Ads

18 November 2019

महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे 18/11/2019

1. पुढील शब्दाचा सामासिक प्रकार कोणता? (दारोदार)
अव्ययीभाव
बहुव्रीही
व्दंद
तत्पुरुष

● उत्तर - अव्ययीभाव

2. थंड फराळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पैकी कोणता?
उपाशी राहणे
थंड पदार्थ खाणे
भरपुर फराळ करणे
थंड करून मग खाणे

● उत्तर - उपाशी राहणे

3. शिपायाने चोरास पकडले प्रयोग ओळखा.
कर्मणी
भावे
कर्मभावसंस्कार
कर्तरी-कर्म संकर

● उत्तर - भावे

4. पद्य सुरावर म्हणण्याची पध्दत म्हणजे खालील पैकी काय?
कविता
चाल
गद्य
गाण

● उत्तर - गाण

5. ‘ शब्द लावणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या .
दोष देणे
शब्दांनी रचना करणे
लेखन करणे
बोलणे

● उत्तर - दोष देणे

6. 'उंदिर' या नामाचे अनेक वचन कोणते?
उंदरे
उंदरांना
उंदीरं
अनेकवचन होत नाही

● उत्तर - अनेकवचन होत नाही

7. 'दही' या शब्दाचा प्रकार कोणता?
तत्सम
तद्भव
परभाषिक
यापैकी नाही

● उत्तर - यापैकी नाही

8. 'बोलका पोपट उडून गेला.'
'बोलका' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
धातुसाधित विशेषण
गुण विशेषण
अनिश्चय वाचक
ते विशेषणाच नाही

● उत्तर - गुण विशेषण

9. हत्ती गेला ...... राहिले.
चिन्ह
अंकुश
शेपूट
माहूत

● उत्तर - शेपूट

10. नाशिकहून मुंबई २०० किलोमिटर आहे.
तृतीय
पंचमी
सप्तमी
व्दितीय

● उत्तर - पंचमी

Super - 30 Questions Current Affairs

1.   पाचवे भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
✅.  कोलकाता

2. ऑस्ट्रेलियात झालेल्या फेड चषक 2019 या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले?
✅.  : फ्रान्स

3.   ‘फूझौ चाइना ओपन 2019’ या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद कोणी पटकावले?
✅.   केंटो मोमोटा

4.  NASAचे पहिले संपूर्ण विद्युत चलित विमान कोणत्या प्रयोगासाठी बनवले आहे?
✅.  मॅक्सवेल X-55

5.   BRICS व्यापार मंत्र्यांची 9 वी बैठक कोठे होणार आहे?
✅.   ब्राझिलिया

6.   ‘MILAN’ सरावाच्या संदर्भातली मध्य नियोजन परिषद (MPC) कुठे पार पडली?
✅.  विशाखापट्टणम

7.  मॉरिशस या देशात झालेल्या निवडणूकीत कोणत्या व्यक्तीच्या पक्षाचा विजय झाला?
✅.   प्रविंद जुगनाथ

8.  11 वा बाल संगम महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे?
✅.  नवी दिल्ली

9.  राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) प्रक्रियेचे राज्य समन्वयक कोण आहेत?
✅.  हितेश देव शर्मा

10.   नवोदय विद्यालय समितीसाठी बनवण्यात आलेल्या डिजिटल व्यासपिठाचे नाव काय?
✅.  शाला दर्पण

11.  ‘युरोपियन ओपन 2019’ ही स्पर्धा कुणी जिंकली?
✅.  अँडी मरे

12.   आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटने (ISSA)ची स्थापना कोणत्या साली झाली?
✅. : सन 1927

13.   भारतीय बँक संघाचे (IBA) अध्यक्ष कोण आहेत?
✅.  रजनीश कुमार

14.  ‘एशियन ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेत कोणत्या भारतीयाने सुवर्णपदक पटकावले?
✅.   रोनाल्डो सिंग

15.  ‘स्टार्टअप शिखर परिषद’ कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती?
✅.   नवी दिल्ली
@mpsctopper7

16.  ‘नॉन-अलाइन्ड मूव्हमेंट (NAM) शिखर परिषद 2019’ कुठे भरणार आहे?
✅.  बाकू

17.   वित्तीय कृती दलाच्या (FATF) ‘ग्रे लिस्ट’ मधून कोणत्या देशाला हटविण्यात आले आहे?
✅.   श्रीलंका

18. सुलतान ऑफ जोहोर चषक या पुरुष हॉकी स्पर्धेत कोणत्या संघाने भारताला पराभूत केले?
✅. : ग्रेट ब्रिटन

19.  फेब्रुवारी 2020 मध्ये ‘डिफेन्स एक्सपो’ कुठे भरवण्यात येणार आहे?
उत्तर : लखनऊ

20.  सॅंटियागो शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?
✅.  चिली

21.   क्षयरोगावर उपचारांसाठी ‘प्रेटोमनाईड’ हे औषध कोणत्या कंपनीने तयार केले?
✅.  मायलान

22.  एशियामनी कडून दिला जाणारा ‘2019 सालाची एकूणच उत्कृष्ट कंपनी’ हा सन्मान कोणत्या कंपनीला मिळाला?
✅. TCS

23.  "गर्ल, वुमन, अदर" या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत?
✅. बर्नार्डिन इव्हारिस्टो

24.   जागतिक अन्न दिन कधी साजरा केला जातो?
✅.   6 ऑक्टोबर

25.   ‘इंडिया मोबाइल कॉंग्रेस-2019’ ही सभा कुठे आयोजित करण्यात आली?
✅.  नवी दिल्ली

26.  2019 या वर्षीचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार कोणी जिंकला?
✅.  अभिजीत बॅनर्जी

27.  जागतिक विद्यार्थी दिन कधी साजरा केला जातो?
✅.  15 ऑक्टोबर

28.  2019 सालाचा बुकर पुरस्कार कोणी जिंकला?
✅.  मार्गारेट अ‍ॅटवुड आणि बर्नार्डिन इव्हारिस्टो

29.   ‘लोटस-HR’ हे कशाशी संबंधित आहे?
✅.   जलशुद्धीकरण

30.  ‘बियॉन्ड 2020: ए व्हिजन फॉर टुमारोज इंडिया’ पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
✅.  : डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम

चालू घडामोडी प्रश्नसंच 17/11/2019

📌रेलगाड्यांचा वेग वाढवा यासाठी भारतीय रेल्वेनी ____ या मार्गावर प्रगत इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली प्रस्थापित केली.

(A) दिल्ली-पानीपत-अंबाला-कालका मार्ग
(B) ग्रँड कोर्ड मार्ग✅
(C) नवी दिल्ली-मुंबई मुख्य मार्ग
(D) मुंबई-चेन्नई मार्ग

📌लडाखमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते भारतातला सर्वाधिक उंचीवर असलेल्या पुलाचे उद्घाटन झाले. तो पूल __ नदीवर आहे.

(A) श्योक✅
(B) झांस्कर
(C) सराप
(D) डोडा

📌संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक अन्न कार्यक्रमाने (UNWFP) भारतात 'फीड अवर फ्यूचर' नावाच्या मोहीमेचा प्रारंभ केला. WFP या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे?

(A) रोम✅
(B) हेग
(C) जिनेव्हा
(D) न्युयॉर्क

📌जापान या देशाचे नवे सम्राट कोण आहेत?

(A) सम्राट एमेरिटस अकिहितो✅
(B) सम्राट नरुहितो
(C) सम्राट अकिशिनो
(D) सम्राट हिसाहितो

📌“डार्क फील, एरी सिटीज: न्यू हिंदी सिनेमा इन नियोलिबरल इंडिया” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

(A) एरिक बारनौव
(B) आशिष राजाध्यक्ष
(C) अनुपमा चोप्रा
(D) सरुनास पोंकस्निस✅

📌भारताची प्रथम ‘स्टार्टअप शिखर परिषद’ _ या शहरात आयोजित करण्यात आली.

(A) बेंगळुरू
(B) गुरुग्राम
(C) नवी दिल्ली✅
(D) चंदीगड

17 November 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) माणसाने स्वार्थ व ............... चा विचार करावा. स्वार्थ शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

   1) आप्पलपोटी      2) प्रपंच     
   3) परमार्थ      4) पोटार्थ

उत्तर :- 3

2) समानार्थी म्हण शोधा. ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’

   1) खाऊ जाणे तो पचवू जाणे    2) जशी कुडी तशी पुडी
   3) यापैकी नाही        4) अंथरुण पाहून पाय पसरावे

उत्तर :- 3

3) ‘धिंडवडे निघणे’ या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कोणता ?

   1) फजिती होणे      2) मिरवणूक निघणे 
   3) वडे तळणे      4) बोबडी वळणे

उत्तर :- 1

4) ‘हालअपेष्टा सहन करण्याचा गुण’ चा शब्दसमूहासाठी एक शब्द शोधा.

   1) तितिक्षा      2) गरीब     
   3) दयाळू      4) मायाळू

उत्तर :- 1

5) शुध्द शब्दाचा पर्याय निवडा.

   1) महात्म्य      2) माहात्म्य   
   3) माहात्म      4) महात्म

उत्तर :- 2

6) पुढीलपैकी स्पर्श व्यंजने कोणती आहेत?

   1) अ – आ    2) च – छ   
   3) य – र    4) श – ष

उत्तर :- 2

7) नाविक शब्दाचा विग्रह करा.

   1) नौ + इक = नाविक    2) ना + विक = नाविक   
   3) नाव + इक = नाविक    4) नावी + क = नाविक

उत्तर :- 1

8) एकाच जातीच्या पदार्थामधील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणतात ?

   1) सर्वनाम    2) विशेषनाम   
   3) सामान्यनाम    4) भाववाचकनाम

उत्तर :- 3

9) ‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’ – यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत ?

   1) सामान्य      2) संबंधी व दर्शक   
   3) पुरुषवाचक व दर्शक    4) संबंधी व सामान्य

उत्तर :- 2

10) ‘व्दिगुणित आनंद’ या शब्दातील ‘व्दिगुणित’ शब्द ................. संख्याविशेषण आहे.

   1) क्रमवाचक    2) आवृत्तीवाचक   
   3) अनिश्चित    4) गणनावाचक

उत्तर :- 2

Bhopal gas tragedy: पीडितांच्या न्यायासाठी लढणारे अब्दुल जब्बार यांचं निधन

🔰भोपाळ : भोपाळ वायू दुर्घटनेतील पीडितांच्या न्यायासाठी लढणारे अब्दुल जब्बार यांचे गुरुवारी खासगी रुग्णालयात निधन झालं. 2 डिसेंबर 1984 ला मध्य प्रदेशातील भोपाळ येथे वायुगळतीची घटना घडली. यात कित्येक हजार लोकांचा मृत्यू तर, 1 लाखांपेक्षा अधिक लोक आजारी पडले होते. या पीडितांना कंपनीने केलेली मदत तुटपुंजी असल्याने अब्दुल जब्बार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तेव्हापासून ते पीडितांच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढत राहिले.

🔰अब्दुल जब्बार यांच्यावर काही महिन्यांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. ते स्वतः देखील भोपाळ वायू दुर्घटनेतील पीडित होते. या घटनेत त्यांची 50 टक्के दृष्टी आणि फुफ्फुसातही संसर्ग झाला. जगभरातील औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठा अपघातात याची गणना होते. कारण घटनेनंतरच्या आठ-दहा दिवसांत अडिच हजारांच्या वर माणसे मृत्युमुखी पडली. गेल्या 30 वर्षांत किती माणसे अपंग झाली अथवा जिवास मुकली त्याची गणनाच नाही.

🔰अब्दुल जब्बार यांनी पीडितांच्या न्याय हक्कासाठी भोपाळ गॅस पीडित उद्योग संघटना स्थापन केली. ही संघटना औद्योगिक क्षेत्रातील दुर्घटनेतील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत आहे. गुरुवारी मध्य प्रदेश सरकारने अब्दुल जब्बार यांच्या होणाऱ्या उपचाराचा खर्च सरकार करेल, अशी घोषणा केली होती. ही मदत जब्बार यांच्यापर्यंत पोहचण्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.

🔴 भोपाळ वायुगळती दुर्घटना -

🔰मिक वायूचा वापर करुन सेविन हे कीटकनाशक त्या कारखान्यात तयार करण्यात येत होते. अपघाताच्या पूर्वी दीड महिना अगोदरपासून सेविनचे उत्पादन बंद करण्यात आले होते. मात्र, उरलेला 50 टनांपेक्षा अधिक वायू 2 टाक्यांमध्येच पडून होता. त्या टाकीत पाणी गेल्याने आतील मिक वायूचा दाब तीन किलोग्राम एवढा वाढला. परिणामी टाकीचे तापमान वाढल्याने तिच्यावरची सेफ्टी व्हाल्व्ह उघडली गेली आणि वायू बाहेर सुटला. यात अपरिमित मनुष्य व वित्त हानी झाली. त्यावेळी अपंग झालेले भोपाळमधील लोक आजही त्याचे परिणाम भोगत आहेत. कितीजणांना नुकसान भरपाई मिळाली ते माहीत नाही. कारखाना बंद पडल्याने लोकांच्या नोक‍ऱ्या गेल्या.

न्यूझीलँडने 2050 सालापर्यंत ‘शून्य कार्बन उत्सर्जन’ लक्ष्य ठेवणारा कायदा मंजूर केला..

🍀न्यूझीलँड या देशाने 2050 या सालापर्यंत कार्बनचे होणारे उत्सर्जन निव्वळ शून्यावर आणण्याची योजना तयार केली आहे आणि त्यासंदर्भातला कायदा संसदेने 7 नोव्हेंबर 2019 रोजी मंजूर देखील केला.

🍀पॅरिसच्या हवामान कराराच्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून 2050 या सालापर्यंत ‘मिथेन’ वायू वगळता हरितगृह वायूंच्या (GHG) उत्सर्जनास पुर्णपणे आळा घालण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.त्याच कालावधीत कृषी क्षेत्रातले उप-उत्पादन असलेल्या ‘मिथेन’ वायूच्या उत्पादनात 24-47 टक्क्यांनी कपात करण्याची योजना आहे.

🍀लक्ष्य साध्य करण्यासाठी सरकारला सल्ला देण्यासाठी आणि दर पाच वर्षांनी "कार्बन बजेट" तयार करून किती उत्सर्जन करण्यास परवानगी दिली जावी हे सांगण्यासाठी एक स्वतंत्र ‘क्लायमेट चेंज कमिशन’ची स्थापना करण्यात येणार आहे.

🍀न्यूझीलँड केवळ 50 दशलक्षांपेक्षा कमी लोकसंख्या असलेला देश आहे आणि त्याने 2035 या सालापर्यंत 100 टक्के अक्षय ऊर्जा निर्मितीची वचनबद्धता दर्शविलेली आहे.

शबरीमला’चा वाद सात न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे

🅾शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश द्यायचा की नाही, याचा निर्णय आता सात न्यायमूर्तीचे खंडपीठ घेणार आहे. या संदर्भातील फेरविचार याचिकेवर तीन विरुद्ध दोन अशा बहुमताने सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी हा निकाल दिला. तर धर्माशी निगडित प्रथा-परंपरांचा सखोल आढावा घेण्याची आवश्यकता असल्याचे मत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी मांडले.

🅾शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेशबंदी असल्याच्या प्रथेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने संविधानातील समान हक्कांचा आधार घेत सर्व वयोगटांतील महिलांच्या प्रवेशास मुभा दिली. २८ सप्टेंबर २०१८ रोजी बहुमताने दिलेला हा निकाल घटनापीठाच्या पुढील निकालापर्यंत कायम राहणार आहे. शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही.

🅾सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ निकालाविरोधात ६० फेरयाचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर एकत्रित सुनावणी घेतल्यानंतर गुरुवारी दिलेल्या निकालात सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. अजय खानविलकर आणि न्या. इंदू मल्होत्रा यांनी धर्मप्रथांचा सखोल विचार करून अर्थ लावला पाहिजे, असे मत व्यक्त केले. यापूर्वीच्या निकालामध्ये नोंदवलेले मत न्या. मल्होत्रा यांनी कायम ठेवले आहे. न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. रोहिंग्टन फली नरिमन यांनी संविधान सर्वोच्च असून तोच ‘पवित्र ग्रंथ’ असल्याचे मत मांडून सर्व वयोगटांतील महिलांना मंदिरात प्रवेश देण्यास अनुकूलता दर्शवली होती.

पोलीस भरती प्रश्नसंच 17/11/2019


*Q.1] भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण आहेत?*
A] पंडित नेहरू
B] सलीम अली
C] जिम कोर्बेट
D] कैलास सांकला
*उत्तर: D] कैलास सांकला*
________________________________
*Q.2] नवाश्मयुगात खालीलपैकी कोणता धातू मानवाला परिचित होता?*
A] लोखंड
B] तांबे
C] चांदी
D] यापैकी नाही
*उत्तर: D] यापैकी नाही.*
________________________________
*Q.3] भारतातील मॅंगनीजच्या मोठ्या साठ्यांपैकी एक साठा महाराष्ट्रात कोठे आहे?*
A] गडचिरोली
B] भंडारा
C] यवतमाळ
D] वर्धा
*उत्तर: B] भंडारा.*
________________________________
*Q.4] सुर्यसेनला पकडून देण्यास इंग्रजांची मदत कोणी केली?*
A] गणेश द्रविड
B] वांची अय्यर
C] नेत्रसेन
D] रामचंद्र यादव
*उत्तर: C] नेत्रसेन.*
________________________________
*Q.5] भारतातील पहिला रेयॉन प्रकल्प १९५० साली कोणत्या राज्यात उभारला गेला?*
A] उत्तर प्रदेश
B] केरळ
C] तामिळनाडू
D] महाराष्ट्र
*उत्तर: B] केरळ.*
________________________________
*Q.6] महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला?*
A] लतिका घोष
B] सरोजिनी नायडू
C] कृष्णाबाई राव
D] उर्मिला देवी
*उत्तर: A] लतिका घोष.*
________________________________
*Q.7] जगप्रसिद्ध पंचमहासरोवरे कोणत्या देशात आहेत?*
A] भारत
B] रशिया
C] अमेरिका
D] जपान
*उत्तर: C] अमेरिका.*
________________________________
*Q.8] अलाहाबाद येथील स्तंभालेख खालीलपैकी कोणाशी संबंधीत आहे?*
A] महापद्म नंद
B] समुद्रगुप्त
C] चंद्रगुप्त मौर्य
D] सम्राट अशोक
*उत्तर: B] समुद्रगुप्त.*
________________________________
*Q.9] सरहिंद कालवा कोणत्या राज्यात आहे?*
A] पंजाब
B] जम्मू काश्मीर
C] हिमाचल प्रदेश
D] उत्तराखंड
*उत्तर: A] पंजाब.*
________________________________
*Q.10] भारताला भेट देणारा 'मार्को पोलो' हा प्रवासी कोणत्या देशाचा होता?*
A] चीन
B] पोर्तुगाल
C] इटली
D] फ्रांस
*उत्तर: C] इटली.*
________________________________
*Q.11] 'निलम' जातीच्या आंब्याचे भारतातील प्रमुख उत्पादक राज्य कोणते?*
A] महारष्ट्र
B] आंध्रप्रदेश
C] उत्तर प्रदेश
D] पश्चिम बंगाल
*उत्तर: B] आंध्रप्रदेश.*
________________________________
*Q.12] राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अध्यक्षाने १९४२च्या क्रिप्स आणि वेव्हेल योजनेसंबंधी वाटाघाटी घडवून आणल्या?*
A] मौलाना आझाद
B] पंडित नेहरू
C] जे.बी.कृपलानी
D] सी.राजगोपालाचारी
*उत्तर: A] मौलाना आझाद.*
________________________________
*Q.13] 'गोंडवाना कोळसा क्षेत्र' खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते?*
A] छत्तीसगढ
B] महाराष्ट्र
C] कर्नाटक
D] मध्यप्रदेश
*उत्तर: C] कर्नाटक.*
________________________________
*Q.14] लोकमान्य टिळकांची चतुःसूत्री > स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि _ _ _ _ _ _ _ ?*
A] असहकार
B] जहालवाद
C] राजकारण
D] राष्ट्रीय शिक्षण
*उत्तर: D] राष्ट्रीय शिक्षण.*
________________________________
*Q.15] तौला शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?*
A] नाशिक
B] पुणे
C] धुळे
D] नंदुरबार
*उत्तर: A] नाशिक.*

16 November 2019

चालू घडामोडी प्रश्नसंच १६/११/२०१९

que.1 : कोणत्या राज्य सरकारने ई-गन्ना अ‍ॅप, वेब पोर्टल सुरू केले?

1⃣. बिहार

2⃣. पंजाब

3⃣. आंध्र प्रदेश

4⃣. उत्तर प्रदेश✅✅✅

उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील ऊस उत्पादकांसाठी समर्पित वेब पोर्टल आणि मोबाइल अनुप्रयोग, ई-गन्ना अ‍ॅप सुरू केला आहे.

que.2 : हार्ट केअरसाठी योगावरील आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित केली जाईल?

1⃣. केरळ

2⃣. नवी दिल्ली

3⃣. कोलकाता

4⃣. कर्नाटक✅✅✅

Explanation :
आयुष मंत्रालय 15-16 नोव्हेंबर 2019 रोजी कर्नाटकातील म्हैसूर येथे योगा विषयी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करीत आहे. परिषदेची थीम ‘हार्ट केअरसाठी योग’ / आहे.

que.3 : बालदिनानिमित्त खालील पैकी कोणते अ‍ॅप बाल हक्कांचे संरक्षण आसाम राज्य आयोगाने सुरू केले?

1⃣. शिशु सुरक्षा✅✅✅

2⃣. इंद्रधनुष

3⃣. टॉडल्स सेफ्टी

4⃣. मुलांचे संरक्षण

que.4. मॅच फिक्सिंग प्रकरणांना गुन्हेगारीच्या श्रेणीत आणणारा पहिला दक्षिण एशियाई देश कोणता देश बनला आहे?

1⃣. बांगलादेश

2⃣. पाकिस्तान

3⃣. श्रीलंका✅✅✅

4⃣. भारत

que .5 : सन २०२० साठी भारतातील कोणत्या स्मारकाची वर्ल्ड स्मारक वॉच लिस्ट म्हणून निवड केली गेली आहे?

1⃣. सुरंगा बावडी✅✅✅

2⃣. तुशेती राष्ट्रीय उद्यान

3⃣. सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम

4⃣. अजिंठा लेणी

दाल तलाव ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ घोषित केला जाणार

जम्मू व काश्मीर सरकारने श्रीनगरचे प्रसिद्ध दाल तलाव आणि त्याच्याजवळच्या आसपासच्या भागांना इको सेन्सिटिव्ह झोन (ESZ) म्हणून घोषित करण्यासाठी दहा सदस्यांची समिती गठीत केली आहे.

🅱दाल तलाव "लेक ऑफ फ्लॉवर्स", "ज्वेल इन द क्राऊन ऑफ कश्मीर" किंवा "श्रीनगर्स ज्वेल" या नावानेही ओळखले जाते. यात झेलम नदीचे पाणी साठते.

🅱2017 साली केलेल्या अभ्यासानुसार, प्रदूषण आणि अतिक्रमणांमुळे दाल तलाव त्याच्या मूळ क्षेत्रफळापासून म्हणजेच 22 चौरस किलोमीटर क्षेत्रापासून सुमारे 10 चौरस किलोमीटरपर्यंत कमी झाले आहे.

🅱तलावाची क्षमता सुमारे 40 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे आणि पाण्याची गुणवत्ता खालावली आहे. तलावाच्या आरोग्यास धोका तयार झाल्याने तिथले पर्यावरण दूषित झाले आहे. हे स्थळ पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. तिथे 800 ते 900 हाऊसबोटी देखील आहेत.

चालू घडामोडी प्रश्न:-

* IIT मद्रासने विकसित केलेले RISC-C इंस्ट्रक्शन सेट आर्किटेक्चरवर आधारीत असलेली भारताची प्रथम स्वदेशी इलेक्ट्रॉनिक प्रोसेसर चीप – शक्ती प्रोसेसर.

* 'गगनयान' अंतराळ मोहिमेसाठी भारताच्या अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्याकरिता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) या देशाच्या कंपनीसोबत करार केला – रशिया (ग्लॅवकोसमोस कंपनी).

*  या कंपनीने भारतात 'डिजिटल उडान' नावाचा डिजिटल साक्षरता उपक्रम जाहीर केला - जियो.

*  नासाची कोणती अंतराळ दुर्बीण २० जानेवारी २०२० रोजी बंद पडणार आहे:- स्पीटझर

*  इस्रोच्या चांद्रयान २ या प्रकल्पाचे नेतृत्व करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या महिला शास्रज्ञाची नेमणूक करण्यात आली आहे:- रितू करीधल व मुथय्या वनिथा

*  जगातील सर्वात लांब पूल कोणता :-हाॅगकाॅग-झुहाई पूल

* रुस्तम काय आहे:- संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेले मानवरहित हवाई वाहन आहे

*  दस्तक अभियान काय आहे:- उत्तर प्रदेश राज्य शासनाने युनिसेफच्या सहकार्याने घरोघरी पोहचणारे दस्तक नामक अभियान आहे. त्याचे उद्दिष्टे हे जपानी मेंदुज्वाराचे राज्यातून उच्चाटन करणे हा आहे.

* मंत्रालयातील महिला कर्मचारी तसेच मंत्रालयात स्तनदा मातांना आपल्या बाळांना स्तनपान करणे सुलभ व्हावे यासाठी मंत्रालयात स्थापन करण्यात आलेल्या कक्षाचे नाव काय आहे:- हिरकणी कक्ष

१ डिसेंबरपासून टोलच्या नियमांमध्ये होणार ‘हा’ मोठा बदल

🅾१ डिसेंबरपासून टोलच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवरील सर्व टोल प्लाझांमध्ये फास्टॅगद्वारे टोलची रक्कम भरता येणार आहे.

🅾केंद्र सरकारनं १ डिसेंबरपासून संपूर्ण देशात सर्व वाहनांना फास्टॅग लावणे अनिवार्य करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत घोषणा केली होती.

🅾नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानं देशभरतील सर्व टोल प्लाझांवर इलेक्ट्रॉनिक टोल घेण्यास सुरूवात केली आहे. यासाठी वाहन चालकांना आपल्या गाड्यांवर फास्टॅग लावावं लागणार आहे. हा फास्टटॅग अधिकृत टॅग विक्रेते किंना बँकेतून विकत घेता येऊ शकतो. काही ठिकाणी पेट्रोल पंपांवरदेखील हा टॅग विकत घेता येणार आहे.

🅾टोल प्लाझावर ऑटोमॅटिक ट्रान्झॅक्शनसाठी विंडस्क्रिनवर फास्टॅक लावावा लागणार आहे. यामध्ये रेडियो फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन (RFDI) देण्यात येते. वाहन टोल प्लाझावर पोहोचल्यावर त्या ठिकाणी लावण्यात आलेला सेन्सर फास्टॅक स्कॅन करतो. त्यानंतर फास्टॅगच्या अकाऊंटमधून पैसे वजा होतील.

बाळाची गर्भावस्था व पोषण


◾मानव 'मॅमल' या गटात मोडतात. म्हणजेच सस्तन प्राणिमात्र असल्याने एकपेशीय.सुरुवातीपासून जन्म होईपर्यंत आईच्या पोटात त्यांची पूर्ण वाढ होते जाते.

◾माणसाची गर्भावस्था ही अडतीस आठवड्यांची असते. हाच काळ छत्तीस ते चाळीस आठवडे येथपर्यंत मागे पुढे होऊ शकतो. या काळातील अवस्थेलाच 'गर्भावस्था' म्हणतात व आईच्या गर्भाशयात ही सर्व वाढ होते.

◾गर्भाशयाला आतील बाजूने तळहाताएवढय़ा पसरट भागात जोडलेल्या अस्तराला 'प्लासेंटा' असे म्हणतात.

◾याचे दुसरे टोक गर्भाच्या नाभीतून गर्भाला पोषणद्रव्ये रक्ताद्वारे पूरवत असते. पुरवठा करणाऱ्या रक्तनलिकांच्या या समुच्चयास 'नाळ' असे म्हणतात. बाळाची नाळ आईच्या गर्भाशयाशी आतील बाजूस जोडलेली असल्याने आईच्या रक्तातील पोषणद्रव्ये जशीच्या तशी बाळाला मिळत राहतात.

◾दहाव्या आठवडय़ाच्या सुमारास बाळाचे अवयव स्पष्ट होऊ लागतात,

t.me/nirmitiacademypune

◾बाविसाव्या आठवड्यात त्याच्या हृदयाच्या स्पंदनांचे ठोकेही ऐकू येऊ शकतात, तर बत्तीसाव्या आठवड्यात बाळ गर्भाशयात पूर्णपणे स्थिर स्थिती घेऊ शकते .

◾या सर्व गोष्टी हल्ली अल्ट्रासाऊंड तपासणीद्वारे नीट दिसूही शकतात.

◾ गर्भावस्थेतील काही दोष असल्यास वरील तपासण्यांचा हल्ली उपयोग केला जातो.

◾त्यावरून बाळाची वाढ, आकारमान यांचा नक्की पत्ता लागू शकतो.

◾पूर्ण वाढ झाल्यावर अडतिसाव्या आठवड्यात एके दिवशी गर्भाशयाचे आकुंचन सुरू होते व गर्भावस्थेतील बाळ योनीमार्गे आईच्या पोटातून जगात जन्म घेते.

◾बाळाचा जन्म झाल्यावर लगेच त्याची नाळ बांधून कापून टाकतात. याच जागी बाळाची बेंबी व नाभी काही दिवसांनी तयार होते.