19 January 2020

जगातील सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप सुरू.

◾चीनमध्ये जगातील सर्वांत मोठा आणि संवेदनशील रेडिओ टेलिस्कोप सुरू करण्यात आला आहे.

◾महत्वाचे म्हणजे या टेलिस्कोपची चाचणीच तीन वर्षे घेण्यात येत होती.

◾हा टेलिस्कोप बनविण्यासाठी चीनला तब्बल 20 वर्षे लागली.

◾हा टेलिस्कोप जगभरातील खगोल शास्त्रज्ञांसाठी खुला करण्यात आला आहे.तसेच चीनमध्ये एवढी प्रगत टेक्नॉलॉजी आहे की, हजारो किमी लांबीचे रस्ते आणि गगनचुंबी इमारती बांधण्यासाठी काही महिनेच लागतात.

◾मात्र, या टेलिस्कोप निर्मितीच्या कामाने चीनला मोठा वेळ खर्ची घालावा लागला आहे.

◾ हा टेलिस्कोप गुईझोऊ प्रांतामध्ये बांधण्यात आला आहे.

◾2016 पासून याची चाचणीच घेण्यात येत होती.

◾हा टेलिस्कोप प्युर्टोरिकाच्या अरेसिबो ऑब्झर्व्हेटरीपेक्षा 2.5 पटींनी संवेदनशील आहे.

◾प्युर्टोरिकास्थित ऑब्झर्व्हेटरीमध्ये जगातील दुसरा मोठा सिंगल डिश रेडिओ टेलिस्कोप कार्यरत आहे.

◾ वापर अंतराळात दूरवर जीवजंतूंचा शोध आणि एलियन्सचा शोध घेण्यासाठी करण्याच येतो.

◾चीनचा टेलिस्कोप एका सेकंदात 28 GB माहिती गोळा करण्यात सक्षम आहे. यामुळे त्याला फाईव्ह हंड्रेड मीटर अपार्चर स्पेरिकल रेडिओ टेलिस्कोप (फास्ट) असे नाव देण्यात आले आहे.

◾फास्टची अंतराळातील रेंज चार पटींनी जास्त आहे.

◾टेलिस्कोपने आतापर्यंत जवळपास 44 पल्सरचा शोध लावला आहे.

◾ पल्सर हा वेगाने फिरणारा न्यूट्रॉन किंवा तारा असतो, जो रेडिओ लहरी आणि विद्युत चुंबकीय विकिरण उत्सर्जित करतो.

◾या टेलिस्कोपच्या पाच किमीच्या परिघामध्ये कोणतेही शहर नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

तुम्हाला हे पाठ आहेत ना - काही महत्वाची कलमे

1. घटना कलम क्रमांक 14
कायद्यापुढे समानता

2. घटना कलम क्रमांक 15
भेदभाव नसावा

3. घटना कलम क्रमांक 16
समान संधी

4. घटना कलम क्रमांक 17
अस्पृश्यता निर्मूलन

5. घटना कलम क्रमांक 18
पदव्यांची समाप्ती

6. घटना कलम क्रमांक 19 ते 22
मूलभूत हक्क

7. घटना कलम क्रमांक 21 अ
प्राथमिक शिक्षण

8. घटना कलम क्रमांक 24
बागकामगार निर्मूलन

9. घटना कलम क्रमांक 25
धर्म स्वातंत्र्याचा अधिकार

10. घटना कलम क्रमांक 26
धार्मिक संस्था स्थापन करणे व चालवणे

11. घटना कलम क्रमांक 28
धार्मिक शिक्षण देण्यावर बंधी

12. घटना कलम क्रमांक 29
स्वतःभाषा व लिपी, संस्कृती जतन करणे

13. घटना कलम क्रमांक 30
अल्पसंख्यांक समाजाला शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार

14. घटना कलम क्रमांक 40
ग्राम पंचायतीची स्थापना

15. घटना कलम क्रमांक 44
समान नागरिक कायदा

16. घटना कलम क्रमांक 45
6 ते 14 वयोगटातील मुळा मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण

17. घटना कलम क्रमांक 46
शैक्षणिक सवलत

18. घटना कलम क्रमांक 352
राष्ट्रीय आणीबाणी

19. घटना कलम क्रमांक 356
राज्य आणीबाणी

20. घटना कलम क्रमांक 360
आर्थिक आणीबाणी

21. घटना कलम क्रमांक 368
घटना दुरूस्ती

22. घटना कलम क्रमांक 280
वित्त आयोग

23. घटना कलम क्रमांक 79
भारतीय संसद

24. घटना कलम क्रमांक 80
राज्यसभा

25. घटना कलम क्रमांक 81
लोकसभा

26. घटना कलम क्रमांक 110
धनविधेयक

27. घटना कलम क्रमांक 315
लोकसेवा आयोग

28. घटना कलम क्रमांक 324
निर्वाचन आयोग

29. घटना कलम क्रमांक 124
सर्वोच्च न्यायालय

30. घटना कलम क्रमांक 214
उच्च न्यायालय

भारताने ‘हार्मुझ शांती पुढाकार’मध्ये भाग घेतला

◾️भारताने ‘हार्मुझ शांती पुढाकार’ यात भाग घेतला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश्य जगातल्या सर्वात व्यस्त आणि मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जलवाहतुकीच्या मार्गामध्ये शांती प्रस्थापित करून ते क्षेत्र स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणे हा आहे.

◾️या प्रदेशातल्या देशांमधली प्रादेशिक अखंडता आणि राजकीय स्वातंत्र्य याची हमी देणारा हा उपक्रम देशांमधली एकता, परस्पर समन्वय तसेच शांततापूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंध वाढविण्यासाठी आहे.

✍होर्मुज समुद्रधुनी: जागतिक तेलाची एक महत्त्वाची वाहिनी

◾️पर्शियन खाडीमध्ये होर्मुज समुद्रधुनी आहे.

◾️होर्मुज समुद्रधुनीच्या क्षेत्रातून जगातले एक पंचमांश तेल वाहून नेल्या जाते. ही समुद्रधुनी ओमान आणि इराण या देशांच्या दरम्यान आहे.

◾️ही समुद्रधुनी उत्तर आखाती प्रदेशाला जोडते आणि दक्षिणेकडे ओमानची खाडी आणि त्यापलीकडे अरबी समुद्र आहे. ही समुद्रधुनी 21 मैल (33 किमी) अंतरावर पसरलेली आहे.

◾️या मार्गे OPECचे सदस्य असलेले सौदी अरब, इराण, संयुक्त अरब अमीरात (UAE), कुवैत आणि इराक बहुतांश तेल निर्यात करीत आहेत.

◾️कतार हा जगातला सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा (LNG) निर्यातदार देश आहे आणि जवळपास सर्व LNG या मार्गे पाठवते.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पियुष गोयल यांच्याकडे जागतिक आर्थिक मंच-2020 साठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व

🎆 दावोस येथे होणाऱ्या मंत्रीस्तरीय बैठकीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्र्यांचा सहभाग

🎆 केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल दावोस येथे होणाऱ्या 50 व्या जागतिक आर्थिक मंचासाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. दावोस येथे 20 ते 24 जानेवारी 2020 दरम्यान जागतिक आर्थिक मंच-2020 चे आयोजन करण्यात आले आहे.

🎆 पियुष गोयल यांच्यासमवेत केंद्रीय नौवहन आणि रसायने व खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय, कर्नाटक आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री, पंजाबचे अर्थमंत्री, तेलंगणाचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री, उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाचे सचिव, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच इनव्हेस्ट इंडियाचा शिष्टमंडळात समावेश असणार आहे.  

🎆 पियुष गोयल ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, रशिया, सौदी अरब, स्वित्झर्लंड, कोरिया आणि सिंगापूर या देशांच्या मंत्र्यांसमवेत होणाऱ्या बैठकीत सहभागी होणार आहेत. तसेच ते जागतिक व्यापार संघटनेचे संचालक आणि आर्थिक सहकार्य आणि विकास संस्था (ओईसीडी) च्या सरचिटणीसांना भेटणार आहेत.

🎆 याव्यतिरिक्त केंद्रीय मंत्री विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत द्वीपक्षीय चर्चा करणार आहेत. भारतीय रेल्वेमध्ये गुंतवणूक वाढवणे आणि देशात जागतिक गुंतवणूक निर्माण करणे याविषयी बैठक घेणार आहेत.     

🎆 दावोसमध्ये होणाऱ्या जागतिक व्यापर संघटनेच्या अनौपचारिक मंत्रीस्तरीय संमेलनातही केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सहभागी होणार आहेत.

🎆 दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत जगातील आघाडीचे नेते जागतिक, प्रादेशिक आणि औद्योगिक मुद्यांवर चर्चा करणार आहेत. एकत्रित आणि शाश्वत विश्वाचे भागीदार ही यावर्षीच्या बैठकीची संकल्पना आहे

मुंबई महापालिकेत मेगा भरती; लवकरच होणार ऑनलाईन परीक्षा


चतुर्थ श्रेणीतील कामगार, कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीनंतर आता मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा मेगाभरती होणार आहे. लिपिक अर्थात कार्यकारी सहाय्यक पदाची मेगा भरती लवकरच होणार आहे. महापालिकेतील ८१० कार्यकारी सहाय्यकांच्या रिक्तपदांची भरती होणार असून लवकरच याबाबतची ऑनलाईन परीक्षा घेवून भरती प्रक्रीया राबवली जाणार आहे.

मुंबई महापालिकेतील कार्यकारी सहाय्यक वर्गातील एकूण ८१० रिक्तपदे सरळसेवेद्वारे भरण्यात येणार आहे. ही पदे भरण्यासाठी महापालिकेने महाऑनलाईन लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीच्या माध्यमातून या पदांची भरती सरळसेवेत करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवणे, संगणक ज्ञानाची परीक्षा आणि बहुपर्यायी वस्तूनिष्ठ ऑनलाईन परीक्षेसह इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची ऑनलाईन व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अंदाजित खर्च ७ कोटी ८० लाख ८३ हजार ५५० रुपये एवढा येणार आहे.

मुंबई महापालिकेत लिपिक अर्थात कार्यकारी सहाय्यक वर्गाची एकूण ५२५५ पदे आहेत. त्या पदांपैकी सरळसेवा पध्दतीने ३२२१ पदे भरायची आहेत. त्यातील सरळसेवेपैकी रिक्त असलेली ८१० पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे खुल्या आणि आरक्षित प्रवर्गात एकूण १ लाख अर्ज येणे अपेक्षित आहेत. या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकडून प्रत्येकी ९०० रुपये शुल्क घेतले जाणार आहे. तर मागास व इतर मागास प्रवर्गातील उमदेवारांकडून प्रत्येकी ७०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे संबंधित कंपनीची निवड तसेच परीक्षा घेण्यास मंजुरी प्राप्त व्हावी यासाठी स्थायी समितीपुढे प्रस्ताव सादर करण्यात येत असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी सष्ट केले.
सर्व उमेदवारांचे ऑनलाईन पध्दतीचे अर्ज मागवण्यासाठी अर्जाचा नमुना महाऑनलाईन यांच्या महा रिक्रुटमेंट या संकेतस्थळावर अपलोड केले जाणार आहे. याची लिंक मुंबई महापालिकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहे.

महाआयटी आणि आय.बी.पी.एसची माघार
महापालिकेच्या या कार्यकारी सहाय्यक पदासाठी उमेदवारांची इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची व्यावसायिक चाचणी परीक्षा घेणे आवश्यक आहे. परंतु टंकलेखनाची चाचणी परीक्षा घेण्यास शासन नियुक्त महाआयटी आणि आय.बी.पी.एस या नामांकित संस्थांनी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे या कंपन्यांनी माघार घेतल्याने महाऑनलाईन लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आल्याचेही अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

बीसीसीआय बनली जगातील सर्वांत शक्तिशाली क्रिकेट संघटना

👉भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही जगातील सर्वात शक्तिशाली क्रिकेट संस्था बनली आहे. 

👉आता एवढ्या मोठ्या संख्येत क्रिकेट फॅन्स असणाऱ्या देशात तितकेच मोठे क्रिकेट स्टेडियम उभारले जात आहे.

👉गुजरातच्या अहमदाबादमध्ये उभारण्यात येणारे मोटेरा स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ठरणार आहे.

👉मोटेरा स्टेडियममध्ये एकाचवेळी तब्बल 1 लाख 10 हजार प्रेक्षक बसतील एवढी याची आसन क्षमता तयार करण्यात आली आहे.याचबरोबर हे मोटेरा स्टेडियम सध्या जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला (एमसीजी) मागे टाकेल.

👉एमसीजीची आसनक्षमता 1 लाख 24 इतकी आहे. जानेवारी 2018 मध्ये मोटेरा स्टेडियमच्या उभारणीस प्रारंभ झाला असून सध्या याचे निम्म्याहून अधिक काम झाले आहे.

👉गुजरात क्रिकेट असोसिएशन (जीसीए) च्या देखरेखेखाली मोटेरा स्टेडियमचे बांधकाम सुरू आहे. भव्यदिव्य अशा या मोटेरा स्टेडियममध्ये तांबड्या आणि काळ्या मातीपासून तयार केलेल्या तब्बल 11 खेळपट्ट्या असतील. आणि फिरकी आणि वेगवान अशा दोन्ही गोलंदाजांना अनुकूल अशी खेळपट्टी बनविण्यात येत असल्याची माहिती जीसीएचे अध्यक्ष धनराज नथवानी यांनी दिली. 

👉मोटेरा हे भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोलकातामधील ऐतिहासिक ईडन गार्डनलाही मागे टाकेल. ईडन गार्डन्सची आसन क्षमता 68 हजार एवढी आहे.

👉ऑस्ट्रेलियातील एमसीजीनंतर ईडन गार्डन हे सध्या जगातील दुसरे मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखले जाते.त्यानंतर पर्थ स्टेडियम आणि हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचा क्रमांक लागतो.

✅जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्टेडियम (मोटेरासहित) : 
1) मोटेरा क्रिकेट स्टेडियम, अहमदाबाद (भारत)
2) मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)
3) ईडन गार्डन, कोलकाता (भारत)
4) पर्थ स्टेडियम, पर्थ (ऑस्ट्रेलिया)
5) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद (भारत)

मराठमोळे हरीश साळवे ब्रिटनच्या महाराणीचे वकील

आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची थेट ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती झाली आहे.

ब्रिटनच्या न्यायमंत्रालयाने नव्या नियुक्त्या संदर्भातील यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये मराठमोळे हरीश साळवे यांच्या नावाचा समावेश आहे.

हरीश साळवे ब्रिटनच्या महाराणीसाठी कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे ‘क्वीन काऊंसिल’ म्हणून काम पाहतील.

16 मार्च रोजी हरीश साळवे यांची अधिकृतपणे नियुक्ती होईल.

कायदा आणि वकिलीच्या क्षेत्रामध्ये महत्वाची आणि मोठी कामगिरी करणाऱ्यांना ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून निवडले जाते.

साळवे यांचे आंतरराष्ट्रीय कायदाक्षेत्रातील मोठे योगदान असल्याने त्यांना हा बहुमान मिळाला आहे.

सोलापुरात सुरु होतेय फॉरेन्सिक लॅब!

◾️ राज्यात सध्या 8 विभागीय आणि 5 लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा (फॉरेन्सिक लॅब) आहेत.

◾️ फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून वर्षभरात जवळपास अडीच लाख प्रकरणांची तपासणी केली जात आहे.

◾️सोलापूरच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये रक्त, विष आणि व्हिसेरा तपासणी होणार आहे.
◾️भविष्यात फॉरेन्सिक लॅबमध्ये अल्कोहोल संदर्भातील प्रकरणांचीही तपासणी होणार असल्याचे राज्याचे पोलिस महासंचालक (न्यायिक व तांत्रिक) हेमंत नगराळे यांनी सांगितले. 

रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्जेई लेवरोव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट.

💠रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्जेई लेवरोव यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. रायसीना संवादात भाग घेण्यासाठी  लेवरोव भारत दौऱ्यावर आले आहेत.

💠पररराष्ट्र व्यवहार मंत्री लेवरोव यांनी पंतप्रधानांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष  ब्लादिमीर पुतीन यांच्यातर्फे शुभेच्छा दिल्या.

💠पंतप्रधानांनी 13 जानेवारी 2020 ला दूरध्वनीवरून राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासह झालेली चर्चा आणि गेल्या वर्षी दोन्ही देशात विशेष आणि विशेषाधिकार धोरणात्मक भागीदारीमध्ये झालेल्या प्रगतीचा उल्लेख केला.

💠75 व्या विजय दिवसानिमित्त मे 2020 मध्ये होणारा पंतप्रधानांचा रशिया दौरा ब्रिक्स तसेच एससीओ शिखर संमेलनासाठीचा जुलै दौरा यासाठी पुतीन उत्सुक असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी सांगितले. पुतीन यांना भेटण्यासाठी यावर्षी अनेक संधी मिळणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

💠 या वर्षअखेर द्विपक्षीय शिखर  संमेलनासाठी पुतीन यांचा पाहुणचार करण्याची संधी मिळणार असून त्यासाठी आपण उत्सुकतेने  प्रतीक्षा करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

💠दोन्ही देशांमध्ये 2019 मध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झाले असून त्यांचे परिणाम दिसून येत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. वर्ष 2020 हे भारत आणि रशियातील धोरणात्मक भागीदारीच्या स्थापनेचे 20 वे वर्ष असून हे वर्ष ‘या निर्णयांचे कार्यान्वयन वर्ष’ झाले पाहिजे असे त्यांनी सुचवले.
परराष्ट्र व्यवहार मंत्री लेवरोव यांनी पंतप्रधानांना प्रमुख क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर रशियाच्या भूमिकेची माहिती दिली.

एनआयए कायद्याला छत्तीसगडचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान

🔰नवी दिल्ली : काँग्रेसप्रणीत यूपीए १सरकारच्या काळात करण्यात आलेला राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कायदा घटनाबाह्य़ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. 

🔰या कायद्यामुळे राज्यांचे सार्वभौमत्व धोक्यात येऊन केंद्राला अनिर्बंध अधिकार मिळतात असा दावा याचिकेत केला आहे.

🔰केरळ सरकारने नागरिकत्व कायद्याला आव्हान दिले होते त्यानंतर आता एनआयए कायद्याला छत्तीसगड सरकारने आव्हान दिले आहे.

🔰मनमोहन सिंग सरकारने २६ नोव्हेंबर २००८ रोजी एनआयए कायदा मुंबई हल्ल्यानंतर केला होता. त्या वेळी काँग्रेस नेते पी.चिदंबरम हे गृहमंत्री होते.

🔰या कायद्यानुसार एनआयएच्या पथकांना राज्यांची परवानगी न घेता कुठेही जाऊन छापे टाकणे व चौकशी करणे असे अधिकार देण्यात आले आहेत.

🔰छत्तीसगड सरकारने कलम १३१ अन्वये दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे, एनआयए कायद्याने राज्यघटनेतील तत्त्वांचा भंग झाला असून असा कायदे करणे संसदेच्याही कार्यकक्षेत नाही.

रशिया २०२५ पर्यंत भारताला देणार एस - ४०० हवाई सुरक्षा यंत्रणा.

🔰 भारतासाठी तयार केल्या जाणार्‍या, जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या लांब पल्ल्याच्या एस ४०० या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीला रशियानं सुरुवात केली आहे.

🔰 ही क्षेपणास्त्र २०२५ पर्यंत भारताकडे सुपूर्द केली जातील अशी माहिती या मोहिमेचे रशियाचे उप प्रमुख रोमन बाबुश्किन यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत दिली. 

🔰 याशिवाय सैनिकी वापरासाठीच्या कामोव्ह या हलक्या हेलिकॉप्टर्सच्या संयुक्त निर्मिती कराराला लवकरच अंतिम रूप दिलं जाईल, असं ते म्हणाले.

🔰 रशिया यावर्षी भारताला पाच हजार कलाश्निकोव्ह राइफली देणार आहे, असं त्यांनी सांगितलं. 

🔰 एस ४०० हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणाली जगातल्या सर्वोत्तम यंत्रणेपैकी एक आहे, यामुळे भारताची हवाई सुरक्षा अधिक मजबूत होईल असं बाबुश्किन म्हणाले.

🔰 भारत आणि रशिया यांच्या २०१८ मध्ये यासंबंधीचा पाच अब्ज डॉलर्स चा करार झाला होता.   

विषय : इंग्रजी व्याकरण

*126) Select the correct meaning of the underlined word. ?*

     *The idea had distinct possibilities.*

1) chances   
2) odds   
3) alternatives   
4) *prospects ☑*

*127) Choose the correct articles to fill in the blanks. ?*

   a) …………… apples are grown in many different countries.

   b) ………….. apples on our tree are not yet ripe.

1) The, no article 
2) The, the 
3) *No article, the ☑*
4) An, the

*128) Choose the option to fill in the blank in the following sentence. ?*

     *Radha ………….. six pillow cases since seen O’clock this morning.*

1) was making 
2) is making 
3) *has made ☑*
4) none of the above

*129) The doctor gave him medicine. In the passive form, the sentence will be. ?*

   a) He has been given medicine by the doctor.
   b) Medicine was given to him.
   c) He was given medicine.
   d) Medicine has been given to him by the doctor.

1) Only (a) and (d) are right.
2) Only (c) and (d) are right.
3) *Only (b) and (c) are right. ☑*
4) All four are right.

*130) He said, “Please help me”. Choose the option with the correct indirect form of the above ?*

1) He pleased me to help me.   
2) *He requested me to help him. ☑*
3) He ordered me about helping.   
4) He said I need help.

*131) Which one of the following alternatives is not a ‘preposition’?*

1) *an ☑*
2) what     
3) that     
4) whatever

*132) Fill in the blank with suitable modal. Choose the correct alternative.*

    *Mother : (to her daughter) I want to watch ‘Aaj Tak’ …………… you change the channel please?*

1) do     
2) may     
3) have     
4) *can ☑*

*133) Choose from the following the verb form of*

*‘liberty’*

1) libertine   
2) liberation   
3) liberality   
4) *liberate ☑*

*134) Choose the right preposition : ?*

*It is natural for a human being to wish …………..money.*

1) of     
2) to     
3) by     
4) *for ☑*

*135) Change the degree of comparison of the sentence given below. ?*

     *This proposal is unique.*

a) This is the most unique proposal       
b) This is the uniquest proposal
c) This proposal is more unique than all others.   
d) This proposal is uniquer than all others.

1) Only a and c are right   
2) Only b and d are right
3) All are right     
4) *None of right. ☑*

*141) Choose the option with all four words spelt correctly. ?*

   1) Lightening, noticeable, vaccum, ocassional   
   2) *Lightning, noticeable, vacuum, occasional ☑*
   3) Lightening, noticable, vaccum, ocassional
   4) Lightning, noticeable, vaccum, ocassional

*142) Choose the option indicating the meaning of the idiom : ?*

     *The boss in my office does not know what happens under his nose.*

1) Below his nose     
2) *In his very presence ☑*
3) With him       
4) to his juniors

*143) Choose the correct sentence from the following. ?*

1) That’s the useful book.   
2) That’s useful book.
3) That’s an useful book.   
4) *That’s a useful book. ☑*

*144) Identify the meaning of the underlined word. ?*

    *We want an equitable distribution of the resources.*

1) *Fair ☑*
2) in the same measure
3) quick   
4) healthy

*145) Choose the correct alternative for the blank. He fell a sleep while he ?*

1) *was reading ☑*
2) has been reading
3) is reading     
4) had read

महागाईचा गेल्या सहा वर्षातील हा सर्वाधिक दर

👉कांदा आणि भाजीपाल्याच्या किमतीत वाढ झाल्याने किरकोळ बाजारात डिसेंबरमध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये महागाई दर ७.३५ टक्क्यांवर गेला असून गेल्या सहा वर्षातील हा सर्वाधिक दर आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्टाची पातळी महागाई दराने ओलांडली आहे.

👉केंद्र सरकारने सोमवारी महागाईची आकडेवारी जाहीर केली. ज्यात डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर ७.३५ टक्क्यांवर गेला आहे. नोव्हेंबरच्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये मूळ महागाई दर ३.७ टक्के आहे. नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई दर ५.५४ टक्के होता. डिसेंबरमध्ये कांदा १५० रुपयांवर गेला होता. अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले होते. पुरवठा कमी झाल्याने भाजीपाल्याच्या किमतीत मोठी वाढ झाली.

👉डिसेंबरमध्ये अन्नधान्य महागाई दर १४. १२ टक्क्यावर गेला आहे. भाजीपाला महागाई दर ६०.५ टक्के होता. ग्राहकोपयोगी वस्तूंमधील महागाई १.७५ टक्के होती. इंधन दराने मात्र दिलासा दिला. रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाई दराचे २ ते ६ टक्के ठेवले आहे. येत्या ६ फेब्रुवारी रोजी पतधोरण जाहीर होणार आहे.

वनजमिनीचा व्यापार करण्यासाठी नवी ‘हरित पत योजना’

वन सल्लागार समितीने ‘हरित पत योजना (ग्रीन क्रेडिट स्कीम)’ यास मान्यता दिली, ज्यायोगे वनजमिनीचा एक वस्तू म्हणून व्यापार करता येणार.

सध्याच्या यंत्रणेत जंगलाचे नुकसान होत असल्याने उद्योगांना पडीक जमीन शोधावी लागते आणि वन विभागाला निव्वळ वर्तमान मूल्य देण्याची गरज आहे. तर वेळोवेळी जंगलात वाढ करण्यासाठी वृक्षारोपण करणे ही वनविभागाची जबाबदारी आहे.

नव्या योजनेमुळे हाल जबाबदारी व्यवस्थेच्या इतर घटकांकडेही सोपवली जाऊ शकणार, त्यामुळे अधिक प्रभावीपणे जंगलांचा विकास आणि त्याचबरोबर त्यावर विसंबून असलेला व्यापार यांना चालना मिळू शकणार.

ठळक बाबी

🔸योजना संस्था, खासगी कंपन्या आणि ग्रामीण वन समुदाय इत्यादींना पडीक जमीन ओळखणे आणि त्यावर वृक्षारोपण करण्याची परवानगी देते.

🔸वृक्षारोपणाच्या तीन वर्षानंतर, वनविभागाने ठरवलेल्या निकषांची पूर्तता केल्यास ती जमीन भरपाई देणारी वन जमीन मानण्यास पात्र ठरणार.

🔸ज्या उद्योगाला वनजमीन हवी असेल ते जबाबदारी घेणार्‍या संस्थेकडे संपर्क साधून त्यांना त्याचा मोबदला देणार आणि पुढे ती जमीन वनविभागाकडे हस्तांतरित केली जाणार आणि वनजमीन म्हणून नोंद होणार. म्हणजेच ही योजना जंगलांना / वनांना एक वस्तू म्हणून व्यापार करण्यास मंजूरी देते.

‘हरित भारत अभियान’च्या अनुषंगाने ही योजना तयार करण्यात आली आहे, ज्याचा उद्देश्य 2020-30 या वर्षापर्यंत 2.523 अब्ज टन कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्याचे आहे. या योजनेत सध्याचा जंगलाव्यतिरिक्त 30 दशलक्ष हेक्टर जमिनीवर जंगल उभे करण्याचे ध्येय ठेवले गेले आहे.

SCOच्या 8 आश्चर्यांमध्ये ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चा समावेश

- जगातला सर्वात उंच पुतळा म्हणजेच गुजरातमधले ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ याचा शंघाई सहकार संघटना (SCO) यांच्या '8 वंडर्स ऑफ SCO' या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

- सदस्य राष्ट्रांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी SCOने हा पुढाकार घेतला आहे.

▪️इतर सात आश्चर्य -

- तमगलीचा भूप्रदेश (Archaeological Landscape of Tamgaly), कझाकस्तान

▪️डॅमिंग पॅलेस, चीन

- इसिक-कुल तलाव, किर्गिस्तान

- मुघल घराण्याचा वारसा, पाकिस्तान

- गोल्डन रिंग, रशिया

- कोही नवरोझ पॅलेस, ताजिकिस्तान

- बुखाराचे ऐतिहासिक केंद्र, उझबेकिस्तान

- स्टॅच्यू ऑफ युनिटी

- गुजरात राज्यात केवडिया येथे “स्टॅच्यू ऑफ युनिटी” या नावाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा 182 मीटर (597 फूट) उंचीचा आहे.

- हा नर्मदा नदीच्या किनारी उभारण्यात आलेला जगातला सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे. हा पुतळा राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळच्या साधू बेटावर उभारलेला आहे. ही शिल्पाकृती जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी साकारली. विक्रमी 33 महिन्यांमध्ये पुतळ्याचे बांधकाम केले गेले.

▪️शंघाई सहकार्य संघटना (SCO)

- शांघाय सहकार्य संघटना (Shanghai Cooperation Organisation -SCO) याची स्थापना 2001 साली झाली आणि त्याचे मुख्यालय चीनच्या बिजींग या शहरात आहे. SCO मध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे.  चीन हा याचा संस्थापक देश आहे.
---------------------------------------------------