Saturday 18 January 2020

पियुष गोयल यांच्याकडे जागतिक आर्थिक मंच-2020 साठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व

🎆 दावोस येथे होणाऱ्या मंत्रीस्तरीय बैठकीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्र्यांचा सहभाग

🎆 केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल दावोस येथे होणाऱ्या 50 व्या जागतिक आर्थिक मंचासाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. दावोस येथे 20 ते 24 जानेवारी 2020 दरम्यान जागतिक आर्थिक मंच-2020 चे आयोजन करण्यात आले आहे.

🎆 पियुष गोयल यांच्यासमवेत केंद्रीय नौवहन आणि रसायने व खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय, कर्नाटक आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री, पंजाबचे अर्थमंत्री, तेलंगणाचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री, उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाचे सचिव, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच इनव्हेस्ट इंडियाचा शिष्टमंडळात समावेश असणार आहे.  

🎆 पियुष गोयल ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, रशिया, सौदी अरब, स्वित्झर्लंड, कोरिया आणि सिंगापूर या देशांच्या मंत्र्यांसमवेत होणाऱ्या बैठकीत सहभागी होणार आहेत. तसेच ते जागतिक व्यापार संघटनेचे संचालक आणि आर्थिक सहकार्य आणि विकास संस्था (ओईसीडी) च्या सरचिटणीसांना भेटणार आहेत.

🎆 याव्यतिरिक्त केंद्रीय मंत्री विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत द्वीपक्षीय चर्चा करणार आहेत. भारतीय रेल्वेमध्ये गुंतवणूक वाढवणे आणि देशात जागतिक गुंतवणूक निर्माण करणे याविषयी बैठक घेणार आहेत.     

🎆 दावोसमध्ये होणाऱ्या जागतिक व्यापर संघटनेच्या अनौपचारिक मंत्रीस्तरीय संमेलनातही केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सहभागी होणार आहेत.

🎆 दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत जगातील आघाडीचे नेते जागतिक, प्रादेशिक आणि औद्योगिक मुद्यांवर चर्चा करणार आहेत. एकत्रित आणि शाश्वत विश्वाचे भागीदार ही यावर्षीच्या बैठकीची संकल्पना आहे

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ पंजाब पोलीसांनी 'मिशन निश्चय' योजना सुरू केली आहे ◾️उद्देश : पंजाब पोलिसांनी ड्रग्जची मागणी आणि पुरवठा याबाबत गुप्तचर माहिती गो...