ए. पी. माहेश्वरी: CRPF चे नवे महानिदेशक

🔰 केंद्रीय IPS अधिकारी ए. पी. माहेश्वरी ह्यांची 13 जानेवारी 2020 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

🔰 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

🔰 उत्तरप्रदेश संवर्गातून 1984च्या तुकडीचे IPS अधिकारी ए. पी. माहेश्वरी सध्या केंद्रीय गृह मंत्रालयात विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा) आहेत.

🔰 31 डिसेंबर 2019 रोजी आर. आर. भटनागर निवृत्त झाल्यानंतर CRPF महानिदेशक हे पद रिक्त होते.

🔴 केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)

🔰 केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) याची स्थापना ‘क्राऊन रिप्रेझेंटेटीव्ज पोलीस’ या नावाने 27 जुलै 1939 रोजी झाली.

🔰 नक्षलविरोधी कारवाई आणि जम्मू व काश्मीरमधल्या दहशतवादविरोधी कारवाया यांची जबाबदारी असलेले देशातले आघाडीचे अंतर्गत सुरक्षा दल आहे.

🔰 त्यात 3.25 लक्षहून अधिक सैनिकांसह हे दल जगातले सर्वात मोठे निमलष्करी दल ठरते.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी

प्रश्न 1:- ₹6 लाख कोटी मार्केट कॅप ओलांडणारी 8वी कंपनी कोणती आहे? उत्तर :- भारती एअरटेल. प्रश्न 2:- सियाचीनमध्ये तैनात करण्यात आलेल्या भा...