१९ जानेवारी २०२०

भारताने ‘हार्मुझ शांती पुढाकार’मध्ये भाग घेतला..

भारताने ‘हार्मुझ शांती पुढाकार’ यात भाग घेतला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश्य जगातल्या सर्वात व्यस्त आणि मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जलवाहतुकीच्या मार्गामध्ये शांती प्रस्थापित करून ते क्षेत्र स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणे हा आहे.

🧬या प्रदेशातल्या देशांमधली प्रादेशिक अखंडता आणि राजकीय स्वातंत्र्य याची हमी देणारा हा उपक्रम देशांमधली एकता, परस्पर समन्वय तसेच शांततापूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंध वाढविण्यासाठी आहे.

🧬होर्मुज समुद्रधुनी: जागतिक तेलाची एक महत्त्वाची वाहिनी...

🧬पर्शियन खाडीमध्ये होर्मुज समुद्रधुनी आहे. होर्मुज समुद्रधुनीच्या क्षेत्रातून जगातले एक पंचमांश तेल वाहून नेल्या जाते. ही समुद्रधुनी ओमान आणि इराण या देशांच्या दरम्यान आहे. ही समुद्रधुनी उत्तर आखाती प्रदेशाला जोडते आणि दक्षिणेकडे ओमानची खाडी आणि त्यापलीकडे अरबी समुद्र आहे. ही समुद्रधुनी 21 मैल (33 किमी) अंतरावर पसरलेली आहे.

🧬या मार्गे OPECचे सदस्य असलेले सौदी अरब, इराण, संयुक्त अरब अमीरात (UAE), कुवैत आणि इराक बहुतांश तेल निर्यात करीत आहेत. कतार हा जगातला सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा (LNG) निर्यातदार देश आहे आणि जवळपास सर्व LNG या मार्गे पाठवते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...