Saturday 18 January 2020

रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्जेई लेवरोव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट.

💠रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्जेई लेवरोव यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. रायसीना संवादात भाग घेण्यासाठी  लेवरोव भारत दौऱ्यावर आले आहेत.

💠पररराष्ट्र व्यवहार मंत्री लेवरोव यांनी पंतप्रधानांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष  ब्लादिमीर पुतीन यांच्यातर्फे शुभेच्छा दिल्या.

💠पंतप्रधानांनी 13 जानेवारी 2020 ला दूरध्वनीवरून राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासह झालेली चर्चा आणि गेल्या वर्षी दोन्ही देशात विशेष आणि विशेषाधिकार धोरणात्मक भागीदारीमध्ये झालेल्या प्रगतीचा उल्लेख केला.

💠75 व्या विजय दिवसानिमित्त मे 2020 मध्ये होणारा पंतप्रधानांचा रशिया दौरा ब्रिक्स तसेच एससीओ शिखर संमेलनासाठीचा जुलै दौरा यासाठी पुतीन उत्सुक असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी सांगितले. पुतीन यांना भेटण्यासाठी यावर्षी अनेक संधी मिळणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

💠 या वर्षअखेर द्विपक्षीय शिखर  संमेलनासाठी पुतीन यांचा पाहुणचार करण्याची संधी मिळणार असून त्यासाठी आपण उत्सुकतेने  प्रतीक्षा करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

💠दोन्ही देशांमध्ये 2019 मध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झाले असून त्यांचे परिणाम दिसून येत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. वर्ष 2020 हे भारत आणि रशियातील धोरणात्मक भागीदारीच्या स्थापनेचे 20 वे वर्ष असून हे वर्ष ‘या निर्णयांचे कार्यान्वयन वर्ष’ झाले पाहिजे असे त्यांनी सुचवले.
परराष्ट्र व्यवहार मंत्री लेवरोव यांनी पंतप्रधानांना प्रमुख क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर रशियाच्या भूमिकेची माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना

👉 1. महंमद गझनवी :- अकराव्या शतकापासून भारतावर तुर्काची आक्रमणे होण्यास सुरुवात झाली. गझनीचा तुर्क सत्ताधीश सबक्तगीन याने भारतावर स्वार्‍या...