19 January 2020

महत्त्वाचे प्रश्नसंच

१) मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशांकाचा वापर होत नाही?(MPSC Main-IV 2016)
१) साक्षरता दर                         २) दरडोई स्थल देशांतर्गत उत्पन्न
३) जन्माच्यावेळी जगण्याचा दर        ४) कृषी उत्पादकता

२) २०१४ च्या मानव विकास निर्देशांकानुसार भारत आणि त्याचा शेजारील देश पाकिस्तान यांचे क्रमांक अनुक्रमे असे आहेत. (MPSC Main-IV 2015)
१)१३५ व १७४             २)१२६ व १३६
३) १३५ व १४६ व          ४)१२५ व १४७

३) जागतिक बँकेच्या विश्व विकास अहवाला (२०१०) बाबत पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?(MPSC Main IV-2015)
अ) विकसनशील अर्थव्यवस्था खाली विश्वाची सुमारे ८३ टक्के लोकसंख्या आहे, ती जगाच्या सुमारे ३८ टक्के स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आय दर्शविते.
ब) युरोपातील काही देश विकसनशील आर्थव्यवस्था दर्शवितात.

पर्यायी उत्तरे
१) केवळ अ         २) केवळ ब            ३) दोन्ही          ४) एकही नाही

४) भ्रष्टाचाराबाबतच्या विधानांचा विचार करा.(MPSC Main-IN 2015)
अ) ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही विविध देशातील भ्रष्टाचाराचे प्रमाण मोजणारी संस्था आहे.
ब) संस्थेने २०१४ यावर्षात १७५ देशांतील भ्रष्टाचाराचा अभ्यास केला,
क) भारताला १०० पैकी ३८ गुण मिळाले.
ड) १७५ देशांमध्ये भारताला ८५ वा क्रमांक मिळाला,
इ) स्वित्झर्लंड सगळ्यात शिखरावर आहे.
फ) सोमालिया सगळ्यात खाली आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने अयोग्य आहेत?
१)क       २) ड        ३) इ        ४) फ

५) २०१४ या मानवी विकास निर्देशांका संदर्भात जुळणी करा. (MPSC Main -IN 2015)
अ) सिंगापूर         i) ०.८९१
ब) इस्त्रायल        ii) ०.९०१
क) जपान          iii) ०.८८८
ड) दक्षिण कोरिया  iv) ०.८९०

उत्तर :- १ - ४, २ -१, ३ -२, ४ - ३, ५ - १

६) लक्ष्मीबाई टिळक यांच्याबाबत पुढील विधाने वाचा चुकीचे विधान ओळखा.

१) 'स्मृतिचित्रे' हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
२) नारायण वामन टिळक हे त्यांच्या पतीचे नाव.
३) लक्ष्मीबाई टिळक व त्यांचे पती नारायण वामन टिळक यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.
४) ब्राह्मण कन्या विवाह विचार हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे.

१)२ ४,          २)४,        ३) १ व २,        ४) २

७) विधाने वाचा समाजसुधारक स्त्री ओळखा.
१) १९२० मध्ये पुण्यात मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करावे यासाठी त्यांनी मोर्चा काढला.
२) स्त्रियांना मतधिकार मिळावेत यासाठी त्यांनी आंदोलन हाती घेतले होते.
३) येरवडा तुरुंगाच्या त्या मानद सचिव होत्या.
४) गांधीजींच्या मते, त्या वैधव्य जीवनाचा आदर्श होत्या.

१) अवंतिका गोखले,        २) पंडिता रमाबाई,
३) अनुसया काळे,           ४) रमाबाई रानडे

८) विधाने वाचा समाजसुधारक ओळखा.

१) 'वेदोक्त धर्म प्रकाश' या ग्रंथाचे ते लेखक होते.
२) पुनर्विवाह, प्रौढ विवाह, घटस्फोट, बाल विवाह, समुद्र पर्यटन, सती याबाबत त्यांचे विचार पुरोगामी होते.
३) मार्क्सच्या विचारांशी त्यांचे विचार काही प्रमाणात जुळतात.

१) विष्णुशास्त्री चिपळूणकर,       २) विष्णुबुवा ब्रह्मचारी,
३) विष्णुशास्त्री पंडित,             ४) रामकृष्ण विश्वनाथ मंडलिक

९) गोपाळराव जोशी यांच्या बाबत पुढील विधाने वाचा. बरोबर विधान ओळखा.
१) गोपाळराव जोशी हे एक विक्षिप्त,जिद्दी,तहेवाईक,जिभेला हाड नसलेले व कशाचा धरबंध नसणारे एक सामान्य गृहस्थ होते. ते पोस्ट खात्यात नोकरीस होते.
२) गोपाळराव जोशी यांनी आपली पत्नी आनंदीबाई जोशींच्या मृत्युनंतर ४ वर्षानी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.
३) श्री. ज. जोशी यांच्या 'आनंदी गोपाळ' या चरित्रपर कादंबरीमुळे व त्यावर अंधारलेल्या नाटकामुळे गोपाळराव जोशी हे नाव महाराष्ट्राला माहित झाले.
४) आगरकरांची निंदानालस्ती करण्यात ते आघाडीवर होते.
आगरकरांची जिवंतपणीच त्यांनी प्रेतयात्रा काढली होती.

१)१ व ३,           २) १,२,३,४,        ३) १,३,४,         ४)१ व २

१०) त्र्यंबकजी डेंगळे यांचे दोन पुतणे गोदांजी व महिपा यांनी L000 .... ची पलटण उभी केली होती.
१) भिल्ल,        २) रामोशी,           ३) कोळी,         ४) यापैकी

उत्तर - ६- २, ७- ४, ८-२, ९ -२, १०-१

१) भारतातील उत्पन्न असमानतेची प्रमख कारणे कोणती?(MPSC Main -IN 2015)
अ) मालमत्तेची खाजगी मालकी
ब) वारसाहक्काचा कायदा
क) करचुकवेगिरी ड) समांतर अर्थव्यवस्था

पर्यायी उत्तरे
१) अ आणि ब
२) ब,क आणि ड
३) अ,क आणि ड
४) वरील सर्व

२) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?(MPSC Main -IV 2015)
अ) यु.एन.डी.पी. च्या (२०१४ च्या) मानव विकास अहवालानुसार, लिंगभेद निर्देशांकानुसार १५२ देशांमध्ये भारताचा १२७ वा क्रमांक लागतो.
ब) त्याच अहवालानुसार मानव विकास निर्देशांकात भारत १८७ पैकी १६५वा आहे.

पर्यायी उत्तरे
१) केवळ अ         २) केवळ ब          ३) दोन्ही         ४) एकही नाही

३) (UNDP) च्या मानव विकास अहवालाप्रमाणे (२००९) पुढील दोन विधानांतील कोणते योग्य नाही?(MPSC Main -IV 2015)
(भारताची आयु अपेक्षा ६३.४ व प्रौढ साक्षरताटक्केवारी (२००७) ६६ होती)
अ) अमेरिका, युके, फ्रान्स, जपान, कॅनडा यांची सरासरी आयु अपेक्षा २००७ सुमारे ८४ होती.
ब) वरील देशात प्रौढ साक्षरता टक्केवारी २००७ मध्ये सुमारे ९९ होती.

पर्यायी उत्तरे
१) केवळ अ       २) केवळ ब          ३) दोन्ही       ४) एकही नाही

४) आर्थिक विकास आणि पर्यावरण यामधील संबंध दर्शवणाऱ्या प्रमेयाचे नाव काय?(MPSC Main-IN 2015)
१) पर्यावरणीय फिलिप्स वक्र गृहितक
२) पर्यावरणीय मार्शल वक्र गृहितक
३) पर्यावरणीय पिगू वक्र गृहितक
४) पर्यावरणीय कुज़्नेत्स वक्र गृहितक

५) लिंगसापेक्ष विकास निर्देशांकात (GDI) कोणत्या पैलूंचा विचार केला जातो? (MPSC Main-IV 2015)
अ) स्त्रियांचे अपेक्षित आयुर्मान
ब) स्त्रियांमधील प्रौढ साक्षरता आणि शाळामधील नावनोंदणी गुणोत्तर
क) स्त्रियांचे दरडोई उत्पन्न
ड) शेतात काम करणाऱ्या स्त्रियांची टक्केवारी

१)ड,ब,अ        २) अ,ब,क       ३) क,ड,ब          ४) अ,ब,क,ड

उत्तर :- १ - ४, २ -१, ३ -१, ४ - ४, ५ - २.

चालू घडामोडी प्रश्नसंच

📍 16 जानेवारीला गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ______ प्रदेशामध्ये पहिली-वहिली अन्नप्रक्रिया शिखर परिषद आयोजित केली गेली.

(A) जम्मू
(B) सिक्किम
(C) लडाख✅✅
(D) हरयाणा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता रशियाचे पंतप्रधान कोण आहेत?

(A) मिखाईल मिशूस्टीन✅✅
(B) रॉबर्ट अबेला
(C) मॅन्युएल व्हॅल्स
(D) महिंदा राजपक्षे


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या देशाशी अमेरिकेचा व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याला मान्यता देणारा करार झाला?

(A) चीन✅✅
(B) भारत
(C) रशिया
(D) इस्त्राएल


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या राज्याने आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाच्या (IUCN) सोबत सामंजस्य करार केला आहे?

(A) अरुणाचल प्रदेश✅✅
(B) आसाम
(C) मणीपूर
(D) मिझोरम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या राज्याच्या पोलीस विभागाने 9 फेब्रुवारीला “हेल्थ रन” नावाने एका आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे?

(A) राजस्थान
(B) हरयाणा
(C) महाराष्ट्र✅✅
(D) उत्तरप्रदेश

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अरुणाचल प्रदेश विधानसभेनी नवीन बोधचिन्ह स्वीकारले


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
- अरुणाचल प्रदेश राज्याच्या विधानसभेनी नवीन बोधचिन्हाचा स्वीकार केला आहे, जो राज्याची विशिष्ट ओळख आणि संस्कृती प्रतिबिंबित करतो.

▪️ठळक बाबी

- नवीन बोधचिन्हामध्ये राष्ट्रीय चिन्ह आणि फॉक्सटेल ऑर्किड (राइन्कोस्टाईलिस रेटुसा) हे राज्य पुष्प आहे.

- राष्ट्रीय चिन्ह भारतीय राज्यघटनेच्या महासंघ यंत्रणेचे प्रतीक आहे.

- फॉक्सटेल ऑर्किड हे राज्याचे राज्य फूल आहे. ते राज्याचे वैशिष्ट्य प्रदर्शित करते, तर फुलांचा निळा रंग विधानसभा सचिवालयाची स्वायत्तता दर्शवितो.

▪️अरुणाचल प्रदेश राज्य

- अरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्य भागातले एक प्रमुख राज्य आहे. आसाम राज्याचे विभाजन होऊन अरुणाचल प्रदेश हे वेगळे राज्य म्हणून 1987 साली स्थापना झाली. या राज्याच्या सीमा चीन व म्यानमार या देशांना लागून आहेत. इटानगर ही राज्याची राजधानी आहे.

- हे राज्य भारताच्या अगदी पूर्वेला येत असल्याने भारतात सर्वात आधी सूर्य या राज्यात उगवतो, म्हणून राज्याला अरुणाचल प्रदेश म्हणजेच सर्वप्रथम सू्र्य उगवणारा प्रदेश हे नाव मिळाले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जगातील सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप सुरू.

◾चीनमध्ये जगातील सर्वांत मोठा आणि संवेदनशील रेडिओ टेलिस्कोप सुरू करण्यात आला आहे.

◾महत्वाचे म्हणजे या टेलिस्कोपची चाचणीच तीन वर्षे घेण्यात येत होती.

◾हा टेलिस्कोप बनविण्यासाठी चीनला तब्बल 20 वर्षे लागली.

◾हा टेलिस्कोप जगभरातील खगोल शास्त्रज्ञांसाठी खुला करण्यात आला आहे.तसेच चीनमध्ये एवढी प्रगत टेक्नॉलॉजी आहे की, हजारो किमी लांबीचे रस्ते आणि गगनचुंबी इमारती बांधण्यासाठी काही महिनेच लागतात.

◾मात्र, या टेलिस्कोप निर्मितीच्या कामाने चीनला मोठा वेळ खर्ची घालावा लागला आहे.

◾ हा टेलिस्कोप गुईझोऊ प्रांतामध्ये बांधण्यात आला आहे.

◾2016 पासून याची चाचणीच घेण्यात येत होती.

◾हा टेलिस्कोप प्युर्टोरिकाच्या अरेसिबो ऑब्झर्व्हेटरीपेक्षा 2.5 पटींनी संवेदनशील आहे.

◾प्युर्टोरिकास्थित ऑब्झर्व्हेटरीमध्ये जगातील दुसरा मोठा सिंगल डिश रेडिओ टेलिस्कोप कार्यरत आहे.

◾ वापर अंतराळात दूरवर जीवजंतूंचा शोध आणि एलियन्सचा शोध घेण्यासाठी करण्याच येतो.

◾चीनचा टेलिस्कोप एका सेकंदात 28 GB माहिती गोळा करण्यात सक्षम आहे. यामुळे त्याला फाईव्ह हंड्रेड मीटर अपार्चर स्पेरिकल रेडिओ टेलिस्कोप (फास्ट) असे नाव देण्यात आले आहे.

◾फास्टची अंतराळातील रेंज चार पटींनी जास्त आहे.

◾टेलिस्कोपने आतापर्यंत जवळपास 44 पल्सरचा शोध लावला आहे.

◾ पल्सर हा वेगाने फिरणारा न्यूट्रॉन किंवा तारा असतो, जो रेडिओ लहरी आणि विद्युत चुंबकीय विकिरण उत्सर्जित करतो.

◾या टेलिस्कोपच्या पाच किमीच्या परिघामध्ये कोणतेही शहर नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

तुम्हाला हे पाठ आहेत ना - काही महत्वाची कलमे

1. घटना कलम क्रमांक 14
कायद्यापुढे समानता

2. घटना कलम क्रमांक 15
भेदभाव नसावा

3. घटना कलम क्रमांक 16
समान संधी

4. घटना कलम क्रमांक 17
अस्पृश्यता निर्मूलन

5. घटना कलम क्रमांक 18
पदव्यांची समाप्ती

6. घटना कलम क्रमांक 19 ते 22
मूलभूत हक्क

7. घटना कलम क्रमांक 21 अ
प्राथमिक शिक्षण

8. घटना कलम क्रमांक 24
बागकामगार निर्मूलन

9. घटना कलम क्रमांक 25
धर्म स्वातंत्र्याचा अधिकार

10. घटना कलम क्रमांक 26
धार्मिक संस्था स्थापन करणे व चालवणे

11. घटना कलम क्रमांक 28
धार्मिक शिक्षण देण्यावर बंधी

12. घटना कलम क्रमांक 29
स्वतःभाषा व लिपी, संस्कृती जतन करणे

13. घटना कलम क्रमांक 30
अल्पसंख्यांक समाजाला शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार

14. घटना कलम क्रमांक 40
ग्राम पंचायतीची स्थापना

15. घटना कलम क्रमांक 44
समान नागरिक कायदा

16. घटना कलम क्रमांक 45
6 ते 14 वयोगटातील मुळा मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण

17. घटना कलम क्रमांक 46
शैक्षणिक सवलत

18. घटना कलम क्रमांक 352
राष्ट्रीय आणीबाणी

19. घटना कलम क्रमांक 356
राज्य आणीबाणी

20. घटना कलम क्रमांक 360
आर्थिक आणीबाणी

21. घटना कलम क्रमांक 368
घटना दुरूस्ती

22. घटना कलम क्रमांक 280
वित्त आयोग

23. घटना कलम क्रमांक 79
भारतीय संसद

24. घटना कलम क्रमांक 80
राज्यसभा

25. घटना कलम क्रमांक 81
लोकसभा

26. घटना कलम क्रमांक 110
धनविधेयक

27. घटना कलम क्रमांक 315
लोकसेवा आयोग

28. घटना कलम क्रमांक 324
निर्वाचन आयोग

29. घटना कलम क्रमांक 124
सर्वोच्च न्यायालय

30. घटना कलम क्रमांक 214
उच्च न्यायालय

भारताने ‘हार्मुझ शांती पुढाकार’मध्ये भाग घेतला

◾️भारताने ‘हार्मुझ शांती पुढाकार’ यात भाग घेतला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश्य जगातल्या सर्वात व्यस्त आणि मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जलवाहतुकीच्या मार्गामध्ये शांती प्रस्थापित करून ते क्षेत्र स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणे हा आहे.

◾️या प्रदेशातल्या देशांमधली प्रादेशिक अखंडता आणि राजकीय स्वातंत्र्य याची हमी देणारा हा उपक्रम देशांमधली एकता, परस्पर समन्वय तसेच शांततापूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंध वाढविण्यासाठी आहे.

✍होर्मुज समुद्रधुनी: जागतिक तेलाची एक महत्त्वाची वाहिनी

◾️पर्शियन खाडीमध्ये होर्मुज समुद्रधुनी आहे.

◾️होर्मुज समुद्रधुनीच्या क्षेत्रातून जगातले एक पंचमांश तेल वाहून नेल्या जाते. ही समुद्रधुनी ओमान आणि इराण या देशांच्या दरम्यान आहे.

◾️ही समुद्रधुनी उत्तर आखाती प्रदेशाला जोडते आणि दक्षिणेकडे ओमानची खाडी आणि त्यापलीकडे अरबी समुद्र आहे. ही समुद्रधुनी 21 मैल (33 किमी) अंतरावर पसरलेली आहे.

◾️या मार्गे OPECचे सदस्य असलेले सौदी अरब, इराण, संयुक्त अरब अमीरात (UAE), कुवैत आणि इराक बहुतांश तेल निर्यात करीत आहेत.

◾️कतार हा जगातला सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा (LNG) निर्यातदार देश आहे आणि जवळपास सर्व LNG या मार्गे पाठवते.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पियुष गोयल यांच्याकडे जागतिक आर्थिक मंच-2020 साठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व

🎆 दावोस येथे होणाऱ्या मंत्रीस्तरीय बैठकीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्र्यांचा सहभाग

🎆 केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल दावोस येथे होणाऱ्या 50 व्या जागतिक आर्थिक मंचासाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. दावोस येथे 20 ते 24 जानेवारी 2020 दरम्यान जागतिक आर्थिक मंच-2020 चे आयोजन करण्यात आले आहे.

🎆 पियुष गोयल यांच्यासमवेत केंद्रीय नौवहन आणि रसायने व खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय, कर्नाटक आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री, पंजाबचे अर्थमंत्री, तेलंगणाचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री, उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाचे सचिव, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच इनव्हेस्ट इंडियाचा शिष्टमंडळात समावेश असणार आहे.  

🎆 पियुष गोयल ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, रशिया, सौदी अरब, स्वित्झर्लंड, कोरिया आणि सिंगापूर या देशांच्या मंत्र्यांसमवेत होणाऱ्या बैठकीत सहभागी होणार आहेत. तसेच ते जागतिक व्यापार संघटनेचे संचालक आणि आर्थिक सहकार्य आणि विकास संस्था (ओईसीडी) च्या सरचिटणीसांना भेटणार आहेत.

🎆 याव्यतिरिक्त केंद्रीय मंत्री विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत द्वीपक्षीय चर्चा करणार आहेत. भारतीय रेल्वेमध्ये गुंतवणूक वाढवणे आणि देशात जागतिक गुंतवणूक निर्माण करणे याविषयी बैठक घेणार आहेत.     

🎆 दावोसमध्ये होणाऱ्या जागतिक व्यापर संघटनेच्या अनौपचारिक मंत्रीस्तरीय संमेलनातही केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सहभागी होणार आहेत.

🎆 दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत जगातील आघाडीचे नेते जागतिक, प्रादेशिक आणि औद्योगिक मुद्यांवर चर्चा करणार आहेत. एकत्रित आणि शाश्वत विश्वाचे भागीदार ही यावर्षीच्या बैठकीची संकल्पना आहे

मुंबई महापालिकेत मेगा भरती; लवकरच होणार ऑनलाईन परीक्षा


चतुर्थ श्रेणीतील कामगार, कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीनंतर आता मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा मेगाभरती होणार आहे. लिपिक अर्थात कार्यकारी सहाय्यक पदाची मेगा भरती लवकरच होणार आहे. महापालिकेतील ८१० कार्यकारी सहाय्यकांच्या रिक्तपदांची भरती होणार असून लवकरच याबाबतची ऑनलाईन परीक्षा घेवून भरती प्रक्रीया राबवली जाणार आहे.

मुंबई महापालिकेतील कार्यकारी सहाय्यक वर्गातील एकूण ८१० रिक्तपदे सरळसेवेद्वारे भरण्यात येणार आहे. ही पदे भरण्यासाठी महापालिकेने महाऑनलाईन लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीच्या माध्यमातून या पदांची भरती सरळसेवेत करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवणे, संगणक ज्ञानाची परीक्षा आणि बहुपर्यायी वस्तूनिष्ठ ऑनलाईन परीक्षेसह इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची ऑनलाईन व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अंदाजित खर्च ७ कोटी ८० लाख ८३ हजार ५५० रुपये एवढा येणार आहे.

मुंबई महापालिकेत लिपिक अर्थात कार्यकारी सहाय्यक वर्गाची एकूण ५२५५ पदे आहेत. त्या पदांपैकी सरळसेवा पध्दतीने ३२२१ पदे भरायची आहेत. त्यातील सरळसेवेपैकी रिक्त असलेली ८१० पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे खुल्या आणि आरक्षित प्रवर्गात एकूण १ लाख अर्ज येणे अपेक्षित आहेत. या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकडून प्रत्येकी ९०० रुपये शुल्क घेतले जाणार आहे. तर मागास व इतर मागास प्रवर्गातील उमदेवारांकडून प्रत्येकी ७०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे संबंधित कंपनीची निवड तसेच परीक्षा घेण्यास मंजुरी प्राप्त व्हावी यासाठी स्थायी समितीपुढे प्रस्ताव सादर करण्यात येत असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी सष्ट केले.
सर्व उमेदवारांचे ऑनलाईन पध्दतीचे अर्ज मागवण्यासाठी अर्जाचा नमुना महाऑनलाईन यांच्या महा रिक्रुटमेंट या संकेतस्थळावर अपलोड केले जाणार आहे. याची लिंक मुंबई महापालिकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहे.

महाआयटी आणि आय.बी.पी.एसची माघार
महापालिकेच्या या कार्यकारी सहाय्यक पदासाठी उमेदवारांची इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची व्यावसायिक चाचणी परीक्षा घेणे आवश्यक आहे. परंतु टंकलेखनाची चाचणी परीक्षा घेण्यास शासन नियुक्त महाआयटी आणि आय.बी.पी.एस या नामांकित संस्थांनी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे या कंपन्यांनी माघार घेतल्याने महाऑनलाईन लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आल्याचेही अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

बीसीसीआय बनली जगातील सर्वांत शक्तिशाली क्रिकेट संघटना

👉भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही जगातील सर्वात शक्तिशाली क्रिकेट संस्था बनली आहे. 

👉आता एवढ्या मोठ्या संख्येत क्रिकेट फॅन्स असणाऱ्या देशात तितकेच मोठे क्रिकेट स्टेडियम उभारले जात आहे.

👉गुजरातच्या अहमदाबादमध्ये उभारण्यात येणारे मोटेरा स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ठरणार आहे.

👉मोटेरा स्टेडियममध्ये एकाचवेळी तब्बल 1 लाख 10 हजार प्रेक्षक बसतील एवढी याची आसन क्षमता तयार करण्यात आली आहे.याचबरोबर हे मोटेरा स्टेडियम सध्या जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला (एमसीजी) मागे टाकेल.

👉एमसीजीची आसनक्षमता 1 लाख 24 इतकी आहे. जानेवारी 2018 मध्ये मोटेरा स्टेडियमच्या उभारणीस प्रारंभ झाला असून सध्या याचे निम्म्याहून अधिक काम झाले आहे.

👉गुजरात क्रिकेट असोसिएशन (जीसीए) च्या देखरेखेखाली मोटेरा स्टेडियमचे बांधकाम सुरू आहे. भव्यदिव्य अशा या मोटेरा स्टेडियममध्ये तांबड्या आणि काळ्या मातीपासून तयार केलेल्या तब्बल 11 खेळपट्ट्या असतील. आणि फिरकी आणि वेगवान अशा दोन्ही गोलंदाजांना अनुकूल अशी खेळपट्टी बनविण्यात येत असल्याची माहिती जीसीएचे अध्यक्ष धनराज नथवानी यांनी दिली. 

👉मोटेरा हे भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोलकातामधील ऐतिहासिक ईडन गार्डनलाही मागे टाकेल. ईडन गार्डन्सची आसन क्षमता 68 हजार एवढी आहे.

👉ऑस्ट्रेलियातील एमसीजीनंतर ईडन गार्डन हे सध्या जगातील दुसरे मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखले जाते.त्यानंतर पर्थ स्टेडियम आणि हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचा क्रमांक लागतो.

✅जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्टेडियम (मोटेरासहित) : 
1) मोटेरा क्रिकेट स्टेडियम, अहमदाबाद (भारत)
2) मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)
3) ईडन गार्डन, कोलकाता (भारत)
4) पर्थ स्टेडियम, पर्थ (ऑस्ट्रेलिया)
5) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद (भारत)

मराठमोळे हरीश साळवे ब्रिटनच्या महाराणीचे वकील

आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची थेट ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती झाली आहे.

ब्रिटनच्या न्यायमंत्रालयाने नव्या नियुक्त्या संदर्भातील यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये मराठमोळे हरीश साळवे यांच्या नावाचा समावेश आहे.

हरीश साळवे ब्रिटनच्या महाराणीसाठी कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे ‘क्वीन काऊंसिल’ म्हणून काम पाहतील.

16 मार्च रोजी हरीश साळवे यांची अधिकृतपणे नियुक्ती होईल.

कायदा आणि वकिलीच्या क्षेत्रामध्ये महत्वाची आणि मोठी कामगिरी करणाऱ्यांना ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून निवडले जाते.

साळवे यांचे आंतरराष्ट्रीय कायदाक्षेत्रातील मोठे योगदान असल्याने त्यांना हा बहुमान मिळाला आहे.

सोलापुरात सुरु होतेय फॉरेन्सिक लॅब!

◾️ राज्यात सध्या 8 विभागीय आणि 5 लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा (फॉरेन्सिक लॅब) आहेत.

◾️ फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून वर्षभरात जवळपास अडीच लाख प्रकरणांची तपासणी केली जात आहे.

◾️सोलापूरच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये रक्त, विष आणि व्हिसेरा तपासणी होणार आहे.
◾️भविष्यात फॉरेन्सिक लॅबमध्ये अल्कोहोल संदर्भातील प्रकरणांचीही तपासणी होणार असल्याचे राज्याचे पोलिस महासंचालक (न्यायिक व तांत्रिक) हेमंत नगराळे यांनी सांगितले. 

रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्जेई लेवरोव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट.

💠रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्जेई लेवरोव यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. रायसीना संवादात भाग घेण्यासाठी  लेवरोव भारत दौऱ्यावर आले आहेत.

💠पररराष्ट्र व्यवहार मंत्री लेवरोव यांनी पंतप्रधानांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष  ब्लादिमीर पुतीन यांच्यातर्फे शुभेच्छा दिल्या.

💠पंतप्रधानांनी 13 जानेवारी 2020 ला दूरध्वनीवरून राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासह झालेली चर्चा आणि गेल्या वर्षी दोन्ही देशात विशेष आणि विशेषाधिकार धोरणात्मक भागीदारीमध्ये झालेल्या प्रगतीचा उल्लेख केला.

💠75 व्या विजय दिवसानिमित्त मे 2020 मध्ये होणारा पंतप्रधानांचा रशिया दौरा ब्रिक्स तसेच एससीओ शिखर संमेलनासाठीचा जुलै दौरा यासाठी पुतीन उत्सुक असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी सांगितले. पुतीन यांना भेटण्यासाठी यावर्षी अनेक संधी मिळणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

💠 या वर्षअखेर द्विपक्षीय शिखर  संमेलनासाठी पुतीन यांचा पाहुणचार करण्याची संधी मिळणार असून त्यासाठी आपण उत्सुकतेने  प्रतीक्षा करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

💠दोन्ही देशांमध्ये 2019 मध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झाले असून त्यांचे परिणाम दिसून येत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. वर्ष 2020 हे भारत आणि रशियातील धोरणात्मक भागीदारीच्या स्थापनेचे 20 वे वर्ष असून हे वर्ष ‘या निर्णयांचे कार्यान्वयन वर्ष’ झाले पाहिजे असे त्यांनी सुचवले.
परराष्ट्र व्यवहार मंत्री लेवरोव यांनी पंतप्रधानांना प्रमुख क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर रशियाच्या भूमिकेची माहिती दिली.

एनआयए कायद्याला छत्तीसगडचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान

🔰नवी दिल्ली : काँग्रेसप्रणीत यूपीए १सरकारच्या काळात करण्यात आलेला राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कायदा घटनाबाह्य़ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. 

🔰या कायद्यामुळे राज्यांचे सार्वभौमत्व धोक्यात येऊन केंद्राला अनिर्बंध अधिकार मिळतात असा दावा याचिकेत केला आहे.

🔰केरळ सरकारने नागरिकत्व कायद्याला आव्हान दिले होते त्यानंतर आता एनआयए कायद्याला छत्तीसगड सरकारने आव्हान दिले आहे.

🔰मनमोहन सिंग सरकारने २६ नोव्हेंबर २००८ रोजी एनआयए कायदा मुंबई हल्ल्यानंतर केला होता. त्या वेळी काँग्रेस नेते पी.चिदंबरम हे गृहमंत्री होते.

🔰या कायद्यानुसार एनआयएच्या पथकांना राज्यांची परवानगी न घेता कुठेही जाऊन छापे टाकणे व चौकशी करणे असे अधिकार देण्यात आले आहेत.

🔰छत्तीसगड सरकारने कलम १३१ अन्वये दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे, एनआयए कायद्याने राज्यघटनेतील तत्त्वांचा भंग झाला असून असा कायदे करणे संसदेच्याही कार्यकक्षेत नाही.