०१ मे २०२२

महादेव गोविंद रानडे भारतीय विद्वान, समाज सुधारक आणि लेखक

महादेव गोविंद रानडे
भारतीय विद्वान, समाज सुधारक आणि लेखक

महादेव विनायक रानडे याच्याशी गल्लत करू नका.
महादेव गोविंद रानडे (जन्म : १८ जानेवारी १८४२[१]; मृत्यू : १६ जानेवारी १९०१), हे महाराष्ट्रातील समाजसुधारक होते, तसेच ते अर्थशास्त्रज्ञ व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे ते अध्यक्षही होते. १८८५ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. रानडे यांना आधुनिक भारताच्या इतिहासात महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीत महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षणाचा प्रसार व्हावा, स्त्रियांनाही शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी मुलींच्या शाळा सुरू केल्या. त्यांनी शिक्षण, समाजसेवा, राजकारण तसेच आर्थिक बाबतीत अमूल्य कार्य केले.[२]

महादेव गोविंद रानडे
Mahadev Govind Ranade.jpg
महादेव गोविंद रानडे
टोपणनाव:
न्यायमूर्ती रानडे
जन्म:
१८ जानेवारी १८४3
निफाड, जि - नाशिक, महाराष्ट्र
मृत्यू:
१६ जानेवारी १९०१
चळवळ:
समाजिक सुधारणा
संघटना:
राष्ट्रीय सामाजिक परीषद (स्थापना - १८८५)
पत्रकारिता/ लेखन:
सुबोध (पत्रिका) , सुधारक (वृत्तपत्र)
धर्म:
हिंदू
प्रभाव:
महात्मा फुले
वडील:
गोविंद रानडे
पत्नी:
रमाबाई रानडे

महादेव गोविंद रानडे यांचा पुतळा, चर्चगेट, मुंबई
जीवन
संपादन करा
महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिकमधील निफाड या गावी झाला.[१] त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले. त्यांना शालेय आयुष्यात विनायक जनार्दन कीर्तने यांची मैत्री लाभली आणि पुढे ती वाढली. लहानपणी माधवराव अबोल आणि काहीसे संथ होते. मात्र त्यांची तीव्र स्मरणशक्ती, सामाजिक भान इतरांच्या लक्षात आले होते. १८५६नंतर ते आणि कीर्तने मुंबईत शिक्षणासाठी आले, एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल झाले. त्यांचे इंग्रजी-संस्कृत भाषांमधील वाचन वाढले. लॅटिनचाही त्यांनी अभ्यास केला. मॅट्रिकच्या परीक्षेसाठी त्यांनी 'मराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष' या विषयावर निबंध लिहिला. पुढच्या काळात त्यांनी त्याच नावाचे पुस्तक लिहिले. अफाट वाचनाने त्यांची बुद्धी प्रगल्भ झाली होती. त्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळे; बक्षिसेही मिळत. १८६२(?) साली ते मॅट्रिक तर १८६४ साली एम. ए. झाले. त्या वेळी अलेक्झांडर ग्रॅन्ट यांचा सहवास आणि मार्गदर्शन त्यांना लाभले. या काळात माधवरावांनी विविध विषयांवर निबंधलेखन केले. इतिहास आणि अर्थशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय राहिले आणि त्यात त्यांनी अधिकारही प्राप्त केला होता. त्यांनी अध्यापन, परीक्षण, अनुवाद, न्यायदान अशा कामांमध्ये आपल्या बुद्धीची चमक दाखवली. त्यांनी इतिहास हा विषय घेऊन एम. ए. केले. इ.स. १८६६ साली ते कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून त्यांची निवड झाली.

न्यायमूर्ती रानडे यांना एल्फिन्स्टन महाविद्यालयात कनिष्ठ असलेले दिनशा वाच्छा रानडे यांबद्दल लिहितात :-

“ते महाविद्यालयाच्या वाचनालयात अभ्यास करण्यांत कसे रमून जात ते मला नीट स्मरतं. महाविद्यालयाचा अभ्यास शिष्यवृत्तीसाठीच्या परीक्षेसाठी तयारी करणं तर त्यांना मुलांच्या खेळासारखे वाटे. कठीणात कठीण पुस्तक ते इतक्या सहजगत्या समजून घेत असत आणि ज्ञान प्राप्त करत. ज्ञान प्राप्तीची अहमनीय उत्कंठा आणि पुस्तकाच्या विषयाला हृदयंगम करण्याची क्षमता इतकी महान होती की ते दिवसभर पुस्तक वाचत असत. ते पुस्तके वारंवार वाचत. एवढा विस्तृत अभ्यास करायला आमच्यापैकी कुणातहीना धैर्य होतंना शक्ती,ना एवढी उत्कंठा! ते वाचण्यात एवढे तल्लीन होऊन जात की आजूबाजूला काय चालले आहे याकडे त्यांचे लक्षही जात नसे. खाण्यापिण्याकडे किंवा कपड्याकडे त्यांनी कधीही चौकसपणे लक्ष दिले नाही. काहीही खात, काहीही कपडे घालत.” [३]

विवाह
संपादन करा
म.गो. रानडे यांचा पहिला विवाह १८५१ साली वयाच्या ११-१२व्या वर्षी वाईतील दांडेकरांच्या रमा नावाच्या मुलीशी झाला. ही पत्नी आजारी पडली आणि तिचे १८७३ साली निधन झाले. माधवरावांचे विधवांच्या पुनर्विवाहासंबंधीचे विचार आणि त्या चळवळीतील त्यांचा सहभाग लक्षात घेता ते एखाद्या विधवेशी लग्न करतील अशी अटकळ त्यांच्या वडिलांनी बांधली आणि त्या सालच्या नोव्हेंबरच्या ३० तारखेला अण्णासाहेब कुर्लेकर यांच्या कन्येशी त्यांनी माधवरावांचा विवाह करून दिला(बाल विवाह). लग्नानंतर माधवरावांनी या पत्नीचे नावही रमा असेच ठेवले. माधवरावांची त्या काळात 'बोलके सुधारक' म्हणून सनातन्यांकडून संभावनाही झाली. विधवाविवाहाची हाती आलेली संधी आपण दवडली म्हणून ते दुःखी झाले, पण पुढे त्यांनी रमाबाईंना शिकवले.

न्यायाधिशी
संपादन करा
काही काळ त्यांनी शिक्षक, संस्थानाचे सचिव, जिल्हा न्यायाधीश म्हणून विविध ठिकाणी काम केले. इ.स. १८९३ साली मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.[४]

सार्वजनिक कार्य
संपादन करा
ज्ञानप्रसारक सभा, परमहंस सभा, प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा, भारतीय सामाजिक परिषद इत्यादी विविध संस्था स्थापन करण्यात व त्यांचा विस्तार करण्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता. ‘अनेक क्षेत्रांतील संस्था स्थापन करून त्यांनी भारतात संस्थात्मक जीवनाचा पाया घातला,’ असे त्यांच्याबद्दल गौरवाने म्हटले जाते. रानडे यांनी स्वातंत्र्यासाठी व सामाजिक सुधारणांसाठी कायम घटनात्मक व सनदशीर मार्गांचा पुरस्कार केला. स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘मवाळ’ प्रवाहाचे ते नेते होते. त्यांनी भारतीय राजकारणात अर्थशास्त्रीय विचार आणला. स्वदेशीच्या कल्पनेला त्यांनी शास्त्रशुद्ध व व्यावहारिक स्वरूप दिले. त्यांनी भारतातील दारिद्रयाच्या प्रश्नाचे मूलभूत विवेचन करून येथील दारिद्ऱ्याची कारणे व ते दूर करण्याचे उपाय यासंबंधी अभ्यासपूर्ण विचार मांडले.

भारतीय समाजात संकुचित वृत्ती; जातिभेदांचे पालन; भौतिक सुखे, व्यावसायिकता व व्यावहारिकता यांविषयाचे गैरसमज यांसारखे दोष निर्माण झाल्यामुळे समाजाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. हे दोष दूर करूनच आपल्या समाजाची प्रगती साधता येईल असे त्यांचे ठाम मत होते. समाजाची राजकीय किंवा आर्थिक उन्नती घडवून आणायची असेल, तर सामाजिक सुधारणेकडे लक्ष पुरविले पाहिजे. "ज्याप्रमाणे गुलाबाचे सौंदर्य व सुगंध हे जसे वेगळे करता येत नाहीत, त्याप्रमाणे राजकारण व सामाजिक सुधारणा यांची फारकत करता येत नाही" असे त्यांचे मत होते. हे विचार त्यांनी समाजसुधारणा चळवळीच्या अगदी सुरुवातीच्या काळात मांडल्यामुळे त्यांना ‘भारतीय उदारमतवादाचे उद्गाते’, असेही म्हटले जाते.

संस्था
संपादन करा
दिनांक ३१ मार्च, इ.स. १८६७ रोजी न्यायमूर्ती रानडे, डॉ. आत्माराम पांडुरंग, डॉ. रा. गो. भांडारकर, वामन आबाजी मोडक इत्यादी मंडळींनी पुढाकार घेऊन मुंबईत ‘प्रार्थना समाजा’ची स्थापना केली. त्याआधी इ.स. १८७१ साली रानडे यांचा सार्वजनिक सभेच्या स्थापनेशी व कार्याशी संबंध आला होताच. सामाजिक प्रश्नांचे महत्त्व लक्षात घेऊन, समाजसुधारणांसाठी रानडे यांनी पुढाकार घेऊन ‘भारतीय सामाजिक परिषदेची' स्थापना केली. या परिषदेचे ते १४ वर्षे महासचिव होते. जातिप्रथेचे उच्चाटन, आंतरजातीय विवाहांस परवानगी, विवाहाच्या वयोमर्यादेत वाढ, बहुपत्नीकत्वाच्या प्रथेस आळा, विधवा पुनर्विवाह, स्त्री-शिक्षण, तथाकथित जाति-बहिष्कृत लोकांच्या स्थितीत सुधारणा, हिंदू-मुसलमानांच्या धार्मिक मतभेदांचे निराकरण अशा या संस्थेच्या मागण्या होत्या. भारताच्या स्वातंत्र्यात पुढे मध्यवर्ती भूमिका बजावणाऱ्या ‘राष्ट्रीय काँग्रेस’ या संघटनेच्या स्थापनेतही (इ.स. १८८५) न्यायमूर्ती रानडे यांचा मोठा सहभाग होता.

न्यायमूर्ती रानडे यांनी वक्तृत्वोत्तेजक सभा (हीच संस्था पुणे शहरात दरवर्षी, वसंत व्याख्यानमाला आयोजित करते), नेटिव्ह जनरल लायब्ररी, फीमेल हायस्कूल, मुलींच्या शिक्षणासाठी हुजूरपागा शाळा, इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया, इत्यादी अनेक संस्था पुढाकार घेऊन स्थापन केल्या. मराठी ग्रंथकार संमेलन सर्वप्रथम त्यांच्याच प्रयत्नांमुळे यशस्वी ठरले होते. त्यातूनच पुढे साहित्य संमेलन योजण्याची प्रथा सुरू झाली. न्यायमूर्ती रानडे हे स्वतः उत्तम संशोधक, विश्लेषक होते हे त्यांच्या द राइझ ऑफ मराठा पॉवर (मराठी सत्तेचा उदय) या ग्रंथावरून दिसून येते. त्यांच्या व्याख्यानांचे संग्रहही पुढील काळात प्रकाशित झाले.

न्या.महादेव गोविंद रानडे हे १८९७ साली स्थापन झालेल्या गिरगांव,मुंबई स्थित आर्यन एज्युकेशन सोसायटीचे पहिले अध्यक्ष होते. ही संस्था आजही गिरगांव,मुंबई आणि पालघर येथे ज्ञानदानाचे कार्य करत आहे.

लोकांचा रोष
संपादन करा
विष्णूबुवा ब्रह्मचारी, करसनदास मुलजी, भाऊ दाजी, रावसाहेब मंडलिक, विष्णूशास्त्री पंडित, सार्वजनिक काका आणि पंडिता रमाबाई यांच्या बरोबरीने आणि सहकार्याने माधवरावांनी विधवांच्या पुनर्विवाहाचा प्रश्न, संमतीवयाचा कायदा यांसारख्या अनेक समाजसुधारणांकरिता अथक प्रयत्न केले. परंतु स्वामी दयानंद सरस्वती, वासुदेव बळवंत फडके, पंचहौद मिशन, रखमाबाई खटला या व्यक्ती वा घटनांच्या संदर्भांत त्यांना टीका सहन करावी लागली. त्या काळात समाजसुधारकांना फार विरोध होई. माधवरावांच्या या समाजसुधारकी कामालाही सनातनी वर्गाकडून सतत विरोध झाला. माधवरावांनी तो विरोध सहनशीलतेने आणि समजुतीने हाताळला.

सरकारी रोष
संपादन करा
माधवरावांच्या समाजकारणाच्या प्रारंभी अलेक्झांडर ग्रॅन्ट, सर बार्टल फ्रियर, बेडरबर्न यांच्या काळातील सरकारचा विश्वास त्यांनी अनुभवला. पण पुढे क्रांतिकारकांचे, पेंढाऱ्यांचे बंड, दुष्काळ आणि तत्कालीन सरकारविरोधी घटनांत माधवरावांचा हात असल्याचा संशय सरकारला येऊ लागला. त्याचा परिणाम म्हणून त्यांची बदली १८७९ साली धुळे येथे झाली आणि त्याचबरोबर त्यांच्या टपालावर नजर ठेवण्यात येऊ लागली. म्हणून गणेशशास्त्री लेले या मित्राने त्यांना नोकरीतून निवृत्ती स्वीकारण्याचा सल्ला दिला. माधवरांवांनी हा सल्ला मानला नाही, आणि पुढे यथावकाश सरकारचा संशय दूर झाला.

मुंबई विद्यापीठात मराठी भाषेसाठी प्रयत्न
संपादन करा
पार्श्वभूमी
संपादन करा
ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांनी त्या त्या प्रांतातील शिक्षणाची व्यवस्था लावण्यासाठी १८४०मध्ये प्रांतनिहाय शिक्षणमंडळे (बोर्ड ऑफ एज्युकेशन) स्थापन केली. त्यांपैकी मुंबई प्रांताच्या शिक्षणमंडळाचे अध्यक्ष सर आर्स्किन पेरी ह्यांनी मंडळाच्या सभेत "उच्च शिक्षण देणाऱ्या सर्व संस्थांत शिक्षणाचे माध्यम केवळ इंग्लिश हेच असेल" असा ठराव मांडला.[५] (त्यावेळी महाविद्यालये अथवा विद्यापीठ नसल्याने उच्चशिक्षण ह्या संज्ञेचा अर्थ माध्यमिक शाळांतील शिक्षण असा होता.[५]) ह्या ठरावाला तीन भारतीय सदस्य आणि कर्नल जार्विस ह्यांनी विरोध केला. त्यामुळे पेरी ह्यांचा ठराव लगेच मान्य झाला नाही. परंतु कलकत्ता येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो मान्य केल्यामुळे मुंबई प्रांतातील सर्व माध्यमिक शाळांतून (तत्कालीन चवथी ते सातवी (मॅट्रिक)) ह्या वर्गांत मराठी भाषा वगळता अन्य सर्व विषय मातृभाषेऐवजी इंग्लिशमधून शिकवण्यात येऊ लागले.[६]

चार्ल्स वुड ह्यांच्या मार्गदर्शनानुसार मुंबई प्रांतातील शिक्षणविषयक व्यवस्थापनाची एक संहिता १८५४ मध्ये तयार करण्यात आली. तिच्यातील एका कलमात शिक्षणव्यवस्थेत देशी भाषांना उत्तेजन देण्याचे कलम असले तरी त्यावर प्रत्यक्षात कार्यवाही झाली नव्हती.[७]

१८५७ ह्या वर्षी मुंबई विद्यापीठ स्थापन झाले तेव्हा मराठी हा विषय मॅट्रिक ते एम. ए.पर्यंतच्या सर्व परीक्षांना वैकल्पिक म्हणून घेण्याची सोय होती. पण १८५९ ह्या वर्षी झालेल्या विद्यापीठाच्या पहिल्या मॅट्रिक परीक्षेत मुंबई प्रांतातून परीक्षेला बसलेल्या १३२ विद्यार्थ्यांपैकी केवळ २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि अनुत्तीर्ण झालेल्या ११० विद्यार्थ्यांपैकी ८९ विद्यार्थी हे मराठी इ. देशी भाषांत अनुत्तीर्ण झाले होते.[८] ह्या प्रकाराची पुनरावृत्ती १८६२ पर्यंत होत राहिल्याने २९ नोव्हेंबर १८६२ रोजी विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळापुढे (सिंडिकेट) विद्यापीठाचे कुलगुरू सर अलेक्झॅंडर ग्रॅंट ह्यांनी मॅट्रिक्युलेशननंतर विद्यापीठात केवळ अभिजात भाषाच (उदा. संस्कृत, अरबी, हीब्रू, ग्रीक, लॅटिन) शिकवण्यात याव्यात असा ठराव मांडला. ह्या ठरावाला डॉ. एम. मरे आणि डॉ. जॉन विल्सन ह्यांनी विरोध केला. पण हा ठराव १८६३मध्ये मान्य झाला.[९] त्यामुळे मॅट्रिक ते एम. ए. ह्या सर्व स्तरावर मराठी भाषेचे अध्ययन-अध्यापन बंद झाले.

रानडे ह्यांचे प्रयत्न
संपादन करा
१८७० ते १८८७ ह्या काळात मराठीला विद्यापीठात स्थान मिळावे ह्यासाठी जनमत तयार करण्यासाठी रानडे ह्यांनी प्रयत्न केले.

'विद्यापीठ आणि देशी भाषा' ह्या विषयावर श्री. ग. त्र्यं. जोशी ह्यांना निबंध लिहिण्यास प्रवृत्त करून त्या निबंधाचे सार्वजनिक सभेत प्रकट वाचन करवणे व चर्चा करणे
जर्नल ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटी ह्या संस्थेच्या नियतकालिकातून ह्या विषयावर लेखन
मुंबईच्या टाइम्स ऑफ इंडिया ह्या वृत्त पत्रातून ह्या विषयावर लेखन[१०]
तसेच देशी भाषांत प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांचा आढावा घेण्यासाठी मुंबईच्या शासनाने नेमलेल्या रजिष्ट्रार ऑफ नेटिव्ह पब्लिकेशन्स ह्या अघिकाऱ्याशी संपर्क साधून त्या वर्षीच्या अहवालात देशी भाषांत पुस्तके प्रकाशित होण्याचे प्रमाण कमी असण्याचे कारण विद्यापीठात ह्या भाषांना स्थान नसणे हे असल्याचे रानडे ह्यांनी नोंदवून घेतले.[११] ह्यावर तत्कालीन भारतमंत्र्यांनी मुंबईच्या गव्हर्नरांना ह्या प्रकरणी लक्ष घालण्याची सूचना केल्याने विद्यापीठाच्या कार्यकारी सभेत (सिंडिकेट) ह्या विषयावर चर्चा झाली. रानडे ह्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. [१२]

१८९७ ह्या वर्षी रानडे ह्यांनी मराठी आणि इतर देशी भाषा ह्यांच्या पुरस्कर्त्यांच्या सह्यांसह पुन्हा एक अर्ज कार्यकारी सभेपुढे मांडला. पण त्यावर चर्चा होऊन ती अनिर्णित राहिली. रानडे ह्यांनी विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ आर्ट ह्या मंडळापुढे तो ठराव मांडण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही पाठिंबा मिळाला नाही. [१३]

१९०० ह्या वर्षी मुंबई प्रांताच्या शिक्षणसंचालकांनी ह्या प्रश्नी विद्यापीठाला पत्र लिहून विचार करण्याची सूचना केली असता बी. ए. आणि एम. ए. ह्या परीक्षांना नेमण्यासाठी देशी भाषांतील पुस्तके सुचवण्यासाठी समिती नेमण्यात आली. समितीने मराठीतील अशा पुस्तकांची यादी सादर केल्यावर २९ जानेवारी १९०१ ह्या दिवशी (रानडे ह्यांच्या मृत्यूनंतरच्या १३ व्या दिवशी) सिनेटच्या बैठकीत विद्यापीठाच्या परीक्षांत देशी भाषांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.[१४] हा प्रस्ताव मांडणारे सदस्य चिमणलाल सेटलवाड ह्यांनी रानडे ह्यांच्या निधनाने झालेल्या हानीचा उल्लेख करून सदर प्रस्तावासंदर्भात रानडे आणि आपण ह्यांच्यात झालेल्या संभाषणाचा उल्लेखही केला.[१५] ह्या सभेत हा प्रस्ताव बहुमताने संमत करण्यात आला. त्यायोगे मॅट्रिकप्रमाणे एम.ए.च्या परीक्षेतही मराठी हा विषय विकल्पाने उपलब्ध करून देण्यात आला. मात्र मराठीची प्रश्न पत्रिका इंग्लिशमधून काढण्यात येणार होती आणि उत्तरेही इंग्लिशमध्येच देण्याची अट होती.[१६]

निधन
संपादन करा
रानडे यांनी १६ जानेवारी १९०१ च्या रात्री जस्टीन मेकार्थी याचे ‘हिस्ट्री ऑफ अवर ओन टाईम्स’ हे पुस्तक वाचायला घेतले आणि पुस्तक वाचायला बसले नाहीत तोवर त्यांना त्रास सुरू झाला व त्यांची जीवनयात्रा संपली.[१७]

रानडे यांनी लिहिलेली किंवा त्यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके
संपादन करा
न्या. म. गो. रानडे व्यक्ति कार्य आणि कर्तृत्व (१९९२-त्र्यंबक कृष्ण टोपे)
मराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष (१९६४-म.गो. रानडे)
पुनरुत्थानाचे अग्रदूत - म.गो. तथा माधवराव रानडे यांचे चरित्र (२०१३-ह.अ. भावे)
आमच्या आयुष्यातील काही आठवणी (१९१०-रमाबाई रानडे)
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे चरित्र (१९२४-न.र. फाटक)
रानडे-प्रबोधन पुरुष (२००४-डॉ. अरुण टिकेकर)
Mahadev Govind Ranade (इंग्रजी १९६३-टी.व्ही. पर्वते)
Mr. Justice M. G. Ranade : A Sketch of the Life and Work. (इंग्रजी-जी.ए.मानकर).
Ranade : The Prophet of Liberated India (इंग्रजी १९४२-डी.जी. कर्वे).
मन्वंतर - (२००९-गंगाधर गाडगीळ)
Mahadev Govind Ranade : A Biography Of His Vision And Ideas (इंग्रजी १९९८-वेरिंदर ग्रोवर)
रानडे, गांधी आणि जीना (इ.स. १९४३) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
रानडेंबद्दल व्यक्त झालेली मते
संपादन करा
१९४२ साली रानडेंच्या जन्मशताब्दी दिनी (रानडे, गांधी आणि जीना) बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "रानडे हे स्वभावतः प्रामाणिक होते. त्यांच्यात प्रचंड क्षमतेची बुद्धी होती. ते केवळ वकील किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नव्हते, तर सर्वोत्तम अर्थतज्ज्ञ, सर्वोत्तम इतिहासकार, सर्वोत्तम शिक्षणतज्ज्ञ, तसंच दिव्य दृष्टी असेलेले व्यक्ती होते."[१८]

संयुक्त महाराष्ट्र चळवळ

संयुक्त महाराष्ट्र चळवळ

स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे इ. स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व अजूनही महाराष्ट्राबाहेरच असलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रेत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगानी ही चळवळ उभी राहिली.

हुतात्मा स्मारक,मुंबई
पूर्वार्ध
ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती. इ. स. १९२० रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांतरचेनेचा मुद्दा महात्मा गांधींनी मान्य केला होता. लोकमान्य टिळक हे देखील भाषावर प्रांतरचनेच्या बाजूने होते. काँग्रेसनेच एकेकाळी मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर मात्र पक्षाला ,विशेषतः नेहरुंना , संकुचित व राष्ट्रीय एकात्मकतेला धोका वाटू लागला. मुंबईतील भांडवलदारांना जे मुख्यत: अमहाराष्ट्रीय होते, त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता.

इ. स. १९३८ रोजी पटवर्धन [ संदर्भ हवा ] व इ. स. १९४० मध्ये ग.त्र्यं. माडखोलकरांनी महाराष्ट्र एकीकरणाचा विषय उपस्थित केला[ संदर्भ हवा ]. माडखोलकरांनी महाराष्ट्र समाजात व्यापार व उद्योग भूमिपुत्रांच्या ताब्यात नसल्याचं व महाराष्ट्राचे काँग्रेस पुढारी एकीकरणासाठी प्रयत्न करत नसल्याचे म्हटले. इ. स. १९४६चे साहित्य संमेलन माडखोलकरांच्या अध्यक्षतेखाली झाले. या संमेलनात 'संयुक्त महाराष्ट्र समिती' स्थापन झाले व संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे तीन ठराव साहित्यकांनी पाठवले ज्याला राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला.

इ. स. १९४६ रोजीच भरलेल्या महाराष्ट्र एकिकरण परिषदेत स.का.पाटील यांनी मुंबईला महाराष्ट्राची राजधानी करण्यास विरोध केला. महाराष्ट्रातील डाव्या पक्षांनी सुरुवातीपासूनच मुंबईसह महाराष्ट्राला पाठिंबा दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीला पाठिंबा होता. या चळ्वळीला पाठिंबा दर्शविण्याकरिता अनेक ठिकाणी सभा त्यांनी घेतल्या होत्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीतील एक घटक पक्ष होता.. २८ नोव्हेंबर १९४९ रोजी मुंबई महापालिकेत संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव आचार्य अत्रे व डॉ. आर.डी. भंडारे यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’चा ठराव शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या (Scheduled Caste Federation) वतीने मांडला. स्वातंत्र्यानंतर भाषिक राज्यांची मागणी होऊ लागली. आंध्र प्रदेश राज्याची मागणी पोट्टी श्रीरामल्लू यांच्या बलिदानानंतर पूर्ण झाली. भाषावार प्रांतरचेनेसाठी नेमलेल्या कमिशनाने महाराष्ट्र राज्याची मागणी डावलली.

दार कमिशन व जे.व्ही.पी कमिटी
डिसेंबर इ. स. १९४८ रोजी प्रसिद्ध झालेल्या दार कमिशनच्या अहवालात भाषावर प्रांतरचनेला विरोध दर्शविण्यात आला होता व महाराष्ट्रीय लोकांवर अपमानास्पद टिप्पणी होती. जे.व्ही.पी कमिटीने महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या मागणीला पाठिंबा दिला नाही व मुंबई महाराष्ट्रात देण्यास विरोध केला. मुंबई अनेक भाषांच्या व वर्णाच्या लोकांचे, उद्योगधंद्याचे शहर आहे असे अहवालात म्हटले होते. वल्लभभाई पटेलांनी मुंबईचा विकास गुजराती भाषकांनी केल्याचे नमूद केले.

फाजलअली आयोग
डिसेंबर इ. स. १९५३ रोजी फाजलअली यांच्या अध्यक्षेतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या वतीने एस.एम.जोशी,धनंजय गाडगीळसह इतरांनी आयोगासमोर आपली बाजू मांडली. इ. स. १९५५ रोजी आयोगाचा निवाडा जाहीत झाला. पुनर्रचनेबाबत पायाभूत तत्त्व सगळ्यांना सारखी लागू केलेली नव्हती आणि त्यात मोठी विसंगती होती. हैद्राबादसाठी एक भाषिकाच तत्त्व तर मुंबईसाठी द्वैभाषिकाचं. मुंबई प्रांतात गुजराती भाषिक सौराष्ट्र समाविष्ट करून मराठी भाषिक विदर्भ ,बेळगाव-कारवार बाहेर ठेवले गेले. मुंबईच्या विकासासाठी तिला गुजरातपासून वेगळे ठेवणे योग्य नाही व बेळगाव भाग कर्नाटकाशी 'आर्थिकदृष्ट्या' जोडला असल्याचे तसेच विदर्भ महाराष्ट्रात घातल्यास नागपूर शहराचे महत्त्व कमी होईल असे अहवालात नमूद करण्यात आले. आयोगाला या द्वैभाषिकात मराठी भाषिकांची संख्या गुजराती भाषिकांपेक्षा जास्त होऊ द्यायची नव्हती असेच या विसंगतीचे कारण म्हणावे लागेल.

चळवळीस सुरुवात

महाराष्ट्र राज्य
या आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रभर असंतोषाचा डोंब उसळला. नेहरूनी त्यामुळे सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई अशा त्रिराज्य योजना जाहीर केली. त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना मराठीजनांत पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' हे या आंदोलनाचे घोषवाक्य बनलं.महाराष्ट्रीय काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर गुडघे टेकले. यामुळे काँग्रेसनेते जनतेच्या नजरेतून उतरले. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे ज्येष्ठ नेत्याने तर नेहरु व संयुक्त महाराष्ट्रात ,मला नेहरु महत्त्वाचे वाटतात असे म्हटले. महाराष्ट्रातील कम्युनिस्ट, सोशालीस्ट व प्रजासमाजवादी पक्षातील डावे पुढारी व काँग्रेसेतरांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला. सेनापती बापट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एस.एम.जोशी, प्रल्हाद केशव अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख,भाई उद्धवराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्त्वाचे नेते ठरले. एस.एम. जोशी, श्रीपाद डांगे यांनी लढ्याचे नेतृत्व केले. अत्र्यांनी आपल्या 'मराठा' या दैनिकात संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला तर विरोधकांवर बोचरी व कठोर टीका केली. त्यांच्या भाषणातून संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणार्याचा खरपूस समाचार घेतला. शाहीर अमर शेख,शाहिर अण्णाभाऊ साठे,शाहिर गव्हाणकर ह्यांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली.

२० नोव्हेंबर इ. स. १९५५ मोरारजी देसाई व स.का.पाटील या काँग्रेस नेत्यांनी चौपाटीवर सभा घेऊन प्रक्षोभक विधाने केली. पाटलांनी 'पाच हजार वर्षांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही व मोरारजींनी 'काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, गुंडगिरीला योग्य जबाब मिळेल' अशी मुक्ताफळं उधळली. लोकांनी संतापून सभा उधळली. २१ नोव्हेंबर इ. स. १९५५ रोजी झालेल्या आंदोलनावेळेस पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे १५ जणांना प्राण गमवावा लागला. जाने-फेब्रु इ. स. १९५६ रोजी केंद्रशासित मुंबईची घोषणा केल्यानंतर लोक रस्त्यावर उतरली. हरताळ, सत्याग्रह व मोर्चे सुरू झाली. मोरारजीच्या सरकारने सत्तेचा दुरुपयोग करून निष्ठूरपणे ८० लोकांना गोळीबारात मारले. संयुक्त महाराष्ट्रातील आंदोलनात एकूण १०५ जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या फ्लोरा फाउंटन भागात हुतात्मा स्मारक उभारले गेले. संयुक्त महाराष्ट्र समितीने दिल्ली येथे प्रचंड सत्याग्रह घडवून आणला.चळवळीच्या काळात जनतेच्या असंतोषामुळ, नेहरुंना महाराष्ट्रात सुरक्षारक्षकांसोबत फिरावे लागे व त्यांचे स्वागत काळ्या झेंड्यांनी व निषेधानेच होई. भारताचे अर्थमंत्री सी.डी देशमुखांनी महाराष्ट्रावरील होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ आपला राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे चळवळीला अधिक बळ मिळाले.

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना
१ नोव्हेंबर इ. स. १९५६ला केंद्राने सौराष्ट्र, गुजरात,मराठवाडा, विदर्भ व मुंबई इलाख्यातील सर्व मराठी प्रदेश मिळून (परंतु बेळगाव-कारवार वगळून) विशाल द्विभाषिक स्थापले. परंतु या द्विभाषिकाचे महाराष्ट्र व गुजरात येथेही कडाडून विरोध झाला. या समितीने १९५७ सालची लोक सभा आणि विधानसभा निवडणूक लढवली. या सार्वत्रिक निवडणुकीत समितीला भरघोस यश मिळाले. त्यात बलाढ्य काँग्रेसच्या विरोधात निवडणुकीत या समितीला ३९८ जागांपैकी तब्बल १५५ जागांवर विजय मिळाला. स्वाभाविकच ही समिती प्रमुख विरोधी पक्ष बनली. आणि डाॅ. आर.डी. भंडारे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या विरोधी पक्षनेते पदाचा मान भुषविला. काँग्रेसचे नेतृत्व या सर्व प्रकारामुळे व १९६२ला होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचे असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल झाले. इंदिरा गाधींने नेहरूंचे मन वळवले. द्वैभाषिकाची विभागणी करताना महाराष्ट्र राज्याने गुजरात राज्याला १० कोटी द्यायचे व पुढील ४ वर्षात ती रक्कम कमी करत आणायची अशी अट मान्य झाली.[१] तसेच मुंबईचा विकास व उभारणी गुजराती भांडवलदारांनी केली असा दावा गुजराती भाषिक करत होते व त्याचं 'व्याज' म्हणून एकूण ५० कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली.[२] मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व डांगचा समावेश झाला नाही. बेळगावबाबतचा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आजही चालू आहे. नेहरूंना राज्याला हवे असलेले 'मुंबई' नाव वगळून समितीने 'महाराष्ट्र'असे नाव ठरवले व राज्याची स्थापना १९६० सालच्या कामगारदिनी म्हणजे १ मे १९६० रोजीझाली. महाराष्ट्र स्थापनेचा कलश महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे हस्ते दिल्लीहून आणला गेला. नव्या राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर उपराजधानी निश्चित झाली.

हुतात्म्यांची नावे
२१ नोव्हेंबर इ. स. १९५५चे हुतात्मे[३]

१] सिताराम बनाजी पवार

२] जोसेफ डेव्हिड पेजारकर

३] चिमणलाल डी. शेठ

४] भास्कर नारायण कामतेकर

५] रामचंद्र सेवाराम

६] शंकर खोटे

७] धर्माजी गंगाराम नागवेकर

८] रामचंद्र लक्ष्मण जाधव

९] के. जे. झेवियर

१०] पी. एस. जॉन

११] शरद जी. वाणी

१२] वेदीसिंग

१३] रामचंद्र भाटीया

१४] गंगाराम गुणाजी

१५] गजानन ऊर्फ बंडू गोखले

१६] निवृत्ती विठोबा मोरे

१७] आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर

१८] बालप्पा मुतण्णा कामाठी

१९] धोंडू लक्ष्मण पारडूले

२०] भाऊ सखाराम कदम

२१] यशवंत बाबाजी भगत

२२] गोविंद बाबूराव जोगल

२३] पांडूरंग धोंडू धाडवे

२४] गोपाळ चिमाजी कोरडे

२५] पांडूरंग बाबाजी जाधव

२६] बाबू हरी दाते

२७] अनुप माहावीर

२८] विनायक पांचाळ

२९] सिताराम गणपत म्हादे

३०] सुभाष भिवा बोरकर

३१] गणपत रामा तानकर

३२] सिताराम गयादीन

३३] गोरखनाथ रावजी जगताप

३४] महमद अली

३५] तुळशीराम पुंजाजी बेलसरे

३६] देवाजी सखाराम पाटील

३७] शामलाल जेठानंद

३८] सदाशिव महादेव भोसले

३९] भिकाजी पांडूरंग रंगाटे

४०] वासुदेव सुर्याजी मांजरेकर

४१] भिकाजी बाबू बांबरकर

४२] सखाराम श्रीपत ढमाले

४३] नरेंद्र नारायण प्रधान

४४] शंकर गोपाल कुष्टे

४५] दत्ताराम कृष्णा सावंत

४६] बबन बापू भरगुडे

४७] विष्णू सखाराम बने

४८] सिताराम धोंडू राडये

४९] तुकाराम धोंडू शिंदे

५०] विठ्ठल गंगाराम मोरे

५१] रामा लखन विंदा

५२] एडविन आमब्रोझ साळवी

५३] बाबा महादू सावंत

५४] वसंत द्वारकानाथ कन्याळकर

५५] विठ्ठल दौलत साळुंखे

५६] रामनाथ पांडूरंग अमृते

५७] परशुराम अंबाजी देसाई

५८] घनश्याम बाबू कोलार

५९] धोंडू रामकृष्ण सुतार

६०] मुनीमजी बलदेव पांडे

६१] मारुती विठोबा म्हस्के

६२] भाऊ कोंडीबा भास्कर

६३] धोंडो राघो पुजारी

६४] हृदयसिंग दारजेसिंग

६५] पांडू माहादू अवरीरकर

६६] शंकर विठोबा राणे

६७] विजयकुमार सदाशिव भडेकर

६८] कृष्णाजी गणू शिंदे

६९] रामचंद्र विठ्ठल चौगुले

७०] धोंडू भागू जाधव

७१] रघुनाथ सखाराम बीनगुडे

७२] काशीनाथ गोविंद चिंदरकर

७३] करपैया किरमल देवेंद्र

७४] चुलाराम मुंबराज

७५] बालमोहन

७६] अनंता

७७] गंगाराम विष्णू गुरव

७८] रत्नू गोंदिवरे

७९] सय्यद कासम

८०] भिकाजी दाजी

८१] अनंत गोलतकर

८२] किसन वीरकर

८३] सुखलाल रामलाल बंसकर

८४] पांडूरंग विष्णू वाळके

८५] फुलवरी मगरू

८६] गुलाब कृष्णा खवळे

८७] बाबूराव देवदास पाटील

८८] लक्ष्मण नरहरी थोरात

८९] ठमाबाई विठ्ठल सूर्यभान

९०] गणपत रामा भुते

९१] मुनशी वझीऱअली

९२] दौलतराम मथुरादास

९३] विठ्ठल नारायण चव्हाण

९४] देवजी शिवन राठोड

९५] रावजीभाई डोसाभाई पटेल

९६] होरमसजी करसेटजी

९७] गिरधर हेमचंद लोहार

९८] सत्तू खंडू वाईकर

—नाशिक --

९९] गणपत श्रीधर जोशी

१००] माधव राजाराम तुरे(बेलदार)

-- बेळगांव --

१०१] मारुती बेन्नाळकर

१०२] मधूकर बापू बांदेकर

१०३] लक्ष्मण गोविंद गावडे

१०४] महादेव बारीगडी

-- निपाणी --

१०५] कमलाबाई मोहिते

-- मुंबई—

१०६] सिताराम दुलाजी घाडीगांवकर

१०७] शंकरराव तोरस्कर

१०८] बंडु गोखले

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीविषयी पुस्तके
महाराष्ट्र : एका संकल्पनेचा मागोवा (माधव दातार)
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा (ऐतिहासिक, लेखिका - शिरीष पै)

टोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादी

टोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादी

टोपणनावाला इंग्रजीत 'निकनेम' (Nickname) म्हणतात. मराठीले अनेक लेखक 'निकनेम'ने लेखन करीत आलेले आहेत, काहीजण अजूनही करतात. अशा टोपणनावाने लिखाण करणाऱ्या लेखकांची ही अपूर्ण यादी :-

अरुण टिकेकर : (टिचकीबहाद्दर); (दस्तुरखुद्द)
अनिल बाबुराव गव्हाणे : (बापू)
अशोक जैन : (कलंदर)
अशोक रानडे (दक्षकर्ण)
आत्माराम नीलकंठ साधले : आनंद साधले, दमयंती सरपटवार
आत्माराम शेट्ये : (शेषन कार्तिक)
आनंद बालाजी देशपांडे (आकाशानंद)
आनंद साधले : (दमयंती सरपटवार)
आनंदीबाई कर्वे : (बाया कर्वे)
कृष्ण गंगाधर दीक्षित : (संजीव)
कृष्णाजी अनंत एकबोटे (सहकरी कृष्ण)
कृष्णाजी लक्ष्मण सोमण : (किरात; काळदंड; सारथी) (काव्यलेखनासाठी किरात आणि भ्रमर)
कृ.श्री. अर्जुनवाडकर (पंतोजी)
केशव नारायण देव : (पतितपावनदास)
डॉ.कैलास रायभान दौंड (कैलास दौंड)
गंगाधर कुलकर्णी (रसगंगाधर)
गंगाधर बाळकृष्ण देशपांडे : (गंगाधरराव देशपांडे)
गणेश दामोदर सावरकर : (बाबाराव सावरकर) (दुर्गातनय)
गणेश वामन गोगटे : (लीला)
गणेश विठ्ठल कुलकर्णी (कुंभोजकर) : (व्यतिपात)
ग.दि. माडगुळकर (गदिमा)
गोपाळ गोविंद मुजुमदार : (साधुदास)
गोपाळ नरहर नातू : लोककवी (मनमोहन); मीनाक्षी दादरकर
गोपाळ हरी देशमुख : (लोकहितवादी; एक ब्राह्मण)
चंद्रकांत सखाराम चव्हाण : (बाबूराव अर्नाळकर)
चं.वि.बावडेकर : (आलमगीर)
चिंतामण रामचंद्र टिकेकर - अरुण टिकेकर यांचे वडील : (दूत)
चिं.त्र्य.खानोलकर - आरती प्रभु या नावाने काव्यलेखन व चिं.त्र्य.खानोलकर या नावाने गद्यलेखन
जयवंत दळवी : (ठणठणपाळ)
तुकारामतात्या पडवळ : (एक हिंदू)
तुळसी परब : ओज पर्व
दगडू मारुती पवार : कथालेखक (जागल्या)
दत्ता टोळ : (अमरेंद्र दत्त)
दत्तात्रेय रामचंद्र् कुलकर्णी : (श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर)
दामोदर माधव कुळकर्णी : (माधवसुत)
डॉ. दामोदर विष्णू नेने : (दादूमिया)
दासोपंत दिगंबर देशपांडे : (दासोपंत)
दिनकर शंकरराव जवळकर : (आग्यावेताळ)
देवदत्त टिळक : (लक्ष्मीनंदन)
द्वारकानाथ माधव पितळे : (नाथमाधव)
द्वारकाबाई हिवरगांवकर/मनोरमा श्रीधर रानडे : (गोपिकातनया)
धनंजय चिंचोलीकर : (बब्रूवान रुद्रकंठावार)
न.र. फाटक : (अंतर्भेदी), (करिष्मा), (फरिश्ता) आणि (सत्यान्वेषी)
नरसिंह चिंतामण केळकर : (अनामिक; आत्‍मानंद)
नागावकर : (गंधर्व)
नागेश गणेश नवरे : (नागेश)
नारायण गजानन आठवले : (राजा ठकार)
नागोराव गोविंद साठे : (ब्रह्मानंदाश्रम स्वामी)
नारायण जोशी : (साखरेबुवा; नानामहाराज साखरे)
नारायण दामोदर सावरकर : (जातिहृदय)
नारायण विनायक कुलकर्णी : गोविंदसुत (की विनायकसुत?)
परशराम गोविंद चिंचाळकर : गोविंदसुत
प.स. देसाई (सौ.जानकीबाई देसाई) : (सदाराम)
पांडुरंग सदाशिव साने : (साने गुरुजी)
पांडुरंग ज्ञानेश्वर कुळकर्णी : (पांडुरंग शर्मा)
पुरुषोत्तम धाक्रस (फडकरी)
पृथ्वीगीर हरिगीर गोस्वामी : पृथ्वीगीर हरिगीर
प्रल्हाद केशव अत्रे (केशवकुमार)
प्र.न. जोशी : (पुष्पदंत)
प्रभाकर जनार्दन दातार : शाहीर प्रभाकर
प्रभाकर नारायण पाध्ये : (भाऊ पाध्ये)
प्रवीण टोकेकर : (ब्रिटिश नंदी)
फोंडूशास्त्री करंडे : द्विरेफ
बळवंत जनार्दन करंदीकर : (रमाकांत)
बा.सी. मर्ढेकर : (मकरंद)
बाळकृष्ण अनंत भिडे : (बी)
बाळूताई खरे/मालती बेडेकर : (विभावरी शिरूरकर)
ब्रह्माजीपंत ब्रह्मानंद नाझरीकर : (श्रीधर)
भागवत वना नेमाडे : (भालचंद्र नेमाडे)
भा.रा. भागवत : (संप्रस्त)
मनोरमा श्रीधर रानडे/द्वारकाबाई हिवरगांवकर : (गोपिकातनया)
महादेव नारायण जोशी : (माधवराव जोशी)
महादेव मल्हार जोशी : (स्वामी सच्चिदानंद)
मा.गो. वैद्य : (नीरद)
महादेव आसाराम घाटेवाळ : (माधव परदेशी)
माधव दादाजी मोडक : (बंधु माधव)
मालतीबाई बेडेकर/बाळूताई खरे : (विभावरी शिरूरकर)
मीनप्पा व्यंकटेश केलवाड : गोविंदशर्मा
मुक्ताबाई दीक्षित : (कृष्णाबाई)
मुक्ता विठ्ठल कुलकर्णी : (मुक्ताबाई)
मृत्युंजय श्रीकृष्ण रिसबूड : (सुमेध वडावाला)
मृदुला तांबे : (सृष्टिलावण्या)
मेहबूब पठाण : (अमर शेख)
मो.ग. रांगणेकर : (धुंडिराज)
र.गो. सरदेसाई : (र.गो.स., हरिविवेक)
रघुनाथ चंदावरकर : (रघुनाथ पंडित)
रघुवीर जगन्नाथ सामंत (कुमार रघुवीर)
रविन थत्ते : (रविन मायदेव थत्ते)
रामकृष्ण माधव चोणकर : (हरी माधव समर्थ)
राम गणेश गडकरी : (बाळकराम)
रामचंद्र चितळकर : (सी रामचंद्र)
रामचंद्र जोशी : (साखरेबाबा)
रामचंद्र विनायक कुलकर्णी : (आनंदघनराम)
रामचंद्र विनायक टिकेकर - अरुण टिकेकर यांचे आजोबा : (धनुर्धारी)
रामजी गणोजी चौगुले : (रामजी गणोजी)
रा.श्री. जोग : (निशिगंध)
लक्ष्मीकांत तांबोळी : (लता जिंतूरकर)
लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर (लक्ष्मीकांत-प्यारेलालमधील पहिला) : (के.लक्ष्मीकांत, लक्ष्मीकांत)
लीला भागवत : (भानुदास रोहेकर)
वा.रा.कांत : (कांत)
विठ्ठल वामन हडप : (केयूरक)
विनायक गजानन कानिटकर : (रा. म. शास्त्री, ग्यानबा)
विनायक नरहरी भावे : (विनोबा)
वि.ल. बर्वे : (आनंद)
वि.शा. काळे  : (बाबुलनाथ)
विश्वनाथ वामन बापट : (वसंत बापट
विष्णू भिकाजी गोखले : (विष्णूबाबा ब्रह्मचारी)
विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज )
विष्णूशास्त्री चिपळूणकर : (गोल्या घुबड)
वि.ह. कुलकर्णी (चंद्रहास, रत्नपारखी, शरदचंद्र, सुहास)
वीरसेन आनंद कदम : (बाबा कदम)
शंकर दाजीशास्त्री पदे : पिनाकी, भ्रमर, शंकर
शिवराम महादेव गोऱ्हे : (चंद्रशेखर; चंद्रिका)
श्रीधर व्यंकटेश केतकर : गोविंदपौत्र
श्रीपाद रामचंद्र टिकेकर - अरुण टिकेकर यांचे काका : मुसाफिर
स.अ. शुक्ल : (कुमुद)
संजीवनी मराठे (जीवन)
सतीश जकातदार : (अमोघ श्रीवास्तव; सलील आदर्श)
संतोष दौंडे (संतोष मधुकर दौंडे)
सुनंदा बलराम कुलकर्णी : (सानिया)
सुलोचना देशमुख : (एस्; एन्)
सेतुमाधव पगडी : (कृष्णकुमार)
पी. विठ्ठल
ज्ञानेश्वर नाडकर्णी : (तुकाराम शेंदाणे)
(?) अप्पा बळवंत
(?) (वामनसुता)
(?) (देशभगिनी)
(?) (लक्ष्मीतनया)

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादी

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादी
.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे पहिले अध्यक्ष होते.

अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत महामंडळाने ४२ साहित्य संमेलने घेतली असून घुमान येथे झालेले साहित्य संमेलन हे ४३ वे साहित्य संमेलन होते. महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी कुसुमावती देशपांडे या एकच स्त्री अध्यक्ष झालेल्या होत्या. महामंडळाच्या स्थापनेनंतर दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष, अरुणा ढेरे या चार स्त्रिया संमेलनाध्यक्ष झाल्या आहेत.

मराठी साहित्य संमेलनांच्या दहा गाजलेल्या संमेलनाध्यक्षांवर आधारित ’साहित्य दरबारातील दशरत्‍ने’ नावाचे पुस्तक प्राचार्य श्याम भुर्के यांनी लिहिले आहे.

माजी संमेलनाध्यक्षांचा परिचय करून देणारी किमान चार पुस्तके आहेत, त्यांपैकी ही काही :

अरुणा ढेरे व्यक्ती आणि कथनात्मक लेखन (नानासाहेब यादव)
दभि सहवास आणि सन्मान (डॉ. श्यामला मुजुमदार)
संमेलनाध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव (संपादक - अरुण पारगावकर)
’साहित्य दरबारातील दशरत्‍ने’ (प्राचार्य श्याम भुर्के)

साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांची यादी [१]
संपादन करा
१. इ.स. १८७८ (पुणे) न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

इ.स. १८७९ ते इ.स. १८८४ (संमेलन नाही)
२. इ.स. १८८५ (पुणे) कृष्णशास्त्री राजवाडे

इ.स. १८८६ ते इ.स. १९०४ (संमेलन नाही)
३. इ.स. १९०५ (सातारा) रघुनाथ पांडुरंग करंदीकर

४. इ.स. १९०६ (पुणे) गोविंद वासुदेव कानिटकर

५. इ.स. १९०७ (पुणे) विष्णू मोरेश्वर महाजनी

६. इ.स. १९०८ (पुणे) चिंतामण विनायक वैद्य

७. इ.स. १९०९ (बडोदे) कान्होबा रामछोडदास कीर्तिकर

इ.स. १९१० (संमेलन नाही)
इ.स. १९११ (संमेलन नाही)
८. इ.स. १९१२ (अकोला) हरी नारायण आपटे

इ.स. १९१३ (संमेलन नाही)
इ.स. १९१४ (संमेलन नाही)
९. इ.स. १९१५ (मुंबई) गंगाधर पटवर्धन

इ.स. १९१६ (संमेलन नाही)
१०. इ.स. १९१७ (इंदूर) गणेश जनार्दन आगाशे

इ.स. १९१८ ते इ.स. १९२० (संमेलन नाही)
११. इ.स. १९२१ (बडोदे) नरसिंह चिंतामण केळकर

इ.स. १९२२ ते इ.स. १९२५ (संमेलन नाही)
१२. इ.स. १९२६ (मुंबई) माधव विनायक किबे

१३. इ.स. १९२७ (पुणे) श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

१४. इ.स. १९२८ (ग्वाल्हेर) माधव श्रीहरी अणे

१५. इ.स. १९२९ (बेळगाव) शिवराम महादेव परांजपे

१६. इ.स. १९३० (मडगाव) वामन मल्हार जोशी

१७. इ.स. १९३१ (हैदराबाद) श्रीधर वेंकटेश केतकर

१८. इ.स. १९३२ (कोल्हापूर) सयाजीराव गायकवाड

१९. इ.स. १९३३ (नागपूर) कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

२०. इ.स. १९३४ (बडोदे) नारायण गोविंद चापेकर

२१. इ.स. १९३५ (इंदूर) भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी

२२. इ.स. १९३६ (जळगांव) माधव जूलियन

इ.स. १९३७ (संमेलन नाही)
२३. इ.स. १९३८ (मुंबई) विनायक दामोदर सावरकर

२४. इ.स. १९३९ (अहमदनगर) दत्तो वामन पोतदार

२५. इ.स. १९४० (रत्‍नागिरी) नारायण सीताराम फडके

२६. इ.स. १९४१ (सोलापूर) विष्णू सखाराम खांडेकर

२७. इ.स. १९४२ (नाशिक) प्रल्हाद केशव अत्रे

२८. इ.स. १९४३ (सांगली) श्रीपाद महादेव माटे

२९. इ.स. १९४४ (धुळे) भार्गवराम विठ्ठल वरेरकर

इ.स. १९४५ (संमेलन नाही)
३०. इ.स. १९४६ (बेळगाव) गजानन त्र्यंबक माडखोलकर

३१. इ.स. १९४७ (हैदराबाद) न.र. फाटक

इ.स. १९४८ (संमेलन नाही)
३२. इ.स. १९४९ (पुणे) शंकर दत्तात्रय जावडेकर

३३. इ.स. १९५० (मुंबई) यशवंत दिनकर पेंढारकर

३४. इ.स. १९५१ (कारवार) अनंत काकबा प्रियोळकर

३५. इ.स. १९५२ (अमळनेर) कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी

३६. इ.स. १९५३ (अमदावाद) विठ्ठल दत्तात्रय घाटे

३७. इ.स. १९५४ (दिल्ली) लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी

३८. इ.स. १९५५ (पंढरपूर) शंकर दामोदर पेंडसे

इ.स. १९५६ (संमेलन नाही)
३९. इ.स. १९५७ (औरंगाबाद) अनंत काणेकर

४०. इ.स. १९५८ (मालवण) अनिल

४१. इ.स. १९५९ (मिरज) श्रीकृष्ण केशव क्षीरसागर

४२. इ.स. १९६० (ठाणे) रामचंद्र श्रीपाद जोग

४३. इ.स. १९६१ (ग्वाल्हेर) कुसुमावती देशपांडे

४४. इ.स. १९६२ (सातारा) नरहर विष्णू गाडगीळ

इ.स. १९६३ (संमेलन नाही)
४५. इ.स. १९६४ (मडगाव) वि.वा. शिरवाडकर

४६. इ.स. १९६५ (सातारा) वामन लक्ष्मण कुलकर्णी

इ.स. १९६६ (संमेलन नाही)
४७. इ.स. १९६७ (भोपाळ) विष्णू भिकाजी कोलते

इ.स. १९६८ (संमेलन नाही)
४८. इ.स. १९६९ (वर्धा) पु.शि. रेगे

इ.स. १९७० (संमेलन नाही)
इ.स. १९७१ (संमेलन नाही)
इ.स. १९७२ (संमेलन नाही)
४९. इ.स. १९७३ (यवतमाळ) गजानन दिगंबर माडगूळकर

५०. इ.स. १९७४ (इचलकरंजी) पु.ल. देशपांडे

५१. इ.स. १९७५ (कऱ्हाड) दुर्गा भागवत

इ.स. १९७६ (संमेलन नाही)
५२. इ.स. १९७७ (पुणे) पु.भा. भावे

इ.स. १९७८ (संमेलन नाही)
५३. इ.स. १९७९ (चंद्रपूर) वामन कृष्ण चोरघडे

५४. इ.स. १९८० (बार्शी) गं.बा. सरदार

५५. इ.स. १९८१(फेब्रुवारी) (अकोला) गो.नी. दांडेकर

५६. इ.स. १९८१ (डिसेंबर) (रायपूर) गंगाधर गाडगीळ

इ.स. १९८२ (संमेलन नाही)
५७. इ.स. १९८३ (अंबेजोगाई) व्यंकटेश दिगंबर माडगूळकर

५८. इ.स. १९८४ (जळगांव) शंकर रामचंद्र खरात

५९. इ.स. १९८५ (नांदेड) शंकर बाबाजी पाटील

६०. इ.स. १९८६ (मुंबई) विश्राम बेडेकर

इ.स. १९८७ (संमेलन नाही)
६१. इ.स. १९८८ (ठाणे) वसंत कानेटकर

६२. इ.स. १९८९ (अमरावती) केशव जगन्नाथ पुरोहित

६३. इ.स. १९९०(जानेवारी) (पुणे) यू.म. पठाण

६४. इ.स. १९९०(डिसेंबर) (रत्‍नागिरी) मधू मंगेश कर्णिक

इ.स. १९९१ (संमेलन नाही)
६५. इ.स. १९९२ (कोल्हापूर) रमेश मंत्री

६६. इ.स. १९९३ (सातारा) विद्याधर गोखले

६७. इ.स. १९९४ (पणजी) राम शेवाळकर

६८. इ.स. १९९५ (परभणी) नारायण सुर्वे

६९. इ.स. १९९६ (आळंदी) शांता शेळके

७०. इ.स. १९९७ (अहमदनगर) ना.सं इनामदार

७१. इ.स. १९९८ (परळी-वैजनाथ) द.मा. मिरासदार

७२. इ.स. १९९९ (मुंबई) वसंत बापट

७३. इ.स. २००० (बेळगाव) य.दि. फडके

७४. इ.स. २००१ (इंदूर) विजया राजाध्यक्ष

७५. इ.स. २००२ (पुणे) राजेंद्र बनहट्टी

७६. इ.स. २००३ (कऱ्हाड) सुभाष भेंडे

७७. इ.स. २००४ (औरंगाबाद) रा.ग. जाधव

७८. इ.स. २००५ (नाशिक) केशव मेश्राम

७९. इ.स. २००६ (सोलापूर) मारुती चितमपल्ली

८०. इ.स. २००७ (नागपूर) अरुण साधू

८१. इ.स. २००८ (सांगली) मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर

८२. इ.स. २००९ (महाबळेश्वर) हे संमेलन अध्यक्षाविना पार पडले

८३. इ.स. २०१० (मार्च), (पुणे), द.भि. कुलकर्णी

८४. इ.स. २०१० (डिसेंबर), ठाणे, उत्तम कांबळे

इ.स. २०११ संमेलन नाही
८५. इ.स. २०१२(फेब्रुवारी), चंद्रपूर, वसंत आबाजी डहाके

८६. इ.स. २०१३ (जानेवारी), चिपळूण, नागनाथ कोतापल्ले,

८७. इ.स. २०१४ (जानेवारी), सासवड, फ.मुं. शिंदे

८८. इ.स. २०१५ (जानेवारी), घुमान, डॉ. सदानंद मोरे

८९. इ.स. २०१६ (जानेवारी), पिंपरी, डॉ. श्रीपाल सबनीस

९०. इ.स. २०१७ (फेब्रुवारी), डोंबिवली, डॉ. अक्षयकुमार काळे

९१. इ.स. २०१८ (फेब्रुवारी), बडोदे, डाॅ.. लक्ष्मीकांत देशमुख

९२. इ.स. २०१९ (फेब्रुवारी), यवतमाळ, अरुणा ढेरे

९३. इ. स. २०२० (जानेवारी), उस्मानाबाद, फादर फ्रान्सिस दिब्रिटो

९४. इ. स. २०२१ (मार्च), (कोरोना मुळे स्थगिती), नाशिक, जयंत नारळीकर