01 May 2022

विश्वनाथ काशीनाथ राजवाडे महाराष्ट्रातील प्रख्यात इतिहासकार, लेखक, वक्ते

विश्वनाथ काशीनाथ राजवाडे
महाराष्ट्रातील प्रख्यात इतिहासकार, लेखक, वक्ते

इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे (जन्म : २४ जून १८६३; - ३१ डिसेंबर १९२६) हे मराठी इतिहास-संशोधक होते. त्यांनी संपादित केलेले 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' ह्या ग्रंथाचे २२ खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते.

विश्वनाथ काशीनाथ राजवाडे
Vishwanath Kashinath Rajwade 2003 stamp of India.jpg
जन्म नाव
विश्वनाथ काशीनाथ राजवाडे
जन्म
२४ जून इ.स. १८६३
वरसई, रायगड जिल्हा
मृत्यू
३१ डिसेंबर इ.स. १९२६
धुळे
भाषा
मराठी
साहित्य प्रकार
इतिहास
प्रसिद्ध साहित्यकृती
मराठ्यांच्या इतिहासाची साधने
भारतीय विवाह संस्थेचा इतिहास
जीवन
संपादन करा
वि. का. राजवाडे यांचा जन्म महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील वरसई येथे झाला. [१]

बी.ए. पर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर करून ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी भाषांतर नावाचे मासिक सुरू केले.

१८९८ साली त्यांनी लिहिलेल्या 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. ७ जुलै १९१० रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली.

३१ डिसेंबर १९२६]] रोजी राजवाडे यांचे निधन झाले.

राजवाडे म्हणायचे - ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा पाश्चिमात्य लोक शिकतील; माझ्या ग्रंथांची पूजा करतील. मी परकीय भाषेत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीला हपापलेलाो नाही.

राजवाडे ह्यांचे जन्मवर्ष
संपादन करा
राजवाडे ह्यांच्या जन्माच्या वर्षाबाबत थोडा गोंधळ झालेला दिसतो. त्यांच्याविषयीच्या विविध लेखनांत त्यांचे जन्मवर्ष वेगवेगळे दिलेले आढळते[२].

राजवाडे ह्यांच्या मृत्यूनंतर द. वा. पोतदार ह्यांनी केसरीत लिहिलेल्या लेखात त्यांची जन्मतिथी आषाढ शु. ८, शके १७८६ अशी नोंदवलेली आढळते[३]. ह्यानुसार इ. स. १२ जुलै १८६४ हा दिनांक[४] मिळतो.

मात्र राजवाड्यांच्या स्मृत्यर्थ प्रकाशित झालेल्या ब्राह्मण-पत्रिकेच्या राजवाडे तिलांजली अंकात वा. दा. मुंडले ह्यांनी जे स्पष्टीकरण दिले आहे त्यानुसार राजवाडे ह्यांनी मुंडल्यांना आपला जन्मशक १७८५ असा सांगितला होता. त्याबाबत मुंडले ह्यांनी पोतदार ह्यांच्याकडे विचारणा केली आणि राजवाड्यांचे थोरले बंधू वैजनाथपंत राजवाडे ह्यांच्याकडे त्यांना विचारणा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे विचारणा केली असता राजवाडे ह्यांची एक जन्मपत्रिका वैजनाथपंत ह्यांनी पोतदारांना उपलब्ध करून दिली. ती मुंडले ह्यांच्या लेखात छापली असून त्यावर राजवाड्यांची जन्मतिथी आषाढ शु. ८, शके १७८५ अशी नोंदवलेली आहे[५]. इसवी सनानुसार हा दिनांक २४ जून १८६३ असा आहे[६]. दत्तोपंत पोतदार ह्यांनीही नंतरच्या काळात ह्याच तिथीचा उल्लेख केलेला आढळतो [७].

ह्याव्यतिरिक्त १२ जुलै १८६३[८] आणि २४ जुलै १८६३[९] असे दोन दिनांक राजवाडे ह्यांचे जन्मदिनांक म्हणून नोंदवलेले आढळतात. मात्र त्यांचे आधार नोंदवलेले आढळत नाहीत[१०]. त्यामुळे उपलब्ध पुरावे पाहता आषाढ शु. ८, शके १७८५ (२४ जून १८६३) हाच दिनांक राजवाडे ह्यांचा जन्मदिनांक असावा असे म्हणता येते.

राजवाड्यांचा दरारा
संपादन करा
महाराष्ट्राच्या विचारविश्वात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा मोठा दरारा, दबदबा आणि धाक होता. राजवाडे आपल्या हयातीतच एक आख्यायिका बनून गेले होते राजवाडे यांच्यावर भरपूर टीका झाली. त्यांच्या हयातीतच प्रबोधनकार के.सी. ठाकरे, विठ्ठल रामजी शिंदे, जिवाजी मंगेश तेलंग यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. नंतरही इतिहाससंशोधक त्र्यं.शं. शेजवलकर यांनी राजवाडे यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. तथापि, या सर्व गोष्टी एकत्र केल्या तरी राजवाडे यांचे वाक्‍य न्‌ वाक्य ब्रह्मवाक्‍य मानणारा एक वर्ग अस्तित्वात राहिलाच आणि विशेष म्हणजे मराठी विचारविश्‍वात याच वर्गाचे वर्चस्व असल्यामुळे राजवाडे यांचे स्थान अबाधित राहिले.

राजवाड्यांचे लेखन आणि प्रस्तावना
संपादन करा

विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचे मोडी लिपीतील हस्ताक्षर
राजवाडे यांच्या नावावर स्वतंत्र असा एकही ग्रंथ नाही. त्यांनी नियतकालिकांमधून किरकोळ स्वरूपाचे लेख लिहिले. ‘महिकावतीची बखर’ आणि ‘राधामाधवविलास चंपू’ या प्राचीन ग्रंथांचे संपादन केले आणि मुख्य म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साधने गोळा करून ती तब्बल बावीस खंडांमध्ये छापली. त्यांच्यापैकी काही खंडांना प्रस्तावना लिहिल्या. राजवाडे संपादनांपेक्षा अधिक गाजले ते या प्रस्तावनांमुळे. ज्यांना या प्रस्तावना आवडल्या नाहीत, त्यांनाही राजवाडे यांनी अविश्रांत कष्ट घेऊन, प्रचंड भ्रमंती करून जमा केलेल्या इतिहासाच्या साधनसामग्रीसाठी त्यांच्या ऋणात राहण्यावाचून पर्यायच नव्हता.

राजवाडे यांनी लिहिलेली ‘ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण’ या पुस्तकाची प्रस्तावना मूळ पुस्तकापेक्षा अधिक वाचनीय आहे. असेच त्यांच्या बहुतेक पुस्तकांबद्दल म्हणता येईल.

प्रतिभाशक्ती आणि आत्मविश्वास
संपादन करा
राजवाडे बुद्धिमान तर होतेच; पण त्यांना प्रतिभाशक्तीचीही देणगी लाभली होती. जबरदस्त आत्मविश्‍वास हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य होते. त्यामुळं साधा अंदाज किंवा कयाससुद्धा ते अशा पद्धतीने व अशा आक्रमकपणाने मांडत, की जणू काही तो त्रिकालाबाधित सत्य असलेला महासिद्धान्तच आहे.

प्रकाशित साहित्य
संपादन करा
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १ -मराठी भाषा व व्याकरण
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड २ -मराठी ग्रंथ व ग्रंथकार
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ३ -संस्कृत भाषा विषयक
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ४ -अभिलेख संशोधन
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ५ -मराठी धातुकोष
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ६ -व्युत्पत्ती कोष
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ७,८ -समाजकारण व राजकारण
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ९ - आत्मवृत्त व लेख
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १० -प्रस्तावना खंड
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ११ -इतिहास
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १२ -संपादक राजवाडे
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १३ -समग्र संत साहित्य
खानदेशातील घराणी
तीर्थरूप शहाजीराजे भोसले यांचे चरित्र
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १ ते २२ (संपादन आणि प्रस्तावना)
राजवाडेनामादिशब्द व्युत्पत्तिकोश
राजवाडे लेखसंग्रह (संपादक - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी; साहित्य अकादमी प्रकाशन)
राधामाधवविलासचंपू (संपादन आणि प्रस्तावना)
संस्कृत प्रतिशब्दशः भाषांतर
संस्कृत भाषेचा उलगडा
ज्ञानेश्वर नीति कथा
ज्ञानेश्वरी (राजवाडे संहिता) : अध्याय १ (२३ पानी प्रस्तावनेसह), ४, १२
ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण
संस्थात्मक कार्य
संपादन करा
भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे (संस्थापक)
वि.का. राजवाडे यांच्यावरील पुस्तके
संपादन करा
ब्राह्मण पत्रिकेचा राजवाडे तिलांजली अंक (राजवाडे यांच्या मृत्यूसंबंधी प्रमुख वर्तमानपत्रांचे व प्रसिद्ध पुरुषांचे अभिप्राय; दुर्मीळ छायाचित्रे)
राजवाडे यांचे चरित्र व राजवाड्यांच्या दोन तपांचा विद्वत्सहवास (लेखक - भा.वा. भट)
राजवाड्यांचा रामदास : (राजवाडे लेखसंग्रहाअंतर्गत, संपादन द.वा. पोतदार)
इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र (लेखक - साने गुरुजी)
वि.का.राजवाडे यांचे इतिहास संशोधन मंडळ
संपादन करा
इतिहास संशोधनासाठी वि.का. राजवाडे यांनी पुणे येथे 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधन मंडळ स्थापन केले.
वि.का.राजवाडे यांचे इतिहासातिल कार्य
संपादन करा
मानवी इतिहास काल व स्थल यांनी
बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार* विशिष्ट कालावर व विशिष्ट स्थलावर पसरवून दाखवला पाहिजे.

काल, स्थल व व्यक्ती या त्रयीची जी
सांगड तिलाच प्रसंग वा ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते.

             _अंतिम चित्रण
इतिहासलेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण
अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत.

मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ असे शीर्षक असणारे २२ खंड त्यांनी संपादित केले.
त्यांच्या मते इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन.
केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी कटकारस्थाने आणि युद्धेयांच्याच हकिकती नव्हेत’’, असे त्यांचे मत होते.
अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.

भारत इतिहास संशोधक मंडळ

भारत इतिहास संशोधक मंडळ

भारत इतिहास संशोधक मंडळ हे प्रामुख्याने भारतीय इतिहासाचा अभ्यास करणारे मंडळ आहे. या मंडळाची स्थापना ७ जुलै, इ.स. १९१० रोजी इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी केली पुणे येथे केली.

स्थापक विश्वनाथ काशिनाथ राजवाडे.
इतिहास

भारत इतिहास संशोधक मंडळाची विश्वनाथ काशीनाथ राजवाडे आणि सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे यांनी पुण्यातील अप्पा बळवंत चौकात असलेल्या सरदार मेहेंदळे यांच्या वाड्यात केली. पुढे ही संस्था पुण्याच्या सदाशिव पेठ परिसरातील स्वतःच्या इमारतीत स्थलांतरित झाली.

त्यानंतरही पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळ इतिहास संशोधकांना मदत करण्यासाठी आणि ऐतिहासिक अभ्यासाच्या प्रगतीस हातभार लावण्याच्या उद्देशाने पुढे चालूच राहिले. जनतेने मंडळाला दानादाखल पुस्तके आणि कागदपत्रे मिळवून देऊन खूप समर्थन दिले. राजवाडे यांचे शिष्य दत्तो वामन पोतदार, गणेश हरि खरे आणि वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी मंडळाच्या कामात स्वतःला झोकून देऊन मंडळाला समृद्ध करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.

संसाधने
संपादन करा
भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये २०१९ साली १५ लाखांहून अधिक ऐतिहासिक कागदपत्रे आणि मराठी (देवनागरी आणि मोडी), फारसी, पोर्तुगीज आणि इंग्रजी भाषेतली ३०,००० हस्तलिखिते आहेत. मंडळाच्या सुसज्ज संग्रहालयात चार हजाराहून अधिक जुनी नाणी एक हजार रंगीत चित्रे आणि काही शिल्पे व शिलालेख जतन करून ठेवली आहेत. मंडळाच्या ग्रंथालयातील २७,०००हून अधिक इंग्रजी-मराठी पुस्तके संशोधकांना तेथेच विनामूल्य वाचनासाठी किंवा घरी नेऊन वाचण्यासठी नाममात्र फीमध्ये उपलब्ध होऊ शकतात. ही संसाधने प्रामुख्याने मराठा साम्राज्य, मराठा संस्कृती आणि मराठी इतिहासावरची आहेत.भारतावरील मुगल आणि ब्रिटिश साम्राज्यावरील साहित्याचा मोठा संग्रहही त्यांत आहे.

भारत इतिहास संशोधक मंडळाकडून एक त्रैमासिक नियतकालिकाही प्रकाशित केले जाते. या नियतकालिकात नवीन शोधांवरील निबंध आणि लेख सादर केले जातात. मंडळाने अनुभवी इतिहासकारांच्या वार्षिक परिषदांच्या आणि इतिहासकारांच्या अन्या बैठकीच्या अहवालांद्वारे लिहिलेली आणि संपादित केलेली पुस्तके देखील प्रकाशित केली आहेत. हे मंडळ वेळोवेळी तरुण संशोधकांसाढी आणि इतिहासकारांसाठी व्याख्याने, कार्यशाळा, प्रशिक्षण, सेमिनार आणि अभ्यासदौरा आयोजित करत असते.

मंडळाचे अध्यक्ष
संपादन करा
१९१० - १९१३ - गणेश व्यंकटेश जोशी
१९१३ - १९२६ - काशिनाथ नारायण साने
१९२६ - १९३५ - चिंतामण विनायक वैद्य
१९३५ - १९४२ - नरसिंह चिंतामण केळकर
१९४२ - १९५० - मालोजीराव नाईक निंबाळकर
१९५० - १९७४ - दत्तो वामन पोतदार
१९७४ - १९८१ - गणेश हरी खरे
१९८१ - १९८३ - हसमुख धीरजलाल सांकलिया
१९८४ - १९८६ - रामचंद्र शंकर वाळिंबे
१९८८ - १९९१ - विश्वनाथ त्रिंबक शेटे
???? - २०२० - श्री.मा.भावे
२०२० - प्रदीप रावत
प्रकाशित ग्रंथ
संपादन करा
शिवचरित्र साहित्य, खंड १ ते १६
शिवाजी निबंधावली
शिवचरित्र निबंधावली
सम्पूर्ण भूषण - रामचंद्र गोविंद काटे, १९३०
दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने
पुणे नगर संशोधन वृत्त
शिवचरित्र वृत्त संग्रह, खंड १ ते ३
शिवभारत
शिवचरित्र प्रदीप
ऐतिहासिक फारसी साहित्य खंड १ ते ६
ऐतिहासिक पोवाडे खंड १ व २
संभाजी कालीन पत्रसार संग्रह
मठगावचा शिलालेख
शिवकालीन पत्रसार संग्रह खंड १ ते ३
मूर्तीविज्ञान
मंडळाचे संशोधक
संपादन करा
वि.का.राजवाडे
वासुदेवशास्त्री खरे
काशिनाथ नारायण साने
दत्तात्रेय विष्णू आपटे
चिंतामण विनायक वैद्य
चिंतामण गणेश कर्वे
न.चिं.केळकर
विनायक लक्ष्मण भावे
नारायण भवानराव पावगी
गणेश सखाराम खरे
गंगाधर नारायण मुजूमदार
शंकर श्रीकृष्ण देव
दत्तो वामन पोतदार
मिया शिकंदरलाल आतार
गो.का. चांदोरकर
नारायण गोविंद चापेकर
स.म.दिवेकर
स.ग. जोशी
जनार्दन सखाराम करंदीकर
पांडुरंग नरसिंह पटवर्धन
भास्कर रामचंद्र भालेराव
चिंतामण गंगाधर भानू
पां.मा.चांदोरकर
कृ.वि.आचार्य
ना.य.मिरीकर
गं.के.देशपांडे
कृष्णाजी वासुदेव पुरंदरे
शिवराम महादेव परांजपे
शंकर नारायण जोशी
वासुदेव सीताराम बेंद्रे
ब.द.आपटे
त्र्यंबक शंकर शेजवलकर
गणेश हरी खरे
यशवंत राजाराम गुप्ते
वा.कृ.भावे
दि.वि.काळे
शां.वि.आवळसकर
बाबासाहेब पुरंदरे
सदाशिव मार्तंड गर्गे
बी.जी.परांजपे
रा.वि.ओतूरकर
यादव माधव काळे
य.न. केळकर
द.बा.डिसकळकर
वि.सी.चितळे
मा.वि.गुजर
यशवंत खुशाल देशपांडे
मोरेश्वर गंगाधर दिक्षित
देवीसिंह व्यंकटसिंह चौहान
कमल गोखले
गो.त्र्यं.कुलकर्णी
प्र.ल.सासवडकर
मा.रा.कंटक
कृ.ना.चिटणीस
अ.रा.कुलकर्णी
शोभना गोखले
गजानन भास्कर मेहेंदळे
चंद्रकांत अभंग

हरी नारायण आपटे मराठी लेखक

हरी नारायण आपटे
मराठी लेखक

हरी नारायण आपटे, अर्थात ह.ना. आपटे, (मार्च ८, इ.स. १८६४ - मार्च ३, इ.स. १९१९) हे मराठी लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व व्याख्याते होते. ते ज्ञानप्रकाश या मासिकाचे काही काळ संपादक, आनंदाश्रम या प्रकाशनसंस्थेचे व्यवस्थापक, आणि करमणूक या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. अकोला येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. त्यांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. आठ स्त्रीरत्ने या सदराखाली ह.ना.आपटे यांनी भास्कराचार्यांची लीलावती, राणी दुर्गावती इत्यादी स्त्रियांची बोधप्रद माहिती प्रकाशित केली होती. केशवसुतांची कविता आणि गोविंद बल्लाळ देवल यांचे शारदा हे नाटक हरिभाऊ आपट्यांनीच प्रकाशात आणले.

हरी नारायण आपटे
नारायण हरी आपटे याच्याशी गल्लत करू नका.

हरी नारायण आपटे
प्रकाशित साहित्य
संपादन करा
आपटे अर्वाचीन मराठी कादंबरीचे जनक मानले जातात. त्यांच्या लिखाणावर महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले प्रभृतींचा प्रभाव होता. १२ सामाजिक आणि ११ ऐतिहासिक अशा एकूण २३ कादंबऱ्या लिहिणाऱ्या ह.ना. आपटयांची 'पण लक्षात कोण घेतो?' ही कादंबरी मराठी साहित्यात मानदंड समजली जाते. सतत २५-३० वर्षे अशाप्रकारचे मराठी साहित्य निर्माण झालेल्या त्या ह.ना.आपट्यांच्या कालखंडाला हरीभाऊ युग म्हणतात, आणि हरीभाऊ आपट्यांना युगप्रवर्तक. हरिभाऊंनी नाटकेसुद्धा लिहिली आहेत. दोन नाटके स्वतंत्र आहेत, त्यांतले ’सती पिंगळा’ हे नाटक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. उरलेली तीन नाटके व तीन प्रहसने रूपांतरित आहेत. धूर्तविलसत, मारून मुटकून वैद्यबुवा व जबरीचा विवाह ही फ्रेन्च नाटककार मोलियरच्या प्रहसनांची रूपांतरे आहेत तर, जयध्वज (मूळ व्हिक्टर ह्यूगोचे 'हेर्नानी'), श्रुतकीर्तचरित (काँग्रेव्हचे ’द मोर्निंग ब्राईड’) व सुमतिविजय (शेक्सपियरचे ’मेझर फॉर मेझर’) ही रूपांतरित नाटके आहेत. त्यांनी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या तेराव्या वार्षिक सभेपुढे दिलेल्या व्याख्यानांची पुस्तिका ’विदग्धवाङ्‌मय’ या नावाखाली प्रकाशित झाली होती. ’नाट्यकथार्णव’ यामासिकासाठी त्यांनी मेडोज टेलर या इंग्रजी लेखकाच्या दोन कादंबऱ्यांची ’तारा’ व ’पांडुरंग हरी’ ही मराठी भाषांतरे केली होती. बिचारा या टोपणनावाने ह.ना. आपट्यांनी २९ मार्च, इ.स. १८८१ च्या केसरीच्या अंकात कालिदास व भवभूती यांच्या संबंधांत लिहिलेल्या पत्रांतून त्यांचा व्यासंग व समीक्षा दृष्टी दिसून येते. निबंधकार चिपळूणकर यांच्या निधनानंतर हरीभाऊ आपट्यांनी शिष्यजनविलाप ही ८८ श्लोकांची विलापिका लिहिली होती. ती विद्वज्जनांनी वाखाणली होती. सुरुवातीच्या काळात साहित्याला एक वेगळी उंची प्राप्त करून देण्यामध्ये हरी नारायण आपटे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले सामाजिक आणि ऐतिहासिक स्वरूपाच्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या त्यांच्या कादंबऱ्यांतून समाजाचं यथार्थ चित्रण केलं गेलं

नावसाहित्यप्रकारप्रकाशनप्रकाशन वर्ष (इ.स.)
आजचसामाजिक कादंबरी (अपूर्ण)रम्यकथा प्रकाशनइ.स. १९०४ - इ.स. १९०६
उषःकालऐतिहासिक कादंबरीइ.स. १८९५ - इ.स. १८९७
घटकाभर करमणूककथासंग्रहइ.स. १९१७
कर्मयोगसामाजिक कादंबरी(अपूर्ण)रम्यकथा प्रकाशनइ.स. १९१३ - इ.स. १९१७
कालकूटऐतिहासिक कादंबरी(अपूर्ण)इ.स. १९०९ - इ.स. १९११
केवळ स्वराज्यासाठीऐतिहासिक कादंबरीइ.स. १८९८ - इ.स. १८९९
गड आला पण सिंह गेलाऐतिहासिक कादंबरीरम्यकथा प्रकाशनइ.स. १९०३ - इ.स. १९०४
गणपतरावसामाजिक कादंबरी(अपूर्ण)आधी मासिक’मनोरंजन’, नंतर रम्यकथा प्रकाशनइ.स. १८८६ - इ.स. १८९२
गीतांजलीटागोरांचे चरित्र व त्यांच्या गीतांजलीचा गद्य अनुवादइ.स. १९१७
चंद्रगुप्तऐतिहासिक माहितीपरइ.स. १९०२ - इ.स. १९०५
चंद्रगुप्त व चाणक्यऐतिहासिक कादंबरीइ.स. १९०२ - इ.स. १९०५
चाणाक्षपणाचा कळससामाजिक कादंबरीआधी मनोरंजन मासिक, नंतर रम्यकथा प्रकाशनइ.स. १८८६ - इ.स. १८९२
जग हें असें आहे...सामाजिक कादंबरीरम्यकथा प्रकाशनइ.स. १८९७ - इ.स. १८९९
जबरीचा विवाहप्रहसन(रूपांतरित)मूळ लेखक - मोलियरइ.स. १९१०
जयध्वजनाटक(रूपांतरित)मूळ - व्हिक्टर ह्यूगोचे 'हेर्नानी'
तारासामाजिक कादंबरी(अनुवादित)
धूर्त विलसतप्रहसन (रूपांतरित)मूळ लेखक - मोलियरइ.स. १९१०
पण लक्षात कोण घेतो?सामाजिक कादंबरीरम्यकथा प्रकाशनइ.स. १८९० - इ.स. १८९२
पांडुरंग हरीसामाजिक कादंबरी (अनुवादित)
भयंकर दिव्यकादंबरीरम्यकथा प्रकाशनइ.स. १९०१ - इ.स. १९०३
भासकवीच्या नाटककथाअनुवादित कथाइ.स. १९१७
मधली स्थिति(आजकालच्या गोष्टी)सामाजिक कादंबरीआधी मासिक ’पुणे वैभव’, नंतर रम्यकथा प्रकाशनइ.स. १८८५ - इ.स. १८८८
माध्यान्हसामाजिक कादंबरीइ.स. १९०६ - इ.स. १९०८
मायेचा बाजारसामाजिक कादंबरीरम्यकथा प्रकाशनइ.स. १९१० - इ.स. १९१२
मारून मुटकून वैद्यबुवाप्रहसन (रूपांतरित)मूळ लेखक - मोलियरइ.स. १९१०
मीसामाजिक कादंबरीरम्यकथा प्रकाशनइ.स. १८९३ - इ.स. १८९५
म्हैसूरचा वाघअनुवादात्मक ऐतिहासिक कादंबरी(अपूर्ण)इ.स. १८९० - इ.स. १८९१
यशवंतराव खरेसामाजिक कादंबरीरम्यकथा प्रकाशनइ.स. १८९२ - इ.स. १८९५
रूपनगरची राजकन्याऐतिहासिक कादंबरीरम्यकथा प्रकाशनइ.स. १९०० - इ.स. १९०२
वज्राघातऐतिहासिक कादंबरीइ.स. १९१३ - इ.स. १९१५
विदग्धवाङ्‌मयव्याख्यानपुस्तिकाइ.स. १९११
शिष्यजनविलापश्लोकमय विलापिकासाप्ताहिक केसरीमार्च, इ.स. १८८२
श्रुतकीर्तचरितनाटक(रूपांतरित)
संत सखूनाटकइ.स. १९११
सती पिंगळानाटकइ.स. १९२१
सुमतिविजयनाटक(रूपांतरित)मूळ विल्यम शेक्सपियर लिखित मेझर फाॅर मेझर
स्फुट गोष्टी -भाग १ ते ६कथासंग्रहइ.स. १९१७
सूर्यग्रहणऐतिहासिक कादंबरी(अपूर्ण)इ.स. १९०८ - इ.स. १९०९
सूर्योदयऐतिहासिक कादंबरीइ.स. १९०५ - इ.स. १९०६
हरिभाऊंचीं पत्रें [१]पत्रसंग्रहऐक्यसंपादन मंडळ
संदर्भ
संपादन करा
हरी नारायण आपटे यांनीं श्री काशीबाई व गोविंद वासुदेव कानिटकर यांस लिहिलेलीं पत्रें ; दोन शब्द, काशीबाई कानिटकर ; प्रस्तावना वाग्भट नारायण देशपांडे
ह.ना. आपटे यांच्यासंबंधीची पुस्तके
संपादन करा
आलोचना मासिकाचा हरि नारायण आपटे विशेषांक (इ.स. १९६३)
सहा साहित्यकार (हरिभाऊ आणि इतर, सु. रा. चुनेकर)
हरि नारायण आपटे (चरित्र, लेखक रा.भि. जोशी)
हरि नारायण आपटे, चरित्र व वाङ्‍मयविवेचन (इ.स. १९३१) : लेखिका वेणूताई पानसे
हरि नारायण आपटे यांचे संक्षिप्त चरित्र (इ.स. १९२२) : लेखक बापुजी मार्तंड आंबेकर
ह.ना. आपटे (कांहीं आठवणी आणि मनोरंजक प्रसंग) (बापुजी मार्तंड आंबेकर)
ह.ना. आपटे निवडक वाङ्‌मय : साहित्य अकादमी प्रकाशन (इ.स. १९८९) : संपादक विद्याधर पुंडलिक
हरिभाऊ, काळ आणि कर्तृत्व (इ.स. १९७२) : लेखक वि.बा.आंबेकर.
हरिभाऊ आपटे यांची आत्मचरित्रात्मक कादंबरी -'मी' -डॉ. रेखा वडिखाये
हरिभाऊ आपटे यांची 'मी' ही कादंबरी त्यांच्या जीवनावर आधारित असल्याने तिच्यातून तत्कालीन, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक परिस्थितीचे दर्शन घडते. कादंबरी नायकप्रधान वाटत असली तरी ती स्त्रीजीवनकेंद्री आहे.स्त्रियांच्या दुःखांना वाचा फोडणे हाच या कादंबरीचा मूळ हेतू आहे. पुरुषप्रधान संस्कृतीच्या अनुषंगाने निर्माण झालेली पुरुषजातीची आणि समाजाची स्त्रीकडे बघण्याची मानसिकता बदलण्याची गरज त्यांनी या कादंबरीत वर्तवली आहे. हरिभाऊंचे वडील कुटुंब सोडून गेल्यामुळे आईच्या वाट्याला आलेले दुःख, बहीण गंगी तिचा साठीच्या आतबाहेर असलेल्या पुरुषाशी झालेला जरठबाला विवाह, घराघरांत असलेल्या गंगीसारख्या स्त्रियां, त्यांची अवस्था बदलण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे या जाणिवेतून हरिभाऊंनी त्याकाळी स्त्री शिक्षणाचा जोरकसपणे पुरस्कार केला. हरिभाऊ आपटे यांनी मृत्युपूर्वी लिहून ठेवलेल्या या कादंबरीत समाविष्ट केलेल्या पत्रात समाजसुधारणेविषयीची त्यांची तळमळ प्रकर्षाने जाणवते. ते म्हणतात,"एकोणविसाव्या शतकानंतर आता आपला शत्रू म्हणजे आपले अज्ञान. आज हजारो वर्षे जगाचे पाऊल पुढे पडत आहे ते ज्ञानाच्या जोरावर. ज्ञानाचे स्थान एकेकाळी आपला आर्य देश होता. पुढे इजिप्त झाला, पुढे रोम झाला. पुढे फ्रान्स,जर्मनी,इंग्लंड, अमेरिका इत्यादी देश होत गेले आहेत. आता जपानमध्ये ते आले आहे. कालचक्राप्रमाणे ज्ञानाने आपले स्थान बदलले. ज्या स्थानांतून त्याचा लोप झाला त्या स्थानांचे वैभवही लयास गेले.म्हणून अज्ञानरूपी शत्रूला जिंकण्यासाठी ज्ञानाचा प्रसार करणे हेच मोठे अकुंठित गतिशात्र आहे."( ' मी ' -पृ.क्र. ४५३ ,४५४) समाजातील केवढा मोठा मानवसमूह पुरुषप्रधान संस्कृतीने अज्ञानाच्या अंधारात ठेवल्याने त्याच्याजवळ असलेल्या विविध क्षमतांचा समाजविकासासाठी आणि देशविकासासाठी वापर होऊ शकत नाही, याचे दुःख हरिभाऊ वरील परिच्छेदात अतिशय कळकळीने व्यक्त करताना दिसतात. त्यांच्या या विचारांची आजच्या समाजालाही नितांत गरज आहे.स् त्रीशिक्षण आणि स्त्री -पुरुष समानतेचा विचार हा या कादंबरीचा गाभा आहे. यायोगेच कुटुंबाचा, समाजाचा, पर्यायाने देशाचा विकास घडून येणार आहे.

आधार ग्रंथ - ' मी ' -कादंबरी - हरिभाऊ आपटे , सर्व्हिडिया प्रकाशन, पुणे,१९६५ ,पाचवी आवृत्ती