Ads

14 May 2022

जीव विज्ञान के प्रश्न

जीव विज्ञान के प्रश्न 🔵

1.: - मांसपेशियों में किस अम्ल के एकत्रित होने से थकावट आती है ?
Ans : - लैक्टिक अम्ल

2.: - अंगूर में कौन-सा अम्ल पाया जाता है?
Ans : - टार्टरिक अम्ल

3.: - कैंसर सम्बन्धी रोगों का अध्ययन कहलाता है
Ans : - -ऑरगेनोलॉजी

4.: - मानव शरीर में सबसे लम्बी कोशिका कौन-सी होती है?
Ans : - तंत्रिका कोशिका

5.: - दाँत मुख्य रूप से किस पदार्थ के बने होते हैं?
Ans : - डेंटाइन के

6.: - किस जंतु की आकृति पैर की चप्पल के समान होती है?
Ans : - पैरामीशियम

7.: - केंचुए की कितनी आँखें होती हैं?
Ans : - एक भी नहीं

8.: - गाजर किस विटामिन का समृद्ध स्रोत है?
Ans : - विटामिन A

9.: - निम्न में से किस पदार्थ में प्रोटीन नहीं पाया जाता है?
Ans : - चावल

10.: - मानव का मस्तिष्क लगभग कितने ग्राम का होता है?
Ans : - 1350

11.: - रक्त में पायी जाने वाली धातु है
Ans : - -लोहा

12.: - किण्वन का उदाहरण है
Ans : - -दूध का खट्टा होना,खाने की ब्रेड का बनना,गीले आटे का खट्टा होना

13.: - निम्न में से कौन-सा आहार मानव शरीर में नये ऊतकों की वृद्धि के लिए पोषक तत्व प्रदान करता है?
Ans : - पनीर

14.: - निम्न में से कौन एक उड़ने वाली छिपकली है?
Ans : - ड्रेको

15.: - घोंसला बनाने वाला एकमात्र साँप कौन-सा है?
Ans : - किंग कोबरा

16.: - भारत में पायी जाने वाली सबसे बड़ी मछली कौन-सी है?
Ans : - ह्वेल शार्क

17.: - दालें किसका एक अच्छा स्रोत होती हैं?
Ans : - प्रोटीन

18.: - देशी घी में से सुगन्ध क्यों आती है?
Ans : - डाइएसिटिल के कारण

19.: - इन्द्रधनुष में किस रंग का विक्षेपण अधिक होता है?
Ans : - लाल रंग

20.: - टेलीविजन का आविष्कार किसने किया था?
Ans : - जे. एल. बेयर्ड

21: - हीरा चमकदार क्यों दिखाई देता है?
Ans : - सामूहिक आंतरिक परावर्तन के कारण

22.: - ‘गोबर गैस’ में मुख्य रूप से क्या पाया जाता है।
Ans : - मिथेन

23.: - दूध की शुद्धता का मापन किस यन्त्र से किया जाता है?
Ans : - लैक्टोमीटर

24.: - पृथ्वी पर सबसे अधिक मात्रा में पाया जाने वाला धातु तत्त्व कौन-सा है?
Ans : - ऐलुमिनियम

25.: - मोती मुख्य रूप से किस पदार्थ का बना होता है?
Ans : - कैल्सियम कार्बोनेट

26.: - मानव शरीर में सबसे अधिक मात्रा में कौन-सा तत्व पाया जाता है?
Ans : - ऑक्सीजन

27.: - किस प्रकार के ऊतक शरीर के सुरक्षा कवच का कार्य करते हैं?
Ans : - एपिथीलियम ऊतक

28.: - मनुष्य ने सर्वप्रथम किस जन्तु को अपना पालतू बनाया?
Ans : - कुत्ता

29.: - किस वैज्ञानिक ने सर्वप्रथम बर्फ़ के दो टुकड़ों को आपस में घिसकर पिघला दिया?
Ans : - डेवी

30.: - सबसे अधिक तीव्रता की ध्वनि कौन उत्पन्न करता है?
Ans : - बाघ

31.: - जब ध्वनि तरंग चलती हैं, तो वे अपने साथ ले जाती हैं
Ans : - -ऊर्जा

32.: - सूर्य ग्रहण के समय सूर्य का कौन-सा भाग दिखाई देता है?
Ans : - किरीट

33.: - सूर्य की किरण में कितने रंग होते हैं?
Ans : - 7

34.: - ‘टाइपराइटर’ (टंकण मशीन) के आविष्कारक कौन हैं?
Ans : - शोल्स

35.: - सिरका को लैटिन भाषा में क्या कहा जाता है।
Ans : - ऐसीटम

36.: - कपड़ों से जंग के धब्बे हटाने के लिये प्रयोग किया जाता है
Ans : - -ऑक्ज़ैलिक अम्ल

37.: - गन्ने में ‘लाल सड़न रोग’ किसके कारण उत्पन्न होता है?
Ans : - कवकों द्वारा

38.: - आम का वानस्पतिक नाम क्या है?
Ans : - मेंगीफ़ेरा इण्डिका

39.: - कॉफी पाउडर के साथ मिलाया जाने वाला ‘चिकोरी चूर्ण’ प्राप्त होता है
Ans : - -जड़ों से

40.: - ‘विटामिन-सी’ का सबसे अच्छा स्त्रोत क्या है?
Ans : - आंवला.

काही प्रश्न उत्तर

*महाराष्ट्रातून एकूण किती प्रतिनिधी राज्यसभेवर निवडले जातात?*
*1.   १२*
*2.   १५*
*3.   १९*✅✅✅
*4.   २३*

      *जी देशाच्या अध्यक्षतेखाली दुसरी अतीसकीय जी -20 वित्त मंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर्स* *(एफएमसीबीजी) यांची बैठक झाली?*

*1.     जपान*

*2.     चीन*

*3.     सौदी अरेबिया     ✅✅*

*4.     भारत*

नोट्स  :-
2 विलक्षण जी -20 अर्थमंत्री व मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर (FMCBG) बैठक अलीकडेच सौदी अरेबिया यांच्या अध्यक्षतेखाली या टेली-कॉन्फरन्सिंग द्वारे आयोजित करण्यात आली होती.
केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री, निर्मला सीतारमण यांनी आभासी बैठकीत भाग घेतला. या जागतिक आव्हानाला* उत्तर देताना कोविड१ p (साथीचा रोग) सर्व देश (साथीचा रोग) सर्व जगाच्या साथीच्या परिणामांवर चर्चा झाली आणि समन्वयाने प्रयत्न करण्यात आले. अर्थमंत्र्यांनी आयएमएफ टूलकिटचा आढावा घेण्यास व वर्धित करण्यास सांगितले.

कोणत्या अल्पसंख्यांक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले ?

  1) शीख✅✅✅  
2) ख्रिश्चन  
3) अनुसूचित जाती  
4) अनुसूचित जमाती

हम्बोल्ट हे प्रसिद्ध विद्यापिठ........... शहरात आहेत?

A) म्युनिक
B) फ्रंकफर्ट
C) बॉन
D) बर्लिन✅✅✅

भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते.

1) डॉ. नॉरमन बोरलॉग
2) डॉ. एस स्वामिनाथन✅✅✅
3) सी . सुब्रह्मण्यम
4) वर्गीस कुरियन

" The street of Cricket  INDIA " या पुस्तकाचे लेखक कोण आहे?

1) ब्राट ली

2) मलिंगा

3) स्टेन ली

4) स्टीव्ह व्हा ✅✅✅

*अर्थ व्यवस्थेतील बेरोजगारीचा दर व चलनवाढीचा दर यातील व्यस्त प्रमाण हे कशाच्या माध्यमातून दर्शविता येते*.?

१) फिलिप्स वक्र✅✅✅
२) ऐंजलचा नियम
३) उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम
४) यापैकी नाही

रुपया नावाचे नाणे भारतात प्रथम जारी करणारे कोण होते?

A. अकबर
B. अलेक्झांडर लोदी
C. शेरशाह सुरी✅✅✅
D. बल्बन

नॉर्वे ची राजधानी कोठे आहे?

A.ओस्लो✅✅✅
B. पेरिस
C. वॉर्न
D. लिस्बन

भारतात नोटा छापण्याचा  अधिकार सर्वप्रथम कोणत्या बँकेला देण्यात आला?

१) बॅक ऑफ कलकत्ता
२) बॅक ऑफ बंगाल✅✅✅
३) बॅक ऑफ मद्रास
४) बॅक ऑफ बॉम्बे.

१)  आग्रा शहराचे संस्थापक कोण होते ?

    १) मोहम्मद तुघलक
    २) अल्लादिन खिल्जी
    ३) सिकंदर लोधी 📚📚
    ४) इब्राहिम लोधी

२) 'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण होते ?

        १) अशोक कोठारी
        २) अशोक मेहता 📚📚
        ३) डॉ. एस. एन.सेन
        ४)  वी.डी सावरकर

३) केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली होती ?

      १) शिवराम  
      २) नारायण गुरु📚📚
      ३) राजगुरू
      ४)  पेरियार

४) होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली ?

          १) दक्षिण आफ्रिका
          २) आयर्लंड📚📚
          ३) नेदरलँड
          ४) भारत

५) महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी 'सत्याग्रह' केला.........?
          
         १) असहकार चळवळीच्या वेळी  📚📚
         २)  जालियनवाला बाग हत्याकांडा वेळी
         ३) रौलेट ॲक्ट विरोधात
         ४) खिरापत चळवळीच्या वेळी

६) चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा .......... शी संबंधित होता.

          १) ऊस
          २) नीळ 📚📚
          ३) कापूस
          ४) भात

७) खालील पैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण?

           १) महात्मा गांधी
           २) लोकमान्य टिळक
           ३) चित्तरंजन दास📚📚
           ४) न्यायमूर्ती रानडे


८) खालील पैकी कोणत्या कायद्याने मुस्लीमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले ?

            १) १८१३
            २) १९०९📚📚
            ३) १९१९
            ४) १९३५

९) भारतातील कामगार संघटनांवर कुठल्या क्रांतीचा मोठ्या प्रमाणावर  प्रभाव पडला ?

            १) अमेरिकन क्रांती
            २) फ्रेंच क्रांती
            ३) रशियन क्रांती📚📚
            ४) यापैकी नाही

१०) कोणत्या महसूल पध्दतीत शेतकरी जमीन मालक बनले ?

              १) कायमधारा
              २) जमीनदारी
              ३) रयतवारी 📚📚
              ४) मिरासदारी

 
===========================

भारतातील सर्वात मोठे

भारतातील सर्वात मोठे👇👇👇👇

Q1) भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळाने)?
-- राजस्थान

Q2) भारतातील सर्वात मोठे राज्य (लोकसंख्या)?
-- उत्तरप्रदेश

Q3) भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या शहर?
-- मुंबई ( महाराष्ट्र )

Q4) भारतातील सर्वात मोठा किल्ला?
-- आग्रा

Q5) भारतातील सर्वात मोठा दरवाजा?
-- बुलंद दरवाजा ( फत्तेपुर सिक्रि )

Q6) भारतातील सर्वात मोठे वाळवंट?
-- थर ( राजस्थान )

Q7) भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान?
-- भारतरत्न

Q8) भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान?
-- परमवीर चक्र

Q9) भारतातील सर्वात मोठे मंदिर (क्षेत्रफळ)?
--रामेश्वर मंदिर

Q10) भारतातील सर्वात मोठे चर्च?
-- सेंट कथेड्रल, गोवा

Q11) भारतातील सर्वात मोठा गुरुद्वार?
-- सुवर्णमंदिर ,अमृतसर

Q12) भारतातील सर्वात मोठी म्हशजीद?
-- जामा म्हशजीद

Q13) भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर?
-- चिलका सरोवर ( ओरिसा )

महत्त्वाच्या घटनादुरुस्त्यया

महत्त्वाच्या घटनादुरुस्त्यया


l १ली घटना दुरुस्ती – १९५१ – ९वे परिशिष्ट घटनेत समाविष्ट
l ३१वी घटना दुरुस्ती – १९७३ – लोकसभा सदस्यसंख्या ५२५ वरून ५४५
l ४२वी घटना दुरुस्ती – १९७६ – ‘मिनी राज्यघटना’
l ४४वी घटना दुरुस्ती – १९७८ संपतीचा हक्क विभाग ३मधून वगळला
l ५२वी घटना दुरुस्ती – १९८५ – १०वे परिशिष्ट जोडले
l ६१वी घटना दुरुस्ती – १९८९ – मतदारांचे वय २१ वरून १८ वर्षे
l ७३वी घटना दुरुस्ती – १९९३ – पंचायत राज, ११वे परिशिष्ट
l ७४वी घटना दुरुस्ती – १९९३ – नगरपालिका, १२वे परिशिष्ट
l ८६ वी घटना दुरुस्ती – २००२ – कलम २१ अ – शिक्षण हक्क
l ९३ वी घटना दुरुस्ती – २००६ – ओबीसीना शिक्षण संस्थांत आरक्षण

मूलभूत हक्क म्हणजे काय? मूलभूत हक्कांची वैशिष्टे राज्य म्हणजे काय- कलम १२ मधील व्याख्या

मूलभूत हक्क म्हणजे काय?
मूलभूत हक्कांची वैशिष्टे
राज्य म्हणजे काय- कलम १२ मधील व्याख्या
संविधानातील कलम १२ मध्ये भाग तीन(मूलभूत हक्क) च्या संदर्भासाठी राज्याची व्याख्या दिली आहे. कलम १२ नुसार,

या भागात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, “राज्य” या शब्दात भारताचे सरकार व संसद आणि राज्यांपैकी प्रत्येक राज्याचे सरकार व विधीमंडळ आणि भारताच्या राज्यक्षेञातील अथवा भारत सरकारच्या नियंञणातील सर्व स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणे यांचा समावेश आहे.

म्हणजेच या कलमानुसार राज्यामध्ये,

भारत सरकार (केंद्रीय कार्यकारी मंडळ)

संसद (केंद्रीय कायदेमंडळ)

सर्व राज्य सरकारे (राज्य कार्यकारी मंडळ)

सर्व राज्य विधीमंडळे (राज्य कायदेमंडळ)

सर्व स्थानिक प्राधिकरणे (महानगरपालिका,
नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, कटक मंडळे इ.)

इतर प्राधिकरणे (वैधानिक व गैर-वैधानिक प्राधिकरणे जसे LIC, इ.)

यांचा समावेश होतो. या संस्थांच्या कृतींमुळे मूलभूत हक्क भंग होत असतील तर त्या कृतींना न्यायालयात आव्हान देता येते.

या कलमातील व्याख्येच्या बाबतीत पुढील गोष्टी महत्वाच्या आहेत.

ही व्याख्या केवळ संविधानाच्या भाग तीनच्या(मूलभूत हक्क) च्या संदर्भात आहे.

न्यायमंडळे हे राज्याच्या व्याख्येत येत नाही. माञ न्यायव्यवस्थेची गैर-न्यायिक कार्ये राज्याच्या व्याख्येत येतात असे प्रस्थापित झालेले आहे.

इतर प्राधिकरणे हा शब्द संदिग्ध असल्याने याबाबतीत अनेक याचिकांमध्ये न्यायालयांनी वेळोवेळी याचा व्यापक असा अर्थ लावला आहे.

मूलभूत हक्क म्हणजे काय? मूलभूत हक्क माहिती ?? महत्वाचे मुद्दे मूलभूत हक्क मूलभूत हक्कांचे महत्व – मूलभूत हक्क - घटनात्मक उपायांचा हक्क –

मूलभूत हक्क म्हणजे काय? मूलभूत हक्क माहिती ??

महत्वाचे मुद्दे

मूलभूत हक्क

मूलभूत हक्कांचे महत्व –

मूलभूत हक्क -

घटनात्मक उपायांचा हक्क –

प्रत्येक व्यक्तीने वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर त्याला मतदानाचा अधिकार मिळतो. आपल्याला भारतीय नागरिक म्हणून भारतामध्ये मुक्तसंचार करण्याचा अधिकार आहे.  मग हे हक्क व अधिकार आपल्याला मिळाले कसे ? हक्क म्हणजे काय? हक्क म्हणजे माणूस व नागरिक या नात्याने केलेल्या न्याय मागण्या व अधिकार आहेत. हक्कामुळे शासनाची सत्ता मर्यादित होते. लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये नागरिकांना हक्क दिले जाणे आणि शासनाकडून अशा हक्कांचे रक्षण होणेही गरजेचे असते.

लोकशाही देशांमध्ये व्यक्तींना काही मूलभूत हक्क  प्रदान केले जातात. त्याचे संरक्षण देशातील न्यायव्यवस्था मार्फत केले जाते. फ्रेंचच्या राज्यक्रांतीने मानवी हक्काची सनद जाहीर करून स्वातंत्र्य समता बंधुता ही महत्त्वाची मूल्ये जगाला दिली. अमेरिकन संविधानात घटना दुरुस्ती करून ‘ बिल ऑफ राइट्स ‘ या नावाने नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आला.

                      १० डिसेंबर १९४८ रोजी संयुक्त राष्ट्राने मानवी हक्काचा सार्वत्रिक जाहीरनामा घोषित केला. भारतीय संविधानात मूलभूत हक्काचे महत्व जाणून तिसऱ्या भागात सहा प्रकारच्या मूलभूत हक्कांचा समावेश केला आहे.

भारतीय राज्यघटनेच्या भाग ३ मध्ये कलम १२ ते ३५ मध्ये मूलभूत हक्क स्पष्ट करण्यात आले आहेत.  याच कारणामुळे भारतीय राज्यघटनेच्या भाग ३ ला भारताची मॅग्ना कार्टा असे संबोधले जाते. भारतातील मूलभूत हक्क हे जगातील इतर देशांच्या तुलनेत अधिक विस्तृत पद्धतीने स्पष्ट केलेले मूलभूत हक्क आहेत. संविधानात असे नमूद करण्यात आले आहे की मूलभूत हक्क देण्याची आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्यांकडे आहे.

मूलभूत हक्कांचे महत्व –

                     व्यक्तीला विकास साधण्यासाठी स्वातंत्र्य आणि समता आवश्यक ठरते म्हणून लोकशाहीचे स्वातंत्र्य आणि समता हे दोन आधारस्तंभ ठरतात.   स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही महत्त्वाची  मुल्ये संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये व्यक्त केली आहेत. कोणत्याही देशाची राज्यघटना ही त्या देशाचा मूलभूत कायदा असते.  राज्यघटनेत मूलभूत हक्कांना स्थान दिले गेल्यामुळे मूलभूत हक्क व्यक्तीसाठी महत्त्वाचे ठरतात.  मूलभूत हक्क न्यायप्रविष्ठ असतात. न्याय व्यवस्थेमार्फत अशा हक्कांचे उल्लंघन झाल्यास न्याय मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येतो.

मूलभूत अधिकार देशात राजकीय लोकशाहीचा आदर्श प्रस्थापित करतात.  जनतेच्या स्वातंत्र्याचे रक्षण मूलभूत हक्काकडून होते. देशातील कार्यकारी मंडळ व कायदे मंडळ यांच्या या कृतीवर मर्यादा घालण्याचे काम मूलभूत हक्काकडून होत असते.

मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये

१) हक्कांची सविस्तर पद्धतीने नोंद

                             भारतीय राज्यघटनेत व्यक्तीच्या मूलभूत हक्कांची नोंद सविस्तर पद्धतीने करण्यात आली आहे स्वातंत्र्याच्या काळात नागरिकांना देण्यात येणारी सहा प्रकारचे स्वतंत्र तर कलम ३२ मध्ये हक्कांच्या संरक्षणासाठी देणात येणाऱ्या पाच वेगवेगळ्या आदेशांची माहिती आहे. 

२)  मूलभूत हक्क मर्यादित आहेत – 

भारतीय नागरिकांना देण्यात आलेले मूलभूत हक्क अमर्याद नाहीत. या मर्यादा मूलभूत हक्काबरोबरच स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

३) न्यायालयीन संरक्षण –

           मूलभूत हक्कांना न्यायालयीन संरक्षण आहे. हक्कांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी न्याय मंडळावर आहे. व्यक्तीला जर वाटले आपल्या हक्काचे उल्लंघन झाले तर व्यक्ती न्यायालयात धाव घेऊ शकते.

४)  मूलभूत हक्कांची दुरुस्ती –

              मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करता येते.  भारतीय संसदेला मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे.  मात्र यासाठी घटनेच्या मूलभूत संरचनेचा विचार केला जावा अशी अट आहे.

५) मूलभूत हक्कांची स्थगिती –

                   राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कलम २० व २१ मधील हक्क वगळता इतर सर्व हक्क स्थगित करता येतात.

भारतीय संविधान भाग – ३

मूलभूत हक्क
------

१) समानतेचा हक्क
२) स्वातंत्र्याचा हक्क
३) शोषणाविरुद्धचा हक्क
४) धर्मस्वातंत्र्याचा हक्क
५) सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क
६) घटनात्मक उपायांचा हक्क
१) समानतेचा हक्क  (कलम १४ ते १८) –

१.१) कलम १४ – कायद्यापुढे समानता –  कलम १४ नुसार प्रत्येक व्यक्ती कायद्यासमोर समान असते. सर्वांना कायद्याचे समान संरक्षण आहे. धर्म जात लिंग आर्थिक दर्जा अशा कोणत्या आधारावर राज्य नागरिकांच्या मध्ये भेदभाव करू शकणार नाही.  कायद्यासमोर समानता ही एक नकारात्मक संकल्पना आहे. तर कायद्याचे समान संरक्षण ही एक सकारात्मक संकल्पना आहे. कायद्यासमोर समानता हा कायद्याचे राज्य या संकल्पनेचा प्रमुख घटक आहे.

१.२)  कलम –  भेदभावास प्रतिबंध –  भारतीय नागरिकांमध्ये धर्म, वंश, जात, लिंग, जन्मठिकाण, या व अशा कोणत्या आधारावर राज्य भेदभाव करू शकत नाही.  या कलमाला अपवाद कलम १५ (३) मध्ये दिलेल्या आहे. राज्यसंस्था महिला व बालकांसाठी विशेष तरतूद करू शकते. तसेच कलम १५ (५) नुसार अनुसूचित जाती व जमाती करता विशेष तरतूद करण्याचा अधिकार आहे.

१.३) कलम १६ – समानसंधी – राज्यसंस्थेच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील नेमणूकासंबंधी सर्व नागरिकांना समान संधी असेल.

१.४)  कलम १७ – अस्पृश्यतेवर बंदी – कलम १७ नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे. व तिचे कोणत्याही स्वरूपातील आचरण हे निषिद्ध मानण्यात आले आहे. भारतीय संसदेने नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ संमत करून अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने फौजदारी गुन्हा ठरवला आहे.

१.५) कलम १८ – पदव्यांची समाप्ती – भारतीय संविधानाने भेदभाव निर्माण करणारे पदव्या व किताब कलम १८ नुसार नष्ट केले आहेत. समानतेची भावना रुजवण्यासाठी ही पदव्यांची समाप्ती आवश्यक ठरते.

२) स्वातंत्र्याचा हक्क –

                   स्वातंत्र्य हा लोकशाहीचा आत्मा आहे.  स्वातंत्र्य आणि समता परस्परांवर अवलंबून असतात. भारताच्या राज्यघटनेमध्ये भारतीय नागरिकाला सुरुवातीला सात प्रकारची स्वातंत्र्य देण्यात आली होती. मात्र १९७८ मधील ४४ व्या घटनादुरुस्तीनुसार संपत्ती संपादन करणे, धारण करणे आणि संपत्तीची विल्हेवाट लावणे या प्रकारचे स्वातंत्र्य वगळण्यात आले आहे.

२.१) कलम १९ – सहा स्वातंत्र्ये –

अ) भाषण व विचार स्वातंत्र्य –  भाषण व विचार स्वातंत्र्याच्या त्यानुसार सरकारवर टीका देखील करता येते हे स्वातंत्र्य लोकशाहीचे द्योतक आहे.
ब) शांततापूर्ण व निशस्त्र एकत्र येण्याचे स्वातंत्र्य
क)  संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य
ड)  भारताच्या क्षेत्रात मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य
इ)  देशाच्या कोणत्याही भागात वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य
फ) कोणताही व्यवसाय वा पेशा आचारण्याचे स्वातंत्र्य.

२.२) कलम २० – अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण कलम २० नुसार सर्व व्यक्तींना अयोग्य व अत्याधिक शिक्षेपासून संरक्षण प्रदान करण्यात आले आहे.

२.३) कलम २१ – जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य याचे संरक्षण – कायद्याने प्रस्थापित कार्यपद्धती शिवाय कोणत्याही व्यक्तीचे जिवीत किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही.

२.४) कलम २२ – अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण – स्थानबद्धता दोन प्रकारची असते. शिक्षा म्हणून केलेली स्थानबद्धता व प्रतिबंधक स्थानबद्धता.  प्रतिबंधक स्थानबद्धता केवळ संशयावरून केलेली आगाऊ सावधगिरी असते. प्रतिबंधक स्थानबद्धता ही भविष्यात गुन्हा करण्यापासून रोखणे या उद्देशाने केलेली असते.

३) शोषणाविरुद्धचा हक्क –

                        भारतीय समाजात पूर्वी वॅट बेदारी देवदासी अशा प्रकारच्या शोषण करणाऱ्या अनिष्ठ प्रथा प्रचलित होत्या. या प्रथा नष्ट करण्याच्या दृष्टीने शोषणाविरुद्धचा मूलभूत हक्क व्यक्तीला देण्यात आला.

३.१) कलम २३ – माणसांचा अप्पा व्यापार आणि वेट बिगारी यांना मनाई. माणसांचा अपंग व्यापार आणि वेट बिगारी करणे हा कायद्यानुसार शिक्षा पात्र अपराध असेल.

३.२) कलम २४ – कारखाने इत्यादीमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई. कलम २४ नुसार १४ वर्ष वयाखालील कोणत्याही बालकास कारखान्यात किंवा खाणीमध्ये किंवा इतर कोणत्याही धोकादायक ठिकाणी कामाला ठेवण्यास सक्त मनाई आहे.

४) धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क

                    राज्याचा कोणताही विशिष्ट धर्म नाही किंवा धर्माच्या आधारावर राज्य भेदभाव करू शकणार नाही. भारतातील राज्यव्यवस्था धर्मनिरपेक्ष आहे.

४.१) कलम २५ – विवेकबुद्धी चे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त आचरण व प्रसार . कलम २५ नुसार सर्व नागरिकांना कोणताही धर्म स्वीकारण्याचा व त्याचा प्रचार व प्रसार करण्याचा हक्क असेल.

४.२) कलम २६ – धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वतंत्र. या कलमाअंतर्गत धार्मिक उद्दिष्टांनी धार्मिक संस्थांची स्थापना करणे, त्याच्या व्यवहारांची व्यवस्था पाहणे, धार्मिक संस्थांची मालमत्ता स्वमालकीची असणे किंवा संपादन करणे, व अशा मालमत्तेचे प्रशासन करणे हे सर्व हक्क सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य राखण्याच्या अधीन राहूनच उपभोगता येतील.

४.३)  कलम २७ – विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याबाबत स्वातंत्र्य.  कोणत्याही व्यक्तीवर अशी सक्ती केली जाणार नाही की एखाद्या विशिष्ट धर्मासाठी त्या व्यक्तीने कर दिलाच पाहिजे. हे व्यक्तिगत स्वातंत्र्य त्या व्यक्तीला या कलमानुसार दिलेले आहे.  

४.४) कलम २८ – शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वतंत्र. शासकीय अनुदानातून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत धार्मिक शिक्षणावर बंदी आहे. शासकीय किंवा शासन अनुदानित संस्थेमध्ये धार्मिक उपासनेसाठी सहभागी होण्यास कोणत्याही व्यक्तीला भाग पाडले जाणार नाही.

५) सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क –

                  भारत हा विविधतेने नटलेला देश आहे.  यामध्ये वेगवेगळ्या समाजातील लोकांची वेगवेगळी संस्कृती दिसून येते. या समाजातील संस्कृतीचे जतन करण्याच्या दृष्टिकोनातून या मूलभूत हक्कांचा समावेश घटनेमध्ये केलेला दिसून येतो. 

५.१)  कलम २९ – अल्पसंख्यांकांच्या हितसंबंधांचे संरक्षण.  भारतीय नागरिकाला स्वतःची वेगळी भाषा लिपी व संस्कृती जतन करण्याचा हक्क असेल.

५.२) कलम ३० – अल्पसंख्यांक नागरिकांना शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व प्रशासन करण्याचा हक्क.

६) घटनात्मक उपायांचा हक्क
                   व्यक्तीच्या मूलभूत हक्कांच्या संदर्भात घटनात्मक उपाय योजना या विभागा अंतर्गत मूलभूत हक्कांमध्ये पुरवल्या आहेत.

कलम ३२ –  भारतीय घटनेच्या भाग ३ मध्ये प्रदान केलेले हक्क बजावण्या करता उपाय. मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी किंवा मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले तर ते हक्क परत मिळवण्याच्या दृष्टीने न्यायालयात न्याय मागता येतो.  मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाने काढलेल्या आदेशात रिट्स असे म्हणतात. ह्या आदेशांना निर्देश किंवा प्रसिद्धी लेख असेही म्हटले जाते.

१) देहोपस्थिती / बंदी प्रत्यक्षीकरण (Habeas corpus)
२) परमादेश (Mandamus)
३) प्रतिषेध ( prohibition)
४) उत्प्रेक्षण ( Certiorari)
५)  अधिकारपृच्छा (Quo-warranto)

कलम ३३ – सेनेच्या मूलभूत हक्कांमध्ये फेरबदल करण्याचा अधिकार –  मूलभूत हक्क Mulabhut Hakk सेनेला लागू करताना त्यामध्ये आवश्यक ते  फेरबदल करण्याचा अधिकार संसदेला कायद्याद्वारे प्रदान करण्यात आला आहे .

कलम ३४ – लष्करी कायदा अमलात असताना मूलभूत हक्कावर निर्बंध – भारताच्या राज्य क्षेत्रात एखाद्या भागात जर लष्करी कायदा अमलात असेल तर व्यक्तीच्या मूलभूत हक्कावर निर्बंध आणण्याबद्दल तरतूद या कलमांमध्ये दिलेली आहे.

३५ कलम – मूलभूत हक्काचा(mulabhut hakk) अंमलबजावणी करता कायदे – काही मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणी करता कायदे करण्याचा अधिकार हा फक्त संसदेला असेल राज्य विधान मंडळाला असा अधिकार असणार नाही अशी तरतूद या कलमात करण्यात आलेली आहे.