स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
15 May 2024
यशाचा राजमार्ग प्रश्नसंच
ग्रामसेवक / सचिव.
🅾️नमणूक : मुख्य कार्यकारी अधिकारी
🅾️नजीकचे नियंत्रण : गट विकास अधिकारी
🅾️कर्मचारी : ग्रामविकास खात्याचा वर्ग-3 चा
🧩कामे :
1. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.
2. ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे
3. कर्मचार्यांवर नियंत्रण ठेवणे.
4. ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे.
5. व्हिलेज फंड सांभाळणे.
6. ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.
7. ग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व इतिबृत्तांत लिहणे.
8. गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे.
9. जन्म-मृत्यूची नोंद करणे.
🧩गरामपंचातीची कामे व विषय :
1. कृषी
2. समाज कल्याण
3. जलसिंचन
4. ग्राम संरक्षण
5. इमारत व दळणवळण
6. सार्वजनिक आरोग्य व दळणवळण सेवा
7. सामान्य प्रशासन
🅾️गरामसभा : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार निर्मिती करण्यात आली आहे.
🅾️बठक : आर्थिक वर्षात (26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोंबर)
🅾️सभासद : गावातील सर्व प्रौढ मतदार यांचा समावेश होता.
🅾️अध्यक्ष : सरपंच नसेल तर उपसरपंच
🅾️गरामसेवकाची गणपूर्ती : एकूण मतदारांच्या 15% सभासद किंवा एकूण100 व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल.
14 May 2024
चालू घडामोडी :- 13 मे 2024
◆ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आंद्रेई बेलोसोव्ह यांची नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.
◆ कुवेतचे नवे अमीर शेख मिशाल अल-अहमद अल-सबाह यांनी देशाची संसद बरखास्त केली आहे.
◆ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ॲडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या नवीन द्रव रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी केली आहे.
◆ संरक्षण गुप्तचर संस्थेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल डी एस राणा संयुक्त रिपब्लिक ऑफ टांझानियाच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
◆ मलेशियातील पुत्रजया येथे आसियान-भारत वस्तू व्यापार करार संयुक्त समितीची चौथी बैठक पार पडली.
◆ नेपाळची प्रसिद्ध गिर्यारोहक 'कामी रिता शेर्पा' हिने सर्वाधिक वेळा एव्हरेस्टवर चढाई करण्याचा नवा विक्रम केला आहे.
◆ ZETA ने बँकांसाठी UPI-लिंक्ड 'डिजिटल क्रेडिट सेवा' सुरू केली आहे.
◆ पाकिस्तानने आपला मित्र देश चीनसोबत आपली पहिली चंद्र मोहीम ‘iCUBE-Q’ लाँच केली आहे.
◆ हरियाणातील फरिदाबाद येथे ‘राष्ट्रीय लोक अदालत’चे आयोजन करण्यात आले आहे.
◆ ओंकार साळवी यांची मुंबई क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ इंग्लंड देशाचा क्रिकेटपटू जेम्स अँडरसन ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून त्याच्या नावावर कसोटी क्रिकेट मध्ये 700 विकेट ची नोंद आहे.
◆ 2003 नंतर 20 वर्षांनी जगातील सर्वाधिक शक्तिशाली सौर वादळ पृथ्वीवर धडकले आहे.
◆ भारतीय भुदलात हर्मीस 900 स्टरलाईनर ड्रोन हैद्राबाद या ठिकाणी सामील होणार आहे.
◆ 250 आयपीएल सामने खेळणारा विराट कोहली हा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे.
◆ पॅरिस ऑलम्पिक मध्ये अमन हा एकमेव भारतीय पुरुष हा कुस्ती खेळामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
◆ भारताची ट्रॅक धावपटू के. एम. दिक्षा हिने लॉस एंजलिस येथे साउंड रनींग ट्रॅक महोत्सवात महिलांच्या 1500 मिटर शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावला आहे.
◆ लॉस एंजलिस येथे साउंड रनिंग ट्रॅक महोत्सवात पुरुषांच्या 5000 मिटर शर्यतीत भारताचा धावपटू अविनाश साबळे दुसऱ्या स्थानावर राहिला आहे.
◆ दोहा डायमंड लीग 2024 स्पर्धेत चेक प्रजासत्ताक देशाचा भालाफेक पटू याकूब वाडले ने 88.38 मिटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकले आहे.
◆ चीन मध्ये 12 ते 16 जून या कालावधीत 22 वी आशियाई सांघिक स्कॉश चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात येणार आहे.
◆ AI तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या Lancet कामीकाझ ड्रोन रशिया देशाने विकसित केले आहे.
◆ RBI ने आर. लक्ष्मीकांत राव यांची Excutive director (ED) म्हणून नियुक्ती केली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
13 May 2024
चालू घडामोडी :- 12 मे 2024
◆ आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन दरवर्षी 12 मे रोजी साजरा केला जातो.
◆ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल चिरंजीवी आणि वैजयंती माला यांना 'पद्मविभूषण' हा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला आहे.
◆ उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रुद्रप्रयाग जिल्ह्यात ‘पिरुल लाओ-पैसे पाओ अभियान’ सुरू केले आहे.
◆ अमूल आगामी T-20 विश्वचषकासाठी श्रीलंकेची अधिकृत प्रायोजक बनली आहे.
◆ केकी मिस्त्री यांची एचडीएफसी लाईफ कंपनीचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते 'पवन सिंधी' यांना अनुकरणीय सेवेसाठी प्रतिष्ठित ग्लोबल प्राइड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे.
◆ व्हाइस ॲडमिरल संजय भल्ला यांनी भारतीय नौदलाच्या कार्मिक प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे.
◆ ‘आर शंकर रमण’ हे L&T समूहाचे नवे अध्यक्ष बनले आहेत.
◆ कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने ड्रोन दीदी योजनेंतर्गत दोन पायलट प्रकल्पांसाठी ‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’ सोबत सामंजस्य करार केला आहे.
◆ जपानचे भारतातील राजदूत हिरोशी सुझुकी आणि नागालँडचे मुख्यमंत्री पुतणे यांनी 'कोहिमा पीस मेमोरियल'चे उद्घाटन केले.
◆ भारतातील लोककला आणि आदिवासी परंपरांचे दर्शन घडविणारे ‘स्वदेश’ हे प्रदर्शन दुबईत आयोजित करण्यात आले आहे.
◆ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मिखाईल मिशुस्टिन यांची देशाच्या पंतप्रधानपदी पुनर्नियुक्ती केली आहे.
◆ भारताचा स्टार भालाफेकपटू 'नीरज चोप्रा' याने दोहा डायमंड लीगमध्ये रौप्य पदक जिंकले आहे.
◆ इंग्लंडचा वेगवान गोलंदाज 'जेम्स अँडरसन' याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
◆ श्री. व्ही. एल. कांथा राव, सचिव, खाण मंत्रालय, यांनी नवी दिल्ली येथे मिनरल विदेश इंडिया लिमिटेड (काबिल) च्या नोंदणीकृत कार्यालयाचे उद्घाटन केले.
◆ 'पंजाब नॅशनल बँक' (PNB) ने 1 जून 2024 पासून निष्क्रिय खाती बंद करण्याची घोषणा केली आहे.
◆ दिलीप संघानी यांची इफकोचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
◆ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘आर लक्ष्मी कांथ राव’ यांना प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.
◆ 22वी आशियाई सांघिक स्क्वॉश चॅम्पियनशिप चीनमध्ये होणार आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
12 May 2024
चालू घडामोडी :- 11 मे 2024
◆ टाईम आऊट या सर्वेक्षण संस्थेने 2024 या वर्षातील जगातील निवडलेल्या दहा सर्वोत्तम शहरांमध्ये न्यूयॉर्क हे शहर प्रथम स्थानावर आहे.
◆ "टाईम आऊट" सर्व्हेक्षण संस्थेने जगातील सर्वोत्तम दहा शहरांची यादी जाहीर केली आहे.
◆ ISRO ने अत्याधुनिक मिश्रित उत्पादन तंत्र वापरून तयार केलेल्या PS4 रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी घेतली आहे.
◆ न्यूझीलंड देशाचा क्रिकेट खेळाडू कॉलिन मुनरो याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
◆ जगातील पहिली हायड्रोजन वर चालणारी बोट बिल गेट्स यांनी तयार करून घेतली आहे.
◆ जगातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या बोटेच नाव प्रोजेक्ट-821आहे.
◆ लार्बन अँड टुब्रो L & T या कंपनीच्या अध्यक्ष पदी "आर. शंकर रमन" यांची निवड झाली आहे.
◆ Potato फेस्टिवल चे आयोजन नागालँड या राज्यात करण्यात आले होते.
◆ भारतीय नौदलाचे प्रमुख कर्मचारी म्हणून संजय भल्ला यांनी पदभार स्वीकारला आहे.
◆ भारत आणि फ्रान्स या दोन देशाच्या सैन्यामध्ये शक्ती या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.
◆ इदरीस डेबी यांची "चाड" या देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे.
◆ मिखाईल मिशुस्टिन यांची रशिया या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.
◆ मिखाईल मिशुस्टिन यांची दुसऱ्यांदा रशियाच्या पंतप्रधान पदी नियुक्ती झाली आहे.
◆ कोहीमा शांती स्मारकाचे उद्घाटन नागालँड या राज्यात करण्यात आले आहे.
◆ नागालँड राज्यात कोहिमा युद्धाच्या स्मरणार्थ शांती स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले असून हे युद्ध 1944 या वर्षी झाले होते.
◆ नागालँड राज्यात जपान देशाच्या राजदुताच्या हस्ते कोहीमा स्मारकाचे उद्घाटन झाले आहे.
◆ जागतिक स्थलांतर अहवाल 2024 नुसार भारतातील नागरिकांचे सर्वाधिक स्थलांतर युएई या देशात झाले आहे.
◆ गहू या पिकाची HD 3386 ही नवीन जात IARI या संस्थेने विकसित केली आहे.
◆ जगात सर्वाधिक सोन्याचा साठा अमेरीका या देशात आहे.
11 May 2024
अटल सेतू - भारतातील सर्वांत लांब सागरी सेतू
🔥 मुंबई येथे अटल सेतू आहे.
🔥 लांबी: 21.8 किमी
🔥 अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब पूल आणि सर्वात लांब सागरी पूल आहे.
🔥 हा 6 लेनचा पूल आहे ज्याची लांबी समुद्रावर सुमारे 16.5 किमी आहे आणि जमिनीवर सुमारे 5.5 किमी आहे.
🔥 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच या पुलाचे उद्घाटन केले, अटल सेतूने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जलद कनेक्टिव्हिटी प्रदान केली आहे.
🔥 त्यामुळे मुंबईहून दक्षिण भारत, पुणे आणि गोव्याला जाण्यासाठी लागणारा वेळही कमी होतो.
🔥 शिवाय, यामुळे जवाहरलाल नेहरू बंदर आणि मुंबई बंदराची जोडणी मजबूत झाली आहे. अटल सेतू मुंबई महानगर प्रदेशासाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक चालक असेल अशी अपेक्षा आहे. प्रवासाच्या वेळा कमी करून आणि प्रमुख क्षेत्रांमधील कनेक्टिव्हिटी सुधारून, हा पूल व्यापार, वाणिज्य आणि एकूणच आर्थिक क्रियाकलाप सुलभ करण्यासाठी तयार आहे.
महत्त्वाच्या संस्था
● G7 (Group of 7)
- स्थापना 1975
- अगोदर हा गट G8 म्हणून ओळखला जात होता, परंतु रशिया बाहेर पडला.
- सदस्य: फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, USA, कॅनडा
● BRICS
- स्थापना: 2006
- सदस्य: ब्राझिल, रशिया, भारत, चीन, द. आफ्रिका
● Asian Development Bank (ADB)
- स्थापना: 19 डिसेंबर 1966
- मुख्यालय: Mandaluyong, Metro Manila फिलीपीन्स
● SAARC (South Asian Association for Regional Cooperation)
- स्थापना: 16 जानेवारी 1987
- मुख्यालय: काठमांडू, नेपाळ
- सदस्य: अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव
● ASEAN (Association of South East Asian Nation)
- स्थापना: 8 ऑगस्ट 1967
- मुख्यालय: जकार्ता, इंडोनेशिया
- सदस्य: ब्रुनेई, फिलीपीन्स, लाओस, थायलंड, व्हियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, कंबोडिया, सिंगापूर
● BIMSTEC (Bay of Bengal Initiative for Multi Scetoral Technical & Economic Cooperation)
- स्थापना: 6 जून 1997
- मुख्यालय: ढाका, बांगलादेश
- सदस्य: बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, भूटान
● OPEC (Organization of Petroleum Exporting Countries)
- स्थापना: 1960
- मुख्यालय: व्हियन्ना, ऑस्ट्रिया
- सदस्य संख्या: 13
● IBSA
- स्थापना: 6 जून 2003
- मुख्यालय: Stafford ST, Abbotsford, Victoria
- सदस्य: भारत, ब्राझिल, द. आफ्रिका
राज्यघटना प्रश्नसंच
१) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ?
अ) कलम ३५२
ब) कलम ३५६
क) कलम ३६०
ड) कलम ३६२
=======================
:) उत्तर............ क) कलम ३६० :)
=======================
२) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ मधील कोणती तरतूद बदलण्यात आली ?
अ) युद्ध
ब) परकीय आक्रमण
क) अंतर्गत अशांतता
ड) वरीलसर्व
==========================
:) उत्तर......... क) अंतर्गत अशांतता :)
==========================
३) कोणतेही विधेयक (धनविधेयक सोडून) विधान परिषद किती दिवस विलंब करू शकते ?
अ) दोन महिने
ब) तीन महिने
क) चार महिने
ड) सहा महिने
=====================
:) उत्तर....... क) चार महिने :)
=====================
४) भारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?
अ) चंडीगड
ब) लक्षद्वीप
क) दिल्ली
ड) महाराष्ट्र
=====================
:) उत्तर..... क) दिल्ली :)
=====================
५) कनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?
अ) उच्च न्यायालय
ब) सर्वोच्य न्यायालय
क) दोन्ही
ड) यापैकी नाही
========================
:) उत्तर........ अ) उच्च न्यायालय :)
========================
६) कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?
अ) कलम १३
ब) कलम ३२
क) कलम २२६
ड) यापैकी नाही
=====================
:) उत्तर....... क) कलम २२६ :)
=====================
७) केंद्र व राज्य यांच्यातील संबधावर प्रकाश टाकण्यासाठी १९८३ मध्ये कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली ?
अ) राजमन्नार आयोग
ब) सच्चर आयोग
क) सरकारिया आयोग
ड) व्ही. के. सिंग
==========================
:) उत्तर....... क) सरकारिया आयोग :)
==========================
८) राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?
अ) कलम २८०
ब) कलम २८२
क) कलम २७५
ड) कलम २८४
=====================
:) उत्तर....... अ) कलम २८० :)
=====================
९) आंतरराज्जीय नदी विवाद सोडविण्यासाठी राज्य घटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?
अ) कलम २६१
ब) कलम २६२
क) कलम २६३
ड) कलम २६४
=====================
:) उत्तर....... ब) कलम २६२ :)
=====================
१०) निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत आहे ?
अ) कलम ३२४
ब) कलम ३२५
क) कलम ३२६
ड) कलम ३२७
=====================
:) उत्तर........ अ) कलम ३२४ :)
=====================
११) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?
अ) संथानाम समिती
ब) वांछू व गोस्वामी समिती
क) तारकुंडे समिती
ड) गोपालकृष्णन समिती
========================
:) उत्तर....... अ) संथानाम समिती :)
========================
१२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
अ) पाच वर्षे
ब) सहा वर्षे
क) तीन वर्षे
ड) दोन वर्षे
=====================
:) उत्तर........ अ) पाच वर्षे :)
=====================
१३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?
अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश
ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश
क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश
ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश
=====================
:) उत्तर...... पर्याय (ड) :)
=====================
१४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?
अ) केंद्र सरकार
ब) राज्य सरकार
क) जिल्हाधिकारी
ड) निवडणूक आयोग
========================
:) उत्तर....... ड) निवडणूक आयोग :)
========================
१५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?
अ) केंद्र
ब) राज्य
क) दोन्ही
ड) यापैकी नाही
=====================
:) उत्तर.......... ब) राज्य :)
=====================
गटविकास अधिकारी (B.D.O) बद्दल संपूर्ण माहिती.
🅾️ पचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो.
🅾️गटविकास अधिकार्याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते तर त्याची नेमणूक महाराष्ट्र शासन करते.
🅾️ गटविकास अधिकारी हा वर्ग 1 व वर्ग 2 दर्जाचा अधिकारी असतो.
🅾️गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असतो.
🅾️गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी असतो.
🅾️गटविकास अधिकार्यावर नजिकचे नियंत्रण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्याचे असते.
🅾️ गटविकास अधिकारी हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो.
🅾️पचायत समितीचे अंदाजपत्रक गटविकास अधिकारी तयार करतो.
🅾️पचायत समितीस मिळणार्या अनुदानातील रकमा काढण्याचे व त्यांचे वाटप करण्याचे अधिकार गटविकास अधिकार्याला आहेत.
🅾️ पचायत समितीच्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचार्यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार गटविकास अधिकार्याला आहेत.
🅾️ पचायत समितीचा खर्च गटविकास अधिकार्याच्या संमतीने करावा लागतो.
🅾️पचायत समितीचा अहवाल गटविकास अधिकारी सी.ई.ओ.कडे पाठवीत असतो.
🅾️पचायत समितीच्या कार्याची यशस्वीता गटविकास अधिकार्यावर अवलंबून असते.
🅾️गटविकास अधिकार्याला शिक्षा करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तास असतो.
🅾️ पचायत समिती व जिल्हा परिषद यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.
🅾️ राज्यशासन व पंचायत समिती यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.
जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती.
🅾️जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.
🅾️रचना - प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.
🅾️सभासद संख्या - प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात. हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.
🅾️सभासदांची निवडणूक - प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.
🅾️पात्रता (सभासदांची) - जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.
3. 1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.
🅾️आरक्षण : 1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.
🅾️तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.
🅾️कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु काही कारणावरून जिल्हापरिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.
🅾️अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड : जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.
🅾️कार्यकाल : अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे.
🧩राजीनामा :
1. अध्यक्ष - विभागीय आयुक्ताकडे
2. उपाध्यक्ष - जिल्हा परिषद अध्यक्षाकडे
मानधन :
1. अध्यक्ष - 20,000/-
🅾️अविश्वासाचा ठराव - अध्यक्ष/उपाध्यक्षाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.
🅾️सचिव - जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.
🅾️बठक : जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात चार बैठका होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतली जाते.
🧩मख्य कार्यकारी अधिकारी (CEO) :
🅾️ परत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.
मार्गदर्शक तत्वांची उपयुक्ततता :
📌डॉ. आंबेडकर - राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही. घटनेचे आगळेवेगळे व नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये. ही तत्वे अमलात न आणणाऱ्या सरकारला न्यायालयांमध्ये नसला तरी जनतेच्या दरबारात जाब द्यावाच लागेल.
📌B.N. राव - राज्यसंस्थेच्या प्राधिकारांसाठी नैतिक तत्वे, त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे.
.📌N.M. सिंघवी - घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतूदी.
📌M.C. छगला (माजी सरन्यायाधीश) - मार्गदर्शक तत्त्वांची पूर्ण अंमलबजावणी झाल्यास देश पृथ्वी वरील स्वर्ग बनेल. त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे.
📌M.C. सेटलवाड - न्यायालयास उपयुक्त beacon-light व प्रस्ताविकेचे विस्तारण करणारी तत्वे.
📌ग्रॅनव्हिल ऑस्टिन - मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीद्वारे देशातील सामाजिक क्रांती ची उद्दिष्टे साध्य होतील.
📌ईवोर जेनिंग्ज - Pious aspiration.
📌अनंत नारायण - अ-वादयोग्य आणि अमूर्त.
📌 ग्लॅडहिल - "इतर काही गोष्टी करण्यासाठी शासनाला दिलेल्या विधायक सूचना.'
📌K.V.राव - “या मागील खरा हेतू भारताला पोलिस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनविण्याचा आहे."
🎯मार्गदर्शक तत्वांवरील टिका :
📌K.T. शहा - Pious Superfluities, बँकेच्या सोयीनुसार वटविता येणारा चेक.
📌नसिरोद्दीन - नववर्षाचा निश्चय जो 2 जानेवारीला मोडला जातो.
📌T.T. कृष्णमाचारी - भावनांची खरी केराची टोपली.
📌K.C. व्हेअर - कंटाळवाणा नैतिक उपदेश, जरी या घोषणांना कितीही प्रमाणात वचन मानावयाचे ठरले तरीही
त्यांच्यामुळे राज्यघटनेला अपकिर्ती प्राप्त होईल.
📌K. संथानम - या तत्वांनी केंद्र विरुद्ध राज्य, राष्ट्रपती विरुद्ध पंतप्रधान, राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा घटनात्मक संघर्ष निर्माण केला.
राज्यसेवा प्रश्नसंच
१) कोणत्या घटना दुरुस्तीव्दारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला ?
1) 84 वी घटना दुरुस्ती
2) 85 वी घटना दुरस्ती
3) 86 वी घटना दुरुस्ती
4) 87 वी घटना दुरुस्ती
उत्तर :- 3
२) समानतेच्या अधिकारामध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्यांच्या अंतर्भाव होतो ?
अ) कायद्यासमोर समानता
ब) अस्पृश्यतेची समाप्ती
क) पदव्यांची समाप्ती
ड) समान अभिव्यक्ती स्वातंत्र्य
1) अ, ब, ड
2) अ, क, ड
3) क, अ, ब
4) ब, ड, क
उत्तर :- 3
३) खालील विधाने विचारात घ्या :
अ) मूलभूत हक्क व्यक्तीसापेक्ष आहेत तर मार्गदर्शक तत्वे समाजसापेक्ष आहेत.
ब) राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे हे मूलभूत हक्कांचे उद्दिष्ट आहे. सामाजिक लोकशाही निर्माण करणे हे मार्गदर्शक तत्वाचे उद्दिष्ट आहे.
क) एका दृष्टीने मूलभूत हक्क नकारात्मक आहेत तर मार्गदर्शक तत्वे सकारात्मक आहेत.
वरीलपैकी कोणते /ती विधान / ने बरोबर आहे / त ?
1) अ आणि ब
2) ब आणि क
3) अ आणि क
4) अ, ब आणि क
उत्तर :- 4
४) मधू किषवर वि. बिहार राज्य या सर्वोच्च न्यायालयातील 1996 च्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केले की, .............
ही मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्वांची आवश्यक असणारी योजना आहे.
1) सीडॉ (CEDAW)
2) युएनडीपी (UNDP)
3) सीइसीएसआर (CECSR)
4) युएनसीएचआर (UNCHR)
उत्तर :- 1
५) योग्य कथन / कथने ओळखा :
अ) अनुच्छेद 47 प्रमाणे सर्व बालकांना वयाच्या 14 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण असावे.
ब) 86 व्या घटनादुरुस्तीव्दारे 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आले.
1) कथन अ बरोबर, कथन ब चुकीचे 2) कथन अ चुकीचे, कथन ब बरोबर
3) दोन्ही कथने अ आणि ब बरोबर आहेत
4) दोन्ही कथने अ आणि ब चुकीचे आहेत
उत्तर :- 2
६) खालीलपैकी कोणती विधाने भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कोणताही व्यवसाय करण्याच्या अथवा कोणताही धंदा, व्यापार करण्याच्या मूलभूत अधिकाराच्या अनुषंगाने खरी आहेत ?
अ) कोणताही व्यवसाय, धंदा, व्यापार करण्याकरिता नागरिकाकडे सुयोग्य औद्योगिक अथवा व्यावसायिक अर्हता असणे अनिवार्य करण्याचा अधिकार राज्य संस्थेला आहे.
ब) राज्य शासनाची एखादी संस्था एखादा व्यापार उद्योग करीत असेल तर तो करण्यापासून नागरिकाला वंचित करता येण्याचा अधिकार राज्यसंस्थेला असेल.
क) अशी कोणतीही बंधने कायदा करुनच नागरिकांवर लादता येईल.
ड) अशी बंधने प्रशासकीय आदेशाव्दारेही लादता येतील.
1) अ, ब
2) क, ड
3) अ, ब, क
4) अ, ब, क, ड
उत्तर :- 3
७) योग्य कथन / कथने ओळखा.
अ) डॉ. आंबेडकर यांनी संविधानाच्या भाग 3 चा उल्लेख ‘सर्वात टीकात्मक भाग’ असा केला आहे.
ब) तामिलनाडू मध्ये एकूण आरक्षण कोटा 69 टक्के आहे.
1) कथन ‘अ’ बरोबर, ‘ब’ चुकीचे
2) कथन ‘अ’ चुकीचे, ‘ब’ बरोबर
3) कथने ‘अ’ व ‘ब’ दोन्ही बरोबर
4) कथने ‘अ’ व ‘ब’ दोन्ही चुकीची
उत्तर :- 3
८) सार्वजनिक सेवेच्या (Public employment) अनुषंगाने भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?
अ) संसद कायदा करुन सार्वजनिक नोक-यांकरिता, एखाद्या राज्यात अथवा केंद्रशासित प्रदेशात वास्तव्य कालावधीची अट घालू शकते.
ब) राज्य शासन त्यांचे राज्यातील सार्वजनिक सेवेतील नोक-याकरिता राज्यातील किमान रहिवासाची अट कायदा करुन घालू शकते.
क) नागरिकांचे मागासवर्गीय गट, ज्यांना सार्वजनिक सेवेत पुरेसे प्रतिनिधित्व नाही, त्यांच्या पदोन्नतीकरीता आरक्षण ठेवता येते.
ड) एखाद्या विशिष्ट वर्षातील भरावयाच्या एकूण जागांच्या कमाल 50 टक्के जागा आरक्षित करण्याच्या मर्यादेमध्ये त्यापूर्वीच्या
वर्षात रिक्त राहिलेल्या आरक्षित जागाही विचारात घ्याव्या लागतात.
1) अ, ब
2) अ, ड
3) अ, ब, क, ड
4) अ
उत्तर :- 4
९) मूलभूत अधिकारांशी संबंधित भाग (III) चे वर्णन ............. यांनी ‘सर्वात टीकात्मक भाग’ असे केले आहे ?
1) पंडीत जवाहरलाल नेहरू
2) डॉ. राजेंद्र प्रसाद
3) सरदार वल्लभभाई पटेल
4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 4
१०) कालानुक्रमे मांडणी करा:
अ) अंतर्गत सुरक्षा कायदा
ब) प्रतिबंधात्मक स्थानबध्दता कायदा
क) दहशतवाद प्रतिबंधक कायदा
ड) राष्ट्रीय सुरक्षा कायदा
1) ब, अ, ड, क
2) अ, ब, क, ड
3) क, ड, अ, ब
4) ब, ड, क, अ
उत्तर :- 1
शकराचार्य केशवानंद भारती
◾️निधन
केशवानंद भारती :- राज्यशास्त्र Imp घटक
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
◾️१९७३ मधील केरळ राज्य सरकार विरुद्ध केशवानंद भारती खटल्यातील मुख्य पक्षकार व केरळमधील कासरगोड एडनीर मठाचे शंकराचार्य केशवानंद भारती यांचं आज पहाटे निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते.
● केरळ सरकारच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत केशवानंद भारती यांनी केंद्र सरकारनं केलेल्या २४, २५ आणि २९ घटनादुरूस्तीला आव्हान दिलं होतं.
●देशाच्या न्यायालयीन इतिहासात केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार १९७३ हा खटला महत्त्वाच्या खटल्यांपैकी एक समजला जातो.
🎇 कशवानंद भारती खटला :-
संपुर्ण नक्की वाचा... 🎇
🔸कशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य (१९७३) या खटल्यात स्वातंत्र्यानंतर लगेचच सरकार आणि न्यायसंस्था यांच्यात, सरकारी धोरण आणि त्याचे घटनात्मक कायदेशीर स्पष्टीकरण याविषयी संघर्ष झाला.
🔸घटनेची चौकट आणि संसदेचे कायदे करण्याचे अधिकार या विषयातली मतभिन्नता हे या संघर्षाचे प्रमुख कारण होते.
🔸राज्यघटना ही सरकारी समाज सुधारणेच्या धोरणातील मोठा अडथळा आहे, असे चित्र सरकारतर्फे रंगवले गेले.
🔸ससदेचे कायदे करण्याचे अधिकार अमर्याद आहेत, का राज्यघटनेचा त्यावर अंकुश आहे?
🔸या विषयावर शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार (१९५२) सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान सरकार (१९५२) आणि गोरखनाथ विरुद्ध पंजाब सरकार (१९६७) हे महत्त्वाचे खटले लढले गेले.
🔸गोरखनाथ खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, की घटनेतील मूलभूत अधिकारांना (Fundamental Rights) बाधा येणारा कुठलाही कायदा किंवा घटनादुरुस्ती करावयाचा अधिकार संसदेला नाही.
🔸या पार्श्वभूमीवर १९६३ मध्ये केरळ जमीन सुधारणा कायद्याला केशवानंद भारती खटल्यामध्ये आव्हान दिले गेले.
🔸या खटल्यासाठी १३ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन केले गेले.
🔸 सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे खंडपीठ होते. या खंडपीठाने ८०० पानी निकालपत्रात* महत्त्वपूर्ण निर्णय दिला, की
' संसदेला घटनेच्या गाभ्याला धक्का लावता येणार नाही'.
🔸ससदेला घटनादुरुस्ती करावयाचा पूर्ण अधिकार आहे; परंतु या अधिकारात संसद घटनेचे मूलभूत स्वरूप बदलू शकत नाही. याचा अर्थ असा, की घटनादुरुस्ती अधिकारामध्ये घटनेचे मूळ स्वरूप बदलणे अंतर्भूत नाही.
🔸 सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेचे संरक्षक आणि विश्लेषक असल्यामुळे घटनादुरुस्ती किंवा कायदा राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूपाला बाधक आहे किंवा नाही हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने स्वत-कडे ठेवला. म्हणजेच राज्यघटनेचा काही भाग भविष्यकाळातल्या सर्व संसद सदस्यांना बंधनकारक आहे असं स्पष्ट केलं.
🔸या बंधनकारक भागाची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केली नाही; परंतु सर्वोच्च न्यायालयानं नंतर इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण (१९७५), मिनर्वा मिल विरुद्ध भारत सरकार (१९८०), आय. आर. कोहेली विरुद्ध तमिळनाडू सरकार (२००७) या खटल्यांमध्ये राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूप संकल्पनेवर शिक्कामोर्तब केलं.
🔸कशवानंद भारती खटल्यानं सर्वोच्च न्यायालयाने आपले राज्यघटनेच्या विश्लेषणाचे अंतिम अधिकार अबाधित ठेवून देशामध्ये लोकशाहीला धोका पोचणार नाही याची जनतेला खात्री दिली. म्हणूनच या निर्णयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
सामान्य ज्ञान 10 प्रश्नोत्तरे
प्रश्न १ : महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले ?
१) लोकमान्य टिळक
२) आचार्य विनोबा भावे ✔️
३) बाळशास्त्री जांभेकर
४) गो.ग.आगरकर
प्रश्न २ : निकटदृष्टीता हा दृष्टीदोष ............ भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो ?
१) अंतर्वक्र ✔️
२) बहिर्वक्र
३) गोलीय
४) द्विनाभीय
प्रश्न ३ : ‘चले जाव’ ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली ?
१) 1942 साली ✔️
२) 1920 साली
३) 1940 साली
४) 1930 साली
प्रश्न ४ : तंबाखूमध्ये ............. हे धोकादायक रसायन असते .
१) युरिया
२) युरिक आम्ल
३) निकोटीन ✔️
४) कॅल्शियम कार्बोनेट
प्रश्न ५ : जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला ?
१) न्यूटन
२) सी व्ही रमन
३) आईनस्टाइन
४) चार्ल्स डार्विन ✔️
प्रश्न ६ : महात्मा गांधी खालीलपैकी कोणती गोलमेज परिषदेत हजर होते ?
१) पहिल्या
२) दुसर्या ✔️
३) तिसर्या
४) चौथ्या
प्रश्न ७ : खालीलपैकी कोणत्या धातुपासून बनविलेल्या वस्तु चुंबकाकडे आकर्षिल्या जातात ?
१) लोखंड
२) निकेल
३) कोबाल्ट
४) वरील सर्व ✔️
प्रश्न ८ : बर्फामध्ये ............ मिसळल्यानंतर तो वितळण्यास खूप वेळ लागतो ?
१) साखर
२) मीठ ✔️
३) कॉपर
४) झिंक
प्रश्न ९ : नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या प्रकारच्या शासन पद्धतीमध्ये मिळतात ?
१) राजेशाही
२) लोकशाही ✔️
३) हुकुमशाही
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १० : हॅलेचा धूमकेतू किती वर्षातून एकदा दिसतो ?
१) 40 वर्षातून
२) 50 वर्षातून
३) 76 वर्षातून ✔️
४) 80 वर्षातून
प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी शेवटच्या आठवड्यात नियोजन काय असावे?
राज्यसेवा पूर्वसाठी इतिहासामध्ये विचारल्या जाणाऱ्या एकूण 15 प्रश्नांपैकी आठ ते नऊ प्रश्न हे प्राचीन व मध्ययुगीन भारतावर विचारले जातात.त्यामध्ये देखील 5 ते 6 प्रश्न प्राचीन व दोन-तीन प्रश्न मध्ययुगीन भारतावरती विचारले जातात.
♦️आता आपण प्राचीन व मध्ययुगीन भारतासाठी नक्की काय Strategy असायला पाहिजे याविषयी बघूयात.
1.राहिलेल्या 7 दिवसातील कमीत कमी आठ ते दहा तासांचा वेळ तुम्ही प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाला द्यायला हवा.
त्यामध्ये देखील शेवटच्या दोन ते तीन दिवसांमध्ये हा टॉपिक वाचला तर जास्त फायदा होईल.कारण प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या facts खूप लवकर विसरून जातात.कोणी जर हा घटक Skip केला असेल तर अजूनही वेळ आहे हा टॉपिक करून घ्या.कारण Basic reading वरती देखील 4-5 प्रश्न बरोबर येऊ शकतात.
2. प्राचीन भारतातील काही महत्त्वाच्या घटकांवर आयोग हमखास प्रश्न विचारत आहे. उदा.सिंधू खोरे संस्कृती,महाजनपदे, मौर्य कालखंड,गुप्त कालखंड,गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, वैदिक कालखंड etc.
या सर्व कालखंडातील आयोग व्यक्तीवर जास्त प्रश्न विचारताना दिसतो त्यामुळे व्यक्तींचा अंदाज घेऊन चांगला अभ्यास करा.या कालखंडातील संस्कृती,भाषा,लोकांची जीवन जगण्याची पद्धती,कला-संस्कृती याचा अंदाज घ्या.
3. मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर 2-3 प्रश्न विचारले जातात.यामध्ये मुघलांचे आगमन आणि भारतातील मुघल घराण्याची स्थापना, मुघलकालीन कला,साहित्य,संस्कृती इ अनुषंगाने अभ्यास करा.त्यानंतर दिल्ली सलतनत,भक्ती चळवळ, सुफी चळवळ, सीख धर्मीयातील विविध चळवळ या वरती आयोग प्रकर्षाने प्रश्न विचारतो.
♦️Booklist-
तुम्ही आतापर्यत ज्या booklist मधून read केलं आहे त्यामधून revise करा.
आणखी कोणी जास्त केलं नसेल तर फक्त 6,7 आणि 11 th चे Stateboard मधून Cover करून घ्या. एक optimum Level चे marks नक्कीच भेटतील.
♦️आता आता तुम्ही दोन जानेवारी साठी प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाचे प्रश्न सोडवताना कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत ते पाहुयात.
1. इतिहासाचे बरेच प्रश्न हे व्यक्तीविशेष म्हणजेच Personality based विचारले जातात. त्यामुळे शेवटचं revision घेताना व्यक्तींवर जास्त focus राहू द्या.अजून आयोग महत्वाच्या व्यक्तींवरतीच प्रश्न विचारतो त्यामुळे Options मध्ये तुम्हाला जर एखादी महत्त्वाची व्यक्ती दिसत असेल तर तेच उत्तर निवडले पाहिजेत.
उदा.2018 च्या Prelims ला अल्लाउद्दीन खिलजी वरती multistatement प्रश्न आला होता. त्यामध्ये अमीर खुसरो हा नामवंत कवी त्याच्या दरबारी होता हे वाक्य होते. आणि तेवढं वाक्य माहित असली की प्रश्न सुटेल.
2. इतिहासामध्ये उत्तरे ही most Inclusive पर्यायचीच असतात.2020 च्या परीक्षेमध्ये शहाजहाच्या दरबारातील चित्रकार विचारले होते. आणि ऑप्शन खूपच Narrow होते.म्हणजे फक्त ab, फक्त bc, फक्त cd आणि चौथा abd. अशा वेळी चौथा म्हणजे most inclusive Option उत्तर असते.
3. इतिहासामध्ये एक Timeline असते ती timeline perfect लक्षात आली पाहिजे. उदा.महाजनपदे, मौर्य आणि गुप्त या timeline मधील महत्त्वाच्या व्यक्ती आणि त्यांच्या सभोवतालच्या छोट्या गोष्टी जरी माहिती असलं तरी प्रश्न Tackle होतो.
4. प्राचीन व मध्ययुगीन भारतातील 8-9 प्रश्नांपैकी साधारणता दोन ते तीन प्रश्न हे जोड्या लावा यावरती असतात. पुढील पाच-सहा दिवस तुम्ही आयोगाचे 2017 पासून 2020 पर्यंत चे पेपर घेऊन जोड्यांचे पॅटर्न व्यवस्थित बघा. त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन मध्ये काही कॉमन ऑप्शन्स दिसतील तीच उत्तरे बऱ्यापैकी असतात. किंवा प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहासामध्ये 1234 किंवा 4321 या जोड्यांचा पॅटर्न देखील चालतो.
5. प्राचीन व मध्ययुगीन भारताचे प्रश्न हे out of box असतात. पण त्यालादेखील logic लागू शकत. उदा.2019 मध्ये Achaemenid विजयानंत्तर कंभोज मध्ये कोणता उद्योग सुरु झाला असा प्रश्न होता. आपलं Confusion हे जहाजबांधणी व ब्लॅंकेट बनवणे यामध्ये होत. पण कंभोज हे शहर समुद्रकाठावर वसलेलं नव्हतं याचाच अर्थ तिथं जहाजबंधनी उद्योग सुरु होणे थोडे अवघड आहे.त्यामुळे ब्लॅंकेट बनवणे हा एकच पर्याय शिल्लक राहतो.
6. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रश्नातील Options संबंधीचा. तो कोणता? समजा एखाद्या प्रश्नातील Options मध्ये दोन पर्याय जर Close दिसत असतील तर तेच उत्तर असण्याची शक्यता जास्त असते.प्रश्न सोडवताना ही Technique तुम्ही निश्चितच वापरू शकता.
7. 2020 ला प्राचीन व मध्ययुगीन भारताचे प्रश्न थोडे tough होते हे मान्य आहे पण त्यामध्येदेखील आपण वरती सांगितल्याप्रणे वेगवेगळे method वापरून उत्तरापर्यंत पोहोचू शकलो असतो.
सर्वांना शुभेच्छा!
Police bharti question set
🔰 1) राजाराम मोहन रॉय यांना राजा हि पदवी कोणी दिली
1)देंवेंद्रनाथ टागोर
2)नेताजी बोस
3)अकबर✅✅
4)डॉ़ सेन
____________________________
🔰 2)राणी लक्ष्मीबाई पूर्ण नाव काय
1)लक्षमीबाई महादेव जानकर
2)मणकणिका मोरोपंत तांबे ✅✅
3)राणी पांडूरंग माने
4)लक्षमीबाई महादेव थोरात
__________________
🔰 3)कभी कभी छोटी चीज भी बडा काम कर जाती है हे उदृगार कोणाचे आहे
1)नेहरू
2)गांधी
3)लालबहादूर शास्त्री✅✅
4)इंदिरा गांधी
____________________________
🔰 4)चले जाव ठराव कोणत्या अधिवेशन मंजूर करण्यात आला
1)मुंबई
2)पुणे
3)वधाँ✅✅
4)कलकत्त
____________________________
🔰5)पाकिस्तान हा शब्द कोणत्या पुस्तकात वाचायला मिळाला
1)never Pakistan
2)no in pictures
3)Now or Never ✅✅
4)some of the entire
MTDC चा अर्थ काय?
A) महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट महामंडळ
B) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ✅✅
C) महाराष्ट्र टेलिफोन विकास महामंडळ
D) यापैकी नाही
महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र _ आहे.
A) पोलीस मित्र
B) जागर
C) दक्षता ✅✅
D) यापैकी नाही
पवन उर्जेमध्ये भारताचे स्थान जगात आहे.
A) तिसरे
B) दुसरे
C) चौथे
D) पाचवे ✅✅
भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते?
A) १० ✅✅
B) ७
C) ५
D) ११
भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे?
A) आग्नेय ✅✅
B) ईशान्य
C) नैॠत्य
D) वायव्य
भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्य कोण आले होते?
A) पोर्तुगीज ✅✅
B) इंग्रज
C) डच
D) फ्रेंच
मानवामध्ये गुणसूत्रे असतात.
A) ४६ ✅✅
B) ४४
C) ३२
D) ५२
भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे?
A) लक्षद्वीप
B) मालदीव
C) छागोस
D) अंदमान ✅✅
‘झुमर’ लोकनृत्य _ राज्यात प्रसिद्ध आहे.
A) कर्नाटका
B) राजस्थान ✅✅
C) बिहार
D) गुजरात
आम्ल पदार्थाची चव कशी असते?
A) खारट
B) आंबट ✅✅
C) तुरट
D) गोड
नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) ठिकाणी स्थित आहे.
A) मुंबई
B) औंरंगाबाद
C) पुणे ✅✅
D) नागपूर
आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?
A) रासबिहारी बोस ✅✅
B) चंद्रशेखर आझाद
C) सुभाषचंद्र बोस
D) रामप्रसाद बिस्मिल
भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून ओळखला जातो?
A) २४ डिसेंम्बर ✅✅
B) १५ मार्च
C) १ जुलै
D) २ आक्टोबर
I.S.I. हि गुप्तहेर संघटना देशाची आहे?
A) भारत
B) पाकिस्तान ✅👌
C) अमेरिका
D) रशिया
अक्षय उर्जा दिन : २० ऑगस्ट :: ? : २२ मार्च
A) जागतिक जल दिन ✅✅
B) साक्षरता दिन
C) जागतिक महिला दिन
D) जागतिक एड्स दिन
‘दोनदा जन्मलेला’ हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे?
A) द्वित
B) अग्रज
C) अनुज
D) द्विज ✅✅
‘नांगर चषक’ खेळाशी संबधित आहे.
A) गोल्फ
B) बुद्धिबळ
C) हाॅकि
D) बॅटमिंटन ✅✅
भारतीय अवकाश संशोधनाचे अध्वर्यू कोणास म्हणतात?
A) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
B) विक्रम साराभाई ✅✅
C) सतीश धवन
D) माधवन नायर
अंदमान – निकोबार बेटांंचे राजधानीचे शहर कोणते आहे?
A) विशाखापट्टणम
B) मालदीव
C) छागोस
D) पोर्ट ब्लेअर ✅✅
‘सव्यापसव्य करणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?
A) उसने अवसान आणणे
B) सतत त्रास होणे
C) यातायात करणे ✅✅
D) अतिशय काळजी घेणे
कोणत्या कवीने ‘ गझल’ हा प्रकार मराठीत रूढ केला?
A) शांताराम नांदगावकर
B) जोतीबा फुले
C) जगदीश खेबुडकर
D) सुरेश भट्ट ✅✅
हिटलरच्या आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते.
A) माईन काम्फ ✅✅
B) दास कॅपिटल
C) तरुण तुर्क
D) आपला लढा
‘भूल पडणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?
A) भुरळ पडणे✅✅
B) बेशुद्ध पडणे
C) मती नष्ट होणे
D) हरवणे
‘प्लेइंग’ इट माय वे’ हे प्रसिद्ध आत्मचरित्र यांचे आहे.
A) कपिल देव
B) सुनील गावसकर
C) सचिन तेंदुलकर ✅✅
D) अॅडम गिल ख्रिस्ट
क्रेमलिन हे प्रमुख स्थळ ठिकाणी आहे?
A) वाॅशिंग्टन
B) रोम
C) न्यूयाॅर्क
D) माॅस्को ✅✅
महत्वपूर्ण सराव प्रश्न उत्तरे
प्रश्नः Q: भारताचे पहिले प्रभारी पंतप्रधान कोण होते?
उत्तरः गुलझारी लाल नंदा.
प्रश्नः Q: महाराष्ट्रातील कोणत्या समाज सुधारकांना 'लोकहितवादी' म्हटले जाते?
उत्तर: गोपाळ हरी देशमुख.
प्रश्नः Q: भटनागर पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू झाला?
उत्तरः 1957
प्रश्नः Q : 'सत्यार्थ प्रकाश 'रचना कोणी केली?
उत्तरः स्वामी दयानंद सरस्वती.
प्रश्नः Q: दालचिनी वनस्पतीच्या कोणत्या भागापासून मिळते?
उत्तर: झाडाची साल पासून.
प्रश्नः Q: 'अमृत बाजार पत्रिका' हे प्रकाशन कोणत्या वर्षी सुरू झाले?
उत्तरः 1868
प्रश्नः Q: नील नदीच्या काठावर कोणती संस्कृती विकसित झाली होती?
उत्तरः इजिप्तची संस्कृती.
प्रश्नः Q: अकबराने 'दिन-ए-इलाही' हा धर्म कधी जाहीर केला?
उत्तरः1582
प्रश्नः Q: 'भरतनाट्यम' कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे?
उत्तर: तामिळनाडू.
प्रश्नः Q: भारताचा सर्वोच्च सेनापती कोण आहे?
उत्तरः राष्ट्रपति
प्रश्नः Q: धन्वंतरी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
उत्तरः वैद्यकीय क्षेत्र.
प्रश्नः Q: हिटलरने आत्महत्या कधी केली?
उत्तरः 30 एप्रिल 1945
प्रश्नः Q: लोकसंख्येच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
उत्तर: ठाणे, महाराष्ट्र (भारत)
प्रश्नः Q: भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता?
उत्तर - मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार
प्रश्नः Q: 'एग्रीकल्चर' हा कोणत्या भाषेचा शब्द आहे?
उत्तरः लॅटिन भाषा.
चालू घडामोडी :- 10 मे 2024
◆ भारताचा क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली हा टी-20 क्रिकेट मध्ये 400 हून अधिक षटकार ठोकणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
◆ भारताने वस्तूंच्या जागतिक निर्यात दारांमध्ये 19 व्या स्थानावरून 17व्या स्थानावर झेप घेतली आहे.
◆ संयुक्त राष्ट्रांने 25 मे हा दिवस जागतिक फुटबॉल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे.
◆ वर्गीस कोशी यांचे नुकतेच निधन झाले ते बुद्धिबळ या खेळाशी संबंधित होते.
◆ जगात सर्वात श्रीमंत शहरांची यादीत मुंबई 24व्या क्रमांकावर आहे.
◆ जगातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत न्यूयॉर्क शहर प्रथम क्रमांकावर आहे.
◆ भारत या देशाने जपान देशाला मागे टाकून जगातील तिसरा सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे.
◆ 2023 मध्ये चीन या देशाने सौर ऊर्जा पासून सर्वाधिक वीज निर्मिती केली आहे.
◆ स्कॉटलंड या देशाचे प्रथम मंत्री म्हणून जॉन स्विनी यांची निवड झाली आहे.
◆ भारत बायोटेक कंपनी द्वारे क्षयरोग या आजारावरील MTBVAC ही लस विकसित करण्यात येत आहे.
◆ भारताच्या तेजस्वीन शंकरने टक्सन, ऍरिझोना, यूएसए येथे झालेल्या USATF फेस्टिव्हलमध्ये पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत विजय मिळवला.
◆ श्री पवन सिंधी यांना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल ग्लोबल प्राइड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे.
◆ आयआरडीएआयने केकी मिस्त्री यांच्या एचडीएफसी लाइफच्या अध्यक्षपदी नियुक्तीला अधिकृत मान्यता दिली आहे.
◆ समाजावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी केलेल्या असाधारण प्रयत्नांची दखल घेत पवन सिंधी यांना ग्लोबल प्राइड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 हा सन्मान देण्यात आला आहे.
◆ दरवर्षी 10 मे रोजी जगभरात लोक जागतिक ल्युपस दिवस साजरा करतात.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
10 May 2024
चालू घडामोडी :- 09 मे 2024
◆ भारतात दरवर्षी 9 मे रोजी ‘महाराणा प्रताप जयंती’ साजरी केली जाते.
◆ ब्रिटीश फार्मास्युटिकल कंपनी AstraZeneca ने जगभरात आपली कोविड-19 लस खरेदी आणि विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
◆ चीनने जू फेहाँग यांची भारतातील नवीन राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.
◆ Visa ने सुजाई रैनाची भारतात कंट्री मॅनेजर म्हणून नियुक्ती केली आहे.
◆ स्कॉट फ्लेमिंग यांची भारतीय वरिष्ठ पुरुष बास्केटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ अनिवासी नागरिकांकडून मायदेशात रक्कम पाठवण्यामध्ये भारत देशाचा प्रथम क्रमांक लागतो.
◆ राजस्थान मधील बाडमेर मध्ये देशातील सर्वाधिक 46 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
◆ 12 ते 15 मे या कालावधीमध्ये भुवनेश्वर येथे राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धा होणार आहेत.
◆ अमेरीका देशातील प्रसिद्ध दैनिक द न्युयॉर्क टाइम्स आणि वाशिंग्टन पोस्ट, असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला 2024 चा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे.
◆ पुलित्झर पुरस्कार 2024 मध्ये "रॉयटर्स" वृतसंस्थेला छायाचित्रणाच्या श्रेणीतील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
◆ पुलित्झर पुरस्कार दरवर्षी पत्रकारीता क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जातो.
◆ गुगल कंपनीने भारत देशातील अँड्रॉइड वापरकर्त्या साठी गुगल वॉलेट सुविधा सुरू केली आहे.
◆ सध्या जगभरातील 80 देशांमध्ये गुगल वॉलेट सुविधा कार्यरत आहे.
◆ भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज युजवेंद्र चहल हा टी-20 क्रिकेट मध्ये 350 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
◆ भारतीय सेना आणि वायू सेना यांच्या व्दारे गगन स्ट्राईक-2 या सरावाचे आयोजन पंजाब राज्यात करण्यात आले आहे.
◆ आशियाई अंडर 22 युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत कजाकिस्तान देशाने सर्वाधिक 48 पदके जिंकली आहेत.
◆ बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO द्वारे हिमाचल प्रदेश आणि लडाख या ठिकाणा दरम्यान शिंकुन ला बोगदा तयार करण्यात येणार आहे.
◆ "हिदाला" चक्रीवादळ हे हिंदी महासागरात निर्माण झाले आहे.
◆ आयुष मंत्रालयाच्या निर्देशक म्हणून नियुक्त झालेले सुबोध कुमार हे 2010 बॅचचे तामिळनाडू केडरचे आयएएस अधिकारी आहेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
09 May 2024
चालू घडामोडी :- 08 मे 2024
◆ ‘जागतिक रेडक्रॉस दिन’ दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो.
◆ व्लादिमीर पुतिन हे पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.
◆ ‘बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन’ (BRO) ने 7 मे 2024 रोजी आपला 65 वा स्थापना दिवस साजरा केला.
◆ भारत आणि भूतान यांच्यातील 5वी संयुक्त सीमाशुल्क गट (JGC) बैठक लेह, लडाख येथे आयोजित करण्यात आली आहे.
◆ कमांडंट कॉन्क्लेव्हच्या सहाव्या आवृत्तीचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे.
◆ भावी मेहता यांनी ‘द बुक ब्यूटीफुल’ साठी 9वा ऑक्सफर्ड बुकस्टोअर बुक कव्हर अवॉर्ड्स 2024 जिंकला आहे.
◆ IIT मद्रास-समर्थित स्टार्टअप ‘माइंडग्रूव्ह टेक्नॉलॉजीज’ ने पहिली स्वदेशी डिझाइन केलेली मायक्रोकंट्रोलर चिप लाँच केली आहे.
◆ ‘राकेश सिंग’ यांची पेटीएम मनीच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ व्लादिमीर पुतिन यांच्या शपथ विधीला भारताचे राजदूत "विनय कुमार" हे उपस्थित होते.
◆ 22 वर्षाखालील आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा कझाकिस्तान या देशामध्ये पार पडली आहे.
◆ कझाकिस्तान येथे नुकत्याच पार पडलेल्या 22 वर्षाखालील आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताने 7 सुवर्णपदके जिंकले आहेत.
◆ महाराष्ट्र राज्याच्या "सृष्टी साठे" हिने आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत 63 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले आहे.
◆ काझाकिस्तान येथे झालेल्या 22 वर्षांखालील आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एकून 43 पदके जिंकली आहेत.
◆ भारत आणि घाना देशाची संयुक्त व्यापार समितीची बैठक अक्रा (घाना) येथे पार पडली आहे.
◆ 26 व्या युके आशिया फिल्म फेस्टिवल मध्ये "शबाना आझमी" या भारतीय व्यक्तीला फ्रीडम ऑफ सिटी ऑफ लंडन अवॉर्ड ने सन्मानित करण्यात येणार आहे.
◆ 26 व्या युके आशिया फिल्म फेस्टिवल चे आयोजन लंडन येथे करण्यात आले आहे.
◆ गुरुग्राम प्रशासनाने युजवेंद्र चहल या भारतीय क्रिकेट खेळाडुची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केली आहे.
◆ हेन्री ड्युनंट यांच्या सन्मानार्थ 8 मे हा दिवस विश्व रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो.
◆ अमेरीका देशात COVID-19 रोगाचा FLIRT नावाचा नविन व्हेरियंट आढळून आला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━