१. नसीम अल बहर:- भारत व ओमान
२. नोमॅडीक इलेफंट:- भारत व मंगोलिया
३. वरुणा :-भारत व फ्रान्स
४. SIMBEX:- भारत व सिंगापूर
५. सूर्यकिरण:- भारत व नेपाळ
६. AL Nagh Li:- भारत व ओमान
७. युद्ध अभ्यास :- भारत व अमेरिका
८. समप्रीती-७ :- भारत व बांगलादेश
९. मित्र-शक्ती :- भारत व श्रीलंका
१०. कोकण: भारत व ब्रिटन
११. इंद्र:- भारत व रशिया
१२. मलबार :- भारत,युएसए,जपान व ऑस्ट्रेलिया
१३. सिल्नेक्स :- भारत व श्रीलंका
१४. अजेय वारियर :- भारत व युके.
१५. वज्र प्रहार :- भारत व अमेरिका
१६. शीन्यू मैत्री :- भारत व जपान
१७. गरुडा: भारत व फ्रान्स
१८. हॅड अॅड हॅड:- भारत व चीन
१९. IMBEX:- भारत व म्यानमार
२०. एकुवेरीन:- भारत व मालदीव
२१. मिलन :- भारतासह ९ देश
२२. JIMEx:- भारत व जपान
२३. CORPAT:- भारत व बांगलादेश
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
28 December 2021
लष्करी सराव(समविष्ट देश )
राज्यसेवा पूर्व पुढे ढकलली
🔰 राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 करीता वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी
🔰 याकरिता दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी नियोजित प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.
27 December 2021
प्लावक बल (Buoyant Force)
◆ बोटांनी दाबून पाण्याच्या तळाशी नेलेला लाकडी ठोकळा बोट काढताच उसळी मारून पाण्याच्या पृष्ठभागाशी येतो.
◆ पाण्यात बुडलेला असल्याने ठोकळ्यावर कार्य करणारे पाण्याचे बल ठोकळ्याला वर ढकलते.
◆ द्रवात बुडलेल्या वस्तूला वर ढकलणाऱ्या बलाला प्लावी बल असे म्हणतात. प्लावी बलालाच प्लावक बल किंवा उत्प्रनोद असेही म्हणतात.
◆ प्लावक बल हे नेहमी वरच्या दिशेने लावलेले बल असते.
◆ द्रवात बूडालेल्या वस्तूचे आकारमान जास्त असल्यास प्लावक बल अधिक असते.
◆ द्र्वाची घनता जास्त असल्यास प्लावक बल अधिक असते.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.
◆ द्र्वामध्ये एखादा पदार्थ तरंगणार की बुडणार हे प्लावाकबल ठरविते. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असल्यास वस्तु तरंगते.
◆ प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असल्यास वस्तु बुडते.
◆ प्लावक बल वस्तूच्या वजना इतके असल्यास वस्तु द्रवाच्या आतमध्ये तरंगते.
यावर खालील प्रकारचा प्रश्न येवू शकतो.
===========================
प्र.1 खालील पैकी अयोग्य विधान/ने ओळखा.
अ. द्रवात बुडलेल्या वस्तूला वर ढकलणाऱ्या बलाला प्लावी बल असे म्हणतात.
ब. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असल्यास वस्तु बुडते.
क. वस्तूच्या आकारमानाचा व प्लावक बलचा संबंध व्यस्त असतो.
पर्याय.
🛑A. विधान अ फक्त.
⚫️B. विधान अ व ब फक्त.
🔵C. विधान ब व क फक्त.
🔘D. फक्त विधान क.
---------------------------------------------------
प्र.2 खालील पैकी अचूक विधान/ने निवडा.
अ. प्लावक बल हे नेहमी खालच्या दिशेला लावले जाते.
ब. एखाद्या वस्तूवरील प्लावक बल जितके कमी तितके त्या वस्तूचे आकारमान कमी असते.
क. द्र्वामध्ये एखादा पदार्थ तरंगणार की बुडणार हे गुरुत्वबल ठरविते.
पर्याय.
🛑A. विधान अ चूक फक्त.
⚫️B. विधान अ व ब अचूक.
🔵C. विधान ब अचूक फक्त.
🔘D. वरील सर्व विधाने अचूक.
---------------------------------------------------
उत्तरं वरच्या Passage मध्ये शोधा, Confirm उत्तरं नाही समजली तर comments करा
सौर ऊर्जा
सूर्य हा पृथ्वीचा जीवनदाता आहे असे म्हटले जाते पृथ्वीवरील जीवसृष्टी सूर्याच्या ऊर्जेमुळे निरामय आहे प्रकाश संश्लेषण क्रिया द्वार वनस्पती आपले अन्न तयार करतात यासाठी सूर्यकिरण अत्यावश्यक असतात अन्नसाखळीचा प्रारंभ सूर्यापासून होतो अनंत ऊर्जेचा साठा असणारा हा तारा पृथ्वीपासून 1.496*10 8 Km
इतक्या अंतरावर आहे सूर्यकिरण पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचण्यासाठी 8 मिनिटे व 19 सेकंद इतका कालावधी लागतो. 4.6 अब्ज वर्षे वय असणाऱ्या सूर्याच्या पृष्ठभागावर खालील तक्त्यानुसार घटकांचे वास्तव्य असते
हायड्रोजन 73. 46%
हीलियम 24.85%
ऑक्सिजन 0.77%
कार्बन 0.29%
लोह 0.16%
neon 0.12%
नायट्रोजन 0.09%
सिलिकॉन 0.07%
मॅग्नेशिअम 0.05%
सल्फर 0.04%
साधारणतः पृथ्वीचे वातावरण सुर्यापासून 174 status इतक्याच प्रमाणात प्रारणे स्वीकारते त्यापैकी तीस टक्के प्रारणे परावर्तित होतात उर्वरित प्रारणे ढोक समुद्र व जमिनीकडून शोषले जातात समुद्र आणि जमीन यांनी सूर्यापासून घेतलेल्या उष्णतेमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाची सरासरी तापमान 14 डीग्री सेल्सियस इतके राहते
पृथ्वीचे वातावरण समुद्र व जमीन या तिन्ही घटकां द्वारा 38,50,000 Exajoules per year इतक्या प्रचंड प्रमाणात ऊर्जा ग्रहण केली जाते सोबतच्या आकृतीमध्ये पृथ्वीवरील सौर ऊर्जेचे वर्गीकरण दिलेली आहे
सौर ऊर्जेचे पारंपारिक उपयोग
1 अनादी काळापासून सूर्याच्या उष्णतेपासून कपडे वाळविले जातात
2 समुद्रकाठी मिठागरांमध्ये समुद्राचे पाणी साठवण सूर्याच्या उष्णतेने द्वारे बाष्पीभवन होऊन मीठ तयार केले जाते
3 अन्नधान्य कडधान्य तेलबिया इत्यादी पदार्थ वाढविण्यासाठी सूर्याच्या उष्णतेचा उपयोग होतो
4 फळे सुका मेवा मासे इत्यादी वाळवून साठवणूक करण्यासाठी सौर ऊर्जेचा उपयोग करतात
सौर ऊर्जा उपयोगाचे फायदे
1 सौर ऊर्जा वापरामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही त्यामुळे पर्यावरणाचा र्हास होत नाही
2 भारतासारख्या उष्ण प्रदेशामध्ये सौर ऊर्जेची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे
3 कोणत्याही मोबदल्याशिवाय सौर ऊर्जा उपलब्ध होते
सौर ऊर्जा वापराच्या मर्यादा
1 पृथ्वीच्या परिवलन व परिभ्रमण यामुळे पृथ्वीवर ऋतुचक्र दिवस-रात्र असमान दिवस-रात्र असे परिणाम दिसून येतात त्यामुळे दिवसा सौर ऊर्जा उपलब्ध असतील परंतु रात्री ती उपलब्ध नसते
2 उन्हाळ्यात सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते परंतु हिवाळा व पावसाळ्यात तिच्या प्रमाणात लक्षणीय घट होत असते
3 पावसाळ्यात ढगाळ वातावरणामुळे सौर ऊर्जा कमी प्रमाणात मिळते
4 पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वत्र सूर्यकिरणांची तीव्रता एकसारखी नसल्यामुळे उष्णतेचे असमान वितरण होते
सुर्यापासून दर सेकंदाला 1.8 * 10 17 ज्यूल इतकी उर्जा प्राप्त होते परंतु तितक्या प्रमाणात साठवण होण्यासाठी संकलकाचा अभाव आहे
सौर उपकरणे
मित्रानो आपण वर बघितल्याप्रमाणे सौर ऊर्जा वापरात बऱ्याच अडचणी आहेत त्यामुळे आकाशात सूर्य असताना मिळणारी ऊर्जा साठवून ठेवणे गरजेचे असते साठवून ठेवलेली ऊर्जा सूर्य नसतानाही वापरता येते साठवणुकीच्या सामग्रीवर होणाऱ्या खर्चामुळे सौर ऊर्जेचे मूल्य वाढते संकलन आणि साठवण्याची पुरेशी व्यवस्था करून सौर ऊर्जा वापर शक्य आहे
सौर जलतापक
पृथ्वीवर घरगुती तसेच औद्योगिक क्षेत्रांमध्ये उष्ण व पाण्याची विविध कामांसाठी गरज पडते इलेक्ट्रिक वॉटर हिटर शेगडी यादी द्वारा पाणी तापविण्याच्या सौर चालता पकाने तापविणे परवडणारे व अतिशय सहज सोपे असते
सोबतच्या आकृतीप्रमाणे सौर जलतापक याचे दोन मुख्य प्रकार आहेत
1 सपाट पृष्ठाचा संकलक
2 उष्णता विरोधात साठवण टाकी
टाकी संकलकापेक्षा नेहमी वरच्या पातळीवर ठेवलेली असते कारण सूर्याच्या उष्णतेमुळे संकलकामधील पाणी
सौर ऊर्जेने तापते त्यामुळे ते प्रसरण पावते म्हणून त्याची घनता कमी होते संकलन कमी घनतेचे पाणी टाकी तिल पाण्याच्या पृष्ठभागाकडे जाते
त्याची जागा टाकीच्या तळाकडील थंड पाण्यातून घेतली जाते आणि टाकीचा वरील भागातील पाणी वापरासाठी उपलब्ध होते गरम पाणी काढून घेतले की थंड पाणी टाकीच्या तळाशी प्रवेश करते
सौरकुकर
सौर ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीमुळे आज विविध प्रकारचे विविध आकारांचे सौरकुकर उपलब्ध आहेत या उपकरणांमध्ये सौर ऊर्जेच्या सहाय्याने अन्न शिजवले जाते सौर कुकर ची रचना सोबतच्या आकृतीमध्ये असते या धातूचे दुहेरी आवरण असलेली आयाताकार पेटी असते धातूच्या 2 आवरणांमध्ये उष्णतेचे दुर्वाहक असणाऱ्या एखाद्या पदार्थ भरलेला असतो पेटी च्या आतील बाजूला पूर्ण काळा रंग दिलेला असतो त्यावर एका पेटीला तंतोतंत झाकेल असे त्याचे झाकण असते
पेटीच्या वरच्या दिशेने सपाट आरसा बसविलेला असतो या आरशाच्या सहाय्याने पेटी च्या आतल्या भागात सूर्यप्रकाशाचे परावर्तन केले जाते या आरशाच्या सहाय्याने पेटी च्या आतल्या भागात सूर्यप्रकाशाचे परावर्तन केले जाते सौर कुकर मध्ये वापरावयाची भांडी उथळ असतात या भांडण बाहेरच्या बाजूने सुद्धा काळा रंग दिलेला असतो या काळ या भागावर पडणाऱ्या प्रारणांपैकी 98% भागाचे शोषण केले जाते
सौर शुष्कक
शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर परंपरेने केला जातो यामुळे अन्नपदार्थांतील आर्द्रता निघून जाते व पदार्थ सुरक्षित राहतात उघड्यावर पसरून अन्नपदार्थ वाळविण्याची ही प्रक्रिया सदोष मंद आहे
या प्रक्रियेत पदार्थात धूळ कीटक मिसळण्याची शक्यता दाट असत यापेक्षा सोयीस्कर परवडणारे वेगवान साधन म्हणजे सौर शुष्कक होय. सौर शुष्ककाचा उपयोग करून सुकामेवा तयार केला जातो
प्रकाश विद्युत् घट सौरघट
सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या घटांना प्रकाश विद्युत् घट किंवा सौरघट असे म्हणतात सौर घट विरळ प्रारणामध्ये सुद्धा समाधान कारक कार्यरत असतात तसेच हे घट महाग असतात अति दुर्गम भागांमध्ये वीजपुरवठा करणे अवघड असते अशा ठिकाणी सौर घटांच्या सहाय्याने विज पुरवठा होतो दुर्गम भागांमध्ये पंप चालविणे टीव्ही बल्ब रस्ते प्रकाशित करणे यासाठी सौर घटांचा उपयोग होतो
सौरघट बनविण्यासाठी अर्ध वाहकांचा उपयोग केला जातो जसे की सिलिकॉन गॅलियम जर्मेनियम इत्यादी या पदार्थांपासून बनविलेल्या सौर घटांची क्षमता दहा ते पंधरा टक्के असते आधुनिक काळातील सौरघट सेलेनिअमपासून बनविले जातात.
त्यांची क्षमता 25 टक्के असते सौरघट वापरायचे फायदे म्हणजे सौरघट स्थिर असतो खर्च कमी असतो दुर्गम भागांमध्ये वापरता येतात
सामान्य सौर घटामध्ये 2 * 2 semi आकाराचा शुद्ध सिलिकॉनचा एक तुकडा असतो.
त्याद्वारे 0.7w इतकी वीज तयार होते.
सिलिकॉन मोठ्या प्रमाणात सापडत असल्यामुळे सौरघटात त्याचा उपयोग करतात. तसेच सिलिकॉन चा उपयोग पर्यावरणासाठी घातक नसतो
सौर घटाचे उपयोग
कृत्रिम उपग्रहांना अवकाशात भ्रमणासाठी ऊर्जेचा पुरवठा करण्यासाठी तसेच स्पेस स्टेशनला उर्जा पुरविण्यासाठी
रस्त्यांवरचे दिवे प्रकाशित करण्यासाठी traffic signal पाण्याचे पंप इत्यादींसाठी
समुद्रातील दीपस्तंभ व परिसराला वीज पुरवण्यासाठी जहाजांना वीज पुरवण्यासाठी
इलेक्ट्रॉनिक घड्याळे गणकयंत्र इत्यादीमध्ये सौर घट याचा वापर होतो
दुर्गम भागात टीव्ही रेडिओ लाईट पंप इत्यादी वापरासाठी
भारतातील सौर ऊर्जा
1) भारतात सौर उर्जेचा पुरेपूर वापर केल्यास वार्षिक 5000 ट्रिलियन kwh (युनिट) वीजनिर्मिती होऊ शकते. 31 मार्च 2017 अखेर देशात सौर ऊर्जेपासून 12,504 मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता प्राप्त करण्यात आलेली आहे.
2) 2016 – 17 या वर्षात तामिळनाडू राज्य सौर ऊर्जा निर्मितीत आघाडीवर आहे. त्याखालोखाल राजस्थान, गुजरात, तेलंगाना, आंध्र प्रदेशाचा क्रमांक लागतो. 2016 – 17 मध्ये महाराष्ट्र 430.46mw क्षमतेसह आठव्या स्थानावर आहे.
3) सौर ऊर्जा विकासासाठी 19 नोव्हेंबर 2009 रोजी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर अभियान जाहीर करण्यात येऊन 11जानेवारी 2010 पासून सुरू करण्यात आले 2022 पर्यंत 20 हजार मेगावॉट सौर वीज निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे 2013 पर्यंत पहिल्या टप्प्यात 200 मेगावॉट सौर वीज निर्मिती केली गेली 2017 पर्यंत च्या दुसऱ्या टप्प्यात तीन हजार मेगावॉट तर 2022 पर्यंत च्या तिसऱ्या टप्प्यात 20 हजार मेगावॉट वीज निर्मिती केली जाईल
4) 1000 मेगावॉट क्षमतेचे 25 सौर पार्क उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आह पैकी 14 राज्यांमधील एकूण 17 सौर पार्कना मान्यता देण्यात आली आहे. NTPC
ने 2170 मेगावॉट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्याचा करार केला आहे
5 इंटरनॅशनल सोलर अलायन्स ने भारताला सौर ऊर्जेचे jagadguru अशी पदवी दिली आहे
6 मार्च 2014 पर्यंत 11600 सौर पंप होते आता 1.1 लाख सौर पंप आहेत
मराठी व्याकरण - भाषेतील रस
🔹
रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.
साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.
मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.
साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते.
१) स्थायीभाव - रती
रसनिर्मिती – शृंगार
हा रस कुठे आढळतो - स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातुन
उदा – डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका.
२) स्थायीभाव – उत्साह
रसनिर्मिती - वीर
हा रस कुळे आढळतो - पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात
उदा. ‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’
३) स्थायीभाव –शोक
रसनिर्मिती – करुण
हा रस कुठे आढळतो - दुख, वियोग, संकट यांच्या वर्णनात
उदा – आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!
४) स्थायीभाव – क्रोध
रसनिर्मिती – रौद्र
हा रस कुळे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन
उदा – मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.
५) स्थायीभाव – हास
रसनिर्मिती – हास्य
हा रस कुठे आढळतो - विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात.
उदा – मानसीच पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर अडीच तास आठ दिवस भजी तळत बसायची.
६) स्थायीभाव – भय
रसनिर्मिती- भयानक
हा रस कुळे आढळतो - युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनात.
उदा. तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.
७) स्थायीभाव – जुगुप्सा
रसनिर्मिती – बीभत्स
हा रस कुठे आढळतो - किळस, वीट, तिटकारा इ. च्या वर्णनात.
उदा – मुंबईचा कामगार चाळीतल्या दहा बाय बाराच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी, ओकारी आणणाऱ्या दुर्गधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो.
८) स्थायीभाव – विस्मय
रसनिर्मिती- अदभुत
हा रस कुठे आढळतो - आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात
उदा – असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.
९) स्थायीभाव – शम (शांती)
रसनिर्मिती – शांत
हा रस कुळे आढळतो - परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गांणी किंवा वातावरणात.
उदा – सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !
संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न
1) ‘डोंगर कोसळणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ लिहा.
1) आनंद होणे 2) अतिदु:ख होणे
3) डोंगर खाली येणे 4) सुख:द घटना घडणे
उत्तर :- 2
2) ‘मूर्खपणाचा सल्ला देणारा’ या शब्दसमूहाला खाली दिलेल्या शब्दसमूहातील लागू न पडणा-या शब्दांचा पर्याय द्या.
1) अकलेचा कांदा 2) अरण्य पंडित
3) उंटावरचा शहाणा 4) कळीचा नारद
उत्तर :- 4
3) पुढीलपैकी शुध्द शब्दरूप ओळखा.
1) नीस्तेज 2) नि:स्तेज
3) निस्तेज 4) नि:तेज
उत्तर :- 3
4) पुढील समूहात न बसणारा शब्द शोधा.
1) चंपक – चम्पक 2) छंद – छन्द
3) अंबुज – अम्बुज 4) धुवून – धुऊन
उत्तर :- 4
5) खालील पर्यायी उत्तरांतून ‘पररूप संधी’ ओळखा.
1) सदाचार 2) जगदीश
3) करून 4) काहीसा
उत्तर :- 3
6) ‘संस्कार’ हा शब्द कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे?
1) सामासिक 2) अभ्यस्त
3) प्रत्ययघटित 4) उपसर्गसाधित
उत्तर :- 4
7) ‘समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे’ या वाक्याव्दारे व्यक्त होणारा अर्थ कोणता ?
1) वाच्यार्थ 2) लक्ष्यार्थ
3) तात्पयार्थ 4) व्यंगार्थ
उत्तर :- 4
8) ‘झुंबड’ या शब्दाला समानार्थी पर्यायी शब्द शोधा.
1) झोंबाझोंबी 2) झांज
3) गर्दी 4) यापैकी कोणताच नाही
उत्तर :- 3
9) ‘अरी’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द पुढीलपैकी कोणता ?
1) अमृत 2) विष
3) सखा 4) रवी
उत्तर :- 3
10) ‘पळसाला पाने तीन’ या म्हणीतून कोणते सत्य सूचित केले आहे ?
1) निसर्गाविषयीचे मानवी आकर्षण 2) निसर्ग – माणूस यांच्यातील नाते
3) स्वभावाला औषध नाही 4) मानवी स्वभावाची सार्वत्रिकता
उत्तर :- 4
26 December 2021
WHO म्हणतंय, “Omicron वेगाने पसरतोय, लसीकरण पूर्ण झालेल्यांबरोबरच करोना होऊन गेलेल्यांना.
🔰करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव डेल्टापेक्षा अधिक वेगाने होत असल्याची माहिती सोमवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी दिली आहे. इतकच नाही तर लसीकरण पूर्ण झालेल्या किंवा यापूर्वी करोना होऊन गेलेल्यांनाही ओमायक्रॉनचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
🔰डब्ल्यूएओचे महानिर्देशक ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी जिनेवामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सध्याच्या करोना परिस्थितीसंदर्भात सविस्तर माहिती दिली. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ट्रेडोस यांनी, “आता समोर आलेल्या पुराव्यांनुसार करोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टाच्या तुलनेत फारच वेगाने पसरत आहे,” असं म्हटलंय.
🔰टरेडोस यांनी करोना प्रतिबंधक लसीचे सर्व डोस घेतलेल्यांना किंवा यापूर्वी करोनावर मात केलेल्यांमध्येही या नवीन विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केलीय. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगामधील ८९ देशांमध्ये करोनाच्या या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केलाय.
🔰कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका असणाऱ्या भागांमध्ये रुग्णसंख्या दीड ते तीन दिवसांमध्ये दुप्पटीने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार अधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये मोठ्याप्रमाणात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव होत आहे.
मराठा आरक्षण ते पेगॅसस प्रकरणी चौकशी; वाचा देशातील न्यायालयांनी दिलेले सर्वोच्च निर्णय.
🔰२०२१ हे वर्ष कोविड-१९ साथीच्या कठोर निर्बंधात सुरु झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढे जात राहिले आहे. मात्र करोनाच्या आलेल्या नव्या व्हेरिएंटमुळे परिस्थिती अद्याप सामान्य झालेली नाही. लोक फक्त नवीन परिस्थितीशी जुळवून घेत आहे. मात्र २०२१ हे वर्ष एका गोष्टी थांबवू शकलेले नाही ते म्हणजे भारताची न्यायव्यवस्था.
🔰दशाच्या विविध न्यायालयांमध्ये व्हर्च्युअन सुनावण्या पार पडल्याचे पाहायला मिळाले आहे. न्यायालयांनी या वर्षी भारताच्या कायदेशीर परिदृश्याला आकार देणारे काही महत्त्वपूर्ण बदल देखील चिन्हांकित केले आहेत. त्यामुळे २०२१ वर्ष संपत असताना, काही सर्वात महत्त्वाच्या निर्णयांवर एक नजर टाकूया.
🔰मबई उच्च न्यायालयाने (नागपूर खंडपीठ) १८ नोव्हेंबर रोजी दिलेला ‘स्किन टू स्किन’ हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला असेल तरच तो लैंगिक अत्याचार ठरतो. कपडय़ांवरून शरीराची चाचपणी करणे म्हणजे लैंगिक अत्याचार होत नाही, या उच्च न्यायालयाच्या आदेशाला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
Omicron: देशात पुन्हा एकदा लॉकडाउन.
🔰ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. देशात आतापर्यंत २३६ हून अधिक ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली असून यामधील १०४ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत.
🔰महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ओमायक्रॉनबाधितांची एकूण संख्या ८८ झाली आहे. यानंतर दिल्ली, तेलंगण, कर्नाटक, राजस्थान आणि केरळ या राज्यांचा क्रमांक आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लावण्याची तयारी सुरु झाली असताना केंद्राकडूनही कठोर निर्णयाची शक्यता आहे. भाजपा खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनी ट्वीट करत तसे संकेत दिले आहेत.
🔰करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूच्या वेगवान प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बैठक घेऊन करोनास्थितीचा आढावा घेतला. सर्व लसपात्र नागरिकांचे लवकरात लवकर संपूर्ण लसीकरण करून घ्यावे, अशी सूचना मोदींनी राज्यांना केली. आपण सतर्क आणि सावध राहायला हवे, असे नमूद करत मोदी यांनी करोनाप्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या.
🔴“देशात लॉकडाउन जाहीर झाला तर आश्चर्य वाटू देऊ नका”🔴
🔰भाजपाचे खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनी ट्वीट केलं असून लॉकडाउन जाहीर झाला तर आश्चर्यचकित होऊ नका असं म्हटलं आहे. तसंच उत्तर प्रदेश निवडणुकाही पुढे ढकलल्या जाऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली आहे.
🔰“ओमायक्रॉनमुळे लॉकडाउन जाहीर झाल्यास आणि उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवटीखाली निवडणुका सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्यास आश्चर्य वाटू देऊ नका. यावर्षाच्या सुरुवातीला ज्या गोष्टी प्रत्यक्षपणे करु शकले नाहीत त्या पुढील वर्षी अप्रत्यक्षपणे केल्या जातील,” असं ते म्हणाले आहेत.
32 वर्षांनंतर ‘INS खुकरी’ जहाज सेवेतून निवृत्त
🔰भारतीय नौसेनेतील INS खुकरी ही स्वदेशी बनावटीची पहिली क्षेपणास्त्र युद्धनौका देशसेवेच्या गौरवास्पद 32 वर्षांनंतर 23 डिसेंबर 2021 रोजी सेवेतून निवृत्त झाली.
🔰विशाखापट्टणम येथे झालेल्या एका कार्यक्रमात ‘खुकरी’ जहाजावरचा राष्ट्रीय ध्वज, नौदल एनसाईन आणि डीकमिशनिंग पॅनेट सूर्यास्ताला खाली झुकवून निरोप देण्यात आला.
🌼ठळक बाबी
🔰23 ऑगस्ट 1989 रोजी मझगाव गोदीने ‘खुकरी’ जहाजाची बांधणी केली होती. पश्चिम आणि पूर्व ताफ्याचा जहाज भाग होते. मुंबईत या नौकेचा सेवेत समावेश केला. कमांडर संजीव भसीन हे जहाजाचे पहिले कमांडिंग अधिकारी होते.
आपल्या सेवा काळात INS खुकरी जहाजावर 28 कमांडिंग अधिकारी होते आणि जहाजाने 6,44,897 सागरी मैलांचा प्रवास पूर्ण केला आहे.
भारतीय लष्कराच्या गोरखा ब्रिगेडशी ही नौका संलग्न होती.
बारावी वेळापत्रकात बदल करण्याची राज्य भूगोल परिषदेची मागणी
🔰माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १२ वीचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले. या वेळापत्रकानुसार परीक्षा घेत असताना शाळा, महाविद्यालये तसेच विद्यार्थ्यांसमोर येणाऱ्या अडचणींचा मंडळाने विचार करणे आवश्यक आहे. तो केला नसल्याने जाहीर केलेले वेळापत्रक बदलण्याची मागणी शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड व राज्य मंडळाकडे कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषदेने निवेदनाद्वारे केली आहे.
🔰भगोल परिषदेचे राज्याध्यक्ष प्रा. सतीश शिर्के व सचिव प्रा. युवराज खुळे यांनी ही माहिती दिली. निवेदनात म्हंटले,की १२ वी साठी भूगोल हा विषय कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांना शिकविला जात असून हा विषय घेणाऱ्या परीक्षार्थीची संख्या जास्त आहे. मागील १८ वर्षांपासून हा पेपर सकाळ सत्रात घेतला जात होता. परंतु यंदा तो अचानक दुपारच्या सत्रात घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
🔰पपरचा क्रम निश्चित करताना विषयाची विद्यार्थी संख्या विचारात घेतली जात नाही. भूगोल विषयाचा पेपर उशिरा घेण्यात येत आहे. त्यामुळे विज्ञान विषयाचे विद्यार्थी एका पेपरसाठी अडकून पडणार आहेत. यामुळे याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सकाळ-दुपार अशी पेपरची वेळ निश्चित करताना त्या विषयातील परीक्षार्थीची संख्या विचारात घ्यावी. जास्त विद्यार्थी संख्या असणारे पेपर सकाळी व कमी विद्यार्थी संख्या असणारे पेपर दुपारी ठेवावेत, जेणेकरून कमी विद्यार्थ्यांची व कमी केंद्राची गैरसोय होईल.
उत्तर प्रदेशात नाईट कर्फ्यूची घोषणा; लग्नातील उपस्थितीवरही बंधनं; महाराष्ट्रात काय निर्णय होणार
🔰ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून पूर्वकाळजी घेण्याचे तसंच गरज पडल्यास निर्बंध लावण्याची सूचना केली आहे.
🔰दशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे ३४६ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकारने राज्यात नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. ख्रिस्मसपासून उत्तर प्रदेशात याची अमलबजावणी होणार आहे. उत्तर प्रदेशात २५ डिसेंबरपासून रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत नाईट कर्फ्यू लागू असणार आहे.
🔰याशिवाय योगी आदित्यनाथ सरकारने लग्नामधील उपस्थितीवरही बंधनं आणली आहेत. लग्नात २०० जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय कार्यक्रमांमध्ये करोनासंबंधी नियमांचं कठोर पालन करावं लागेल असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट सांगितलं आहे. नाईट कर्फ्यू लागल्यानंतर लोकांना रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत बाहेर फिरण्याची मुभा नसेल.
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवी नियमावली लागू; वाचा काय असतील निर्बंध
🔰संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल.
🔰लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
🔰इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
🔰उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
🔰वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.
उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.
🔰याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.
SAIL ला 'गोल्डन पीकॉक एन्व्हायर्नमेंट मॅनेजमेंट अॅवॉर्ड' २०२१ जाहीर
'स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (Steel Authority of India Ltd. - SAIL)' पोलाद मंत्रालयाच्या अंतर्गत प्रतिष्ठीत 'गोल्डन पीकॉक एन्व्हायर्नमेंट मॅनेजमेंट अॅवॉर्ड (Golden Peacock Environment Management Award)' २०२१ प्रदान करण्यात आला आहे.
🧲 ठळक मुद्दे
१९९८ सालापासून पर्यावरण व्यवस्थापनात लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल संस्थांना सदर पुरस्कार दिला जातो.
SAIL बाबत महत्वपूर्ण माहिती
अर्थ: SAIL म्हणजेच Steel Authority of India Limited अर्थात स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड होय.
सध्याचे अध्यक्ष: सोमा मोंडल सध्या SAIL चे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे SAIL च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
स्थापना वर्ष: १९५४ साली SAIL ची स्थापना करण्यात आली होती.
पुरस्कार
● रॅमन मॅगसेसे पुरस्कार
- फिलीपाईन्सचे तिसरे राष्ट्रपती रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ 1957 पासून हा पुरस्कार दिला जातो.
- हा पुरस्कार प्रत्येक वर्षी 31 ऑगस्टला फिलीपींसची राजधानी मनीला येथे एका औपचारिक समारोहात प्रदान केला जातो.
- हा पुरस्कार आशिया खंडाचा नोबेल म्हणून ओळखला जातो.
- या पुरस्काराची सुरूवात न्यूयॉर्कमधील राॅफेलर भावंडांनी केली आहे.
- 2009 पासून पुरस्कार सहा प्रकारात सरकारी सेवा, समाजकार्य, साहित्य, पत्रकारिता, शांतता, अंतरराष्ट्रीय संबंध इ. क्षेत्रात कार्य करणारे व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
- 2021 चा 63 वा पुरस्कार आहे.
● आतापर्यंतचे भारतीय पुरस्कारार्थी
- विनोबा भावे (नेतृत्व 1958): पहिले भारतीय
- चिंतामण देशमुख (शासकीय सेवा 1959)
- अमिताभ चौधरी (पत्रकारिता 1961): पहिले पत्रकार
- मदर तेरेसा (शांतता 1962): पहिली भारतीय महिला
- अंशू गुप्ता & संजीव चतुर्वेदी (स्थलांतरितांचे नेतृत्व 2015)
- बेझवाडा विल्सन (मानवी हक्क 2016)
- टी. एम. कृष्णा (कर्नाटक संगीत 2016)
- भरत वटवाणी ( प्रतिष्ठेसह आरोग्य स्वच्छता काम 2018)
- सोनम वांगचुक (समुदाय विकासासाठी शिक्षण 2018)
- रविश कुमार (पत्रकारिता 2019): दुसरे पत्रकार, पुरस्कार प्राप्त सहावे पत्रकार
● 2021 चे पुरस्कारार्थी
- बांग्लादेशचे फिरदौसी कादरी (वैक्सीन शास्त्रज्ञ)
- पाकिस्तानचे मुहम्मद अमजद साकिब (माइक्रोफाइनेंसमध्ये)
- फिलिपीनचे रॉबर्टो बैलोन (फिशर आणि सामुदायिक पर्यावरणवादी)
- संयुक्त राज्य अमेरिकाचे स्टीवन मुंसी (मानव अधिकार कार्यकर्त्ता)
- वॉचडॉक (शोध पत्रकारितेसंबंधी इंडोनेशियाई समूह)
‘सुशासन सप्ताह’: 20-25 डिसेंबर 2021
‘सुशासन सप्ताह’: 20-25 डिसेंबर 2021
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त, परराष्ट्र मंत्रालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग आणि पंचायतराज व ग्रामीण विकास मंत्रालय यांच्या सहकार्याने कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाचा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभाग (DARPG) याच्या पुढाकाराने 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2021 या काळात देशात ‘सुशासन सप्ताह’ पाळण्यात येत आहे.
सुशासन सप्ताहानिमित्त उत्तम प्रशासनाच्या कार्यपद्धती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी 'प्रशासन गांव की ओर' अर्थात 'प्रशासन चालले गावांकडे' या मोहिमेचा प्रारंभ केंद्रीय सार्वजनिक तक्रार, निवृत्तीवेतन, अणु-ऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते 20 डिसेंबर 2021 रोजी झाला.
'प्रशासन गांव की ओर' या मोहिमेद्वारे, सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच सेवा प्रदान करण्यात सुधारणा करण्यासाठी सर्व जिल्हे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक राष्ट्रीय चळवळ चालवली जाणार आहे.
सातशेपेक्षा अधिक जिल्हाधिकारी 'प्रशासन गांव की ओर' उपक्रमात सहभागी होतील आणि आठवडाभर चालणाऱ्या या उपक्रमात तहसील / पंचायत समितीच्या मुख्यालयांना भेटी देतील. लोकांच्या तक्रारींचे वेळेवर निवारण व्हावे आणि त्यांना सेवा प्रदान करण्याची पद्धत अधिक सुधारावी, या उद्देशाने हा उपक्रम आखण्यात आला आहे.
दुसरी गोलमेज परिषद
७ सप्टेंबर १९३१ ते १ डिसेंबर १९३१ ही परिषद गांधीजीच्या 'राजपूताना' ह्या जहाजमध्ये महादेव देसाई, मदनमोहन मालवीय, देवदास गांधी, घनश्यामदास, रेम्जे मैकडोनाल्ड, डॉ.बी.आर.आंबेडकर ह्या आवाजात पूर्ण झाली. गांधी करारानंतर लॉर्ड आयर्विन यांनी आपले व्हाईसरॉयचे पद सोडून मायदेशी परतले. त्यांच्या जागी लॉर्ड विलिंग्डन हे व्हाईसरॉय झाले.
ते प्रतिगामी व नोकरशाही वृत्ती असलेले व्हाईसरॉय होते.
पुढे राष्ट्रसभेने सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कराची येथे अधिवेशन घेतले. या अधिवेशनात काही करार मंजूर करून महात्मा गांधी परिषदेला उपस्थित राहण्यासाठी इंग्लंडला गेले. या परिषदेमध्ये हिंदुस्तानला लगेच वसाहतीचे राज्य द्यावे अशी मागणी महात्मा गांधी यांनी केली.
परंतु महात्मा गांधी हे केवळ राष्ट्रसभेचे नेते आहेत ते संपूर्ण हिंदुस्तानाच्या वतीने बोलू शकत नाहीत अशी आठवण इतरांनी करून दिली. भारतातील अनेक धर्म व जाती आहेत व त्यांचे प्रतिनिधी गोलमेज परिषदेला उपस्थित होते.
गांधीजींनी केवळ राष्ट्रसभेचे नेतृत्व करावे असे इतरांचे म्हणणे होते. या गोलमेज परिषदेत गांधीजींचे समाधान झाले नाही त्यामुळे निराश अवस्थेत ते आपल्या मायदेशी परतले व भारतात येताच परत सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली, परंतु ब्रिटीशांनी या वेळेस गांधीजींना अटक करून तुरुंगात टाकले.
यशाचा राजमार्ग प्रश्नसंच
1✔️राष्ट्रीय हरित लवाद (NGT) हे एक .....................आहे.
अ) घटनात्मक ब) वैधानिक क) अर्धन्यायिक ड) नियामक
2✔️..................... या शहरात ‘बायो एशिया समिट २०२०’ आयोजित केली गेली.
अ) बंगळुरू ब) मुंबई क) हैदराबाद ड) दिल्ली
3✔️..................... या शहरात ‘केंद्रीय प्रशासकीय न्यायपीठ विषयक अखिल भारतीय परिषद २०२०’ आयोजित केली गेली.
अ) चेन्नई ब) भोपाळ क) रायपूर ड) नवी दिल्ली
4✔️फेब्रुवारी २०२० मध्ये ..................... या शहरात केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्र्यांनी ‘गल्फूड २०२०’ या कार्यक्रमामध्ये भारतीय मंडपांचे उद्घाटन केले.
अ) दुबई ब) मस्कत क) आबुधाबी ड) दमास्कस
5✔️.....................या शहरात ६५ वा ‘अॅमेझॉन फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२०’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अ) पणजी ब) शिमला क) गुवाहाटी ड) मुंबई
6✔️..................... या शहरात दक्षिण भारतातले पहिले ‘भारतीय बँकनोट’ संग्रहालय उघडले गेले.
अ) चेन्नई ब) बंगळुरू क) कोची ड) हैदराबाद
7✔️कोणत्या रेलगाडीमध्ये देवासाठी जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे?
अ) काशी महाकाल एक्सप्रेस ब) उज्जैन महाकाल एक्सप्रेस
क) महाकाल एक्सप्रेस ड) काशी-उज्जैन महाकाल एक्सप्रेस
8✔️‘इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी (ICGEB)’ प्रयोगशाळा .....................या शहरात आहे
अ) नवी दिल्ली ब) पुणे क) कोलकता ड) शिमला
9✔️जानेवारी-फेब्रुवारी २०२० या काळात चर्चेत असलेले ‘ग्रॉस रेव्हेन्यू (GR)’, ‘अॅडजेस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू (AGR)’ आणि ‘लायसेन्स फी (LF)’ हे शब्द .....................याच्याशी संबंधित आहेत.
अ) परकीय चलन ब) सकल राष्ट्रीय उत्पन्न
क) दूरसंचार क्षेत्र ड) कंपनीच्या जमाखर्चाचा लेखा जोखा
10✔️.....................या शहरात दहावी ‘जागतिक पेट्रोकोल परिषद’ आयोजित करण्यात आली.
अ) पुणे ब) लखनौ क) नोएडा ड) नवी दिल्ली
11✔️कोणत्या देशाने त्यांच्या विकसनशील देशांच्या यादीतून भारताला वगळले?
अ) जपान ब) अमेरिका क) ब्रिटन ड) रशिया
12✔️..................... या दोन शहरांच्या दरम्यान भारताची पहिली आंतर-शहरी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
अ) कानपूर - लखनौ ब) अहमदाबाद - मुंबई
क) मुंबई - पुणे ड) दिल्ली - अमृतसर
13✔️कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची घोषणा केली?
अ) केरळ ब) महाराष्ट्र क) तामिळनाडू ड) पंजाब
14✔️‘द क्रॉसफायर ऑफ लव्ह’ ही कादंबरी ..................... यांनी लिहिली आहे.
अ) धीरेन तिवारी ब) विक्रम सेठ क) किरण देसाई ड) शोभा डे
15 ✔️‘MOSAiC अभियान’ .....................याच्याशी संबंधित आहे.
अ) आर्क्टिक हवामान ब) उष्णकटिबंधीय हवामान
क) सुदूर संवेदी ड) भौगोलिक माहिती प्रणाली (GIS)
16✔️‘भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था’ .....................या शहरात आहे.
अ) मुंबई ब) हैदराबाद क) पुणे ड) पणजी
17✔️‘घाऊक किंमत निर्देशांक’ (WPI) याच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा.
(१) सध्या, WPI याच्यासाठी आधारभूत वर्ष २००४-०५ हे आहे.
(२) हे सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून प्रकाशित केले जाते.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?
अ) केवळ (१) ब) केवळ (२)
क) (२) आणि (२) दोन्ही ड) (१), (२) दोन्ही नाही
18✔️‘पॉलीक्रॅक’ तंत्रज्ञान ..................... याच्याशी संबंधित आहे.
अ) कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती ब) पेट्रोलियम पदार्थांची निर्मिती
क) ब्लॉकचेन तंत्रज्ञान ड) 3-D तंत्रज्ञान
19✔️शैलेश नायक समिती कशाशी संबंधित आहे?
अ) कावेरी पाणी तंटा ब) कर सुधारणा
क) किनारपट्टी नियंत्रण क्षेत्र ड) विमा क्षेत्रातली सुधारणा
उत्तर : १) ब २) क ३) ड ४) अ ५) क ६) ब ७) अ ८) अ ९) क १०) ड ११) ब १२) क १३) ब १४) अ १५) अ १६) क १७) ड १८) अ १९) क