11 October 2025

भारताचे गव्हर्नर जनरल्स व वॉइसरॉय

 वॉरन हेिस्टग (१७७४ ते १७८५) :

* वॉरन हेिस्टगला प्रथम गव्हर्नर जनरल संबोधले जाते.

* वॉरन हेिस्टगने भारतात आर्थिक, व्यापारिक व न्यायिक सुधारणा केल्या.

* १७७२ मध्ये वॉरन हेिस्टगने महसूल वसुलीचे ठोके जास्त बोली लावणाऱ्याना १ वर्षांसाठी दिले.

* वॉरन हेिस्टगने मीठ, सुपारी, तंबाखूव्यतिरिक्त व्यापारावर २.५% कर लावला.

* वॉरन हेिस्टगने कलकत्ता उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून सर एलिहाज इम्पेची यांची नियुक्ती केली. * नंदकुमार खटला : १७७५ मधील नंदकुमार हत्या खटल्यात वॉरन हेिस्टगचा संबंध.

* रेग्युलेटीन अ‍ॅक्ट, १७७३ : यानुसार कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली.

* १७७८ मध्ये आशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना केली.

* वॉरन हेिस्टगने चार्ल्स विल्कीन्सद्वारे अनुवादित गीतेस प्रस्तावना लिहिली.



लॉर्ड कॉर्नवॉलिस (१७८६ ते १७९३) :

* १७८६ मध्ये कॉर्नवॉलिस गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला.

* न्यायालयीन सुधारणा : 

कॉर्नवॉलिसने सत्ता कलेक्टरांच्या हातात केंद्रित केली. १७८६ ला कलेक्टरांना दिवाणी न्यायाधीश म्हणून नियुक्त केले. १७९० मध्ये फौजदारी कायद्यात सुधारणा करण्यात आली. भारतीय न्यायाधीशांच्या हातातील जिल्हा फौजदारी न्यायालय समाप्त करण्यात आले. त्याजागी ५ फिरती न्यायालये सुरू करण्यात आली. प्रांतिक न्यायालयाची स्थापना कलकत्ता, मुर्शिदाबाद, ढाका, पटणा या ठिकाणी कॉर्नवॉलिसच्या काळात झाली.

* कॉर्नवॉलिस संहिता – 

– अधिकार विभाजनाच्या तत्त्वावर कॉर्नवॉलिसची संहिता आधारित आहे.

– त्याने कर व न्यायपद्धती विभाजित केली.

– त्याने कलेक्टरकडेच पूर्वीचे न्यायालयीन व फौजदारी अधिकार होते ते काढून त्याकडे फक्त कर अधिकार शिल्लक ठेवले.

– जिल्हा सत्र न्यायालयात स्वतंत्र न्यायाधीश नेमणूक केली.

– भारतात त्याने कायद्यांच्या सर्वोच्चतेचा नियम लागू केला.

– कॉर्नवॉलिसची न्यायप्रणाली ही पाश्चिमात्य न्याय संकल्पना व समतेच्या तत्त्वांवर आधारित होती.

* पोलीस सुधारणा- 

– त्याने पोलिसांना जास्त वेतन द्यावयाचे ठरवले.

– खुनी व्यक्ती व चोरांना पकडल्यास खास पुरस्कार जाहीर केला.

– जमीनदारांकडून पोलीस अधिकार काढून घेण्यात आले.

* कर सुधारणा – 

– १७८७ मध्ये कॉर्नवॉलिसने प्रांतांना राजस्व भागात विभाजित केले. त्यावर कलेक्टरची नियुक्ती केली.

* कायम धारा सुधारणा (Permanent Settlement of Land) :

– त्या दृष्टीने त्याने प्रचलित भूमिका, जमीन पट्टा देणे याचा अभ्यास केला व त्यानुसार त्याने जॉन शोर, जेम्स गड्र यांच्याशी चर्चा करून त्याने जमीनदारी व्यवस्था स्थायी स्वरूपात ठेवण्याचा निर्णय घेतला.

– या सुधारणेमुळे कंपनीला बरेचसे फायदे झाले.

* नागरी प्रशासनाचा पाया वॉरन हेिस्टगने घातला, तर त्याचा विकास कॉर्नवॉलिसने केला.

 

लॉर्ड वेलस्ली (१७९८ ते १८०५) :

– १७९८ मध्ये जॉन शोअरनंतर वेलस्ली गव्हर्नर जनरल झाला.

– त्याने भारतीय राजकीय स्थितीचा फायदा घेऊन कंपनीचे साम्राज्य हे ध्येय समोर ठेवले. त्याने सरळ युद्धनीतीचा अवलंब केला.

* तनाती फौज : 

– भारतीय राज्यांना नियंत्रणात आणण्यासाठी तनाती फौजेचा स्वीकार केला.

– तनाची फौजेचा खऱ्या अर्थाने प्रणेता डुप्ले हा होता. कारण की, वेलस्लीच्या आधी त्याने ही पद्धत सुरू केली होती.

– वेलस्ली हा साहाय्यक प्रणालीसाठी प्रसिद्ध आहे.

– या पद्धतीनुसार भारतीय रियायतीबरोबर वेलस्लीने करार करून साम्राज्य दृढ करून साहाय्यक प्रणालीला जन्म दिला.

– ही प्रणाली चार अवस्थांवर अवलंबून होती. सन्य बाळगणे, मदत देणे, खर्च घेणे व बरखास्ती.

हैदराबादच्या निजामाने १७९८ मध्ये,

म्हैसूरने १७९९ मध्ये,

अवध १८०१ मध्ये,

पेशवा १८०२ मध्ये या करारावर सह्या केल्या.

– त्याच्या काळात चतुर्थ इंग्रज – म्हैसूर युद्ध (१७९९)- टिपू सुलतानाचा मृत्यू झाला. (४ मे, १७९९).

 

लॉर्ड मिंटो १८०७ ते १८१३) :

– १८०९ मध्ये रणजितसिंहांशी लॉर्ड मिंटोने करार केला.

– लॉर्ड मिंटोच्या काळात मॉरिशसवर ब्रिटिशांचे साम्राज्य स्थापन झाले.

– १८१३ – चार्टर अ‍ॅक्ट : या कायद्यानुसार कंपनी प्रशासनाला एक लाख रुपये शिक्षणावर खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले. या कायद्याने भारतातील व्यापारावरील कंपनीचा एकाधिकार काढून घेण्यात आला. (फक्त चहाचा व्यापार व चीनबरोबरचा व्यापार वगळता).

 

लॉर्ड हेिस्टग (१८१३ ते १८२३) –

– लॉर्ड मिंटोनंतर लॉर्ड हेिस्टग हा गव्हर्नर जनरल बनला.

– लॉर्ड हेिस्टग हा अहस्तकक्षेप निधीचा पुरस्कर्ता होता. पण लॉर्ड हेिस्टगला हस्तक्षेप निधी स्वीकारावा लागला.

– त्याच्या काळात नेपाळबरोबर युद्ध झाले. (नेपाळ आंग्ल युद्ध १८१४ ते १८१६ या काळात झाले.) हे युद्ध १८१६ ला सगौली कराराने समाप्त झाले.

– तृतीय मराठा-इंग्रज युद्ध (१८१७ ते १८१८) – या युद्धामुळे पेशवा पद समाप्त झाले. १३ जून १८१८ रोजी पुण्याचा तह, पेशवा बाजीराव दुसरा याला कानपूरजवळील विठूर येथे पाठविण्यात आले व उर्वरित आयुष्य कंपनीच्या पेन्शनवर जगून तेथेच त्यांचा मृत्यू झाला.

– यांच्या काळात रयत थॉमस मुन्रोने मद्रास प्रांतात रयतवारी पद्धत लागू केली.

– ज्या पद्धतीत शेतकरी हा भूमी स्वामी होता तो सरळ सरकारला कर द्यायचा.

– लॉर्ड हेिस्टगने वृत्तपत्रांना प्रथमत: स्वतंत्रता प्रदान केली. पण पुढे अटी लादल्या.

– त्याने वृत्तपत्रांवरील प्रसिद्धिपूर्वक नियंत्रण काढून घेतले.

 

लॉर्ड विल्यम बेंटिंग (१८२८ ते १८३५)

– लॉर्ड बेंटिंग हा सुधारणावादी होता.

– त्याला नेपोलियन विरुद्ध लढायचा अनुभव होता.

– सतीप्रतिबंधक कायदा, १८२९ – बेंटिंगच्या आधी कोणत्याही गव्हर्नर जनरलने सामाजिक प्रश्न सोडविण्याचे धाडस दाखवले नाही. बेंटिगने मात्र सतीप्रथा व शिशुवध बंद करून सामाजिक सुधारणा केल्या.

– राजा राममोहन रॉय यांनी सतीप्रथा बंद करण्यासाठी बेंटिंगला साथ दिली.

– १८३० मध्ये मुंबई व मद्रास प्रेसिडेन्सी क्षेत्रात सतीप्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला.

– त्याने ठगांचादेखील बंदोबस्त केला.

– वृत्तपत्रांबाबत त्याने उदार धोरण ठेवले.

* शिक्षण सुधारणा – 

– त्याने सार्वजनिक शिक्षण समिती नेमली.

– बेंटिंगने मेकॉलेला शिक्षण समितीचा अध्यक्ष नियुक्त केले.

– त्यानुसार उच्च स्तरावरील शिक्षणासाठी इंग्रजीची भाषा स्वीकारण्यात आली.

– बेंटिंगने १८३५ मध्ये कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना केली.

– त्याच्याच काळात चार्टर अ‍ॅक्ट, १८३३ हा संमत झाला.

 

सर चार्ल्स मेटकाफ (१८३५ ते ३६) –

– बेंटिंगनंतर हा भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त झाला.

– त्याने भारतीय वृत्तपत्रांवरील बंदी उठवली. म्हणून त्याला गव्हर्नर जनरल पदावरून दूर केले.

 

गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी (१८४८-५६) :

– १८४८ मध्ये लॉर्ड हर्डिंगच्या जागी डलहौसी गव्हर्नर जनरल बनला.

– डलहौसी हा त्याच्या व्यपगत सिद्धांतासाठी विशेष ओळखला जातो.

– डलहौसीच्या मते, संस्थाने तीन प्रकारची होती- स्वतंत्र व कर न देणारी संस्थाने, मोगल/पेशवाअधीन असणारी पण ईस्ट इंडिया कंपनीला कर देणारी संस्थाने, इंग्रजांच्या मदतीने बनलेले अथवा पुनर्जीवित झालेली संस्थाने.

– डलहौसीने या संस्थानांना दत्तक पुत्र घेण्यास अनुमती दिली. पण दत्तक पुत्र हा गादीस वारस मानण्यास नकार दिला.

– त्याचप्रमाणे द्वितीय आणि तृतीय प्रकारच्या संस्थानाला दत्तक पुत्र वारसा नेमल्यास मान्यता नाकारली.

– डलहौसीने या सिद्धांतानुसार सातारा (१८४८), संबलपूर व जैतपूर (१८४९), बगाढ (१८५०), उदयपूर (१८५२), झाशी (१८५३) व नागपूर (१८५४) खालसा केले.

– लॉर्ड डलहौसीकृत सुधारणांचा एकमेव उद्देश सत्ता केंद्रीकरण हा होता.

– लॉर्ड डलहौसीच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीच्या साम्राज्याचा विस्तार पश्चिम भागात झाला.

– लॉर्ड डलहौसीने सन्यात तीन रेजिमेंटची भर घातली.

– १८५३ मध्ये प्रथम रेल्वे ठाणे ते मुंबई येथे सुरू करण्यात आली.

– भारतात पोस्ट स्टॅम्पचा वापर लॉर्ड डलहौसीच्या काळात सुरू झाला.

– त्याच्या काळात भारतात रेल्वे लाइनचे जाळे ठेके पद्धतीने बांधण्यात आले.

– लॉर्ड डलहौसीला भारतात विद्युत तारेचा प्रारंभकर्ता असे म्हणतात.

– लॉर्ड डलहौसीने व्यापारासाठी सर्व बंदरे खुली करून कर रद्द केला.

– १८५४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना केली.

– १८५४ चा वुडचा खलिता – त्यानुसार प्राथमिक शिक्षणापासून ते विश्वविद्यालयीन शिक्षणापर्यंत एक शिक्षा योजना बनविण्यात आली. यालाच भारतीय शिक्षणाचा मॅग्रा चार्टा असे म्हणतात. यानुसार प्रत्येक प्रांतात स्वतंत्र शिक्षण असावे, अशी शिफारस करण्यात आली.

– त्याच्या काळात विधवा विवाहासंदर्भात विडो रिमॅरेज अ‍ॅक्ट, १८५६ ला संमत करण्यात आला. त्यासाठी त्याला ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी मदत केली.

 

लॉर्ड कॅिनग (१८५६ ते १८६२) :

– १८६२ मध्ये भारत प्रशासन कायद्यानुसार गव्हर्नर जनरल व्हाइसरॉय या किताबाचा पहिला मानकरी ठरला.

– १८५८ चा उठाव कॅिनगच्या काळात झाला. उठाव मोडून काढण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्याने केले.

– राणीचा जाहीरनामा (पंतप्रधान डर्बीनी तयार केला.) लॉर्ड कॅिनगने १ नोव्हेंबर,

– १८५८ रोजी अलाहाबादच्या दरबारात वाचून दाखविला.

– कॅिनगने १८६१ च्या पोलीस खात्यात सुधारणा केल्या.

– पोलीस विभागपदी इन्स्पेक्टर जनरल (आयजी) जिल्हा पोलीस प्रमुखपदी पोलीस अधीक्षक (एसपी) तालुका प्रमुखपदी डेप्युटी इन्स्पेक्टर इ.च्या नेमणुका केल्या.

– कॅिनगने मेकॉलेद्वारा तयार केलेली (१८३७ भारतीय दंडविधान) संहिता १८६०मध्ये लागू केली.

– १८६२पासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली. इ.स. १८६१ मध्ये इंडियन हाय कोर्ट अ‍ॅक्ट संमत झाला.

– कॅिनगने मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे उच्च न्यायालयाच्या शाखा स्थापन केल्या.

– उत्तर भारतासाठी अलाहाबाद येथे उच्च न्यायालयाची स्थापना केली.

– १८५९ मध्ये भारतमंत्री म्हणून चार्ल्स वुड आला. वुडच्या साहाय्याने कॅिनगने प्रत्येक प्रांतात शिक्षण खात्याची स्थापना केली.

– १८६१ च्या दुष्काळ चौकशीसाठी कर्नल स्मिथच्या अध्यक्षतेखाली  िहदुस्थानच्या इतिहासातील पहिला चौकशी आयोग कॅिनगने नेमला.

– कॅिनग हा ईस्ट इंडिया कंपनीचा शेवटचा गव्हर्नर जनरल व ब्रिटिश संसदेद्वारा नियुक्त प्रथम व्हाइसरॉय (व्हॉइस ऑफ रॉय – राजा/राणीचा प्रत्यक्ष प्रतिनिधी/ आवाज) होय.  १८६१ चा भारतीय विधिमंडळ कायदा (इंडियन कौन्सिल अ‍ॅक्ट) पास झाला.

– याच काळात इंडियन सिव्हिल सíव्हसेस परीक्षा सुरू झाल्या.

– इ.स. १८५७ मध्ये मुंबई, मद्रास, कलकत्ता (कलकत्ता- २४ जानेवारी) विश्वविद्यालयांची स्थापना करण्यात आली.

लॉर्ड कर्झन (1899 - 1905)



●लाॅर्ड कर्झन म्हणजे भारतातील सर्वात वादग्रस्त व्हाइसराॅय.... 


●1899 मध्ये भारतासाठी चांदी ऐवजी सुवर्ण परिमाण लाॅर्ड कर्झन याने अवलंबिले.


●1901 मध्ये काश्मिर व पंजाब यांचा काही भाग मिळुन वायव्य सरहद्द प्रांत निर्माण केला.


●1901 मध्ये भारतीय राजपुत्रांना उच्च शिक्षण देण्यासाठी लाॅर्ड कर्झन याने Imperial Cadet Core  ची स्थापना केली.


●23 जानेवारी 1901 रोजी महाराणी व्हिक्टोरीया हिचे निधन झाले. पुढे 1921 मध्ये महाराणी व्हिक्टोरिया हिच्या स्मरणार्थ कलकत्ता येथे व्हिक्टोरिया हॉल बांधण्यात आला.


●1902 मध्ये सर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली 'युनिव्हर्सिटी कमिशन' नेमण्यात आले.

 

●1902 मध्ये सर अँन्ड फ्रेजर यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस खात्याची समिती नेमण्यात आली. यानुसारच criminal investigation bureau ची सुरुवात झाली. 


●1902 रोजी कर्झनने दुष्काळ निवारणासाठी 'मॅकडोनाल्ड दुष्काळ आयोग' स्थापन केला.


●1903 मध्ये लाॅर्ड कर्झन याने दिल्ली येथे भव्य दरबार भरवुन राणीच्या वारसाला भारत सम्राट घोषित केले.


●1903 मध्ये सर ॲन्ड्र्यु फ्रेजर यांनी बंगालच्या फाळणीची योजना तयार केली. 


●1904 मध्ये पहिला सहकारी कायदा पारित करण्यात आला. 


●1904 मध्ये प्राचीन स्मारक संरक्षण कायदा पारीत केला.

 

●लाॅर्ड कर्झन याने व्यापार व उद्योगधंदे खाते निर्माण केले.

 

●1901 मध्ये बंगालमध्ये पुसा येथे कृषी संशोधन संस्थेची स्थापना लाॅर्ड कर्झन यांनी केली. 


●लाॅर्ड कर्झनच्या काळात DSP व Dysp यांची थेट नेमणूक सुरु झाली. 


●ब्रिटीश शासनासोबत झालेल्या मतभेदांमुळे (कर्झन - किचनर विवाद) कर्झन 1905 मध्ये मायदेशी परतला.


●कर्झन याने रेल्वे कारभाराच्या चौकशी साठी सर रॉबर्टसन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. 


● भारतात रेल्वेचे विस्तृत जाळे पसरविण्याचे श्रेय कर्झन कडे जाते.


●लाॅर्ड कर्झन याने टाटा इंस्टिट्युट ऑफ सायन्स, बेंगलोर येथील संशोधन कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेला देणगी दिली.


●19 आॅगस्ट 1905 रोजी केसरी वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात लोकमान्य टिळकांनी कर्झनची कारकीर्द औरंगजेबाची प्रतिकृती होती असे म्हटले होते. 


●लोकमान्य टिळक आणि नामदार गोखले यांनी लाॅर्ड कर्झन याची तुलना औरंगाजेबाशी केली.


●कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित  'किचकवध' नाटकात किचक ची तुलना कर्झन सोबत केली गेली.


●कर्झनची कारकीर्द आपल्या दुष्कृत्यामुळे खुप गाजली. लंडन मध्ये मदनलाल धिंग्रा याने कर्झनला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.


● 'व्हाइसराॅय पदाचा राजीनामा  दिल्यानंतर कलकत्त्याचा महापौर होण्यास मला आवडेल' असे कर्झन म्हणत.


भारताचा घटनात्मक विकास ( राज्यसेवा - पूर्व + मुख्य साठी )

प्रस्तावना


ब्रिटिश राजवटीपूर्वी भारतात राजेशाही अस्तित्वात होती़ राजेशाहीची अंतिम विधिसत्ता, कार्यकारी सत्ता व न्यायसत्ता ही राजाच्या हातात एकवटलेली होती़.

या काळात मात्र खेडी ही स्वयंपूर्ण होती व स्वतंत्रही होती़ यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण झालेले होते.

याच काळामध्ये युरोपियन लोक भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले त्यामधील एक कंपनी म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होय़.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ची स्थापना इ़ स़ १६०० मध्ये करण्यात आली, या कंपनीने इंग्लंडच्या राणीकडून ३१ डिसेंबर १६०० रोजी पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद मिळवली.

प्रथम ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे एकच ध्येय होते, ते भारतीय लोकांशी व्यापार करणे व त्यापासून नफा कमवणे़ म्हणून इ़ स़ १६०० ते १७५७ पर्यंतच्या कालखंडास ब्रिटिश ईस्ट इंडियाकंपनीचा व्यापार विस्ताराचा काळ असे म्हटले जाते़.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये सत्तेचा पाया हा प्लासी (१७५७) (बंगाल प्रान्त) च्या लढाईने घातला, तर १७६४ च्या बक्सारच्या लढाईने आपल्या सत्तेचा पाया भक्कम केला़.

भारताच्या घटनात्मक विकासासंदर्भात खालील प्रमाणे वर्गीकरण केले जाते

१) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कालखंडामध्ये झालेला घटनात्मक विकास : १७७३ ते १८५८ पर्यंत़

२) ब्रिटिश राणी किंवा ब्रिटिश पार्लमेंटच्या काळामध्ये झालेला घटनात्मक विकास : १८५८ -१९४७


भारताचा घटनात्मक विकास १७७३ -१८५८ :


१७७३ चा रेंग्युलेटिंग अॅक्ट :

बंगालमधील जनतेत कंपनी सरकारकडून होणाऱ्या अत्याचाराच्या व जुलमाच्या बातम्या इंग्लंडमधील अधिकाऱ्यांच्या कानावर पडत होत्या़.

त्याच काळामध्ये बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला़ बंगाल प्रान्तामध्ये मोठ्या प्रमाणात अराजकता माजली़.

भारतीय व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला असल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत असे़ व्यापारी कंपनीला राज्य करण्यास परवानगी देण्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात इंग्लंडमध्ये आरडाओरड सुरू झाली़.

या सुमारास ईस्ट इंडिया कंपनीने पार्लमेंटकडे मोठ्या रकमेच्या कर्जाची मागणी केली़ तेव्हा कंपनीच्या एकूण कारभारावर पार्लमेंटमध्ये टीका होऊन त्यातून कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी रेग्युलेटींग अॅक्ट संमत करावा लागला़.

रेंग्युलेटिंग अॅक्ट

कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटतर्फे जो अॅक्ट देण्यात आला, त्यास रेंग्युलेटिंग अॅक्ट असे म्हणतात़.

त्यावेळी इंग्लंडमध्ये लॉर्ड नॉर्थ यांचे सरकार होते़ त्यांना इंग्लंडमधील संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत होते़ त्यामुळे कंपनी विषयी त्या सरकारने सभागृहामध्ये दोन कायदे केले़

१) पहिल्या कायद्यानुसार कंपनीच्या मागणीनुसार कंपनीला ४ टक्के व्याजदराने व काही अटींवर १४ लाख पौंड एवढे कर्ज दिले़

२) दुसरा कायदा म्हणजे कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवणारा रेग्युलेटिंग अॅंक्ट होय़

रेग्युलेटिंग अॅाक्टमधील तरतूदी

१) या अॅक्टनुसार कंपनीच्या इंग्लंडच्या व भारताच्या घटनेत बदल करण्यात आला़

२) या अॅेक्टनुसार कंपनीच्या कारभाराचे भारतामध्ये एकसूत्रीकरण करण्यात आले़

३) बंगाल प्रान्तातील गव्हर्नरला बंगाल प्रांताचा गव्हर्नर जनरल हा किताब देण्यात आला व त्याच्या नियंत्रणाखाली मुंबई व मद्रास प्रान्ताचे गव्हर्नर आले़ (विशेष बाब म्हणजे १७७३ च्या अॅचक्टपूर्वी अशा प्रकारे नियंत्रण नव्हते़ प्रत्येक प्रांताच्या गव्हर्नरवर प्रत्यक्ष संचालक मंडळाचे नियंत्रण होते़)

४) या अॅरक्टनुसार गव्हर्नर जनरलच्या मदतीला चार जणांचे एक सल्लागार मंडळ नेमण्यात आले़ प्रशासनाच्या कामात मार्गदर्शन व साहाय्य करण्याचे त्याचे काम होते़

५) या कायद्यानुसार बंगालमध्ये गव्हर्नर जनरल आणि ४ जणांचे सल्लागार मंडळ यांचे मिळून कार्यकारी मंडळ तयार करण्यात आले होते़ या कार्यकारी मंडळाचे सर्व निर्णय हे बहुमताने घेतले जावेत असे ठरवण्यात आले़

६) या कायद्यामधील तरतुदीनुसार १७७४ मध्ये कोलकत्ता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली़ (पहिले न्यायाधीश -एलिजा इम्पे)

कंपनीचे कर्मचारी या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये आणले़

७) गव्हर्नर जनरल व न्यायाधीशांसह कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांना कोणाकडूनही बक्षीस, भेटवस्तू इ़ स्वीकारता येणार नाहीत असे सांगण्यात आले़

८) प्रत्येक २० वर्षानंतर कंपनीच्या कारभाराचे मूल्यमापन केले जाईल किंवा भारताच्या कारभारासाठी फेर कायदा देण्याचे ठरवण्यात आले़ हे फेर कायदे/मूल्यमापन (१) १७९३, (२) १८१३, (३) १८३३, (४) १८५३ मध्ये देण्यात आले

-------------------------------------------------------------------------१७८१

१७८१ चा संशोधनात्मक कायदा :

१७७३ च्या रेग्युलेटिंग अॅाक्टनंतर काही उपायात्मक व पूरक कायदे करण्याची आवश्यकता निर्माण झाली, त्यांपैकी एक म्हणजे १७८१ चा भारत सरकारचा कायदा होय़ यास १७८१ चा संशोधनात्मक कायदा असे म्हणतात़

१) त्यानुसार कंपनीच्या अधिकाऱ्यांना आपल्या शासकीय कार्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर करण्यात आले़

२) यानुसार सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र निश्चित करण्यात आले़.

--------------------------------------------------------------------------पिट्सचा

१७८४ चा पिट्स अॅक्ट :

१७८१ चा भारत सरकारच्या कायद्यानंतर - गव्हर्नर जनरलच्या भारतातील प्रशासनावर सक्त नजर ठेवण्याची गरज आहे अशी जाणीव ब्रिटिश सरकारला (पार्लमेंटला) झाली़ तसेच १७७३ च्या कायद्यातील दोष दूर करण्यासाठी १७८४ चा पिट्स अॅ क्ट देण्यात आला़ (पिट्स हे इंग्लंडचे पंतप्रधान होते़)

तरतुदी :

१) या कायद्यानुसार कंपनीच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले़.

२) कंपनीच्या संचालकांचे धोरण नियंत्रित करण्यासाठी ६ सदस्यीय नियंत्रक मंडळाची स्थापना करण्यात आली़

३) या कायद्यानुसार कंपनीचे राजकीय व व्यापारविषयक अधिकार वेगळे करण्यात आले़.

४) गव्हर्नर जनरलच्या अधिकारात वाढ करताना सल्लागार मंडळाची सदस्य संख्या ४ वरून ३ करण्यात आली़.

५) गव्हर्नर जनरलला इतर गव्हर्नरांनी आपल्या प्रांतात लागू केलेले कायदे व नियम याची एक प्रत देणे सक्तीचे केले़

---------------------------------------------------------------------------१७९३

१७९३ चा चार्टर अॅक्ट :

१) या अॅक्टनुसार ईस्ट इंडिया कंपनीला दिलेल्या मुदतीमध्ये पुन्हा २० वर्षाची वाढ करण्यात आली़

२) कंपनीची व्यापाराची मक्तेदारी कमी करण्यात आली.

३) यानुसार नियामक मंडळाच्या सदस्यांना व त्यांच्या नौकर वर्गाला, भारताच्या महसुलातून तनखे देण्याची तरतूद करण्यात आली़.

४) कंपनीने केलेल्या कायद्याची व्याख्या करण्याचा अधिकार सर्वाच्च न्यालायला देण्यात आला.

५) कायम धारा या नवीन महसूल पद्धतीचा अवलंब करण्यात आला.

६) गव्हर्नर जनरल सैन्याचा सर्वाच्च प्रमुख बनला

--------------------------------------------------------------------------१८१३

१८१३ चा चार्टर अॅक्ट :

१) १८१३ च्या चार्टर अॅक्टद्वारे ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी संपुष्टात आणण्यात आली़

मात्र : कंपनीचा चहाच्या व्यापाराचा तसेच चीनशी व्यापाराची मक्तेदारी कंपनीचीच असेल असे ठरवण्यात आले़.

२) या कायद्यानुसार भारताच्या राज्यकारभाराबाबत सनदेची आणखी २० वर्षे मुद्दत वाढवण्यात आली़.

३) या कायद्यानुसार नियंत्रक मंडळाची सत्ता अधिक स्पष्ट करण्यात आली व त्यात वृद्धी करण्यात आली़.

४) या कायद्याने सरकारने जनतेत शिक्षण प्रसार करण्याचे ठरवले़.

५) भारतीय लोकांच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी कंपनीने १ लाख रुपये खर्च करावेत असे कायद्यात सांगितले़

६) या अॅनक्टनुसार खिस्ती धर्मप्रचारकास भारतामध्ये येण्याचे परवाने मिळाले़.

--------------------------------------------------------------------------१८३३

१८३३ चा चार्टर अॅक्ट :

१) या कायद्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला २० वर्ष मुदत वाढ देण्यात आली़

२) १८३३ च्या चार्टर अॅशक्टनुसार भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनाचे केंद्रीकरण करण्यात आले़ यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल यास भारताचा गव्हर्नर जनरल हा किताब देण्यात आला़.

भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग़

३) १८३३ च्या चार्टर अॅक्टनुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय घटनेत बदल करण्यात आला व या अॅक्टनुसार कंपनीचा चहाचा व्यापार व चीनसोबतच्या व्यापारविषयक मक्तेदारी संपुष्टात आली़

४) या कायद्यानुसार प्रांताच्या गव्हर्नरच्या मंडळातील सदस्यांची तीन ही संख्या निश्चित करण्यात आली; परंतु आर्थिक बाबतीत पूर्वीचे विकेंद्रीकरण नष्ट करण्यात आल्याने अधिकारावर मर्यादा आली़ अर्थकायदा, याबाबतीतही प्रांतावर मध्यवर्ती सरकारचे नियंत्रण प्रस्थापित झाले़

5) विधी आयोगाची स्थापना करण्यात आली (अध्यक्ष-लॉर्ड मेकोले)

-----------------------------------------------------------------------------१८५३

१८५३ चा चार्टर अॅक्ट :

:रेग्युलेटिंग अॅटक्टमधील तरतुदीनुसार १७९३, १८१३, १८३३ व १८५३ या मधील १८५३ चा चार्टर अॅक्ट महत्त्वाचा आहे़.

एकीकडे डलहौसीच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारतातील अनेक संस्थाने ब्रिटिश साम्राज्यात विलीन झाली होती़.याच सुमारास ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतामधून संपवावी अशी मागणी भारतातील अनेक नेत्यांनी, संस्थानांनी केलेली होती़.

या सर्व मागण्यांचा काही फायदा झाला नाही कारण या अॅक्टनुसार कंपनीची सत्ता संपुष्टात आणण्यात आली नाही; पण सत्तेचा कालावधीही ठरविण्यात आला नाही़.

तरतुदी

१) कंपनीला व्यापाराचा व कारभाराची सत्ता मागील चार्टर अॅक्टप्रमाणे २० वर्षे वाटून देण्यात आली नाही़

२) या अॅक्टनुसार इंग्लंड पार्लमेंट जोपर्यंत देईल तेवढीच मुदतवाढ मिळेल असे स्पष्ट केले़

३) गव्हर्नर जनरल व गव्हर्नर यांच्या सल्लागार मंडळात पार्लमेंटच्या अनुमतीनेच सभासदांची नेमणूक केली जावी असे स्पष्ट केले़

४) बोर्ड ऑफ कंट्रोल अध्यक्षाचा दर्जा वाढवून त्याला इंग्लंडमधील मंत्र्यांचा दर्जा देण्यात आला़

५) भारतीयांच्या मागणीनुसार सनदी नोकरांच्या भरतीसाठी स्पर्धा परीक्षेची पद्धत स्वीकारण्यात आली़ (१८५४ मध्ये भारतामध्ये पहिल्यांदा स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या)

६) या कायद्यानुसार बंगाल प्रांतासाठी गव्हर्नरचे स्वतंत्र पद देण्यात आले़ यापूर्वी बंगालचा गव्हर्नर जनरल बंगालचा कारभार पाहत असे़.

इंग्रज अधिकारी व कामगिरी

▪️रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था 


◾️वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट


◾️लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत


◾️लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज


◾️लॉर्ड हेस्टींग - पेंढाऱ्यांचा यशस्वी  बंदोबस्त


◾️ लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक  कायदा


◾️ चार्ल्स मूटकॉफ - वृत्तपत्राचा मुक्तिदाता


◾️ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी  कार्यालय रविवार सुट्टी


◾️ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण


◾️ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय


◾️ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची  स्थापना


◾️ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा   जनक


◾️ लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट


◾️ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा  जनक.


डॉ. भीमराव रामजी आंबेडकर



जन्म - 14 एप्रिल 1891 महू, मध्यप्रदेश.

मृत्यू - 6 डिसेंबर 1956, मुंबई.


 त्यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जाते.

तसेच दलितांचा मुक्तिदाता म्हणून आंबेडकरांना संबोधले जाते.

1990 - 91 मरणोत्तर भारतरत्न हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सामाजिक न्यायवर्ष म्हणून साजरे केले जाते.

हिंदू कोड बिल मांडल्यामुळे त्यांना 'आधुनिक मनू' म्हटले जाते.

सामाजिक समता हा यांच्या विचारविश्वाचा केंद्रबिन्दु होता.

आंबेडकर हे 1947 - 51 नेहरू मंत्रिमंडळात कायदेमंत्री होते.


संस्थात्मक योगदान :


1924 - बहिष्कृत हितकारिणीची स्थापना.

1924 - बहिष्कृत मेळा. नागपूरहुन रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेची घोषणा.

20 मार्च 1927 - महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह.

25 डिसेंबर 1927 - मनुस्मृती दहन.

2 मार्च 1930 - नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह (1935 मध्ये मंदिर खुले)

24 सप्टेंबर 1932 - पुणे करार, अस्पृश्यांसाठी कायदे मंडळात 148 जागा राखीव.

1933 - मुखेड येथे धार्मिक ग्रंथाचे पारायण.

ऑगस्ट 1936 - स्वातंत्र् मजुर पक्षाची स्थापना.

1937 - बाळासाहेब खरे सरकारात विरोधी पक्ष नेते.

1942 - नागपूर येथे All India Scheduled Castes Federation ची स्थापना. यांसाठी आप्पा दुराई यांनी मदत केली.

मे - 1946 : Peoples Education Society स्थापना.

20 जुलै 1946 - सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स, मुंबई. मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद.


आंबेडकरांचे लेखन :


The Problem Of Rupee

1916 - Cast In India

1930 - जनता वृत्तपत्र (1956 साली जनताचे नाव प्रबुद्ध भारत केले.)

1946 - The Untouchables

1956 - Thoughts on pakisthan.

1957 - बुद्ध आणि धम्म, हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर 1957 मध्ये प्रकाशित.

'मुकनायक' ची सुरुवात संत तुकाराम यांच्या तर 'बहिकृत भारत'ची सुरुवात संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांनी होत असे.

1920 - मुकनायक.

1927 - समता.

1946 - Who Were Shudras?


वैशिष्ट्ये :


गौतम बुद्ध, महात्मा फुले, कबीर हे तीन गुरु.

1920 - च्या माणगाव परिषदेचे अध्यक्षपद.

1930, 31-32 या तीनही गोलमेज परिषदांत अस्पृशांचे प्रतिनिधित्व.

1935 - येवला (नाशिक) या ठिकाणी धर्मांतर घोषणा. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही,अशी घोषणा.

शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा, हा संदेश दिला.

29 ऑगस्ट 1947; मसुदा समितीचे अध्यक्ष.

1948 - हिंदू कोडबिल संसदेत मांडले.

14 ऑक्टोबर 1956 धंर्मांतर. नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. चंद्रमणी महास्थावीर यांनी दीक्षा दिली.

खोती पद्धत


🔹खोतांच्या प्रशासन पद्धतीला खोती असे म्हणत.


🔸खोत हा ब्रिटीश भारतातील गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे.


🔹 तो गावातील शेतसारा गोळा करून सरकारला देत असे.


🔸 खोत शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो.


🔹खोती पद्धत बहुतांशी 

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि 

सिंधुदुर्ग येथे आढळून येत होती. 


🔸खोती पद्धतीने शेतकऱ्यांचे कमालीचे शोषण होत होते. 


🔹कळांनी जमीन कसायची आणि ७५ टक्के वाटा सावकारांना द्यायचा, अशी ही अन्यायकारक पद्धत होती.


🔺 ही एक प्रकारची वेठबिगारीच होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खोती पद्धतीला नष्ट करण्यासाठी लढा दिला व ही पद्धत समाप्त केली.


🔸 तयांनी इ.स. १९०५ ते १९३१ या काळामध्ये पेण, वाशी, पोलादपूर, चिपळूण, माणगाव, महाड, खेड, तळा, रोहा इत्यादी गावांत अनेक सभा घेतल्या. 


🔹तयानंतर खोतांना हादरा देण्यासाठी कोकणातील १४ गावच्या शेतकऱ्यांनी १९३३ ते १९३९ पर्यंत संप पुकारला होता.


🔸शतकरी नेते नारायण नागू पाटील हे या संपाचे नेतृत्व करत होते. 


🔹शतकऱ्यांच्या या लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साथ दिली. 

त्यावेळी झालेल्या केसेस लढण्यासाठी बाबासाहेब स्वतः शेतकऱ्यांच्यावतीने न्यायालयात उभे राहिले होते.


📚 खोतांचे अधिकार 📚


🔸एका खोताकडे अनेक गावांचे अधिकार असत. गावातील सर्वाधिक अधिकार हे खोताकडे असत. 


🔹खोत या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो. 


🔸खोताचे हक्क हे वंशपरंपरेने चालत असत. खोताकडे घाटावरील देशमुख आणि देशपांडे यांप्रमाणे काही अधिकार होते.


🔹भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर खोताचे अधिकार नष्ट झाले. तरी काही प्रमाणात गावातील त्याचा मान किंवा वजन तसेच राहिले.


🔺कोकणातील बहुतांशी खोत घराण्याची आडनावे ही सर किंवा प्रभू या उपसर्गाने सुरु होतात.


➡️ उदा. सरदेशपांडे, सरदेसाई, सरपोतदार, सरजोशी, प्रभुदेसाई इ.


सह्यादीतील घाट



उत्तर दक्षिण घाट


सह्याद्री पर्वतातले महाराष्ट्र राज्याअंतर्गत येणारे मोटारीने वाहतूक करता येण्यासारखे घाट


●सह्याद्रीतील प्रमुख घाट


□ घाट जोडलेली शहरे


•आंबाघाट  रत्‍नागिरी-कोल्हापूर

•आंबेनळी घाट  महाबळेश्वर-पोलादपूर

•आंबोली-रामघाट सावंतवाडी– कोल्हापूर

•कुंभार्ली घाट चिपळूण-कराड

•खंबाटकी-खंडाळा  पुणे-सातारा

•चंदनापुरी घाट  नाशिक-पुणे

•ताम्हिणी घाट  माणगाव (कोकण)-पुणे

•दिवा घाट  पुणे-सासवड

•थळघाट-कसार्‍याचा घाट  नाशिक-मुंबई

               (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३)

०पसरणी घाट वाई-महाबळेश्वर

०पारघाट  सातारा-रत्नागिरी

०फोंडाघाट कोल्हापूर-गोवा

०बोरघाट-खंडाळ्याचा घाट पुणे-मुंबई 

             (राष्ट्रीय महामार्ग  क्रमांक ४)

०माळशेज घाट आळेफाटा-कल्याण

०रणतोंडी घाट  महाड-महाबळेश्वर

०वरंधा घाट   भोर-महाड




            महाराष्ट्राचा भूगोल 


महत्त्वाचे घाट...               स्थान


 उत्तरेकडून दक्षिणेकडे


● थळ घाट(कसारा घाट)=मुंबई- नाशिक


○ माळशेज घाट =ठाणे-अहमदनगर


●बोर घाट (खंडाळा घाट)=मुंबई-पुणे


○वरंधा घाट=भोर - महाड


● खंबाटकी घाट=पुणे - सातारा


○ पसरणी घाट= वाई - महाबळेश्वर


● आंबेनळी घाट =महाबळेश्वर - महाड


○ कुंभार्ली घाट =कराड - चिपळूण


● आंबा घाट = कोल्हापूर - रत्नागिरी


○ फोंडा घाट= कोल्हापूर - पणजी


●हनुमंते घाट = कोल्हापूर - कुडाळ


○ अंबोली घाट= बेळगाव - सावंतवाड

अस्पृश्य निवारण परिषदा

23 मार्च, 1918 - अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद.❗️

🔺ठिकाण - मुंबई

🔺अध्यक्ष- महाराज सायाजीराव गायकवाड.

🔺आयोजक - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

🔺स्वागताध्यक्ष - न्या. चंदावरकर

📍 महत्वाचे - "जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्यालाही मी देव मानणार नाही" असे लोकमान्य टिळकांनी याच परिषदेत प्रसिद्ध उद्गार काढले होते. 


25 डिसेंबर 1920 रोजी अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद❗️

🔺 ठिकाण - नागपूर 

🔺अध्यक्ष – महात्मा गांधी


२२ मार्च १९२० रोजी 'दख्खन अस्पृश्य समाजाची परिषद' ❗️

🔺ठिकाण - माणगाव, कागल 

🔺अध्यक्ष - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

🔺आयोजक - राजश्री शाहू महाराज 

🔺स्वागताध्यक्ष- दादासाहेब इनामदार

📍महत्वाचे - याच परिषदेत शाहू महारजांनी डॉ. आंबेडकरांना पुढारी म्हणून घोषित केले होते.


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

महाराष्ट्रातील समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे

विठ्ठल रामजी शिंदे :

जन्म – 23 एप्रिल 1873, जामखिंडी, कर्नाटक.

मृत्यू – 2 जानेवारी 1944.

1932 – 33: बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड परितोषिक.

‘महाराष्ट्राचे अपेक्षित मानकरी‘ गं. बा. सरदार.

‘निष्काम कर्मयोगी‘, भाई माधवराव बागल.

जनतेकडून ‘महर्षी‘ ही पदवी.

अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्र्न राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला.

संस्थात्मक योगदान :

1905 – मुंबई येथे तरुण अस्तिकांचा संघ स्थापन.

18 ऑक्टोबर 1906 – डिप्रेस्ड क्लास मिशनची मुंबई

येथे स्थापना. पहिले अध्यक्ष – न्या. चंदावकर.

1910 – जेजूरी येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ.

द्याराम गिड्डमल यांच्या सहकार्याने ‘सेवा सदन‘ ही संस्था.

अनाथाश्रम – रावजी भोसले यांच्या सहकार्याने पंढरपूर येथे देवदासी प्रथा व व्यसनमुक्ति कार्य.
ब्राहय समाजाच्या प्रसारासाठी ब्राहय पोस्टल मिशनची स्थापना.

23 मार्च 1918 – अस्पृश्यता निवारक संघ.
1918 – मराठा समाजात जागृतिंनिर्माण करण्यासाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना.

1920 – पुण्यातील दुष्काळ पीडितांसाठी दुष्काळ आपत्ती निवारण संस्था.

1937 – स्त्रियांसाठी अहिल्याश्रम.

1923 – तरुण ब्रहयो संघ.

1937 – बहुजन पक्षाची स्थापना.
स्त्रियांसाठी आर्य

महिला समाज, कौटुंबिक उपासना मंडळ.

वृद्धंनसाठि संगत सभा.

लेखन :

प्रार्थना समाजाच्या सुबोध पत्रिकेत लेखन.

1903 – प्रार्थना समाजाच्या सदस्यांसाठी उपासना हे साप्ताहिक.

1903 – अ‍ॅमस्टारडॅम येथे जागतिक धर्म परिषदेत ‘हिंदुस्थानातील उदारधर्म’ हा निबंध वाचला.

Thiestic Directory जागतिक उदार धर्माची माहिती सांगणारा धार्मिक ग्रंथ लिहाला.

भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न

माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र .


वैशिष्ट्ये :

शिमग्याच्या सणातील बीभत्स प्रकारांना आळा बसावा म्हणून जनजागृती मोहीम
अस्पृश्यानसाठी रूपी फंड हा उप्रकार.

1904 – मुंबई धर्म परिषद.

1905 – अहमदनगर जवळ भिंगार येथे अस्पृश्योध्दाराची शपथ.

1918 – मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरविली. अध्यक्ष सायाजीराव गायकवाड.

1924 – वायकोम सत्याग्रह (त्रावनकोर), अस्पृश्य सत्याग्रहात सहभाग.

1935 – बडोदा मराठी साहित्य संमेलनात तत्वज्ञान व समाजशास्त्र शाखेचे अध्यक्ष.

स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जपान मधील विद्या पिठाच्या धर्तीवर भारतात महिला विद्यापीठे व्हावीत, असे मत.

शाहू महाराजांनी क्षात्र जगतगुरुपदी मराठा व्यक्ति नेमल्याबद्दल निषेध केला.


पोलीस भरती प्रश्नसंच


1. बेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या (१९२१ च्या) अध्यक्षपदी कोण होते?

शिवराम महादेव परांजपे.  √

विष्णुशास्त्री चिपळूणकर

कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे

छत्रपती शाहू महाराज

=========================

2. विसोबा खेचर हे कोणत्या संतांचे अध्यात्मिक गुरू होते

संत तुकाराम

संत सावतामाळी

संत नरहरी सोनार

संत नामदेव.   √

=========================

3. इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिल?

डॉ. भाऊ दाजी लाड

दादोबा पांडुरंग

बाळशास्त्री जांभेकर

नाना जगन्नाथ शंकरशेठ.   √

=========================

4. चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा ---------- शी संबंधित होता.

ऊस

कापूस

भात

नीळ.   √

=========================

5. इ.स. १८५७ च्या उठावाचे तत्कालिक कारण होते..........

गाईची व डुक्कराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग.   √

अनेक संस्थाने खालसा करणे

ख्रिश्चन धर्म प्रसार करणे

पदव्या, वतने आणि पेन्शन रग करने

=========================

6. गांधीजानी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले अनुयायी म्हणून कोणाची निवड केली होती?

पंडित जवाहरलाल नेहरू 

विनोबा भावे.    √

सरदार वल्लभभाई पटेल 

मौलाना आझाद

=========================

7. विनोबा भावे यांची गीता प्रवचने कशी तयार झाली?


विनोबा भावेंनी राजबंद्यांसमोर गीतेवर अठरा प्रवचने केली

साने गुरूजी श्रोते विनोबांची प्रवचने ऐकत

साने गुरूजी विनोबांच्या प्रवचनाचे टिपण तयार करीत असत.   √

विनोबा भावे हे गीता प्रवचनाचे लेखक आहेत 

=========================

8. सन १९४० मध्ये रामगढ येथे भरलेल्या राष्ट्रीय कॉग्रेसच्या अधिवेशनात कोणता ठराव पास करण्यात आला?

इंग्रजांना दुसऱ्या महायुध्दात सहकार्य करणे

ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावणे

वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरु करणे.  √

निवडणुकांवर बहिष्कार टाकणे

=========================

9. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली?

रविंद्रनाथ टागोर .    √

लाला लजपतराय

लाला हरदयाळ

महात्मा गांधी

=========================

10. संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली?

डॉ. रार्जेद्र प्रसाद.    √

डॉ. राधाकॄष्णन

डॉ. आंबेडकर

डॉ. झाकीर हुसेन

=========================

11.  ………… वॄक्षापासून तयार होणाया गोंदास मागणी आहे.

खैर.   √

कुसूम

कंडोल

शलार्इ

=========================

12. इस्त्रायलची राजधानी कोणती?

जेरुसलेम.  √

दमास्कस

तेल अवीव 

तेहरान 

=========================

13. ............... वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात.

निग्रॉइड

मंगोलाइड .  √

बुश मॅनाइड 

ऑस्ट्रेलोंइड

=========================

14. महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत?

हरिहरेश्र्वर

वज्रेश्र्वरी.  √

गणपतीपुळे

संगमेश्र्वर

=========================

15. खालीलपैकी कोणती जमीन कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते?

गाळाची जमीन 

काळी जमीन.   √

तांबडी जमान

रेताड जमीन

=========================

16. भारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र …………… येथे उभारण्यात आले.

पाडेगाव

कोर्इमतूर

कानपूर

मांजरी.   √

=========================

17.  ……… हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.

दिल्ली

चेन्नर्इ

मुंबर्इ.   √

हैद्राबाद

=========================

18. देशात सर्वात जास्त साक्षरता कोणत्या राज्यात आहे.

महाराष्ट्र

केरळ .  √

प. बंगाल

तमिळनाडू

=========================

19. भारतातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र कोठे चालू झाले?

मुंबई

दिल्ली.   √

मद्रास 

बंगलोर

=========================

20. लक्षव्दिप बेटे कोणत्या समुद्रात आहेत?

अरबी समुद्र .   √

बंगालचा उपसागर  

हिंदी महासागर   

पॅसिफिक महासागर

02 October 2025

नवीन नियुक्ती व नेमणुका 2025

🔹 प्रश्न: खाण मंत्रालयाचे नवे सचिव कोण झाले?

उत्तर: पियुष गोयल


🔹 प्रश्न: भारताचे नवे उपराष्ट्रपती कोण झाले?

उत्तर: सी. पी. राधाकृष्णन


🔹 प्रश्न: 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष म्हणून कोणांची निवड झाली?

उत्तर: विश्वास पाटील


🔹 प्रश्न: असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाचे (AMFI) नवे अध्यक्ष कोण झाले?

उत्तर: संदीप सिक्का


🔹 प्रश्न: नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चे नवे अध्यक्ष कोण झाले?

उत्तर: इंजेती श्रीनिवास


🔹 प्रश्न: अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे (AIIA) नवे संचालक कोण झाले?

उत्तर: प्रदीप कुमार प्रजापती


🔹 प्रश्न: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) नवे महासंचालक कोण झाले?

उत्तर: प्रवीर रंजन


🔹 प्रश्न: इंडो-तिबेटी सीमा पोलिस दलाचे (ITBP) नवे महासंचालक कोण झाले?

उत्तर: प्रवीण कुमार


🔹 प्रश्न: कंट्रोलर जनरल ऑफ कम्युनिकेशन्स अकाउंट्स (CGCA) म्हणून कोणांची नियुक्ती झाली?

उत्तर: वंदना गुप्ता

चालू घडामोडी सराव प्रश्न

प्रश्न.1) CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारे गोव्यातील पहिले व्यक्ती कोण बनले आहे ?

उत्तर - ख्रिश्चन जोसेफ परेरा 


प्रश्न.2) केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी कोणती योजना जाहीर केली आहे?

उत्तर - डिजिटल कृषी मिशन


प्रश्न.3) पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सुमित अंतील ने कोणते पदक जिंकले आहे?

उत्तर - सुवर्ण 


प्रश्न.4) सलग दोन पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारा सुमित अंतिल कितवा भारतीय भालाफेक पटु ठरला आहे?

उत्तर - पहिला 


प्रश्न.5) पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या निषाद कुमार ने कोणते पदक जिंकले आहे?

उत्तर - रौप्य 


प्रश्न.6) राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद २०२४ कुठे आयोजित करण्यात आले आहे?

उत्तर - मुंबई 


प्रश्न.7) कोणत्या फुटबॉल संघाने Durand Cup २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे?

उत्तर - North East United


प्रश्न.8) केंद्र सरकारने मनमाड ते इंदूर या नवीन किती किलोमीटर रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे?

उत्तर - 309 किमी

30 September 2025

चालू घडामोडी :- 29 सप्टेंबर 2025

◆ कर्नाटकातील बिदर जिल्ह्याला जल शक्ती अभियान: कॅच द रेन अंतर्गत जल संचय जन भागिदारी (JSJB) पुरस्कार मिळाला.

◆ बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील गोकुळ जलाशय आणि पश्चिम चंपारणमधील उदयपूर तलाव यांना रामसर यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.

◆ गोकुळ जलाशय आणि उदयपूर तलावासहित भारतात आता एकूण 93 रामसर स्थळे झाली आहेत.

◆ सप्टेंबर 2025 मध्ये भारतीय हवाई दलाने मिग-21 लढाऊ विमान अधिकृतपणे सेवेतून निवृत्त केले आहे. 

◆ दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. [हा संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेचा (UNWTO) एक उपक्रम आहे, जो 1980 मध्ये सुरू झाला होता.]

◆ जागतिक पर्यटन दिन 2025 ची थीम "पर्यटन आणि शाश्वत परिवर्तन" ही आहे. 

◆ जागतिक पर्यटन दिन 2021 ची थीम "पर्यटन आणि शांतता" ही होती.

◆ मलेशियात 27 ते 29 सप्टेंबर 2025 या काळात जागतिक पर्यटन दिन आणि जागतिक पर्यटन परिषद आयोजित करण्यात आली होती. 

◆ राजस्थान केंद्रीय विद्यापीठ संस्थेने 'मातीकरण' तंत्रज्ञानाचा वापर करून थारच्या वाळवंटात गहू लागवडीचा पहिला यशस्वी प्रयोग केला.

◆ 12 वी शाश्वत पर्वतीय विकास शिखर परिषद (SMDS-XII) देहरादून येथील दून विद्यापीठात आयोजित करण्यात आली होती.

◆ ओडिशातील भुवनेश्वर येथे दुसरी राष्ट्रीय मध्यस्थी परिषद 2025 आयोजित करण्यात आली होती.

◆ दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो.

◆ जागतिक हृदय दिन 2025 ची थीम “एक ठोकाही चुकवू नका" (Don't Miss a Beat) ही आहे.

◆ जागतिक हृदय दिन 2024 ची थीम "कृतीसाठी हृदय वापरा" (Use heart for action) अशी होती.

29 September 2025

चालू घडामोडी :- सप्टेंबर 2025

◆ भारताच्या इन्स्टंट पेमेंट सिस्टम नेटवर्क UPI (Unified Payments Interface) मध्ये सामील होणारा कतार देश आठवा देश बनला आहे.


◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील बांसवाडा येथे अनुशक्ती विद्युत निगम लिमिटेड (ASHVINI) च्या माही बांसवाडा अणुऊर्जा प्रकल्पाची (MBRAPP) पायाभरणी केली.


◆ सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (MOSPI) ने चंदीगड येथे झालेल्या 29 व्या CoCSSO बैठकीत वन पर्यावरण लेखा 2025 अहवाल प्रसिद्ध केला.


◆ पर्यावरणीय लेखा 2025 च्या वन अहवालानुसार, रेकॉर्डेड वनक्षेत्र (RFA) च्या वाट्यामध्ये उत्तराखंड राज्याने सर्वाधिक वाढ नोंदवली आहे.


◆ संयुक्त अरब अमिराती (UAE) ने 2025 मध्ये दुबई वर्ल्ड काँग्रेस फॉर सेल्फ-ड्रायव्हिंग ट्रान्सपोर्टमध्ये त्यांचे पहिले सॉवरेन मोबिलिटी क्लाउड लाँच केले.


◆ आंतरराष्ट्रीय पर्यावरण आरोग्य महासंघ (IFEH) च्या नेतृत्वाखाली दरवर्षी 26 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा केला जातो.


◆ 2025 च्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप चे आयोजन नवी दिल्ली येथे होत आहे.


◆ भारत सरकारने IIT मद्रास या संस्थेला संयुक्त राष्ट्रसंघ (UN) Centre of Excellence for Artificial Intelligence (AI) म्हणून नियुक्त केले आहे.


◆ संयुक्त राष्ट्र संघ दरवर्षी 26 सप्टेंबर रोजी अण्वस्त्रांच्या संपूर्ण निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिन साजरा करतो.


◆ पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी दीनदयाळ लाडो लक्ष्मी योजना सुरू केली.


◆ भारताचे माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी पेंग्विन रँडम हाऊस ने प्रकाशित केलेले "Why the Constitution Matters" हे आपले पहिले पुस्तक लिहिले आहे.


◆ रशिया देश ने 2030 पर्यंत बंद इंधन चक्रासह जगातील पहिली अणुऊर्जा प्रणाली सुरू करण्याची घोषणा केली आहे.


◆ आयुष मंत्रालयाने 10 व्या आयुर्वेद दिनानिमित्त गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA) येथे "Prayas" एकात्मिक न्यूरो-पुनर्वास केंद्र चे उद्घाटन केले.

28 September 2025

रागासा चक्रीवादळ



🔹 2025 मधील जगातील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ (Typhoon)

🔹 वेग ताशी – 270 ते 295 किलोमीटर पर्यंत होता

🔹 ‘सुपर टायफून’ म्हणून ओळखले जाते

🔹 मुख्य प्रभावित क्षेत्र – फिलिपिन्स, तैवान, हाँगकाँग आणि दक्षिण चीन

🔹 पॅसिफिक महासागरात तयार झाले

🔹 'Ragasa' हे नाव फिलिपिन्सने दिले आहे

🔹 Ragasa अर्थ – “अचानक वेगवान हालचाल”


🔰 नुकतीच आलेली काही चक्रीवादळे


🔹 शक्ती (मे 2025) – बंगालचा उपसागर, भारताचा पूर्व किनारा (नाव – श्रीलंका)


🔹 अल्फ्रेड (मार्च 2025) – ऑस्ट्रेलियाचा दक्षिण-पूर्व किनारा (नाव – ऑस्ट्रेलिया)


🔹 जुड (मार्च 2025) – मादागास्कर आणि मोझांबिक (नाव – मॉरिशस)


🔹 डिक्लेडी (जानेवारी 2025) – दक्षिण-पश्चिम हिंदी महासागर


🔹 चिदो (डिसेंबर 2024) – मोझांबिक (नाव – मॉरिशस)

संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) – यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2025



🔹 पुरस्काराचे स्वरूप

➤ ३० वर्षांखालील तरुणांना उत्कृष्ट पर्यावरणीय नवकल्पनांसाठी दिला जाणारा UNEP चा प्रतिष्ठित पुरस्कार.


🔹 २०२५ चे विजेते

🔹 जिनाली मोदी (भारत) ✅✅

🔹 जोसेफ न्गुथिरा (केनिया)

🔹 नोएमी फ्लोरिया (अमेरिका)


🔹 भारताची जिनाली मोदी – विशेष सन्मान

➤ मुंबईतील उद्योजिका आणि Banofi Leather च्या संस्थापक.

➤ केळी पिकाच्या कचऱ्यापासून (Banana Crop Waste) शाश्वत (Sustainable) व पर्यावरणपूरक लेदर पर्याय तयार केला.


🔹 नाविन्यपूर्ण उपाय (Innovation)

🔹 पारंपरिक लेदरच्या तुलनेत ९५% कमी पाणी वापर.

🔹 ९०% पेक्षा जास्त कार्बन उत्सर्जन घट.

🔹 विषारी रसायनांचा वापर टाळला, ज्यामुळे फास्ट फॅशन उद्योगाचा पर्यावरणीय परिणाम कमी.


🔹 इतर महत्त्वाचे मुद्दे

🔹 प्रत्येक विजेत्याला $20,000 बीज भांडवल (Seed Funding) दिले जाते.

🔹 Mentorship उपलब्ध होते.

🔹 त्यांच्या कल्पनांना जागतिक स्तरावर व्यासपीठ दिले जाते.

आर. वेंकटरमणी - भारताचे अटॉर्नी जनरल (महान्यायवादी) दुसऱ्यांदा नियुक्त



1.कार्यकाळ

🔹 30 सप्टेंबर 2025 रोजी पहिला कार्यकाळ संपला

🔹 1 ऑक्टोबर 2025 पासून नवीन 2 वर्षांचा कार्यकाळ सुरू


2.संवैधानिक अधिष्ठान

🔹 संविधानाच्या कलम 76(1) अंतर्गत नियुक्ती


3.वैयक्तिक माहिती

🔹 वय – 75 वर्षे

🔹 माजी वरिष्ठ अधिवक्ता


4.पदभार स्वीकार

🔹 1 ऑक्टोबर 2022 रोजी कार्यभार स्वीकारला

🔹 के.के. वेणुगोपाल यांच्यानंतर नियुक्ती


5.भूमिका व कार्य

🔹 भारत सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार

🔹 सर्वोच्च न्यायालयात सरकारसाठी युक्तिवाद करणे

🔹 सरकारला कायदेशीर मुद्द्यांवर सल्ला देणे


6.स्थिती

🔹 केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत

🔹 संसदेत बोलू शकतात; पण मतदान करू शकत नाहीत


7.पदाचे स्वरूप

🔹 हे पद संवैधानिक आहे

🔹 नियुक्तीचा कार्यकाळ निश्चित नाही; राष्ट्रपतींच्या इच्छेनुसार पदावर राहतात ✅

किनार्यालगतचे सागरी भागातील बेटे व सामुद्रधुनी


🏝️ प्रमुख बेटे


🔹 गंगा नदीच्या मुखाशी – न्यू मरे, सागर, गंगासागर


🔹 नर्मदा नदीच्या मुखाशी – आलिया बेट


🔹 भारत–श्रीलंका दरम्यान – पंबन बेट


🔹 चिलका सरोवरादरम्यान – निक्शोपित बेट


🔹 चिलका सरोवराच्या मुखाशी – पैरकुद बेट


🔹 सौराष्ट्राच्या दक्षिण किनाऱ्यावर – कच्छ, बेला, खाडी बेटे


🔹 पुलिकत सरोवराच्या मुखाशी – श्रीहरीकोटा बेट


🔹 महानदी व ब्राह्मणी नदीच्या मुखाशी – शॉर्ट व व्हिलर बेट


🌊 सामुद्रधुनी व विशेष भौगोलिक रचना


🔹 दक्षिण अंदमान व लिट्ल अंदमान दरम्यान – डंकन पास


🔹 कोको बेटे (म्यानमार) व उत्तर अंदमान दरम्यान – कोको स्ट्रेट


🔹 तमिळनाडू व श्रीलंका दरम्यान – पाल्क स्ट्रेट


🔹 भारत व श्रीलंका दरम्यान – अडम ब्रीज


27 September 2025

भारताच्या डुगोंग संवर्धन राखीव क्षेत्राला IUCN मान्यता


1️⃣ मूलभूत माहिती

🔹 IUCN – International Union for Conservation of Nature

🔹 पाल्क खाडीतील भारतातील पहिल्या डुगोंग संवर्धन राखीव क्षेत्राला औपचारिक मान्यता


2️⃣ स्थापना व कायदेशीर आधार

🔹 स्थापना – 2022 (तमिळनाडू सरकार)

🔹 कायदा – वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत


3️⃣ भौगोलिक तपशील

🔹 स्थान – उत्तर पाल्क खाडी, तामिळनाडू

🔹 क्षेत्रफळ – 448.34 चौ. किमी


4️⃣ डुगोंगविषयी माहिती

🔹 डुगोंग याला सामान्यतः ‘समुद्री गाय’ म्हणून ओळखले जाते

🔹 हे सागरी शाकाहारी प्राणी आहेत आणि सागरी परिसंस्थेच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे


📌 टीप: भारतातील पहिले आणि एकमेव डुगोंग संवर्धन राखीव क्षेत्र

बिहारमध्ये डॉ. एपीजे अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन

1️⃣ मूलभूत माहिती

🔹 ठिकाण – पटना, बिहार

🔹 उद्घाटन – मुख्यमंत्री नितीश कुमार


2️⃣ वैशिष्ट्ये

🔹 एकूण क्षेत्रफळ – 21 एकर

🔹 एकूण खर्च – 889 कोटी रुपये


📌 टीप: विज्ञान प्रसार, नवकल्पना आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही सायन्स सिटी एक महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो.

परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर


◾️ गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एकूण 1,64,875 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली

◾️केवल महाराष्ट्रातच देशातील एकूण गुंतवणुकीच्या 40% गुंतवणूक झाली


🔹 महाराष्ट्रात गुंतवणूक

💠 2023-24 मध्ये : 🔥 1,25,101 कोटी

💠 2024-25 मध्ये : 🔥 1,64,875 कोटी


🔹 भारतातील गुंतवणूक नुसार क्रम (2024-25)

🔹 महाराष्ट्र – 1,64,875 कोटी

🔹 कर्नाटका – 56,030 कोटी

🔹 गुजरात – 47,947 कोटी

🔹 दिल्ली – 51,540 कोटी

🔹 तमिळनाडू – 31,103 कोटी

भारतामधील 2 नवीन रामसर स्थळे


1️⃣ बिहारमधील नवीन स्थळांचा समावेश

🔹 गोकुळ जलाशय – बक्सर जिल्हा (448 हेक्टर)

🔹 उदयपूर सरोवर – पश्चिम चंपारण जिल्हा (319 हेक्टर)


2️⃣ एकूण माहिती

🔹 एकूण 93 रामसर स्थळे

🔹 एकूण क्षेत्रफळ – 13,60,719 हेक्टर


3️⃣ महत्त्वाचे तथ्ये

🔹 भारताचा जागतिक स्तरावर क्रमांक – तिसरा

🔹 तमिळनाडूमध्ये सर्वाधिक – 20 रामसर स्थळे

🔹 जागतिक पाणथळ दिन – 2 फेब्रुवारी

🔹 रामसर कराराची तारीख – 2 फेब्रुवारी 1971

🔹 रामसर मुख्यालय – ग्लैंड, स्वित्झर्लंड

🔹 भारतातील पहिले रामसर स्थळे – चिल्का सरोवर (ओडिशा, 1981) आणि केवलादेवी (राजस्थान)

🔹 क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे – सुंदरबन पाणथळ (प. बंगाल) – 4230 किमी²

🔹 क्षेत्रफळानुसार सर्वात लहान – रेणुका तलाव (हिमाचल प्रदेश) – 0.2 किमी²

26 September 2025

चालू घडामोडी :- 25 सप्टेंबर 2025

◆ कर्नाटक राज्य सरकारने नवोन्मेष आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक अर्थव्यवस्था प्रवेगक कार्यक्रम (LEAP) सुरू केला आहे.

◆ 23 सप्टेंबर 2025 रोजी सात वर्षे पूर्ण करणारी जगातील सर्वात मोठी सरकारी अनुदानित आरोग्य विमा योजना "आयुष्मान भारत पंतप्रधान सार्वजनिक आरोग्य योजना" आहे.

◆ आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) 23 सप्टेंबर 2018 रोजी रांची येथे सुरू करण्यात आली होती.

◆ राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (NISE) ने "सोलर पीव्ही पोटेंशियल असेसमेंट ऑफ इंडिया (ग्राउंड-माउंटेड)" हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

◆ अंत्योदय दिवस दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.

◆ आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) च्या अंमलबजावणीत उत्तर प्रदेश राज्य देशात पहिल्या स्थानावर आहे.

◆ अग्निकुल कॉसमॉसने चेन्नईतील IIT मद्रास रिसर्च पार्कमध्ये भारतातील पहिली खाजगी लार्ज-फॉर्मेट ॲडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग सुविधा सुरू केली आहे.

◆ पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाडा येथील गोवर्धन इको व्हिलेज येथे "देसी फूड मॅटर्स" उपक्रमाचा शुभारंभ केला.

◆ राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त आयुर्वेदिक घटक आणि उत्पादनांचा डिजिटल डेटा मिळविण्यासाठी सुरू केलेल्या पोर्टलचे नाव "DRAVYA पोर्टल" आहे.

◆ मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना (बिहार) येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन केले.

◆ राष्ट्रीय सेवा योजना (NSS) दिन दरवर्षी 24 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.

◆ आंध्र प्रदेश राज्याने भारतातील पहिले व्हॉट्सॲप आधारित गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म 'मन मित्र' लाँच केले आहे.

◆ भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी मोरोक्कोमध्ये टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) च्या संरक्षण उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले.

25 September 2025

चालू घडामोडी :- 24 सप्टेंबर 2025



◆ सिंगापूरमध्ये झालेल्या 25 व्या आशियाई प्रादेशिक परिषदेत भारताची इंटरपोल आशियाई समितीचा सदस्य म्हणून निवड झाली आहे.

◆ इंटरपोल आशियाई प्रादेशिक परिषदेत "केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI)" भारतीय संस्थेने भारताचे प्रतिनिधित्व केले.

◆ राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) सप्टेंबर 2025 साठी सुरू केलेल्या इंटर्नशिप कार्यक्रमाचे नाव "ऑनलाइन शॉर्ट टर्म इंटर्नशिप प्रोग्राम (OSTI)" आहे.

◆ महाराष्ट्रामधील धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायत, सरपंच डॉ. आनंदराव पावरा यांच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्ण पुरस्काराची विजेती ठरली आहे.

◆ भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) नवी दिल्ली येथे ब्राझील-भारत कृषी तंत्रज्ञान क्रॉस-इन्क्युबेशन प्रोग्राम (MAITRI 2.0) ची दुसरी आवृत्ती सुरू केली.

◆ भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) यांनी "राज्य वित्त 2022-23: एक दशकीय विश्लेषण" हा अहवाल प्रसिद्ध केला.

◆ कॅगच्या राज्य वित्त अहवाल 2022-23 नुसार, आर्थिक वर्ष 2023 मध्ये उत्तर प्रदेश राज्याने सर्वाधिक महसूल अधिशेष नोंदवला.

◆ दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन साजरा केला जातो.

◆ आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन 2025 ची थीम ''सांकेतिक भाषांच्या अधिकारांशिवाय मानवी हक्क नाहीत'' (Human rights are not without sign language rights) ही आहे.

◆ आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन 2024 ची थीम "साइन अप करा सांकेतिक भाषेच्या अधिकारांसाठी" (Sign up for sign language rights) ही होती.

◆ झारखंडच्या बेतला राष्ट्रीय उद्यानात भारतातील पहिले AI-सक्षम निसर्ग अनुभव केंद्र सुरू होणार आहे.

◆ सप्टेंबर 2025 मध्ये, युरोपचा पहिला एक्सास्केल सुपरकॉम्प्युटर, "ज्युपिटर" जर्मनीमध्ये लाँच करण्यात आला.

◆ संयुक्त ऑपरेशनल रिव्ह्यू अँड इव्हॅल्युएशन (CORE) कार्यक्रम नवी दिल्ली येथील युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया येथे मुख्यालय एकात्मिक संरक्षण कर्मचारी (HQ IDS) द्वारे आयोजित केला जात आहे.

24 September 2025

काही महत्त्वाच्या परिषदा व आयोजक ठिकाण


🔹️ जागतिक हायड्रोजन शिखर परिषद २०२५ - रॉटरडॅम, नेदरलँड्स


🔹️ ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - सातारा


🔹️ ५१ वी वार्षिक G7 शिखर परिषद - कॅनडा


🔹️ COP 33 (२०२८) - भारत


🔹️ २०२६ मधील ब्रिक्स शिखर परिषद - भारत


🔹️ वॉन हवामान बदल परिषद २०२५ - जर्मनी


🔹️ ७ वी हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद - पुणे


🔹️ पहिला आसियान-भारत क्रूझ संवाद - चेन्नई


🔹️ Quad २०२५ ची बैठक - भारत


🔹️ ग्रीन हायड्रोजन समिट २०२५ - आंध्रप्रदेश


🔹️ एआय इम्पॅक्ट समिट २०२६ - भारत


🔹️ २५ वी शांघाय शिखर परिषद २०२५ - चीन

राज्यघटनेतील भाग (Parts)

◆ भाग पहिला – संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र

◆ भाग दूसरा – नागरिकत्व

◆ भाग तिसरा – मूलभूत हक्क

◆ भाग चौथा – मार्गदर्शक तत्वे

◆ भाग चार ‘अ’ – मूलभूत कर्तव्ये

◆ भाग पाचवा – संघ

◆ भाग सहावा – राज्य

◆ भाग सातवा – रद्द

◆ भाग आठवा – केंद्र शासित प्रदेश

◆ भाग नववा – पंचायत

◆ भाग नऊ ‘अ’ – महापालिका

◆ भाग नऊ ‘ब’ – सहकारी संस्था

◆ भाग दहावा – अनुसूचीत आणि आदिवशी क्षेत्र

◆ भाग अकरावा – संघ-राज्य संबंध

◆ भाग बारावा – वित्त, मालमत्ता, करार आणि सुट्स

◆ भाग तेरावा – भारताच्या राज्याक्षेत्रातील व्यापार आणि वाणिज्य.

◆ भाग चौदावा – संघ आणि राज्यांतर्गत सेवा

◆ भाग चौदा ‘अ’ – न्यायाधिकरणे

◆ भाग पंधरावा – निवडणुका

◆ भाग सोळावा – विशिष्ट वर्गांशी संबंधित विशेष तरतुदी

◆ भाग सतरावा – भाषा

◆ भाग आठरावा – आणीबाणी तरतुदी

◆ भाग एकोणीसवा – संकीर्ण

◆ भाग विसावा – घटनादुरूस्ती तरतुदी

◆ भाग एकविसावा – तात्पुरती, संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी

◆ भाग बाविसावा – संक्षिप्त शीर्षक, प्रारंभाची तारीख, हिंदीमधील अधिपत्र आणि मजकूर.