३१ मार्च २०२०

तुम्हाला हे आठवते का :- अर्थसंकल्प 2020 ठाकरे सरकारचे 1 ले महाबजेट


                                                                                                                                                                                                                                                                                                                                          
▪ राज्यात 1500  आदर्श शाळा समोर आणल्या जाईल, प्रत्येक जिल्ह्यात 4 आदर्श शाळा बनवणार
▪ भूमिपुत्रांना 80% नोकरीसाठी कायदा करू
▪ 35 कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग, उरलेली रक्कम खरीप हंगाम 2020 च्या आधी वर्ग करणार
▪ शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर पंप बसवण्यात येणार आहेत यासाठी 6700 कोटींची तरतूद
▪अण्णासाहेब पाटील महामंडळास ५० कोटी
▪ पेट्रोल डिझेल च्या दरात 1 रुपयांची वाढ
▪ शिकाऊ योजनेसाठी 6000  कोटी रुपये
▪ 10वी उत्तीर्णांना रोजगार प्रशिक्षण देणार
▪ माध्यमिक शाळांतील मुलींना माफक दरांत सॅनिटरी नॅपकिन, नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्र बसवणार 
▪ उच्च तंत्र शिक्षणासाठी 1300  कोटी रुपये
▪ 5 वर्षात 100000 बेरोजगार प्रशिक्षित होणार
▪ मेडिकल डिग्री च्या 118 जागा वाढवणार
▪ प्राथमिक आरोग्यसेवेसाठी 5 हजार कोटी, पाटण आणि साकोलीतल्या रुग्णालयांचं 100 खाटांच्या रुग्णालयात रूपांतर होणार
▪ 1657 कोटींचा निधी मेट्रोच्या राज्यभरातल्या कामांसाठी देण्याचा सरकारचा विचार
▪ नंदुरबार मध्ये नवे मेडिकल कॉलेज
▪ कबड्डी कुस्ती स्पर्धांना 75 लाख अनुदान
▪ खो - खो व्हॉलीबॉल स्पर्धांना 75 लाख अनुदान
▪ बालेवाडीत आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ
▪ कर्नाटकात मराठी वृत्तपत्रांना अनुदान देणार
▪ एस टी बसस्थानकांसाठी 456  कोटी
▪ महामंडळाच्या ताफ्यातल्या जुन्या बसच्या जागी 1600 नवीन बस येणार, बस स्थानकं अत्याधुनिक होणार त्यासाठी 401 कोटी रुपये 
▪ महामार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी 3500 कोटी तरतूद
▪ महामार्गावर 20 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र, सागरी महामार्गांसाठी 3595 कोटींचा निधी
▪ ऊर्जा विभागास 8  कोटी रुपये
▪ 102 क्रमांकाच्या जुन्या रूग्णवाहिका बदलल्या जाणार
▪ प्रत्येक जिल्ह्यात एक महिला पोलीस ठाणे
▪ महिला बचत गटांकडून 1000  कोटींची खरेदी करणार
▪ 10 रुपये शिवथाळी भोजन योजना - प्रत्येक केंद्रावर 500 थाळी - 1 लाख थाळींचं उद्दिष्टं - 150 कोटी रुपये
▪ पेट्रोल डिझेल च्या दरात 1 रुपयांची वाढ
▪ पाणीपुरवठा विभागासाठी 2043  कोटी
▪ मुंबईत मराठी भाषा भवन बांधणार
▪ मुबंईत वस्तू व सेवा केंद्र बांधणार, त्यासाठी 148  कोटी रुपये
▪ नाग , इंद्रायणी , वालधुनीचे प्रदूषण रोखणार ; पर्यावण विभागासाठी 230 कोटी रुपये
▪ वनविभागाची 1630 कोटी रुपये
▪ वरळीत पर्यटन संकुल उभारणार
▪ सोलापूर व पुणे येथे नवे विमानतळ उभारणार
▪ लोणार सरोवराचाही विकास करणार
▪ मुरुड जंजीरयाचा सुशोभिकरण करणार
▪ कोकणच्या काजू प्रकल्पासाठी 15 कोटी
▪ आमदार विकास निधी दर वर्षी 3  कोटी होणार;
▪ पर्यटन विकासाठी एकूण 1400 कोटी
▪ मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना हा नवीन कार्यक्रम 2010 कोटींचा निधी तसेच सिंचनासाठी 10,235 कोटी
▪ पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आठवणी 4  कोटी रुपये
▪ सामाजिक न्याय विभागास 9668 कोटी रुपये
▪ पुण्यात मागासवर्गीय महिलांसाठी वसतिगृह
▪ नाट्यसंमेलनांना 10 कोटी रुपये अनुदान
▪ भारतरत्नांचे एकत्रित स्मारक उभारणार
▪ आदिवासी विकास  विभागासाठी 8853 कोटी रुपये
▪ जिल्हा वार्षिक योजनांसाठी 9800
▪ मुद्रांक शुल्कात 1 % सूट
▪ तृतीयपंथीय मंडळासाठी 5 कोटी

राष्ट्रीय पुस्तके विश्वस्त संस्था ‘कोरोना अभ्यास मालिका’ पुस्तके प्रकाशित करणार

भारत सरकारच्या मनुष्यबळ व विकास मंत्रालयांच्या अंतर्गत पुस्तक प्रकाशन आणि पुस्तक संवर्धनासाठी काम करणारी राष्ट्रीय पुस्तके विश्वस्त संस्था (NBT) यांनी कोविड-19 या विषयावर अभ्यास मालिका प्रकाशित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

भविष्यकाळात मानवी समाजासाठी कोरोना आजारा विषयीच्या जागरूकतेचे विलक्षण मनोवैज्ञानिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन कोरोनाचा प्रभाव ओसारल्यानंतर वाचकांच्या गरजेसाठी सर्व वयोगटांकरिता ही पुस्तके तयार करण्यात येत आहे. उपक्रमाच्या अंतर्गत योग्य वाचन साहित्य तयार करण्यासाठी विविध क्षेत्रांची माहिती घेतली जात आहे.

उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ‘सायको-सोशल इम्पॅक्ट ऑफ कोरोना पॅन्डमिक अँड वेज टू कोप’ या उप-विषयावर पुस्तके तयार करण्यासाठी अनुभवी मानसशास्त्रज्ञ / सल्लागारांचा समावेश असलेला एक अभ्यास गट तयार करण्यात आला आहे.

कोरोनाच्या विविध पैलूंविषयी जाणून घेण्यासाठी मुलांची पुस्तके तयार केली जात आहोत. जागरूकता, कला, साहित्य, लोकसाहित्य, आर्थिक आणि समाजशास्त्रीय बाबी, कोरोना महामारीतून उद्भवणारी विज्ञान / आरोग्य जागरूकता आणि विलगीकरण, संचारबंदी या विषयांवर आधारित पुस्तकेदेखील नियोजित आहेत.

राष्ट्रीय पुस्तके विश्वस्त संस्था (NBT) विषयी

राष्ट्रीय पुस्तके विश्वस्त संस्था (NBT) हे एक भारतीय प्रकाशन गृह आहे, ज्याची 01 ऑगस्ट 1957 रोजी स्थापना झाली. हे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत एक स्वायत्त संस्था आहे. आता ही संस्था मनुष्यबळ व विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.

३० मार्च २०२०

करोनाने अर्थव्यवस्थेचे नुकसान पाहून जर्मनीत मंत्र्याची आत्महत्या

🔸कोरोनाचा विपरित परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. तसंच अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना फटका बसत आहे.

🔹कोरोनामुळे जगभरात प्रामुख्याने अर्थव्यवस्तेवर कसा परिणाम होतोय हे आपण पाहत आहोतच.
याचच एक अस्वस्थ करणार एक उदाहरण सांगायचं झाल्यास हेस्सी राज्याचे अर्थमंत्री थॉमस शेफर यांचं. 

🔹जर्मनीत अर्थव्यवस्थेच्या चिंतेतून हेस्सी राज्याचे अर्थमंत्री थॉमस शेफर यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय.
करोनामुळे होत असलेले मृत्यू आणि अर्थव्यवस्थेचे नुकसान ला यासर्व परिस्थिला तोंड कसे द्यावे या तणावात होते. यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी.

🔸थॉमस शेफर यांचा मृतदेह रेल्वे रूळाजवळ आढळून आला. त्यांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याचं बोललं जातंय.

🔹शेफर गेल्या १० वर्षांपासून हेस्सीचे अर्थमंत्री होते.

पंजाब नॅशनल बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँकेचे विलीनीकरण करण्यात येणार आहे.


त्यानंतर ही देशातील सर्वांत मोठी दुसरी बँक ठरणार आहे. या बँकेकडे एकूण १७ लाख कोटी रुपयांची संपत्ती असणार आहे.

कॅनरा बँकेमध्ये सिंडिकेट बँकेचे विलीनीकरण होणार आहे. त्यानंतर ही देशातील चौथी सर्वांत मोठी बँक ठरणार आहे. या बँकेकडे १५.२० लाख कोटी रुपयांची संपत्ती असणार आहे.

युनियन बँकेचे आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेसह विलीनीकरण होणार आहे. विलीनीकरणानंत ही देशातील सर्वांत मोठी पाचवी सरकारी बँक बनणार आहे. या बँकेकडे १४.५९ लाख कोटी रुपयांची संपत्ती असणार आहे.

इंडियन बँक आणि अलाहाबाद बँकेच्या विलीनीकरणानंतर ही देशातील सातवी मोठी बँक ठरणार आहे.

राजघराण्यातील पहिला बळी स्पेनच्या राजकन्येचा करोना व्हायरसमुळे मृत्यू

🔹करोना व्हायरसचा कहर जगभरात वाढतो आहे आणि जगभरात या व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढू लागली आहे.

🔸आता त्यात स्पेनच्या राजघराण्यातील व्यक्तिचाही समावेश झाला आहे.
स्पेनची राजकन्या मारिया तेरेसा यांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला.
त्या ८६ वर्षांच्या होत्या.

🔹मारिया यांचे बंधु प्रिन्स सिक्सटो एनरिक दी बॉरबोन यांनी ही माहिती दिली.

चालू घडामोडी वन लाइनर्स, 30 मार्च 2020.

❇ हो संग सॉंग ने किआ मोटर्सचे अध्यक्ष नियुक्त केले

❇ राजस्थान पोलिसांनी 'राजकॉप' सिटीझन्स मोबाइल अॅप सुरू केले
 
❇ मिर्जा वहीदने कल्पित कथेत 'द हिंदू पुरस्कार 2019 'जिंकला

❇ संतानू दास यांनी नॉन फिक्शनमध्ये 'द हिंदू पुरस्कार 2019 'जिंकला

❇ सौदी अरेबियाकडून अखंड एलपीजी पुरवठा करण्यासाठी भारत

❇ मोहम्मद नबी यांना इराणच्या फुटबॉल फेडरेशनचे सरचिटणीस म्हणून नियुक्त केले

❇ गोवाचे भागीदार इनोव्हेसरसह भारताचे पहिले सेल्फ असेसमेंट टूल लाँच करण्यासाठी

❇ अमेरिकेने 64 देशांना 174 दशलक्ष डॉलर्सची आर्थिक सहाय्य जाहीर केली

❇ शासनाने कोविड -19 राष्ट्रीय दूरसंचार केंद्र सुरू केले

❇ सर्वोच्च न्यायालयाने बीएस चतुर्थ ते बीएस सहामध्ये संक्रमणाची अंतिम मुदत वाढविली

❇ नेपाळ सरकारने एप्रिलपर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंदी वाढविली

❇ उत्तर मॅसेडोनिया अधिकृतपणे नाटोमध्ये सामील झाले

❇ उत्तर मॅसेडोनिया नाटोचा 30 वा सदस्य होत

❇ गुजरात सरकारने "एसएमसी कोविड -19  ट्रॅकर" सुरू केले.

❇ भारतीय शॉट पुटर नवीन चिकारा 4 वर्षांसाठी निलंबित

General Knowledge

▪ ARCI या संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या ‘फ्युल सेल्स’ तंत्रज्ञानाचे नाव काय आहे?
उत्तर : पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युल सेल्स

▪ शास्त्रज्ञांनी कोणत्या बाह्य ग्रहाला ‘सुपर-अर्थ’ म्हणून संबोधले?
उत्तर : K2-18b

▪ कोणत्या दिवशी जागतिक वन्यजीवन दिन पाळला गेला?
उत्तर : 3 मार्च

▪ ‘मुख्यमंत्री दाल भात योजना’ कोणत्या राज्याची अनुदानित भोजन योजना आहे?
उत्तर : झारखंड

▪ कोणत्या व्यक्तीची भारताचे नवे वित्त सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली?
उत्तर : अजय भूषण पांडे

▪ राष्ट्रीय ललित कला अकादमीचा 61 वा वार्षिक पुरस्कार किती कलाकारांना देण्यात आला?
उत्तर : 15

▪ पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने कोणत्या तलावाला ‘सजीव घटक’ म्हणून घोषित केले?
उत्तर : सुखना तलाव

▪ 1 मार्च 2020 रोजी निधन पावलेले रिचर्ड जॉन पईस कोणत्या क्षेत्राशी जुळलेले होते?
उत्तर : साहित्य

▪ कोणत्या दिवशी भारतात ‘राष्ट्रीय प्रथिने दिन’ पाळण्यात आला?
उत्तर : 27 फेब्रुवारी

▪ ताज्या FIH जागतिक क्रमवारीत भारतीय पुरुष हॉकी संघाचा क्रमांक काय आहे?
उत्तर : 4 था

चलनवाढ व चलनघट

▪️अर्थव्यवस्थेतील किंमतीची पातळी  जेव्हा चढत जाते, तेव्हा ‘चलनवाढ’ होत आहे असे म्हणतात.

▪️ याउलट  किंमतीची पातळी जेव्हा घटत असते, तेव्हा ‘चलनघट’ होत आहे असे  समजतात.

▪️चलनवाढ व चलनघट ह्या सर्वस्वी चलनविषयक घटना  होत, हा विचार जागतिक महामंदीपर्यंतच्या काळात मान्यता पावलेला होता.

▪️परंतु केन्सप्रणीत विचारसरणीप्रमाणे जर अर्थव्यवस्था अपूर्ण  रोजगाराच्या अवस्थेत असेल, तर पैशाचा पुरवठा वाढल्यास  किंमतीबरोबर रोजगारही वाढतो. ही ‘अपूर्ण चलनवाढ’ किंवा ‘सौम्य  चलनवाढ’ होय.

💢 चलनवाढ  💢

▪️महागाई मोजणाचं परिमाण म्हणजे चलनवाढ आहे. एखाद्या विशिष्ट कालावधीत वस्तू व सेवांच्या किंमत पातळीवर होणारी अनियंत्रित वाढ म्हणजे चलनवाढ होय.

◾️चलनवाढीमुळे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात,म्हणून 'चलनवाढ' आणि  'महागाई ' हे शब्द एकमेकांना आलटून पालटून वापरले जातात .

◾️मात्र चलनाची क्रयशक्ती कमी होत असते.

◾️चलनवाढीमुळे रोजगारनिर्मितीची क्षमता वाढते.

💢 भारतातली चलनवाढीची कारणे 💢

●तुटीचे अंदाजपत्रक सरकारने सादर करणे.

●ही तूट भरून काढण्यासाठी रिर्झव्ह बँकेला नोटा छापण्याचा आदेश दिला जातो.

●परदेशात काम करणारे भारतीय नातेवाईकांना पैसे पाठवतात.

●ज्या भारतीयांचे परदेशात उद्योग असतात, ते झालेला नफा भारतात पाठवतात.

●परदेशी भांडवलदार भारतात गुंतवणूक करतात ही गुंतवणूक चलनात दाखल होते.

●काही देशांत भारतीय चलनाच्या नकली नोटा छापून भारतीय अर्थव्यवस्थेत घुसवल्या जातात.

● या कारणांनी चलनवाढ होते व त्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणून भाववाढ होते.

महत्त्वाचे सामान्य ज्ञान

◆ सोलार रिसिव्हर ट्यूब तंत्रज्ञान कोणत्या संस्थेने विकसित केले आहे?
उत्तर : इंटरनॅशनल अॅडव्हान्स्ड रिसर्च सेंटर फॉर पॉवर मेटलर्जी अँड न्यू मटेरियल्स

◆ 11 मार्च रोजी कोणत्या राज्याच्या विधानसभेनी जात वैधता दाखल्याच्या संदर्भात विधेयक मंजूर केले?
उत्तर : महाराष्ट्र

◆ COVID-19 विषाणूशी लढा देण्यासाठी भारतात कोणता कायदा लागू करण्यात आला आहे?
उत्तर : महामारी कायदा-1897

◆ शेतकर्‍यांसाठीच्या कोणत्या योजनेसाठी सल्ला प्राप्त करण्यासाठी भारत सरकारने समिती नेमली?
उत्तर : किसान रेल योजना

◆ महाराष्ट्र मंत्रिमंडळाद्वारे मान्यता दिलेल्या प्रस्तावानुसार मुंबई सेंट्रल स्थानकाचे नवे नाव काय असणार?
उत्तर : नाना शंकरशेठ स्थानक

◆ कोणत्या व्यक्तीची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाचे नवे संचालक म्हणून नेमणूक झाली?
उत्तर : देबाशीष पांडा

◆ संसदेत दिवाळखोरीसंबंधी कोणते विधेयक मंजूर करण्यात आले?
उत्तर : नादारी व दिवाळखोरी संहिता (दुरुस्ती) विधेयक-२०२०

◆ भारतीय स्टेट बँकेचा ‘फायनॅनष्यल इंक्लूजन अँड मायक्रो मार्केट’ उपक्रम कोणत्या प्रकारची कामे हाताळणार?
उत्तर : सूक्ष्म वित्तीय कार्ये

◆ 10 मोठ्या उद्योगांकडे येस बँकेचे थकीत असलेले कर्ज किती आहे?
उत्तर : रु. 34,000 कोटी

◆ कोणत्या महिला संघाने ‘ICC टी-20 विश्वचषक 2020’ या क्रिकेट स्पर्धेचे विश्वविजेतेपद जिंकले?
उत्तर : ऑस्ट्रेलिया

इतिहास :- खोती पद्धत

🔹खोतांच्या प्रशासन पद्धतीला खोती असे म्हणत.

🔸खोत हा ब्रिटीश भारतातील गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे.

🔹 तो गावातील शेतसारा गोळा करून सरकारला देत असे.

🔸 खोत शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो.

🔹खोती पद्धत बहुतांशी 
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि 
सिंधुदुर्ग येथे आढळून येत होती.

🔸खोती पद्धतीने शेतकऱ्यांचे कमालीचे शोषण होत होते.

🔹कुळांनी जमीन कसायची आणि ७५ टक्के वाटा सावकारांना द्यायचा, अशी ही अन्यायकारक पद्धत होती.

🔺 ही एक प्रकारची वेठबिगारीच होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खोती पद्धतीला नष्ट करण्यासाठी लढा दिला व ही पद्धत समाप्त केली.

🔸 त्यांनी इ.स. १९०५ ते १९३१ या काळामध्ये पेण, वाशी, पोलादपूर, चिपळूण, माणगाव, महाड, खेड, तळा, रोहा इत्यादी गावांत अनेक सभा घेतल्या.

🔹त्यानंतर खोतांना हादरा देण्यासाठी कोकणातील १४ गावच्या शेतकऱ्यांनी १९३३ ते १९३९ पर्यंत संप पुकारला होता.

🔸शेतकरी नेते नारायण नागू पाटील हे या संपाचे नेतृत्व करत होते.

🔹शेतकऱ्यांच्या या लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साथ दिली.
त्यावेळी झालेल्या केसेस लढण्यासाठी बाबासाहेब स्वतः शेतकऱ्यांच्यावतीने न्यायालयात उभे राहिले होते.

📚 खोतांचे अधिकार 📚

🔸एका खोताकडे अनेक गावांचे अधिकार असत. गावातील सर्वाधिक अधिकार हे खोताकडे असत.

🔹खोत या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो.

🔸खोताचे हक्क हे वंशपरंपरेने चालत असत. खोताकडे घाटावरील देशमुख आणि देशपांडे यांप्रमाणे काही अधिकार होते.

🔹भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर खोताचे अधिकार नष्ट झाले. तरी काही प्रमाणात गावातील त्याचा मान किंवा वजन तसेच राहिले.

🔺कोकणातील बहुतांशी खोत घराण्याची आडनावे ही सर किंवा प्रभू या उपसर्गाने सुरु होतात.

➡️ उदा. सरदेशपांडे, सरदेसाई, सरपोतदार, सरजोशी, प्रभुदेसाई इ.

General Knowledge

▪ ‘काशी महाकाल एक्सप्रेस’ नावाची तिसरी कॉर्पोरेट पॅसेंजर रेलगाडी कोणत्या मार्गावर धावणार?
उत्तर : वाराणसी-इंदौर

▪ ‘फिरते मधमाशा पालनगृह’ हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाचा आहे?
उत्तर : सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय

▪ ‘भारतीय नौदल अकादमी’ कुठे आहे?
उत्तर : केरळ

▪ कोणत्या शहरात ‘राष्ट्रीय सेंद्रिय खाद्य’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले?
उत्तर : नवी दिल्ली

▪ कोणती व्यक्ती पंधराव्या वित्त आयोगाने नेमलेल्या ‘संरक्षण व अंतर्गत सुरक्षा गट’चे अध्यक्ष आहे?
उत्तर : एन. के. सिंग

▪ खादी व ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यालय कुठे आहे?
उत्तर : मुंबई

▪ ‘भारतीय नौदल जलविज्ञान विभाग’ याचे कार्यालय कुठे आहे?
उत्तर : देहरादून

▪ कोणते मंत्रालय ‘स्कूल हेल्थ अँड वेलनेस अम्बॅसडर’ उपक्रम राबवत आहे?
उत्तर : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय

▪ 'जागतिक युनानी दिन' कधी साजरा केला जातो?
उत्तर : हकीम अजमल खान

▪ ‘खेलो इंडिया’ अभियानाच्या अंतर्गत राष्ट्रीय हिवाळी खेळांचे आयोजन कुठे केले जाणार आहे?
उत्तर : गुलमर्ग

महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे तीन विभाग

1. कोकण किनारपट्टी

2. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट

3. महाराष्ट्र पठार / दख्खन पठारी

🔹1. कोकण किनारपट्टी

स्थान: महराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास ‘कोकण’ म्हणतात.

विस्तार: उत्तरेस – दमानगंगा  नदीपासून दक्षिणेस – तेरेखोल खाडीपर्यंत. कोकण किनारपट्टी ‘रिया’  प्रकारची आहे.

लांबी:  दक्षिणोत्तर = 720 किमी,  रुंदी = सरासरी 30 ते 60 किमी. उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी. तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी. 

क्षेत्रफळ: 30,394 चौ.किमी.

🔹2. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट :

स्थान: दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजेच सह्याद्रि होय.
यामुळे सह्याद्रि पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरल भिंतीसारखा दिसतो.

पठाराकडून मात्र अत्यंत मंद उताराचा दिसतो.

सह्याद्रि पर्वत हा प्राचीन असून या पर्वताची बर्‍याच ठिकाणी झीज झाल्याने कमी – अधिक उंचीची ठिकाणे तयार झाली आहेत. उदा. शिखरे, घाट, डोंगर, उंचीवरील सपाट प्रदेश इ.

🔹3) महाराष्ट्र पठार / दख्खन पठार / देश :

स्थान: महाराष्ट्र राज्यांपैकी एकूण क्षेत्रफळापैकी 90% क्षेत्र महाराष्ट्र पठाराणे व्यापले आहे.

लांबी-रुंदी:  पूर्व- पश्चिम – 750km. उत्तर- दक्षिण – 700km.

ऊंची:  450 मीटर– या पठाराची ऊंची पश्चिमेस (600 मी) जास्त व पूर्वेस (300 मी) कमी आहे.

महाराष्ट्र पठार डोंगर रांगा व नद्या खोर्‍यांनी व्यापले आहे.

मधमाशांचा हल्ला आणि त्यावरील उपाय

🔹महाराष्ट्रात मधमाशा चावणे common आहे. मधमाशांचा हल्ला कोणावरही होऊ शकतो. अगदी गिर्यारोहकांना/प्रस्तरारोहकांना तसेच पर्यटकांनाही मधमाशा कडाडून चावल्या आहेत.
🔹मध्यंतरी मी वर्तमान पात्रातून लाखो मधमाशांनी अंत्ययात्रेला जाणाऱ्या गावकऱ्यांवर हल्ला चढविला अन बऱ्याच जणांना हॉस्पिटल मध्ये भरती करावे लागले एवढी परिस्थिती ओढविली हे वाचनात आले. थोडक्यात मधमाशा कोणालाही चावतात.

🔹मधमाश्या का व केव्हा चवताळतात याचा मानवाला अजूनही शोध लागलेला नाही. वाऱ्यामुळे गवत उडून त्याचा पोळ्याला फटका बसला तरी मधमाश्या उठतात.
🔹 दरड कोसळली तरी मधमाशा उठतात. वातावरणातील अचानक बदलामुळेही मधमाशा चवताळतात. मग त्या आजूबाजूला फिरणाऱ्या मिळेल त्या जनावरावर/माणसांवर हल्ला करतात. गुरांच्या तोंडाला चावल्यामुळे गुरे धूम गावाकडे पळत सुटतात. प्रस्तरारोहणात बोल्टिंग करताना पोळे जवळ असेल तर त्या हमखास उठतात.

🔹मधमाशीच्या शेपटा कडील भागात असलेल्या काट्यात (sting) विष असते. केसांएवढा असणाऱ्या या काट्याचा आकार बास्तिक बाणासारखा असतो.  मधमाशीने डंख मारल्यानंतर हा काटा आपल्या शरीरात बास्तिक बाणासारखा रुतून बसतो. तिला तो काटा खेचून काढता येत नाही. शेवटी तिच्या प्रयत्नाने तो तुटतो. काटा अलग झाल्यामुळे मधमाशी काही तासात मरते.

🔹मधमाशीचे विष Acidic असते. त्यावर Alkaline चा उतारा हवा. म्हणून Liquid Ammonia ची बाटली प्रत्येक ग्रुपने बरोबर ठेवावी. ग्रुपकडे २/३ बाटल्या असणे जास्त चांगले. तसेच एक/दोन Magnifying Glass व २/३ Plucker असणे महत्वाचे.

🔹काटा काळ्या रंगाचा असतो. Magnifying Glass मधून बघून Plucker ने तो उपटावा. Plucker नसेल तर नखाच्या चिमटीत पकडून खेचावा. अथवा नखाने खरडवावा. खरडवल्यामुळे तो तुटतो व स्नायू काम करेनासे होतात. म्हणजेच कट्यातील विष काट्यातच रहाते. त्यानंतर त्या ठिकाणी Liquid Ammonia चा एक थेंब टाकावा व नखाने खरडवावे. म्हणजे Liquid आत शिरेल व विष Neutralize होईल. १५/२० मिनिटांनी दाह कमी होतो.

🔹याउलट गांधीला माशीचे विष Alkaline असते. वरीलप्रमाणे Plucker ने (गांधील माशीलाही काटा असतो) काटा काढावा व त्यावर लिंबू रसाचा एक थेंब टाकावा. त्यासाठी लिंबू कापू नये. दाभणाने लिम्बाला भोक पाडावे. (

कामगारांचे स्थलांतर रोखण्यासाठी केंद्राकडून राज्यांना कडक निर्देश :

कामगारांचे स्थलांतर रोखण्यासाठी केंद्राकडून राज्यांना कडक निर्देश :

सध्या जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना व्हायरसने आता भारतात देखील आपले जाळे विस्तारण्यास झपाट्याने सुरूवात केल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी लॉक डाऊनचा निर्णय घेतलेला आहे. मात्र तरी देखील देशभरातील अनेक ठिकाणी नागरिकांकडून या निर्णयाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून कठोर निर्णय घेतले जाण्याची चिन्ह दिसत आहे.

केंद्र सरकारने अद्यापही सरकारीन सूचनांना गांभिर्याने न घेणाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. सध्याच्या लॉक डाऊनच्या आदेशाला झुगारून छुप्या पद्धतीने स्थलांतर करणाऱ्यांवर आता बारकाईने लक्ष असणार आहे. यासाठी केंद्र सरकारने राज्य व जिल्ह्यांच्या सीमा काटेकोरपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

याचबरोबर केंद्र सरकारकडून राज्यांना हे देखील निर्देश देण्यात आले आहेत की, प्रवासी कामगारांना ते आहेत त्या ठिकाणीच सर्व सुविधा मिळतील याची खात्री करून घ्यावी. एवढच नाहीतर कामगारांना वेळच्यावेळी वेतन दिले जावे, यासाठी देखील सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच, अशा परिस्थितीतही विद्यार्थी व कामगारांना जागा खाली करण्यास सांगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचेही राज्य सरकारांना आदेश देण्यात आले आहेत.

चालू घडामोडी प्रश्नसंच

१) नागरिकत्व दुरूस्ती कायदा २०१९ द्वारे कोणत्या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे ?
✓अ) नागरिकत्व कायदा १९५५
ब) नागरिकत्व कायदा १९६४
क) नागरिकत्व कायदा १९४५
ड) नागरिकत्व कायदा १९३५

२) केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नुकत्याच पार पडलेल्या संविधान दिनी कोणत्या पोर्टलची सुरवात केली आहे ?
अ) हक्क
ब) ई-संविधान
✓क) कर्तव्य
ड) यापैकी नाही

३) कोरेगाव भिमाची लढाई कोणत्या वर्षी लढली गेली ?
✓अ) १८१८
ब) १८२०
क) १८४०
ड) १८७१

४) जानेवारी २०२० मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे ?
अ) हार्दिक पांड्या
ब) विराट कोहली
✓क) इरफान पठाण
ड) रोहित शर्मा

५) २०१९ च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत कोणी भारताचे प्रतिनिधित्व केले ?
✓अ) वर्तिका सिंग
ब) अनुष्का शेट्टी
क) सोनाली चौहान
ड) यापैकी नाही

विदर्भाच्या प्रशिक्षकपदी वसिम जाफर

🔰चंद्रकांत पंडीत यांनी विदर्भ क्रिकेट संघटनेचे प्रशिक्षकपद सोडले आहेत.

🔰जाफर हा विदर्भाच्या संघाचा महत्वाचा भाग आहे. पण जाफर हा ७ मार्चला निवृत्त झाला आहे. त्यामुळे आता पंडित यांच्या जागी विदर्भ संघाचा प्रशिक्षकपदी जाफरची नियुक्ती होऊ शकते, असे म्हटले जात आहे.

🔰पंडीत हे प्रशिक्षकपदी असताना विदर्भाच्या संघाने सलग दोनदा रणजी करंडक स्पर्धा जिंकत इतिहास रचला होता.

🔰यंदाच्या रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत मात्र त्यांना पोहोचता आले नाही. पंडीत यांनी विदर्भाच्या संघाला सोडचिठ्ठी दिली आहे.

🔰आता ते मध्य प्रदेशच्या संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणार आहेत.

🔴वसिम जाफर

🔰वसिम जाफर सर्व प्रकारच्या क्रिकेट मधून निवृत्त.

🔰सर्वात जास्त रणजी सामने - १५६

🔰रणजी मध्ये सर्वात जास्त धावा - १२०३८

🔰सर्वात जास्त शतके - ४०

🔰सर्वात जास्त अर्धशतके - ८९

🔰सर्वात जास्त झेल - २००

🔰वसीम जाफर 1996-97 ते 2012-13 दरम्यान 8 रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईच्या संघात सहभागी होता. तर 2018 आणि 2019 मध्ये वसीम जाफरनं विदर्भाला रणजीचा किताब मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती.