Ads

06 May 2022

भारतरत्न पुरस्कार महत्वाचे मुद्दे

भारतरत्न पुरस्कार -----------

महत्वाचे मुद्दे

भारतरत्न पुरस्कार

२०१९ चे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे भारतातील रत्ने

भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती 2021
भारतरत्न पुरस्कार या विषयी सविस्तर माहिती ती या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

भारतरत्न पुरस्कार भारत देशातील एक अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार आहे.

इतकेच नव्हे तर भारतरत्न पुरस्कार देशातील नागरी पुरस्कार मधील सर्वोच्च पुरस्कार आहे. भारतरत्न पुरस्कार व्यतिरिक्त भारतामध्ये पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री असे विविध नागरी पुरस्कार आहेत.

भारतरत्न पुरस्काराची सुरुवात पुरस्काराचे स्वरूप आणि आत्तापर्यंत किती लोकांना हा पुरस्कार देण्यात आला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

भारतरत्न पुरस्काराची सुरुवात २१ जानेवारी १९५४ पासून झाली.

भारतरत्न पुरस्काराचे स्वरूप सूर्याची प्रतिकृती आणि देवनागरी लिपी मध्ये भारतरत्न लिहिलेले ब्राँझ धातू पासून बनवलेल्या पिंपळाच्या पानाचा आकार असलेले स्मृतिचिन्ह राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेली सनद आणि गळ्यात घालण्याचे पदक अशा स्वरुपात दिले जाते. या पुरस्कारांमध्ये रोख रकमेचा समावेश नसतो.

एका वर्षांमध्ये जास्तीत जास्त तीन लोकांना हा पुरस्कार देण्यात येतो. अपवाद फक्त १९९९ या वर्षीचा आहे. १९९९ मध्ये चार लोकांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. पुरस्काराविषयी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे जनता सरकार जेव्हा देशांमध्ये अस्तित्वात आले तेव्हा १९७७ मध्ये या पुरस्कारा वरती बंदी घालण्यात आलेली होती. मात्र १९८० मधले इंदिरा गांधी सरकारने हा पुरस्कार देण्याची पुन्हा सुरुवात केलेली आहे.

आपल्या भारत देशाचा अत्यंत मानाचा पुरस्कार असल्याने या पुरस्काराची प्रतिष्ठा देखील तितकीच उच्च दर्जाची आहे.

भारत रत्न पुरस्कार आज पर्यंत ४८ व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे.

भारतरत्न पुरस्कार सुरूवातीला म्हणजे १९५४ मध्ये पुढील व्यक्तींना बहाल करण्यात आला.

१) सी राजगोपालचारी
२) डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन
३) सी व्ही रमण

आज पर्यंत भारत रत्न पुरस्कार मरणोत्तर सुद्धा बहाल करण्यात आलेला आहे. मरणोत्तर पुरस्कार मिळालेली पहिली व्यक्ती लाल बहादूर शास्त्री हे होते.

आज पर्यंत दोन परदेशी व्यक्तींना सुद्धा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे.

खान अब्दुल गफार खान यांना १९८७ मध्ये तर नेल्सन मंडेला यांना १९९० मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.

भारतरत्न पुरस्कार विजेते राष्ट्रपती ------------

१) डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन  –  १९५४
२) डॉक्टर राजेंद्र प्रसाद  – १९६२
३) झाकीर हुसेन  – १९६३
४) वराहगिरी वेंकट गिरी  – १९७५
५) डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम  – १९९७
६) प्रणव मुखर्जी  – २०१९
राष्ट्रपती पुरस्कार हा आतापर्यंत पाच महिलांना मिळाला आहे

१) इंदिरा गांधी   -१९७१
२) मदर तेरेसा   -१९८०
३) अरुणा आसफ अली  – १९९७
४) एम एस   सुब्बुलक्ष्मी  – १९९८
५) लता मंगेशकर  – २००१
राष्ट्रपती पुरस्कार आतापर्यंत सात पंतप्रधानांना मिळाला आहे

१) पंडित जवाहरलाल नेहरू – १९५५
२) लालबहादूर शास्त्री – १९६६
३) इंदिरा गांधी – १९७१
४) मोरारजी देसाई – १९९१
५) गुलजारी लाल नंदा – १९९७
६) राजीव गांधी – १९९१
७) अटल बिहारी वाजपेयी – २०१५

आजपर्यंत सर्वाधिक भारतरत्न रत्न पुरस्कार प्राप्त नागरिक महाराष्ट्र राज्याचे आहेत.

महाराष्ट्रातील एकूण नऊ व्यक्तींना आजपर्यंत भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे.

महाराष्ट्र पाठोपाठ उत्तर प्रदेश राज्याचा नंबर लागतो. उत्तर प्रदेश राज्य एकूण आठ व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे.

२०१९ चे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे भारतातील रत्ने
१) प्रणव मुखर्जी
२) भूपेन हजारिका
३) नानाजी देशमुख

2019 चा भारतरत्न पुरस्कार नानाजी देशमुख भूपेन हजारिका यांना मरणोत्तर मिळालेला आहे.

______________________________

भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती 2021
१) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 
२) चक्रवर्ती राजगोपालचारी
३) डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण
४) डॉ. भगवान दास
५) सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
६) पंडित जवाहरलाल
७) नेहरू गोविंद वल्लभ पंत
८)  महर्षी धोंडो केशव कर्वे
९) बिधान चंद्र रॉय
१०) पुरुषोत्तम दास टंडन
११) डॉ. राजेंद्र प्रसाद
१२) डॉ. जाकिर हुसैन
१३) डॉ. पांडुरंग वामन काणे
१४) लाल बहादूर शास्त्री
१५) इंदिरा गांधी
१६) वराहगिरी वेंकट गिरी
१७) के कामराज
१८) मदर तेरेसा
१९) आचार्य विनोबा भावे
२०) खान अब्दुल गफार खान
२१) मुर्दुर गोपाला रामचंदम 
२२) भीमराव रामजी आंबेडकर
२३) नेल्सन मंडेला
२४) राजीव गांधी
२५) सरदार वल्लभभाई पटेल
२६)मोरारजीभाई देसाई
२७) मौलाना अबुल कलाम आझाद
२८) जहांगीर रतनजी दादाभाई टाटा
२९) सत्यजित रे 
३०)एपीजे अब्दुल कलाम
३१) गुलजारी लाल नंदा
३२) अरुणा असिफ अली
३३)एम एस सुब्बलक्ष्मी
३४)सि. सुब्रमण्यम
३५)जयप्रकाश नारायण 
३६) पंडित रविशंकर
३७) अमर्त्य सेन
३८) गोपीनाथ बोरदोलोई
३९) लता मंगेशकर
४०) उस्ताद बिस्मिल्ला खा
४१)पंडित भीमसेन जोशी
४२)सचिन तेंडुलकर
४३) सी एन आर राव
४४)अटल बिहारी वाजपेयी
४५)पंडित मदनमोहन मालवीय
४६) प्रणव मुखर्जी
४७) नानाजी देशमुख
४८)भूपेन हजारिका.

विविध पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय

❇️ विविध पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय

◆ नोबेल : रविंद्रनाथ टागोर

◆ ज्ञानपीठ : जी शंकर कुरुप

◆ मॅगसेसे : विनोबा भावे

◆ वर्ल्ड फूड प्राईझ : स्वामीनाथन

◆ दादासाहेब फाळके : देविका राणी

◆ परमवीर चक्र : सोमनाथ शर्मा

◆ गोल्डन ग्लोब : एक आर रहमान

◆ मॅन बुकर : अरुंधती रॉय

◆ एबेल पुरस्कार : श्रीनिवास वर्धन

◆ ऑस्कर पुरस्कार : भानु अथिया

◆ महाराष्ट्र भुषण : पु. ल. देशपांडे खेलरत्न

━━━━━━━━━━━━━━━

यशाचा राजमार्ग चालू घडामोडी

.    चालू घडामोडी

१) पहिला “लता मंगेशकर पुरस्कार" कोणाला घोषित झाला आहे?

- नरेंद्र मोदी

२) "नॉट जस्ट ए नाईट वाचमन माय इनिंग्स विथ बीसीसीआय" पुस्तक कोणाचे आहे?

- विनोद राय

३) अलीकडेच कोणत्या दक्षिण आशियाई देशाने स्वतःला “डीफालटर" घोषित केले आहे?

- श्रीलंका

४) नुकतेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री यां “१०६४ भष्टाचार विरोधी app" सुरु केले आहे ?

- उतराखंड
५) अलीकडेच कोणत्या राज्याच्या "कांगडी चाय" ला GI tag भेटला आहे ?

- हिमाचल प्रदेश

६) भारत आणि कोणत्या देशात “२ + २ डायलोग" आयोजित केला आहे?

- अमेरिका

७) सध्या चर्चेत असलेले "उमिया माता मंदिर" कोणत्या राज्यात आहे?

- गुजरात

८) दरवर्षी "मानवी अंतराळ उड्डाणाचा आंतरराष्ट्रीय दिवस " केव्हा साजरा करण्यात येतो?

- १२ एप्रिल

यशाचा राजमार्ग चालू घडामोडी

Q. 1) कोणता देश "संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटन" मधून बाहेर पडला आहे?
- रशिया

Q.2) "BADMINTON एशिया चाम्पिं अनशिप २०२२" कोठे आयोजित होणार आहे? - मनिला, फिलिपाईन्स

Q. 3) "वर्ल्ड कॉंग्रेस ऑफ ACCOUNTANTS" चे आयोजन कोठे होणार आहे?
- मुंबई

Q. 4) "क्वार जलविद्युत योजना" कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे?
- जम्मूकाश्मीर

Q. 5) चर्चेत असलेले "मालचा महाल" कोठे आहे?
- दिल्ली

Q.6) NASSCOM च्या CHAIRMAN पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
- कृष्णन रामानुजन

Q.7 ) चर्चेत असलेले पर्सीवरेस रोवर" कोणत्या अंतरीक्ष एजेन्सी शी संबंधित आहे?

- नासा

Q.8) "टाईम्स हायर एजुकेशनइम्पेक्त (THE) रेन्किंग २०२२" नुसार पहिले स्थान कोणाला प्राप्त झाले आहे?

- वेस्टर्न सिडनी युनिवर्सिटी

Q.9) "बीटकॉईनला" आपले आधिकारिक चलन करणारा दुसरा देश कोण बनला आहे?
- मध्य आफ्रिकी गणराज्य

________________________

१) "ईमान्यूअल मक्रोन" यांची कोणत्या देशाचे दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदी नियुक्ती झाली आहे?
✅️ - फ्रांस

२) "वर्ल्ड मिलिटरी एक्सपेंडीचर रिपोर्ट २०२१ नुसार भारत सैन्य खर्चामध्ये कितव्या क्रमांकावर आहे?
✅️- ३

३) २४ वे "उन्हाळी बधीर ऑलम्पिक" कोणत्या देशात आयोजित होणार आहे?
✅️ - ब्राझील

४) चर्चेत असलेले "उर्जा प्रवाह" जहाज भारताच्या कोणत्या दलाचे आहे?
✅️INDIAN COAST GUARD

५) संरक्षण मंत्रालयाने कोठे "डेफ कनेक्ट २.०" चे अयोजन केले आहे?
✅️- दिल्ली

६) कोणत्या राज्य सरकारने "स्पेसटेक फ्रेमवर्क कार्यक्रम सुरु केला आहे?
✅️ तेलंगना

७) कोणत्या देशाने "ट्रायलटरल कोर्पोरेशन फंड" सुरु केले आहे?
✅️- भारत

८) सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने किती युटूब चनेल वर "सुरक्षेच्या कारणाने" बंदीघातली आहे?
✅️ १६

९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे देशातील पहिले "सामुदायिकरेडीओ स्टेशन" "दुध वाणी" चेउद्घाटन केले आहे?
✅️- गुजरात

१०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितव्या "रायसीनाडायलोग" चे उद्घाटन केले आहे?
✅️- ७ व्या

शिवांगी सिंग राफेल उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला वैमानिक

#OneLiner

⚫️ शिवांगी सिंग राफेल उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला वैमानिक
#1st

🔰 फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंग या राफेल लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला वैमानिक ठरल्या आहेत.

🔰 प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात त्या भारतीय वायुसेनेच्या चित्ररथामध्ये सहभागी झाल्या होत्या.


🔰 भारतीय वायुसेनेच्या चित्ररथामध्ये सहभागी होणाऱ्या त्या द्वितीय महिला वैमानिक आहेत.

🔰 भावना कांत 2021 सालच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात भारतीय वायुसेनेच्या चित्ररथामध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक ठरल्या होत्या.

🔰 शिवांगी सिंग या मूळच्या बिहारच्या असून 2017 मध्ये भारतीय हवाई दलात सामील झाल्या आहेत.

त्या सध्या अंबाला येथील गोल्डन ॲरोज स्क्वाड्रनचा भाग आहेत.

05 May 2022

ज्योतिर्लिंग - ठिकाण

🔹 ज्योतिर्लिंग      -      ठिकाण 🔹

🔸१)सोमनाथ - सोमनाथ( गुजरात)

🔹२)मल्लिकार्जुन - श्रीशैलम( आंध्रप्रदेश)

🔸३)महाकालेश्वर - उज्जैन(म. प्रदेश)

🔹४)अंमलेश्वर - ओंकारमांधाता( म.प्र.)

🔸५) वैद्यनाथ - परळी ( महाराष्ट्र)

🔹६) रामेश्वर - तामिळनाडू

🔸७) औंढा नागनाथ - हिंगोली ( महाराष्ट्र)

🔹८) काशी विश्वेश्वर - वाराणसी (उ.प्रदेश)

🔸९) घृष्णेश्वर - औरंगाबाद( महाराष्ट्र)

🔹१०) केदारेश्वर - केदारनाथ( उत्तराखंड)

🔸११)त्र्यंबकेश्वर - नाशिक ( महाराष्ट्र)

🔹१२) भीमाशंकर - पुणे (महाराष्ट्र)

ईशान्य भारतातील महत्त्वपूर्ण सण

❇️ ईशान्य भारतातील महत्त्वपूर्ण सण ❇️

  ★ उत्सव       -             राज्य ★

1) बिहू      -      आसाम

2) हॉर्नबिल, ऑलिंग   -    नागालँड

3) वांगला, नोंगम.   -     मेघालय

4) झिरो फेस्टिव्हल ऑफ म्यूझिक. -  अरुणाचल प्रदेश

5) लॉसॉन्ग, सागा दावा  -  सिक्कीम

6) खार्ची पूजा   -  त्रिपुरा

7) चैरोबा, लाय हरोबा   -  मणिपूर

8) चापचर कूट   -     मिझोराम

कोकण प्रदेशाची थोडी माहिती

कोकण

भारतातील कोकण हा प्रदेश भारता पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टी हा एक ७२० कि.मी. (४५० मैल) लांबीचा समुद्रकिनारा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे आणि डोंगरउतारांवर केलेली भातशेती हे खूप मोठ्या प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच आहे.कोकण म्हणजे स्वर्गच आहे.

कोकणाला संस्कृतमध्ये अपरान्त म्हणतात.


इतिहास-------

पौराणिक आख्यायिका
समुद्रास मागे हटण्याचा आदेश देणारी पौराणिक कथा चितारणारे चित्र -------

समुद्रास मागे हटण्याचा आदेश देणारी पौराणिक कथा चितारणारे चित्र -------

पौराणिक कथेनुसार कोकण प्रदेशाची निर्मिती श्री विष्णूचा सहावा अवतार असलेल्या श्री परशुरामाने केली. परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केल्यावर, त्याने जिंकलेली सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली. स्वतः परशुराम दक्षिण पर्वतावर निघून गेले व तेथे त्यांनी शूर्पारक (सोपारा) देशाची निर्मिती सागरापासून केली, असा उल्लेख महाभारताच्या शांतिपर्वात आढळलाआहे.

पौराणिक कथेनुसार परशूरामाने स्वतःच्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे सिंधु सागराला (अरबी सुमद्राला) मागे हटण्याचा आदेश दिला. सागराने परशुरामाच्या बाणाच्या टप्प्यापर्यंत मागे हटण्याचे मान्य केले...

त्याप्रमाणे परशुरामाने सह्याद्रीवरून शरसंधान केले व कोकणची भूमी निर्माण केली. त्यानंतर परशुराम सध्या उत्तर कर्नाटकात असलेल्या गोकर्ण क्षेत्री वास्तव्य करू लागले.

1)कोकणस्थ ब्राम्हणांची निर्मिती देखील परशुरामाने केली अशी पौराणिक कथा खुप प्रसिद्ध आहे. यातील काही ब्राम्हणांस चितेतून पुन्हा जीवदान देऊन पुढील आयुष्य जगण्याचे वरदान मिळाले म्हणून त्यांना चित्पावन असे नाव पडले. गौड सारस्वत

[२] व केरळ मधील नंबुद्री

[३] ब्राम्हणांच्या उगमासंदर्भात देखील याच प्रकारच्या परशुराम कथेवर आधारित आख्यायिका आहेत. कोकणात रत्‍नागिरी या जिल्ह्यात चिपळूणजवळ लोटे परशूराम हे प्रसिद्ध परशुराम क्षेत्र व एक प्राचीन मंदिर आहे. गोव्यात पैगिनिम (इंग्रजी:Painguinim) या गावी एक प्राचीन परशुराम मंदिर आहे.

मध्ययुगीन---------

आजचे कोकण -----------

महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागापैकी कोकण हा एक विभाग आहे. या विभागात एकूण सात जिल्ह्याचा समावेश होतो. मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड ,रत्‍नागिरी ,सिंधुदुर्ग ठाणे आणि पालघर ही ती सात जिल्हे अलीकडेच म्हणजे १ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा जिल्हा अतित्वात आला.पालघर हा महाराष्ट्राचा ३६ वा जिल्हा असून महाराष्ट्राची ३४ वी जिल्हा परिषद ठरली.

कोकणात सात जिल्हे असून ४७ तालुके आहेत मुंबई उपनगरातील इतर ३ तालुके अंधेरी बोरिवली कुर्ला हे महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय सोईसाठी निर्माण केले कोकणातील मुंबई शहर हा महाराष्ट्रातील एकही तालुका नसणारा जिल्हा आहे

कोकणाला 720 कि.मीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. कोकणातील रत्‍नागिरी या जिल्हास सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. रत्‍नागिरी (२३७) रायगड (१२२) सिंधुदुर्ग (१२०) ठाणे व पालघर (१२७) मुंबई शहर व मुंबई उपनगर (११४) समुद्र किनारा लाभला आहे.

कोकण प्रदेशाला तीन राज्याच्या सीमा लागून आहेत.गोवा कर्नाटक आणि गुजरात ही राज्य आहेत.

महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला कोकण प्रशासकीय विभाग आहे. कोकणाचे एकूण क्षेत्रफळ ३०७२८ चौ.कि.मी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोकणातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर हा आहे. त्याचे क्षेत्रफळ अवघे १५७ चौ.कि.मी आहे. कोकणातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा रत्‍नागिरी आहे त्याचे क्षेत्रफळ ८२०८ चौ.कि.मी आहे.


कोकणातील सागरी किल्ले------------

वसईचा किल्ला,जंजिरा,विजयदुर्ग सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे कोकणातील सागरी किल्ले आहेत.

कोकणातील बेटे -----------

मुंबई ,साष्टी ,खांदेरी, उंदेरी, अंजदीव जंजिरा घारापुरी कुरटे इ.बेटे कोकणात समाविष्ट होतात .

कोकणातील खाड्या - उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने दतीवरा खाडी-वसई-धरमतर-राजपुरी-बाणकोट-दाभोळ-जयगड-विजयदुर्ग-कर्ली-तेरेखोल खाडी या क्रमाने आहे.

कोकणातील बंदरे महाराष्ट्रात एकूण 53 बंदरे आहे.कोकण किनारपट्टीवर मुंबई हे नैसर्गिक आणि आंतराष्ट्रीय महत्त्वाचे बंदर आहे. मुंबई बंदरावरचा ताण कमी करण्यासाठी मुंबईजवळच न्हावाशेवा हे बंदर उभारले गेले. इतर बंदरे - हरिहरेश्वर, दिव्याघर, अलिबाग, मुरुड श्रीवर्धन जयगड रत्‍नागिरी मालवण आणि वेंगुर्ला

कोकण विभागाची संरचना --------

राजकीय
भौगोलिक
महाराष्ट्राच्या सहा प्रशासकीय विभागांपैकी कोकण विभाग [४] हा एक आहे. या विभागात ७ जिल्हे व ७२० कि.मी लांबीच्या किनारपट्टीचा समावेश होतो. हा पश्चिम घाट सह्याद्री म्हणून ओळखला जातो. कोकणाला पश्चिमेकडे अरबी समुद्राने, उत्तरेकडे मयुरा नदीने आणि दक्षिणेतील गंगावल्ली नदी यांनी वेढले आहे.

सध्याच्या कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात गंगावली प्रवाह आहे. त्याचा उत्तर किनारा कोकणचा दक्षिणेकडील भाग आहे. कारवार, अंकोला, कुमठा, होनावर आणि भटकळ ही शहरे कोंकणच्या किनाऱ्यावर येतात. ऐतिहासिक कोकणाची उत्तरेकडील मर्यादा, मयुरा नदीची अचूक ओळख, अनिश्चित आहे.

कोकण किनारपट्टीवरील सर्वात मोठे शहर 'मुंबई' ही महाराष्ट्राची राजधानी आहे. हे कोकण विभागात आहे, महाराष्ट्रातील प्रशासकीय उपविभागामध्ये राज्यातील किनारपट्टीवरील सर्व जिल्हे येतात. हे जिल्हे उत्तरेकडून ते दक्षिणेकडे आहेत.

क्षेत्रफळ: ३०७४६ चौ. किमी
लोकसंख्या: २,४८,०७,३५७ (सन २००१ च्या जनगणनेनुसार)

कोकणातील जिल्हे ----------

मुंबई जिल्हा
मुंबई उपनगर जिल्हा
पालघर जिल्हा
ठाणे जिल्हा
रायगड जिल्हा
रत्‍नागिरी जिल्हा
सिंधुदुर्ग जिल्हा
कोकण

क्रेटेशियस शकट झालेल्या लाव्हाच्या संचयनाने भारताच्या दक्षिण भागात शंकूची निर्मिती झाली होती.

ज्वालामुखीचा मुख्य भाग पश्चिम घाटात असून याचा दोन्ही बाजूकडे बेसिक प्रकाराचा लाव्हा साचून बेसिक लाव्हा शंकूची निर्मिती झाली होती.

बेसिक प्रकाराचा लाव्हा शंकू असल्याने या शंकूची उंची कमी व विस्तार मात्र जास्त होतो.

इयोसिन शकात बेसिक लावा शंकूच्या पश्चिम भागात प्रस्तर भंगामुळे खाली खचलेला भाग अरबी समुद्रात विलीन झाला या खचलेल्या भाग पासूनच कोकण विभागाची निर्मिती झाली.

पश्चिमेकडे वाहणाऱ्या नदीच्या गाळाच्या संचयनामुळे ही कोकणच्या निर्मितीस हातभार लागलेला आहे.

इयोसिन काळात खचलेला भाग आजही जीवाश्मच्या रूपाने अरबी सागराचा खाली पहावयास मिळतो.

पश्चिम घाट व अरबी समुद्र यांच्या दरम्यानची अरुंद व चिंचोळा पट्ट्यास कोकण विभाग असे म्हटले जाते.

कोकणात अरबी सागराचा किनारा लागलेला असून ही किनारपट्टी 720 किलोमीटर लांबीचा आहे यात सर्वाधिक किनारा रत्‍नागिरी

रत्‍नागिरी - 237 Km रायगड -122 Km सिंधुदुर्ग -117 Km मुंबई शहर व उपनगर - 114 Km पालघर - 102 Km ठाणे - 25 Km

कोकणची रुंदी दक्षिनेकडे कमी व उत्तरेकडे जास्त आहे म्हणजेच दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना ही रुंदी वाढत जाते.

दक्षिणे कडे सरासरी रुंदी 40 ते 50/45 किमी तर उत्तरेत उल्हास नदी खोऱ्यात सरासरी 100 पर्यंत आहे.

कोकणाचे प्रामुख्याने प्रदेशानुसार 2 विभाग केले जाता

सामाजिक -----------

प्रमुख भाषा: मराठी,आगरी,कोकणी, मालवणी, कोळी-मांगेली
साक्षरता: ८१.40 %
या प्रदेशात आढळलेल्या काही समुदायांमध्ये मालवणी, आगरी, कोळी, कोकणस्थ (ब्राह्मण व मराठा), भंडारी, गौड सारस्वत ब्राह्मण, कुंभार, राजापूर सारस्वत ब्राह्मण, गाबित, चित्तपावन, दैवज्ञ, कुडाळदेशकर ब्राह्मण, कुरुबा आणि कुणबी यांचा समावेश आहे.

कोकणातील आदिवासी जमातींमध्ये दक्षिणेतील कोकणा, वारली आणि कोलचा, आणि दादरा-नगर हवेली व महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील जमातींचा समावेश होतो. कातकरी रायगड आणि रत्‍नागिरी जिल्ह्यांत आढळतात.

बौद्ध, ख्रिश्चन आणि मुस्लिम अल्पसंख्याकांसह या भागाची लोकसंख्या प्रामुख्याने हिंदू आहे.

प्रमुख आकर्षणे =खेड तालुक्यातील मोजे. असगणी.स्वंयभु पांडवकालीन स्वयंभू शिव मंदिर,

मंदिरे व देवस्थाने -------------

गणपतीपुळे
गणेशगुळे
लोटे परशुराम
वेळणेश्वर
मार्लेश्वर संगमेश्वर
कर्णेश्वर संगमेश्वर
गणपती मंदिर आंजर्ला : याला कड्यावरचा गणपती असेही म्हणतात.
खेड तालुका असगणी गावात अती प्राचीन 5000 पूर्वीचे स्वयंभू पांडवकालीन महादेव मंदीर
पाली (रायगड) अष्टविनायक
महड (रायगड) अष्टविनायक
हेदवी दशभुजा गणेश
रेडी गणपती
दिवेआगर सुवर्णगणेश
कुणकेश्वर, देवगड.
लेणी
गांधारपाले बुद्ध लेणी
कोल बुद्ध लेणी
ठाणाळे बुद्ध लेणी
नेणवली बुद्ध लेणी
गोमाशी बुद्ध लेणी
कान्हेरी बुद्ध लेणी
कोंडीवते बुद्ध लेणी
मागठाणे बुद्ध लेणी
मंडपेश्वर बुद्ध लेणी
कुडा बुद्ध लेणी
चौल बुद्ध लेणी
चिपळूण बुद्ध लेणी
कोळकेवाडी बुद्ध लेणी
खेड बुद्ध लेणी
पन्हाळे काजी

किल्ले---------

जलदुर्ग
विजयदुर्ग किल्ला
मुरूड जंजिरा
देवगडचा किल्ला
सिंधुदुर्ग किल्ला
रत्‍नागिरी किल्ला
जयगड
पद्मदुर्ग
सुवर्णदुर्ग
खांदेरी
अलिबागचा किल्ला (कुलाबा किल्ला)
माहिमचा किल्ला

पर्यटन स्थळे -----------

अलिबाग
वेंगुर्ला
गुहागर
श्रीवर्धन
हरिहरेश्वर
रत्‍नागिरी
रायगड किल्ला
मुरूड- हर्णे
देवगड-जामसंडे
दाभोल
मालवन

थंड हवेची ठिकाणे ------------

माथेरान
आंबोली (सिंधुदुर्ग जिल्हा)
जव्हार
दापोली (मिनी महाबळेश्वर )
कोकण रंगभूमी
कोकण निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांमुळे सर्वपरिचित आहे. कोकणची साहीत्य संपदाही विपूल आहे. कोकण रंगभूमी सशक्त व समृद्ध रंगभूमी आहे. कोकणी नाटक आज आपली स्वतःची ओळख घडविण्यात यशस्वी ठरलेले आहे. कोकण रंगभूमीवर गोमंतकीय जीवनाची वास्तवपूर्ण दर्शन घडते. कोकण संस्कृतीची प्रतिमा दाखवण्याची ताकद आणि सामर्थ्य कोकणी नाटकाने संपादन केलेले आहे. कोकण रंगभूमीला नाटय लेखनाची मोठी परंपरा लाभली आहे. मराठीतील नामवंत नाटककार मामा वरेरकर एकदा विष्णू नाईक यांना म्हणाले होते, ‘‘तुम्ही कोकणी नाटके घेऊन जनसामान्यांपर्यंत गेल्याशिवाय कोकणी भाषेचा कोणी स्वीकार करणार नाहीत.’’ मामा वरेरकरांचा आशीर्वाद आज फळाला आला आहे. मराठी नाट्यपरंपरा समृद्ध करण्यात गोमंतकीयांचे योगदान फार मोठे आहे. मूळ मराठी नाटकाचे जन्मस्थान म्हणण्यापर्यंत या योगदानाची मजल जाते. कोकणी नाटकाला मराठी परंपरेचा आधार लाभणे स्वाभाविक आहे. पण या आधारात मोठा धोकाही होता. तो म्हणजे आधाराचे अनुकरण होण्याची शक्यता; पण तसे घडले नाही.

कोकणावरील पुस्तके ----------

कथा कोकण किनाऱ्याची (प्रकाश गोळे)
कोकणची निसर्गयात्रा (प्रा. सुहास बारटक्के)
कोकणदर्शन (ना.स. देशपांडे, र.य. साने)
कोकण - विविध दिशा आणि दर्शन (प्रतिमा प्रकाशन)
कोकणातल्या आडवाटा (प्रा. सुहास बारटक्के)
कोकणातील लोककथा आणि गजाली (विद्या प्रभू)
कोंकणी गं वस्ती (कथासंग्रह, मधु मंगेश कर्णिक)
कौटुंबिक सहलीसाठी निसर्गरम्य कोकण भाग १ ते ४ (अदितीज पब्लिकेशन)
चला कोकणात (डॉ. नीला पाढरे, शैला कामत)
भटकंती कुडाळ-वेंगुर्ल्याची (महेश तेंडुलकर).

देशातील नदीकाठी वसलेली महत्वाची शहरे

देशातील नदीकाठी वसलेली महत्वाची शहरे :

1)झेलम –       श्रीनगर

2)यमुना –       आग्रा,दिल्ली

3)सतलज –      लुधियाना

4)सिंधु –         लेह

5)गंगा –         वाराणसी

6)मुसी –         हैद्राबाद

7)ब्रह्मपुत्रा –    गुवाहाटी (गोहत्ती)

8)तापी –        सुरत

9)गोदावरी –    नांदेड, नाशिक

10)कृष्णा –       विजयावाडा

11)साबरमती –   अहमदाबाद

12)शरयू –        अयोध्या

13)कावेरी –      तंजावर

14)हुगळी –      कोलकाता

15)गोमती –     लखनऊ

____________________

नागपुर प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती

नागपुर प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती -----

1. नागपुर जिल्हा :
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – नागपुर
लोकसंख्या – 46,53,171 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

तालुके – 15 – काटोल, सावणेर, रामटेक, हिंगणा, नागपुर (ग्रामीण), नागपुर (शहर), उमरेड, कामठी, नरखेड, कळमेश्वर, मौदा, भिवापुर, कुही, पारशीवणी, देवलापूर.

सीमा – नागपुर जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेशातील छिदवाडा व शिवणी हे जिल्हे असून वायव्येस अमरावती जिल्हा आहे. दक्षिणेस चंद्रपुर जिल्हा, पूर्वेस भंडारा जिल्हा आणि पश्चिमेस वर्धा जिल्हा आहे.

नागपुर जिल्हा विशेष----------

नाग नदीच्या काठी असलेल्या या शहराला नाग नदीवरून नागपुर हे नाव पडले. हे शहर मराठा राजवटीत भोसल्यांच्या राजधांनीचे शहर होते. येशील दीक्षाभूमी हे स्थान प्रसिध्द आहे.

महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. संत्र्यासाठी देशातच नव्हे तर विदेशात सुध्दा प्रसिध्द आहे.
4 फेब्रुवारी 2004 रोजी नागपुर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला.

नागपुर विद्यापीठाचे नामकरण ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठअसे करण्यात आले.

नागपुर जिल्ह्यातील प्रमुख स्थळे--------

नागपुर – महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. येथे महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते. येथील सीताबर्डीचा किल्ला पाहण्यासारखा आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ, निरी; रमन विज्ञान केंद्र प्रसिध्द आहे.

कामठी – दगडी कोळश्याच्या खाणीसाठी प्रसिध्द आहे. येथे सैनिकी शिक्षण देणारे विद्यालय असून अलीकडे येथील ड्रॅगण पॅलेस टेम्पल प्रेक्षणीय स्थळ म्हणून विकसित होत आहे.

काटोल – येथे लिंबू या फळाचे संशोधन केंद्र आहे.
सावनेर – दगडी कोळश्याच्या खाणी आहेत.
रामटेक – येथेच महाकवी कालिदासांनी मेघदूत हे काव्य लिहिले होते. येथे महाकवी कालिदास स्मारक आहे.

अंभोरा – येथील चैतन्येश्वराचे व हरिहर स्वामींचे मंदिर प्रसिध्द आहे.
कळमेश्वर – संत्रा व मिरचीच्या बाजारासाठी प्रसिध्द आहे.
भिवापुरमिरचीच्या बाजारासाठी प्रसिध्द आहे.

नागपुर जिल्ह्याची वैशिष्ट्ये---------
14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हजारो अनुयायांसह बौध्द धर्माचा स्वीकार करून दीक्षा घेतली. हे जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे धर्मांतर होय.)

याच स्थळाला दीक्षाभूमी म्हणून ओळखल्या जाते.
कामठी येथील सर्वदूर गाजलेले ड्रॅगण पॅलेस हे बौध्द धम्म मंदिराचे 23 नोव्हेंबर 1999 ला उद्घाटन झाले. अतिशय देखणी वास्तु असणारे हे मंदिर ड्रॅगण पॅलेस मंदिर म्हणून ओळखले जाते.