Tuesday 8 October 2019

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे ‘ई-दंत सेवा’ संकेतस्थळ

◾️केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मुख-आरोग्याच्या संदर्भात ज्ञानाच्या प्रसारासाठी एक संकेतस्थळ तयार केले आहे.

◾️केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते 7 ऑक्टोबर 2019 रोजी ‘ई-दंत सेवा’ या नावाने एक संकेतस्थळ आणि एका मोबाइल अॅपचे उद्घाटन करण्यात आले आहे.

◾️नेत्रहीन व्यक्तींसाठी देखील याच्यासंदर्भात ब्रेल लिपीत एक पुस्तिका आणि ध्वनीफिती प्रकाशित करण्यात आले आहे. तसेच गर्भवती महिला आणि बालकांसाठी एका पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.

             📌ठळक वैशिष्ठ्ये

◾️‘ई-दंत सेवा’ हे पहिले-वहिले राष्ट्रीय डिजिटल व्यासपीठ आहे, ज्याद्वारे मुखा-संबंधी आरोग्याविषयी माहिती प्रदान केले जाते.

◾️अखिल भारतीय वैद्यकीय शास्त्र संस्था (AIIMS) आणि इतर भागधारकांसह मंत्रालयाच्या या पुढाकाराने मुखासंबंधी आरोग्य राखण्याविषयी महत्त्व लोकांना समजून घेण्यास मदत होणार आहे.

◾️संकेतस्थळावर 2014 साली चालू झालेल्या राष्ट्रीय मुख-आरोग्य कार्यक्रमाविषयी माहिती, सर्व दंत-विषयक सुविधांची आणि महाविद्यालयांची तपशीलवार यादी, शैक्षणिक माहिती आणि संपर्क साहित्य आणि 'सिम्प्टंस चेकर' या नावाचे एक साधन आहे जे आरोग्याच्या समस्येबाबत लक्षणे याबाबत माहिती पुरविते.  

◾️तसेच बचाव करण्याचे मार्ग, उपचार पद्धती आणि सर्वात जवळची उपलब्ध दंत सुविधा (सार्वजनिक आणि खासगी दोन्ही) शोधण्यासाठी निर्देशित करते.

No comments:

Post a Comment

Latest post

सुनील छेत्री तडकाफडकी निवृत्त

➡️सोशल मीडियावर घोषणा : ६ जूनला कुवेतविरुद्ध खेळणार अखेरचा सामना 🔖छेत्रीचा जलवा  :- 💡२००७, २००९ आणि २०१२ मध्ये नेहरू चषक विजेत्या भारतीय स...