Tuesday 8 October 2019

कॉर्पोरेट कर 22% एवढा कमी करण्याचा सरकारचा निर्णय

✍देशातल्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे.

✍या प्रयत्नाचा भाग म्हणूनच केंद्रीय अर्थ मंत्रालयाने कॉर्पोरेट कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

✍कोणत्याही प्रकारची सवलत न घेणाऱ्या कंपन्यांच्या करामध्ये कपात करून दर 22 टक्के करण्यात आले आहेत.

✍उत्पादन आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात केलेल्या बदलांची अंमलबजावणी या आर्थिक वर्षापासून करण्यात येणार असून, कोणतीही सवलत न घेणाऱ्या भारतीय कंपन्यांना 22 टक्के कर द्यावा लागणार आणि अधिभार आणि सेस मिळून एकूण 25.17 टक्के कर द्यावा लागणार.

✍मात्र याचा लाभ लगेच मिळणार नाही. घरगुती सामानापासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत अनेक वस्तूंचे दर या करकपातीमुळे कमी होतील, मात्र त्याची अंमलबजावणी तातडीने होणार नाही.

✍करकपातीमुळे कंपन्यांच्या हाती जो पैसा वाचणार, त्याचा उपयोग कंपन्या आधी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी करणार.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतीय कर संरचना (Indian Tax Structure)

व्याख्या :- "जनतेच्या कल्याणासाठी शासनाला करावा लागणारा खर्च भागविण्याच्या हेतूने शासनाने लोकांकडून सक्तीने घेतलेली रक्कम म्हणजे कर होय...