Saturday 2 November 2019

राजधानीत आरोग्य आणीबाणी

📌वायुप्रदूषणाची स्थिती खालावली, शाळांना सुट्टी

📌 शुक्रवारी वायुप्रदूषणाची स्थिती इतकी खालावली की पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकारणाने संपूर्ण दिल्ली परिसरात आरोग्य आणीबाणी जाहीर करावी लागली.

📌दिल्ली गॅस चेंबर बनली असून नागरिकांच्या आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होऊ  लागला आहे.

📌पंजाब आणि हरियाणातील शेतजमिनी जाळल्या जात असून त्याचा भुर्दंड दिल्लीकरांना भोगावा लागत असल्याची टीका आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केरीजवाल यांनी केली आहे.

📌दिल्ली सरकारने शाळांना पुढील पाच दिवस सुट्टी दिली असून ५० लाख मास्कचे वाटप केले जाणार असून शुक्रवारी केजरीवाल यांनी वाटपाला सुरुवात केली.

📌राजधानीत ५ नोव्हेंबपर्यंत सर्व बांधकामांवर बंदी घालण्याचा आदेश प्रदूषण नियंत्रण प्राधिकारणाने दिला आहे. ऑक्टोबरपासूनच शेतजमिनी जाळण्याची प्रक्रिया सुरू होते.

📌त्याचा प्रचंड धूर थेट दिल्ली शहरात पसरत असल्याने तसेच, दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे वायुप्रदूषणाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढते.

✍ अत्यंत गंभीर स्थिती

📌हवेची श्रेणी उत्तम गुणवत्ता सरासरी ०-५० इतकी   मानली जाते.
📌 ५१-१०० ही श्रेणी समाधानकारक, 📌 १०१-२०० मध्यम,
📌 २०१-३०० घातक,
📌 ३०१-४०० अत्यंत घातक,
📌 ४०१-५०० अत्यंत गंभीर अशा श्रेणीमध्ये हवेतील प्रदूषणाची स्थिती मोजली जाते.

📌शुक्रवारी दिल्लीत हवेची गुणवत्ता सरासरी ५०० हूनही अधिक म्हणजेच अत्यंत गंभीर या श्रेणीत होती.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 07 मे 2024

◆ दरवर्षी 7 मे रोजी जागतिक ॲथलेटिक्स दिन जगभरात साजरा केला जातो. ◆ भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स नासाच्या स्टारलाइनर मोहिमेअंत...