Sunday 8 December 2019

तुम्हाला माहीत आहे का - फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस का असतात ?

सध्याचे कॅलेंडर हे रोमन कॅलेंडर पासून प्रेरित झालेले आहे. इसवी सन पूर्व रोमन कॅलेंडरमध्ये फक्त 10 च महिने होते. मार्चपासून डिसेंबर पर्यंतच महिने होते.

👉 डिसेंबर ते फेब्रुवारी थंडी खूप असल्याने त्या दिवसात कुठलेच कामे होत नसायची आणि शेवटचे 60 दिवस डिसेंबरमध्येच जोडले जायचे.

👉 काही कालावधीनंतर रोमन राज्यकर्त्यांनी यात सुधार केला आणि डिसेंबर नंतर जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने टाकण्यात आले.

👉 यानुसार फेब्रुवारी हा शेवटचा महिना झाला आणि शेवटी उरलेले दिवस फेब्रुवारीमध्ये टाकण्यात आले. त्यावेळेस फेब्रुवारीत 28च दिवस उरले.

👉 नंतर ज्युलियस सीजर या रोमन राजाने प्रथा बदलून जानेवारीपासून वर्षाची सुरुवात केली. पण फेब्रुवारीमधील दिवसांची संख्या मात्र तीच राहिली. नंतर काही भौगोलिक कारणांनी लीप वर्षात एक दिवस जास्त असतो हा शोध लागला.

👉 हा दिवस अॅडजस्ट करण्यासाठी सोयीस्कर महिना फेब्रुवारी सापडला कारण यात आधीच कमी दिवस होते. म्हणून लीप वर्षी फेब्रुवारी 29 दिवसांचा असतो.

No comments:

Post a Comment

Latest post

सुनील छेत्री तडकाफडकी निवृत्त

➡️सोशल मीडियावर घोषणा : ६ जूनला कुवेतविरुद्ध खेळणार अखेरचा सामना 🔖छेत्रीचा जलवा  :- 💡२००७, २००९ आणि २०१२ मध्ये नेहरू चषक विजेत्या भारतीय स...