Monday 23 December 2019

चालू घडामोडी ( जाने. १९ ते मार्च १९) महत्वाचे ...


--------------------
• २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनापासून ब्रिटीश मार्शल धुनएवजी,प्रथमच भारतीय मार्शल धून 'शंखनाद" वाजवण्यात आली.भारतीय लष्करासाठी ही धून नागपूर येथील धरमपेठ महाविद्यालयाच्या संगीताच्या प्राध्यापिका डॉ.नाफडे यांनी संगीतबद्ध केली आहे.

• औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाचा कॅडेड सागर मुगले याला राजपथावरील १४४ सदस्यीय एनसीसी पथकाचे नेतृत्व करण्याचा मान मिळाला .राज्यातील २२ कॅडेडस पथसंचलनात सहभागी झाले.

• २०२२ वर्षापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आत्तापर्यंत सुमारे ४१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला.

• भारतात होणाऱ्या एकूण थेट विदेशी गुंतवणुकीपैकी ३० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. २०२५ वर्षापर्यंत महाराष्ट्र हे पहिले ट्रीलिअन डॉलरची अर्थव्यवस्था असणारे राज्य बनेल

• केंद्र सरकारने केलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात सातारा जिल्हाचा स्वच्छतेमध्ये पहिला क्रमांक लागला. तर नाशिक व सोलापूर जिल्हा परीषदेचा नागरीकांचा प्रतिसाद या घटकात विशेष सन्मान करण्यात आला.

• स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत देशपातळीवर स्वच्छता दर्पण या घटकाखाली मुल्यांकन करण्यात आले .यामध्ये देशस्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वर्धा, सिंधूदुर्ग ,सांगली आणि कोल्हापूर या जिल्हांचा सन्मान करण्यात आला.

• युनिसेफच्या आणि इतरसामाजिक संस्थांच्या साह्यानेप्रत्येक गावाचा शाश्वत स्वच्छतेचा आराखडा तयार केला जात आहे.यामध्ये गावकऱ्यांचा सहभाग घेतला असल्याने यातून स्वच्छविषयी लोकशिक्षणही घडत आहे असा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले.

• ग्रामीण भागात शुद्ध व पुरेसे पाणी मिळावे,यासाठी मुख्यंमंत्री ग्रामीण पेयेजल योजना राबविण्यात आली

• २०२२ पर्यंत प्रत्येक बेघर कुटुंबकडे आपला हक्काचा निवारा असावा असा निर्धार केद्र सरकाने केला

• प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १२ लाख घरांची निर्मिती व २०२० पर्यंत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या वर्गातील एकही गरजू कुटुंब घराविना वंचित राहू नये असे महाराष्ट्र सरकारनेठरवले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

हिमालयातील 8000 मी.उंचीपेक्षा जास्त उंची असणारी शिखरे..

-----------------======---------------------- शिखर               उंची(मी)             स्थान ---------------------------------------------...