Monday 23 December 2019

अफगाणिस्तानने ‘इंडियन फार्माकोपीया’  (IP)पुस्तकाला मान्यता दिली

🎆 अफगाणिस्तान इस्लामिक प्रजासत्ताक या देशाने ‘इंडियन फार्माकोपीया’ या पुस्तकाला मान्यता दिली असून या पुस्तकाला मान्यता देणारा पहिला देश ठरला आहे.

🎆 देशाच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय औषधी व आरोग्य उत्पादने नियमन विभागाने ‘इंडियन फार्माकोपीया’ या पुस्तकाला औपचारिक मान्यता दिली.

📚 ‘इंडियन फार्माकोपीया’ पुस्तक 📚

🍀 इंडियन फार्माकोपीया भारताच्या ‘औषधी व सौंदर्यप्रसाधने कायदा-1940’ अन्वये असलेल्या मानकांचे अधिकृत असे मान्यताप्राप्त पुस्तक आहे.

🍀 हे पुस्तक औषधांची ओळख, शुद्धता आणि क्षमता यांच्या बाबतीत भारतामध्ये उत्पादित आणि विक्री केली जाणार्‍या औषधांची मानके निर्दिष्ट करते.

🍀 दरवर्षाच्या अखेरीस ‘इंडियन फार्माकोपीया’ पुस्तक प्रकाशित केले जाते.

🔴 भारतीय फार्माकोपीया 
आयोग (IPC) विषयी 🔴

🎆 भारतीय फार्माकोपीया आयोग (IPC) भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे.

🎆 भारत देशात तयार होणार्‍या औषधांची मानके ठरवण्यासाठी IPCची स्थापना करण्यात आली आहे.

🎆 प्रदेशात असलेल्या रोगांवरच्या उपचारासाठी सामान्यत: आवश्यक असलेल्या औषधांचे मानके नियमितपणे अद्ययावत करणे, हे या संस्थेचे मूलभूत कार्य आहे.

🎆 संस्थेची स्थापना 1956 साली झाली.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...