Monday 23 December 2019

झारखंड भाजप पराभूत ,धनुष्यबाण चे सरकारने

◾️झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत.

◾️ विधानसभेच्या सर्व ८१ जागांचे निकाल प्रदीर्घ मतमोजणीनंतर रात्री उशिरा हाती आले असून
◾️
📌 झारखंड मुक्ती मोर्चा-
📌 काँग्रेस-
📌 राष्ट्रीय जनता दल या तीन पक्षांच्या आघाडीने ४७ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भाजपला या निकालांत मोठा धक्का बसला असून

◾️भाजपचे संख्याबळ २५ पर्यंत घसरलेच शिवाय राज्यातील सत्ताही भाजपच्या हातून निसटली आहे.

◾️हेमंत सोरेन हे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील हे निश्चित झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल सोरेन यांचे अभिनंदन केले आहे.

◾️ तीन पक्षांच्या आघाडीने ८१ पैकी ४७ जागा जिंकल्या आहेत.

◾️ २०१४ मध्ये भाजपने ऑल झारखंड स्टुडेंट्स युनियनसोबत (आजसू) आघाडी केली होती. या आघाडीला ४२ जागांसह काठावरचे बहुमत मिळाले होते.

◾️मुख्यमंत्री रघुवर दास यांनाही विजय मिळवता आला नाही.

◾️जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार सरयू राय यांनी रघुवर दास यांचा पराभव केला.

◾️दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चाची धुरा सांभाळणारे हेमंत सोरेन  यांनी
🔘 दुमका आणि
🔘 बरहेट या दोन्ही जागांवर दणदणीत विजय मिळवला.

◾️दोन्ही मतदारसंघांत त्यांनी भाजपच्या उमेदवारांना पराभवाची धूळ चारली.

✍ पक्षीय बलाबल:

📌 झारखंड मुक्ती मोर्चा- ३०
📌 भाजप- २५
📌 काँग्रेस- १६
📌 झारखंड विकास मोर्चा- ३
📌 आजसू- २
📌 राजद- १
📌 भाकप- १
💐 राष्ट्रवादी काँग्रेस- १
📌 अपक्ष- २

◾️ एकूण जागा- ८१

◾️ झारखंडच्या निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राप्रमाणे येथेही पुन्हा एकदा धनुष्यबाणानेच भाजपचा वेध घेतला आहे.

◾️महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपला धक्का दिला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन करून सेनेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवले तर झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाने काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलासोबत निवडणूकपूर्व आघाडी करून भाजपला सत्तेतून खाली खेचले.

◾️भाजपला लागोपाठ दोन धक्के देणाऱ्या
📌 शिवसेना 🏹 आणि
📌 झारखंड मुक्ती 🏹 मोर्चा या दोन्ही पक्षांची निशाणी धनुष्यबाण हीच आहे, हे विशेष.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...