Monday 23 December 2019

इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात भारत आघाडीवर

📛निरनिराळ्या कारणांमुळे इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात भारत आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.

📛यावर्षी देशातील निरनिराळ्या भागांमध्ये विविध कारणांमुळे 95 वेळा इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती.

📛नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर त्या विरोधात देशातील अनेक भागांमध्ये आंदोलन करण्यात येत आहे.

📛त्यानंतरही कोणत्याही प्रकारची अफवा पसरू नये यासाठी देशाच्या काही भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

📛इंटरनेट सेवा बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे मोठं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती ‘इंडियन कौन्सिल फॉक रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स’सोबतच दोन थिंक टँकनं सादर केलेल्या अहवालातून समोर आली आहे.

📛2012 पासून आतापर्यंत देशभरात 367 वेळा इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

📛2018 मध्ये जगभरातील इंटरनेट सेवेच्या बंदच्या प्रकरणांपैकी तब्बल 67 टक्के प्रकरणं ही भारतातील आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

पोलीस भरतीसाठी महत्वाचे 50 प्रश्न उत्तरे

1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ◾️  नाईल (4,132 मैल) 2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? ◾️ आशिया 3) जगातील सर्वात मोठा देश कोणता...