Monday 23 December 2019

चालू घडामोडी ( जाने. १९ ते मार्च १९) क्रीडा घडामोडी


••••••••••••••••••••••••••••••••••••••
● इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा 2019:-
------------------------------------------
● भारताच्या सायना नेहवालने इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.
● कॅरोलिना मरिनला सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे तिने अंतिम फेरीत माघार घ्यावी लागली. त्यामुळे सायनाला विजयी घोषित करण्यात आलं
● सायनाचं 2019 मधील पहिलं विजेतेपद आहे

● मुंबई मॅरेथॉन २०१९:-
------------------------------------
• मुंबई मॅरेथॉन २०१९ मध्ये पुरुषांमध्ये केनियाच्या कॉलमस लॅगट (२:०९:१५ )याने, तर महिलांमध्ये इथियोपियाच्या वॉर्कनेश अलेमू (२:२५:४५ )हिने बाजी मारली.
• पुरुषांच्या स्पर्धेत आयच्यू बॅनटाय (२:१०:०५) आणि सुमेत अकलन्यू (२:१०:१४) या इथियोपियाच्या धावपटूंनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पटकावले. तर महिलांमध्ये गोबेना हिला आणि बिर्के देबेले धावपटूंनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पटकावले
• मुंबई मॅरेथॉनचे आयोजन दरवर्षी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी करण्यात येते
• लंडन मॅरेथॉनच्या धर्तीवर मुंबई मॅरेथॉनचे आयोजन होते.
• २००४ पासून या स्पर्धेला सुरुवात

● रणजी करंडक २०१८-१९:-
--------------------------------------
• सौराष्ट्रविरुद्धच्या अंतिम लढतीत ७८ धावांनी विजय मिळवत विदर्भने दुसऱ्यांदा रणजी करंडक जिंकला.
• सलग दोन वेळा आपल्या संघाला जेतेपद मिळवून देणारा फैज फाजल हा ११ वा कर्णधार ठरला.सलग दुसऱ्यांदा ट्राॅफी जिंकणारा विदर्भ हा सहावा संघ ठरला.यापूर्वी मुंबई,सौराष्ट्र,दिल्ली,राजस्थान,कर्नाटक संघाने असे यश मिळवले.विदर्भाने गत सत्रात दिल्लीचा अंतिम सामन्यात पराभव केला होता.
• वासिम जाफर १० रणजी विजेतेपद मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहभागी झाला आहे.या यादीमध्ये अशोक मंकड हे १२ रणजी विजेतेपदांसह पहिल्या तर अजित वाडेकर ११ विजेतेपदांसह दुसऱ्या स्थानावर आहे. वासिम जाफरने 10 विजेतेपद मिळवत मनोहर हर्डीकर आणि दिलीप सरदेसाई या खेळाडूंशी बरोबरी केली आहे

● रणजी ट्राफी:-
• स्पर्धेची सरुवात :- १९३४
• एकूण संघ:-३७
• सर्वाधिक विजेता संघ :-मुंबई (४१ वेळा )
• सर्वाधिक धावा :- वसिम जाफर (११७७५ धावा )
• सर्वाधिक बळी :- राजेंद्र गोयल (६४० बळी)
• पहिले आंतराष्ट्रीय सामना खेळणारे पहिले खेळाडू :रणजितसिंहजी (रणजी ) यांच्या नावाने ही स्पर्धा ओळखली जाते
----------------------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

सुनील छेत्री तडकाफडकी निवृत्त

➡️सोशल मीडियावर घोषणा : ६ जूनला कुवेतविरुद्ध खेळणार अखेरचा सामना 🔖छेत्रीचा जलवा  :- 💡२००७, २००९ आणि २०१२ मध्ये नेहरू चषक विजेत्या भारतीय स...