विभक्ती

🔶विभक्ती- नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात.

🔶कारक- वाक्यातील शब्दांचा त्यातील मुख्य शब्दांशी म्हणजे क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असलेला संबंध म्हणजे कारक होय.

🔶कारकार्थ- वाक्यातील नाम किंवा सर्वनाम त्यांचे क्रियापदांशी जे संबंध असतात, त्यांना कारकार्थ असे म्हणतात

🔶उपपदार्थ- क्रियापदाशिवाय इतर असलेल्या संबंधांना उपपदार्थ असे म्हणतात.

विभक्तीचे प्रकार

प्रत्येक वाक्य म्हणजे एक विधान असते यात क्रियापद हा मुख्य शब्द होय

. ही क्रिया करणारा कोणीतरी असतो. त्याला कर्ता असे म्हणतात.

ही क्रिया कोणावार घडली, कोणी केली, कशाने केली, कोणासाठी केली, कोठून घडली, कोठे किंवा केंव्हा घडली, हे सांगणारे शब्द वाक्यात असतात.

नामांचा क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध अशा ८ प्रकारे असतो.

विभक्तीचे एकुण ८ प्रकार पुढीलप्रमाणे मानले जातात.

🌷प्रथमा

🌷द्वितीया

🌷तृतीया

🌷चतुर्थी

🌷पंचमी

🌷षष्ठी

🌷सप्तमी

🌷संबोधन

🔶विभक्तीचे अर्थ🔶

कर्ता – क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा वाक्यात कोणीतरी असतो. त्याला कर्ता असे म्हणतात. प्रथमेचा प्रमुख कारकार्थ कर्ता होय. कधी कधी कर्त्याची विभक्ती प्रथमा असते.
उदा- मीना पुस्तक वाचते.

कर्म – कर्त्याने केलेली क्रिया कोणावार घडली हे सांगणारा शब्द म्हणजे कर्म होय. द्वितीयेचा कारकार्थ कर्म असतो. प्रत्यक्ष कर्माची विभक्ती द्वितीया असते. तर अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती अप्रत्यक्ष चतुर्थी असते.
उदा- राम रावणास मारतो.

करण– करण म्हणजे साधन. वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते, किंवा ज्याच्या साधनाने घडते, त्याला करण असे म्हणतात. तृतीयेचा मुख्य कारकार्थ करण आहे.
उदा- आई चाकुने भाजी कापते.

संप्रदान – जेंव्हा क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते, तेंव्हा ते दान ज्याला करण्यात येते, त्याच्या वाचक शब्दाला किंवा देणे, बोलणे, सांगणे, इ. अर्थाच्या क्रिया ज्याला उद्देशून घडतात, त्या वस्तूला किंवा स्थानाला संप्रदान असे म्हणतात. चतुर्थीचा मुख्य कारकार्थ संप्रदान आहे.
उदा. मी गुरूजींना दक्षिणा दिली.

अपादान – क्रिया जेथून सुरू होते, तेथून ती व्यक्ती वा वस्तू दूर जाते. म्हणजे क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून एखाद्या वस्तूचा वियोग दाखवायचा असतो, त्यास अपादान असे म्हणतात. पंचमीचा कारकार्थ अपादान आहे.
उदा. मी शाळेतून आताच घरी आलो.

अधिकरण – वाक्यातील क्रिया केंव्हा आणि कोठे घडली हे क्रियेचे स्थान किंवा काळ दर्शविणाऱ्या शब्दाच्या संबंधास अधिकरण असे म्हणतात. सप्तमीचा मुख्य कारकार्थ अधिकरण हा आहे. उदा. दररोज सकाळी मी शाळेत जातो.

संबंध – षष्ठी विभकीत शब्दांचा संबंध सामान्यतः क्रियापदांशी न येता दुसऱ्या नामाशी येतो. षष्ठीचा अर्थ संबंध. केंव्हा केंव्हा षष्ठीलाही कारकार्थ असलेला आढळतो.
उदा. रामाची बायको होती सीता.

▪️संबोधन – संबोधनाचा उपयोग हाक मारताना करतात. जे नाम संबोधन म्हणून वापरले जाते, त्याचा विकर होतो व प्रत्ययही लागतात. म्हणून संबोधन ही आठवी विभक्ती आहे.
उदा. मुलांनो, खाली बसा.

विभक्ती अर्थावरून मानावी की प्रत्ययावरून-

उदा.

१)तो घरातून बाहेर पडला.

२) तुझ्या हातून हे काम होणार नाही.

वरीलपैकी पहिल्या वाक्यात घरातून या शब्दामध्ये पंचमी विभक्ती असून पंचमीचा कारकार्थ अपदान आहे.

दुसऱ्या वाक्यात हातून या शब्दात ऊन हा प्रत्यय आहे. त्यावरून आपण येथे पंचमी विभक्ती आहे असे निर्विवादपणे म्हणू शकतो का? प्रत्ययावरून पंचमी म्हणाव तर कारकार्थ करण आहे म्हणजेच तृतीया विभक्ती यायला हवी.

मग हातून या शब्दामध्ये कोणता विभक्ती प्रत्यय असला पाहिजे?

हा वाद नेहमी निर्माण होतो. अर्थाशिवाय प्रत्यय नाहीत आणि प्रत्ययाशिवाय अर्थ व्यक्त करता येत नाही.

अर्थ व प्रत्यय हे परस्परांवर अवलंबून असल्यामुळे विभक्ती या प्रत्ययावरून मानाव्यात असे म्हणता येईल.

 म्हणून विभक्ती ही कारकार्थावरून मानण्यापेक्षा प्रत्ययावरून मानावी. मग विभक्तीचा अर्थ वेगळा असला तरी काही हरकत नाही.
जॉईन करा https://t.me/talathi20

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी

प्रश्न 1:- ₹6 लाख कोटी मार्केट कॅप ओलांडणारी 8वी कंपनी कोणती आहे? उत्तर :- भारती एअरटेल. प्रश्न 2:- सियाचीनमध्ये तैनात करण्यात आलेल्या भा...