Monday 31 January 2022

पेशीजन्य रोग (Cellular Disease)

कर्करोग/ कॅन्सर (Cancer)

व्याख्या: पेशींच्या अनियंत्रित  विभाजनातून शरीराच्या कोणत्याही भागात अनावश्यक पेशींच्या गाठी/ समुह तयार होणे म्हणजेच कर्करोग होय. अश्या अनावश्यक पेशींच्या समूहालाच गाठ (Tumour) असे म्हणतात.
गाठीचे प्रकार (Types Of Tumours)

निरुपद्रवी गाठ (Benign Tumour): अशा प्रकारच्या गाठींचा परिणाम शरीरातील इतर अवयवांवर होत नाही.

दुर्दम्य गाठ (Mallignant Tumour):अशा प्रकारच्या गाठींचा परिणाम अंतर्गत अवयवांच्या कार्यावर होतो.  आणि यामुळेच कर्करोगाच्या स्थितीला दूर्दम्यता (Mallignancy) असेही म्हणतात.

रक्ताद्वारे कॅन्सरच्या वाढत असलेल्या पेशी जेव्हा सर्व शरीरभर पसरतात त्या स्थितीला Metastatis असे म्हणतात.

मानवी शरीरातील कोणत्याही अवयवात कॅन्सर होऊ शकतो. सर्वाधिक तोंडाचा, स्तनांचा, आणि रक्ताचा कॅन्सर बघायला मिळतो.

लक्षणे: कर्करोगाची लक्षणे सुरुवातीला आढळत नाहीत. न भरणाऱ्या जखमा, असाधारण रक्तस्त्राव, अपचन, ताप, वजन कमी होणे, खूप थकवा जाणवणे, त्वचेमध्ये बदल होणे.

कर्करोगाची कारणे:

कर्करोग निर्माण करणाऱ्या घटकांचे तीन गट केले जाते.

1) अपसारी/ प्रारणे ऊर्जा (radiant Energy):

अतिनील किरणे, क्ष- किरणे, आणि गॅमा किरणे कर्करोगजन्य असतात. ही  किरणे विविध मार्गांनी डी. एन. ए. रेणूंची हानी करतात.
डी. एन. ए. वरील परिणांव्यतिरिक क्ष-किरणे आणि गॅमा किरणे उतींमध्ये घटक मुक्त मूलके निर्माण करतात.
जगातील सुमारे 10% लोकांना यामुळे कर्करोग होतो.

2) रासायनिक सयुंगे (Chemical Compounds):

जगातील सुमारे 80% लोकांना विविध रासायनिक सयुंगांमुळे कर्करोग होतो.
उदा. आर्सेनिक, कोबाल्ट, कॅडमिअम, अल्फोटॉक्सिन -B-1, अबेसटॉस, पोलिसायक्लिक हाड्रोकार्बन, बेन्झीन, बेरिलियम, निकेल, डॉक्टीनोमायसिन या संयुगांचा परिणाम DNA रेणूंतील ग्वानिन या नत्ररेणूवर होतो.

3) विषाणू (Viruses):

कॅन्सर घडवून आणण्याची क्षमता असलेल्या जनुकांना कर्करोग जनुक म्हणतात. काही रोगांचे विषाणू कर्करोगजनक स्थिती निर्माण करतात. त्याचे प्रमाण 5% आहे.
उदा: हिपॅटिटिस -B आणि हिपॅटिटिस -C च्या विषाणूमुळे यकृताचा कर्करोग होतो.
राउस -सार्कोमा हर्पस विषाणूमुळे रक्ताचा कर्करोग होतो.
पॅपिलोमा विषाणूमुळे त्वचेचा कर्करोग होतो.

4) इतर घटक (Miscllaneous):

जगातील सुमारे 5% लोकांना अनारोग्यादायी सवयीमुळे कर्करोग होतो व दिवसेंदिवस यांचे प्रमाण वाढत चालले आहे.
धूम्रपान आणि तंबाखू सेवनामुळे तोंड, स्वरयंत्र, फुप्फुस, ग्रसनी, ग्रासनिका, स्वादुपिंड इत्यादींचा कर्करोग होतो.
अतिमद्यप्राशनामुळे यकृत व ग्रासनलिका यांचा कर्करोग होतो.
अतिमेदयुक्त आहारामुळे स्तनांचा कर्करोग होतो.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...