Thursday 16 January 2020

नवी दिल्लीत 14 जानेवारीपासून  ‘रायसीना संवाद’ याचा प्रारंभ

- 14 जानेवारी ते 16 जानेवारी 2020 या काळात दरवर्षी प्रमाणे नवी दिल्लीत ‘रायसीना संवाद 2020’ ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

▪️कार्यक्रमाचा विषय: “21@20: नेव्हिगेटींग द अल्फा सेंचुरी”

- ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन हे या संमेलनाचे मुख्य वक्ते आहेत. या बैठकीला संबोधित करणार्‍या इतर मंत्र्यांमध्ये यजमान भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लाव्हरोव्ह यांचा समावेश आहे.

- तसेच इराण, डेन्मार्क, मालदीव, मोरोक्को, ऑस्ट्रेलिया, भूतान, दक्षिण आफ्रिका, झेक प्रजासत्ताक, एस्टोनिया आणि उझबेकिस्तानमधले प्रतिनिधी यात भाग घेणार आहेत.

- यावर्षी मोठ्या संख्येनी जगभरातल्या परराष्ट्र मंत्र्यांची उपस्थिती भू-राजनैतिक परिषदेत असणार आहे. परिषदेत 90 देशांमधून 150 हून अधिक वक्ता आणि 550  प्रतिनिधी भाग घेणार आहेत.

▪️कार्यक्रमाविषयी

- 'रायसीना संवाद’ ही नवी दिल्लीत दरवर्षी आयोजित होणारी बहुपक्षीय परिषद आहे. 2016 सालापासून तीन दिवस चालणारी ही परिषद भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय आणि ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन (दिल्लीतली स्वायत्त वैचारिक संस्था) यांच्यावतीने संयुक्त रूपात आयोजित केली जाते.

- "रायसीना" हे नाव नवी दिल्लीमधल्या ‘रायसीना टेकडी’ या ठिकाणावरून ठेवले गेले आहे, जे भारत सरकार तसेच राष्ट्रपती भवन, राष्ट्रपतीसाठीचे घर आहे.

- हा कार्यक्रम जागतिक समुदायाला भेडसावणार्‍या सर्वात आव्हानात्मक मुद्द्यांना सोडविण्यासाठी वचनबद्ध आहे. इथे धोरण, व्यवसाय, माध्यमे आणि नागरी समाजातले सर्व जागतिक नेते नवी दिल्लीत एकत्र येतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील आंतरराष्ट्रीय धोरणांच्या विस्तृत विषयावर चर्चा करतात.
---------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...