Thursday 16 January 2020

आता सीएनजीची जागा घेणार बायोगॅस

- कंप्रेस्ड बायोगॅसमार्फत(सीबीजी) संपूर्ण देशामध्ये सीएनजीची मागणी लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पेट्रोलियम आणि गॅस मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली आहे.

- यांच्या माहितीनुसार बायोगॅसची योजना सर्वत्र लागू करण्याचे संकेत आहेत. यामध्ये देशभरात प्रत्येक वर्षाला 6.2 कोटी टन सीएनजीच्या तुलने इतके कंप्रेस्ड बायोगॅसचे उत्पादन होण्याचे अनुमान आहे. 

▪️2023 पर्यंतचे ध्येय

- पेट्रोलियम मंत्रालयाने 2018 मध्ये सतत(सस्टेनेबल अल्टरनेटीव्ह टुवार्ड्स अफोर्डेबल ट्रान्सपोर्टेशन) पहिल्यापेक्षा सक्षम योजना लाँच केली होती.

- याच्या आधारेचे सरकारी तेल ऍण्ड गॅस कंपन्यांना सीबीजी प्रकल्प उभारण्यासाठी प्रोहोत्सान देण्यात आले आहे. यासाठी सरकारने 2023 पर्यंत 1.5 कोटी टन वार्षिक सीबीजीचे उत्पादन करण्याचे ध्येय निश्चित केले आहे.

▪️सीएनजीची 40 टक्के मागणी पूर्ण

- 1.5 कोटी टन सीबीजी उत्पादनाचे ध्येय नि]िश्चत केले जाणार आहे. सीएनजीची सध्याची वार्षिक विक्री 40 टक्क्यापर्यंत पूर्ण होऊ शकते. व्यापारी वर्ष  2018-19 मध्ये 4.4 कोटी टन सीएनजीची विक्री करण्यात आली होती. 

▪️कच्च्या तेलाची आयात घट गरजेची

- सरकार 2022 पर्यंत कच्च्या तेलाची आयात 10 टक्क्यांनी कमी करण्याचा विचार करत आहे. त्यात सीबीजी प्रकल्प उभारण्यासाठी जवळपास 1.75 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याचे संकेत असल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी सांगितले आहे.

- सदरच्या योजनेमधून 75 हजार लोकांना थेट रोजगार उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यासोबतच पाच कोटी टन जैविक खताची निर्मिती होणार असल्याचे नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ युनायटेड नेशन्स ट्रेड अँड डेव्हलपमेंट (UNCTAD ) च्या अहवालानुसार  2023 मध्ये भारतात थेट परकीय गुंतवणुकीत 15 व्या स्थानावर आहे ◾️2023 मध...