Wednesday 22 January 2020

36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडून आढावा

🔰 गोव्यात 20 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन

🔰 केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) किरण रिजीजू यांनी आज मुख्यमंत्री डॉ प्रमोद यांच्यासमवेत आयोजित बैठकीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनाचा आढावा घेतला.

🔰 गोव्यात 20 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर 2020 या काळात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. 

🔰 स्पर्धेत एकूण 37 क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.

🔰 त्यापैकी दोन क्रीडाप्रकार दिल्ली येथे घेण्यात येतील.

🔰 उर्वरीत 35 क्रीडाप्रकार राज्यात होतील.

🔰 केंद्रीय मंत्र्यांनी आज सचिवालयात झालेल्या बैठकीत तयारीचा आढावा घेतला.

🔰 28 फेब्रुवारी पर्यंत सर्व स्टेडिअम सुसज्ज असतील, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. तसेच 31 ऑगस्ट पर्यंत स्पर्धेसाठीची सर्व साधनं स्टेडिअम आणि इतर ठिकाणी तयार असतील.

🔰 स्पर्धेदरम्यान लागणाऱ्या 71 प्रमुख सेवांसाठीच्या कंत्राटाची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले.

🔰 डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडिअम-बांबोळी, बी के एस स्टेडिअम-म्हापसा, टिळक मैदान- मडगाव आणि जवाहरलाल नेहरु स्टेडिअम-फातोर्दा याठिकाणी प्रमुख क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात येणार आहे.

🔰 राज्यात आयोजित करणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा संस्मरणीय ठरतील, असे किरण रिजीजू म्हणाले.

🔰 केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून राज्याला स्पर्धेच्या आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी बैठकीत सांगितले.

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ युनायटेड नेशन्स ट्रेड अँड डेव्हलपमेंट (UNCTAD ) च्या अहवालानुसार  2023 मध्ये भारतात थेट परकीय गुंतवणुकीत 15 व्या स्थानावर आहे ◾️2023 मध...