Wednesday 22 January 2020

शाळांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन अनिवार्य राज्य शासनाचा आदेश.

🎆 शाळेत दररोज परिपाठावेळी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करावं, असा आदेश राज्य शासनानं काल जारी केला.

🎆 सर्व शाळांना हा निर्णय बंधनकारक आहे.

🎆 येत्या रविवारी २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनापासून या निर्णयाची अंमलबजावणी करायला सांगितलं आहे.

🎆 शाळेत विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी पाणी पिण्याची घंटा-वॉटरबेल वाजवण्याचे निर्देश शासनानं दिले आहेत.

🎆 काल याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.

🎆 शाळेच्या वेळापत्रकात दररोज तीन वेळा अशी घंटा वाजवण्याची सूचना यात केली आहे. 

🎆 मुलांनी दररोज किमान दोन लीटर पाणी पिणं आवश्यक आहे, पाण्याच्या कमतरतेमुळे होणारे शारीरिक दुष्परिणाम टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. 

No comments:

Post a Comment

Latest post

संयुक्त गट "ब" आणि "क" पूर्व परीक्षा सराव चाचणी क्र.

 क्रिकेट बाँल ही खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे. ? ⚪️ दराक्ष  ⚪️ मोसंबी  ⚪️ डाळिंब ⚫️ चिकू ☑️ महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने...