Saturday 11 January 2020

खेलो इंडियाचे तिसरे पर्व आजपासून

- पर्व: तिसरे
- स्थळ: गुवाहाटी (आसाम)
- कालावधी: 10 ते 22 जानेवारी 2020
- उद्घाटन सोहळ्यासाठी ध्वजवाहक: आशियाई क्रीडा स्पर्धेतील ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावणारी युवा धावपटू हिमा दास
- वयोगट: 17 आणि 21 वर्षांखालील
- सहभाग: 37 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील तब्बल 6800 पेक्षा जास्त खेळाडू 20 खेळांमध्ये आपले नशीब अजमावतील.
- महाराष्ट्र: 20 पैकी 19 प्रकारांमध्ये आपले खेळाडू मैदानात उतरवले आहेत. महाराष्ट्राने सर्वाधिक खेळाडूंची निवड करत तब्बल 751 खेळाडूंचा चमू ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेसाठी पाठवला आहे.
- यजमान आसाम:  विजेतेपदाला गवसणी घालण्यासाठी कंबर कसली असून 656 खेळाडूंना संघात स्थान दिले आहे.
- हरियाणानेही यंदा 682 खेळाडूंचा चमू या स्पर्धेसाठी पाठवला आहे. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. दादरा नगर हवेलीने फक्त तीन खेळाडूंचा चमू पाठवला असून त्यात एक १०० मीटर धावपटू आणि दोन टेबल टेनिस खेळाडूंचा समावेश आहे.

● शानदार उद्घाटन सोहळा
- ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचा उद्घाटन सोहळा 10 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून सासूराजाय येथील इंदिरा गांधी अ‍ॅथलेटिक्स स्टेडियमवर रंगणार आहेत.
- या कार्यक्रमात गायक शंकर महादेवन आणि ‘अमेरिका गॉट टॅलेंट’ कार्यक्रमात प्रावीण्य दाखवलेल्या ‘व्ही अनबिटेबल्स’ या मुंबईस्थित नृत्यपथकाची. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. अदाकारी पाहायला मिळणार आहे.
- आसामच्या संस्कृती आणि परंपरेची माहिती देणाऱ्या कार्यक्रमात तब्बल 500 कलाकार सहभागी होणार आहेत.

● वैशिष्टय़े
- 13 दिवस रंगणाऱ्या या क्रीडा महोत्सवात 451 सुवर्णपदके जिंकण्याची संधी
- तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, सायकलिंग, टेनिस, जिम्नॅस्टिक्स, जुदो, नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, लॉन बॉल.
- यंदा सायकलिंग आणि लॉन बॉल्स या दोन नव्या खेळांचा समावेश
- गुवाहाटीमधील आठ ठिकाणी विविध खेळांच्या स्पर्धा रंगणार

2018 मधील अव्वल तीन पदकविजेती राज्ये
क्र.     राज्य     सुवर्ण   रौप्य   कांस्य   एकूण
१      हरियाणा  ३८     २६        ३८     १०२
२      महाराष्ट्र   ३६      ३२         ४३     १११
३      दिल्ली     २५     २९         ४०     ९४

2019 मधील अव्वल तीन पदकविजेती राज्ये
क्र.     राज्य     सुवर्ण   रौप्य   कांस्य   एकूण
१      महाराष्ट्र    ८५     ६२     ८१     २२८
२      हरियाणा   ६२     ५६     ६०     १७८
३      दिल्ली      ४८     ३७     ५१     १३६

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 08 मे 2024

◆ ‘जागतिक रेडक्रॉस दिन’ दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो. ◆ व्लादिमीर पुतिन हे पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ◆ ‘बॉर्डर रो...