Wednesday 26 February 2020

जगातील तीन बलाढ्य अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होईल - मुकेश अंबानी : 

‘प्रिमिअर डिजिटल सोसायटी’ आणि जगातील तीन बलाढ्य अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट होण्याची संधी भारताकडे असल्याचं मत रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी व्यक्त केलं. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला सोमवारी भारताच्या दौऱ्यावर आले आहेत.

यावेळी ‘फ्यूचर डिकोडेड समिट’चे आयोजन करण्यात आले होते. या समिटला संबोधित करताना अंबानी बोलत होते. “ट्रम्प २०२० मध्ये जो भारत पाहतील तो कार्टर, क्लिंटन आणि ओबामा यांनी पाहिलेल्या भारतापेक्षा वेगळा असेल,” असं अंबानी यावेळी म्हणाले.

“२०२० मध्ये नवा भारत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं स्वागत करत आहे. देशातील उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन आलं असून डिजिटल अर्थव्यवस्थेच्या बाबतीतही भारत उत्तमरित्या प्रगती करत आहे,” असंही अंबानी यावेळी म्हणाले. “भारत कशाप्रकारे प्रगती करत आहे, याचं मोटेरा स्टेडिअम उत्तम उदाहरण आहे.

या स्टेडिअममधील डिजिटल व्यवस्था ही जगातील कोणत्याही ठिकाणापेक्षा उत्तम आहे. हा नवा भारत आहे. जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होईल याबाबत कोणतीही शंका नाही. फक्त हे पुढील पाच वर्षांमध्ये होईल की दहा वर्षांमध्ये हा चर्चेचा विषय आहे,” असं त्यांनी सांगितलं.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...