Thursday 27 February 2020

विद्यापीठाच्या शैक्षणिक सक्षमीकरणासाठी रतन टाटा यांची सल्लागार परिषदेवर नियुक्ती.

🔰रतन टाटा यांच्या युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा आणि आणि शैक्षणिक, औद्योगिक कार्यक्षेत्रातील जागतिक प्रवाहांचा सखोल अनुभव आता मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

🔰तसेच विद्यापीठात संशोधन व विकासविषयक धोरणे व कृती योजना याबाबत लवकरच शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्याकडून कार्यवाही होणार आहे.कारण मुंबई विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेवर रतन टाटा आणि अनिल काकोडकर यांची राज्यपालांकडून नियुक्ती करण्यात आली आहे.

🔰तर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याच्या नियमानुसार ही नियुक्ती केली असून महाराष्ट्र सरकारच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे.
उपायात्मक नियोजनासंबंधी विद्यापीठाला सल्ला देऊन विद्यापीठाच्या विकासासाठी विशेष काम हाती घेण्याचा पूर्ण अधिकार सल्लागार समितीच्या अध्यक्षास असतो.

🔰त्यामुळे सल्लागार परिषदेवर अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांच्या नामनिर्देशनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

🔰तसेच शिक्षण, संशोधन आणि विकास, प्रशासन यासंबंधीचे अहवाल कृती योजना सादर करून त्याद्वारे कुलगुरूंना सल्ला देणे, वित्तीय साधनसंपत्ती व सुशासन निर्माण करणे, जेणेकरून विद्यापीठ शैक्षणिकदृष्ट्या सशक्त, प्रशासनिकदृष्ट्या कार्यक्षम आणि आर्थिकदृष्ट्या भक्कम व्यवस्था निर्माण करणे, यासाठी विद्यापीठाची सल्लागार परिषद काम करणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना

👉 1. महंमद गझनवी :- अकराव्या शतकापासून भारतावर तुर्काची आक्रमणे होण्यास सुरुवात झाली. गझनीचा तुर्क सत्ताधीश सबक्तगीन याने भारतावर स्वार्‍या...