Thursday 27 February 2020

आपाचे आणि एमएच 60 रोमियो वाढवणार भारतीय सैन्यदलाचं बळ

🔰अमेरिकेसोबतच्या 3 अब्ज डॉलर्सच्या सुरक्षा करारावरील सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

🔰तर या करारांतर्गत भारताला अमेरिकेकडून अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसहित आपाचे आणि एमएच-60 रोमियो हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर्सदेखील मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या पार पडलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी याबाबत माहिती दिली.

🔰तसेच नव्या शस्त्रास्त्रांच्या आणि हेलिकॉप्टर्सच्या खरेदीनंतर भारताचं बळ वाढणार आहे.भारत आणि अमेरिकेदरम्यान असलेले चांगले संबंध हे दोन्ही देशांच्या सरकारमधील नाही तर दोन्ही देशांच्या नागरिकांमधील आहेत, असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.

🔰तर दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी ट्रम्प यांनी उत्तम प्रयत्न केले आहेत. आज आम्ही संरक्षण, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि व्यापार यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा केली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...