Saturday 25 April 2020

भारतीय कंपनीने बनवला कार्डबोर्डचा बेड.

☘करोनाचा प्रादुर्भाव जगभरातील 180 हून अधिक देशामध्ये झाला आहे.जगभरातील अनेक देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव इतक्या मोठ्या प्रमाणात झाला आहे जिवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला आहे.

☘तर आरोग्य सेवेवर ताण पडताना दिसत असून अनेक ठिकाणी पीपीई किट्स (पर्सल प्रोटेकटीव्ह इक्वीपमेंट), मास्क, व्हेंटीलेटर्स आणि बेड्सचा  तुटवडा जाणावर आहेत.

☘परदेशातील परिस्थितीचा अंदाज घेत भारतामधील एका कंपनीने स्वस्त बेडची निर्मिती केली आहे. गुजरातमधील वापी येथील आर्यन पेपर (Aryan Paper) कंपनीने फोल्ड होणारा आणि पूर्णपणे कार्डबोर्डपासून बनवलेल्या बेडची निर्मिती केली आहे.

☘तसेच कार्डबोर्डपासून बनवल्यामुळे हा बेड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे आणि तो तयार करणे अगदीच सोप्पे आहे. भविष्यामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये बेडचा तुटवडा निर्माण झाल्यास या बेडचा वापर करणे शक्य होणार आहे.तर या बेडचे वजन 10 किलोपेक्षा कमी आहे. असं असलं तरी या बेडवर 200 किलोपर्यंतचे वजन  ठेवता येऊ शकते असं कंपनीने म्हटलं आहे.

☘आपत्कालीन परिस्थितीमध्ये हा बेड वापरण्यात येण्याची शक्यता असल्याने या बेडवर विशेष प्रकारच्या रसायनांचे कोटींग करण्यात आलं असून त्यामुळे हा बेड सहज ओला होणार नाही. म्हणजेच एखादा द्रव पदार्थ सांडल्यास किंवा बेडच्या संपर्कात आल्यास, बेडच्या रचनेवर काही विशेष फरक पडणार नाही.

☘हा बेड तयार करण्यासाठी कोणतीही हत्यारे लागत नाही हेही या बेडचे वैशिष्ट्य आहे. शाळेमध्ये एखाद्या प्रोजेक्टदरम्यान जसं खाच्यांमध्ये अडकवून एखादे मॉडेल तयार केले जाते त्याचप्रमाणे हा बेड उभारता येतो. अवघ्या काही मिनिटांमध्ये कोणत्याही समजदार व्यक्तीला हा बेड तयार करता येईल इतके सोपे तंत्रज्ञान यामध्ये वापरण्यात आलं आहे.तर हा बेड पर्यावरणपुरक आहे.

☘म्हणजेच वापर झाल्यानंतर किंवा अती वापरामुळे खराब झाल्यास हा कार्डबोर्डने बनवला असल्याने त्याचे विघटन होते आणि त्यामुळे घन कचऱ्याची निर्मिती होत नाही.या बेडची किंमत 900 ते हजार रुपयांदरम्यान असून बेडच्या डिलेव्हरीचे वेगळे शुल्क कंपनीकडून आकारले जाईल असं सांगण्यात येत आहे. सध्या हे बेड गुजरात सरकार, मुंबई महानगरपालिका आणि भारतीय नौदलाला पुरवले जात आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था

🔹 जमीनदारांची संघटना १८३७ मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन 'लॅंड होल्डर्स असोसिएशन' या नावाची संस्था स्थापन केली. राजकीय...