Saturday 25 April 2020

चीन सीमेजवळ भारताचा नवा पूल, तोफांसह सैन्य वेगाने करु शकते कूच


- चीनच्या सीमेजवळ अरुणाचल प्रदेशमध्ये सुबानसिरी नदीवर बांधलेला पूल भारताने वाहतुकीसाठी खुला केला आहे. ४० टनापर्यंत भार पेलण्याची या पूलाची क्षमता आहे. त्यामुळे आपातकालीन परिस्थितीत या पूलावरुन तोफा नेता येतील तसेच सैन्य तुकडयांची जलदगतीने तैनाती करणेही शक्य होणार आहे.

- या पूलावरुन पुढच्या काही दिवसात भारत आणि चीनमध्ये शाब्दीक वादावादी होऊ शकते. सीमा भाग हा भारत आणि चीनमध्ये नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. अरुणाचलमधील हा पूल आणि सीमा भागात रस्त्याच्या दर्जामध्ये झालेली सुधारणा यामुळे सैन्याला आता विनाखंड आवश्यक साहित्याचा पुरवठा सुरु राहिल. रणनितीक दृष्टीकोनातून भारतासाठी हा पूल अत्यंत महत्वाचा आहे.

- भारताने शेजारी देशातून होणाऱ्या एफडीआय गुंतवणूकीसंदर्भात नियम अधिक कठोर केल्याने चीन भारतावर नाराज आहे. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर चिनी उद्योगांना भारतीय कंपन्यांचे सहजपणे अधिग्रहण करता येऊ नये, यासाठी एफडीआय नियमात काही बदल करण्यात आले आहेत.

- त्यावर चीनने आपला आक्षेप नोंदवला आहे. अरुणाचल प्रदेशवर चीन नेहमीच आपला दावा सांगत आला आहे. आता या पूलावरुन भारत-चीन संबंध आणखी बिघडू शकतात. भारताने आपले रणनितीक हित लक्षात घेऊनच या पूलाची उभारणी केली आहे. २०१७ साली डोकलामवरुन भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने आले होते.

- त्याच भागामध्ये हा पूल बांधण्यात आला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अजून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
---------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...