Saturday 25 April 2020

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज:आतापर्यंतची प्रगती..

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

💢प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत 33 कोटीहून अधिक गरीबांना 31,235 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली.

💢20.05 महिला जनधन खातेधारकांना   10,025 कोटी रुपये वितरित केले.

💢सुमारे 2.82 कोटी वृद्ध व्यक्ती, विधवा आणि अपंग व्यक्तींना 1405 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले.

💢पंतप्रधान-किसानचा पहिला हप्ता: 8 कोटी शेतकर्‍यांना 16,146 कोटी रुपये हस्तांतरित.

💢ईपीएफ योगदानाच्या रुपात 68,775 आस्थापनांमध्ये 162 कोटी रुपयांचे हस्तांतरण, 10.6 लाख कर्मचार्‍यांना लाभ;

💢2.17 कोटी इमारत बांधकाम कामगारांना 3497 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली.

💢प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना.

💢39.27 कोटी लाभार्थ्यांना अन्नधान्यांचे मोफत रेशन वाटप केले.

💢1,09,227 मेट्रिक टन डाळी  विविध राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना पाठवल्या

💢प्रधानमंत्री उज्ज्वला योजना: 2.66 कोटी मोफत उज्वला सिलिंडर वितरित.

💢कोविड -१९ मुळे घोषित लॉकडाऊनच्या प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी.

💢 केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन 26 मार्च 2020 रोजी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज (पीएमजीकेपी) अंतर्गत 33 कोटीहून अधिक गरीब लोकांना डिजिटल पेमेंट सुविधेचा वापर करून 22 एप्रिल 2020 पर्यंत 31,235 कोटी रुपयांची आर्थिक मदत थेट देण्यात आली.

💢पीएमजीकेपीचा एक भाग म्हणून, सरकारने महिला आणि गरीब ज्येष्ठ नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना मोफत अन्नधान्य आणि रोख रक्कम जाहीर केली. या पॅकेजच्या वेगवान अंमलबजावणीवर केंद्र आणि राज्य सरकारांकडून सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. 

💢अर्थ मंत्रालय, संबंधित मंत्रालये, कॅबिनेट सचिवालय आणि पंतप्रधान कार्यालय लॉकडाउनच्या अनुषंगाने गरजूंपर्यंत मदतपर उपाययोजना त्वरित पोहचवण्यासाठी कुठलीही कसर सोडत नाही.

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत 22 एप्रिल 2020 पर्यंत  पुढील आर्थिक सहाय्य (रोख रक्कम) लाभार्थ्यांना देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...