Saturday 25 April 2020

सूर्यप्रकाशात करोना विषाणू नष्ट होतात, अमेरिकन शास्त्रज्ञांचा मोठा दावा.


🌺करोनाचे विषाणू सूर्यप्रकाशात लगेच नष्ट होतात असा दावा अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केला आहे.

🌺मात्र हा रिसर्च अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी विभागाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार विल्यम ब्रायन यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सरकारी शास्त्रज्ञांनी अल्ट्राव्हायोलेट किरणांचा विषाणूंवर परिणाम होत असल्याचा शोध लावला आहे. यामुळे उन्हाळ्यात करोनाचा फैलाव कमी होईल अशी आशा निर्माण झाली आहे”.

🌺“आतापर्यंतचा सर्वात मोठं निरीक्षण करताना सूर्याची किरणं जमीन आणि हवेत दोन्हीकडे विषाणूंचा खात्मा करत असल्याचं लक्षात आलं आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. “तापमान आणि आर्द्रता अशा दोन्ही वेळेला आम्ही पाहणी केली असता तोच परिणाम होत असल्याचं आमच्या लक्षात आलं. तापमान आणि आर्द्रता वाढवणं करोनाच्या विषाणूंसाठी कमी अनुकूल आहे,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

🌺मात्र अद्याप हा रिसर्च सार्वजनिक करण्यात आलेला नाही. समिक्षा करण्यासाठी हा रिसर्च पाठवण्यात येणार आहे. यानंतरच तज्ज्ञ हा दावा कितपत खरा आहे याबद्दल सांगतील.

🌺अल्ट्राव्हायोलेट किरणांमध्ये निर्जंतुकीकरण प्रभाव असल्याचा दावा याआधी करण्यात आला आहे. तसंच प्रयोग करताना अल्ट्राव्हायोलेट किरणांची तीव्रता आणि तरंगलांबी कितपत ठेवण्यात आली होती, हा पण महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला करण्यात आला आहे. “प्रयोग कसा करण्यात आला आणि निकालाचे निकष काय होते हे पहावं लागेल,” असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...