Thursday 23 December 2021

जागतिकीकरण.

🅾 जागतिकीकरण म्हणजे स्थानिक वस्तूंची किंवा घडामोडींची जागतिक स्तरावर स्थानांतरणाची प्रक्रिया. ह्या संज्ञेचा उपयोग बहुधा आर्थिक जागतिकीकरणाच्या संदर्भात केला जातो.

🅾जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे जगाच्या अर्थव्यवस्थेबरोबर एकत्रीकरण करणे ,२० व्या शतकाच्या शब्दकोशानुसार जागतिकीकरण म्हणजे जगभर पसरणे ,एकाच वेळी संपूर्ण जगाचा किंवा जगातील सर्व लोकांचा विचार करणे ,त्यात व्यापार, विदेशी थेट गुंतवणूक, भांडवल प्रवाह, प्रवास आणि तंत्रज्ञान यांच्या प्रसाराच्या माध्यमाने राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थांसाठी खुले केले जाते.

🧩 विश्व बॅंकेच्या अहवालानुसार जागतिकीकरण म्हणजे-

  १) उपभोग्य वस्तुंसह सर्व वस्तुंच्या आयातीवरील नियंत्रण हळूहळू समाप्त होणे.

२) आयात शुल्काचा दर कमी करणे.

३) सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण करणे होय. दिपक नायर यांच्या मते, देशांच्या राजकीय सीमांमध्ये आर्थिक क्रियांचा विस्तार करणे म्हणजेच जागतिकीकरण होय. डॉ. यशवंत मनोहर यांच्या मते जागतिकीकरण म्हणजे जगातील वेगवेगळ्या देशांनी परस्पर व्यापार करणे होय.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠जागतिकीकरण म्हणजे.💠💠

१) ज्या ठिकाणी स्वस्त आणि रास्त कच्चा माल आणि इतर स्रोत उपलब्ध असतील , अशा जगातील कोणत्याही ठिकाणी उत्पादन घेणे .

२) जगातील कोणत्याही कोपऱ्यापर्यंत वस्तू आणि सेवा पुरविणे , संपूर्ण जग हीच बाजारपेठ असणे .

३)देशाच्या बृहतलक्षी घटकांपैकी 'परकीय
क्षेत्र हे सर्वात महत्त्वाचे क्षेत्र असणे .

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...