Friday 24 December 2021

राष्ट्रपतींची निवडणूक कशी होते ..

👉 भारताच्या राष्ट्रपतींची निवडणुक अप्रत्यक्ष निवडणुक पध्दतीने होते

१) संसदेची दोन्ही सभागॄहे व २) घटक राज्यांच्या विधानसभा यांतील निर्वाचित सदस्य राष्ट्रपतीची निवड करतात. (टिप  विधान परिषदातील सदस्यांना तसेच राज्यसभा व लोकसभा यांतील नियुक्त सदस्यांना राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार दिलेला नाही.)

👉 संसदेच्या दोन्ही गृहातील सदस्यांच्या मताचे मुल्य पुढील प्रमाणे ठरवितात.

👉 राष्ट्रपतींच्या निवडणूकीसाठी प्रमाणशीर क्रमदेय मतदान पध्दती किंवा एकल संक्रमणीय पध्दती स्वीकारली जाते.

👉 भारताचा राष्ट्रपती प्रमाणशीर प्रतिनिधीत्वाच्या गुपत मतदान पदतीने अप्रत्यक्षपणे निवडला जातो. त्यामुळे तो भारतातील सर्व जनतेचा प्रतिनिधी आहे. हे सिध्द होते. अशा प्रकारे भारतातील जनतेकडून (त्यांच्या प्रतिनिधीकडून) अप्रत्यक्षपणे राष्ट्रपतीची निवड होते.

👉२६ जाने. १९५० रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची हंगामी राष्ट्रपती म्हणून निवड झाली. तेव्हा पासून आता पर्यंत १३ वेळा राष्ट्रपती निवडणूक झाली आहे.

👉11 वे राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्द्ल कलाम हे होते.

👉भारताच्या १२ व्या राष्ट्रपती व पहिल्या महिला राष्ट्रपती – सौ. प्रतिभाताई पाटील.

👉 सद्याचे म्हणजे १३ वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आहेत

राष्ट्रपती पदाची पात्रता:-

👉 तो भारताचा नागरिक असावा

👉 त्याच्या वयाची ३५ वर्षे पुर्ण झालेली असावीत

👉 तो लोकसभेचा सदस्य म्हणुन निवडून येण्यास पात्र असावा

कार्यकाल:-

राष्ट्रपतीचा कार्यकाल ५ वर्षांचा असतो. कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो. संसद महाभियोगाद्वारे राष्ट्रपतीला पदावरुन दुर करु शकते.

राजिनामा:-

राष्ट्रपती आपला राजीनामा उप राष्ट्रपतींकडे देतो. राष्ट्रपतीच्या राजिनाम्यामुळे किंवा मृत्युमुळे ते पद रिकामे झाले तर उप राष्ट्रपती त्या पदाची सुत्रे हाती घेतो. परंतु सहा महिन्याच्या आत राष्ट्रपती पदाची निवडणूक घ्यावी लागते.

महाभियोग:-

कलम ६१ मध्ये महाभियोगाची कार्यपध्दती स्पष्ट केली आहे. संविधानाचा भंग केल्यास राष्ट्रपतींवर महाभियोगाची कारवाई होऊ शकते. संसदेच्या कोणत्याही सभागृहात राष्ट्रपतींवर निश्चित दोषारोप करणारा ठराव मंजूर केल्यास राष्ट्रपतीस पदावरून पायउतार व्हावे लागते.

निवडणुक:-

राष्ट्रपतीपदाची निवडणुक लढविण्यासाठी उमेद्वाराला 15  हजार रुपये अनामत म्हणून भरावे लागते. निवडून यावयाच्या आवश्यक असणा-या मतांच्या एक षष्ठांश मते प्राप्त झाली नाहीत तर ती अनामत रक्कम जप्त केली जाते.

राष्ट्रपतींचे वेतन व भत्ते:-

भारताच्या राष्ट्रपतीला दरमहा वेतन मिळते शिवाय इतर भत्ते, सुखसोयी व सवलती देण्यात येतात. भारतीय संसदेला राष्ट्रपतींचे वेतन आणि भत्ते ठरविण्याचा आधिकार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...