Tuesday 25 August 2020

जॅक कॅलिस, झहीर अब्बास यांचा ICC Hall of Fame मध्ये समावेश;📚दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस, पाकिस्तानचे माजी दिग्गज फलंदाज झहीर अब्बास आणि जन्माने पुण्याची असलेली ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार लिसा स्थळेकर यांचा ICC च्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या Hall of Fame मध्ये समावेश करण्यात आला आहे.

📚 ICC च्या व्हर्च्युअल कार्यक्रमात तिन्ही दिग्गज खेळाडूंना हा सन्मान देण्यात आला.
जॅक कॅलिसने दक्षिण आफ्रिकेकडून १६६ कसोटी, ३२८ वन-डे आणि २५ टी-२० सामने खेळले आहेत. १९९५ ते २०१४ या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत कॅलिस हा आपल्या अष्टपैलू खेळीसाठी ओळखला जायचा.

📚कसोटीत १३ हजार २८९ तर वन-डे क्रिकेटमध्ये ११ हजार ५७९ धावा खात्यात जमा असलेल्या कॅलिसने अनुक्रमे २९२ आणि २७३ बळी घेतले आहेत. कसोटी आणि वन-डे मध्ये १० हजारपेक्षा जास्त धावा आणि किमान २५० बळी घेणारा कॅलिस हा एकमेव खेळाडू होता.

📚करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आयसीसीने यंदा Hall of Fame चा सोहळा ऑनलाईन आयोजित केला. याव्यतिरीक्त ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल लिसा स्थळेकरचंही कौतुक करण्यात आलं.

📚लिसाने ऑस्ट्रेलियन संघाकडून ८ कसोटी, १२५ वन-डे आणि ५४ टी-२० सामने खेळले आहेत. याचसोबत आपल्या काळात आशियाचे ब्रॅडमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झहीर अब्बास यांचाही सन्मान करण्यात आला.

📚पाकिस्तानकडून ७८ कसोटी आणि ६२ वन-डे सामने खेळणारे अब्बास हे आपल्या बहारदार फलंदाजीसाठी ओळखले जायचे.

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...