Tuesday 25 August 2020

केरळ प्रथमच ‘चतुर’ महोत्सव साजरा करणार



🔸करळ राज्यात प्रथमच ‘चतुर’ (ड्रॅगनफ्लाय नावाचा कीटक) महोत्सव साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाला ‘थंबिमहोत्सवम् 2020’ असे नाव देण्यात आले आहे.

ठळक बाबी

🔸हा कार्यक्रम सप्टेंबर 2020 या महिन्यात आरंभ होण्याचे नियोजित आहे. जानेवारी 2021 या महिन्यात होणाऱ्या ‘राज्य चतुर शिखर परिषदेत या कार्यक्रमाची सांगता होणार.

🔸या काळात समाजातल्या विविध घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यक्रमांची मालिका सादर केली जाणार आहे. लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि त्यांचे निरीक्षण कौशल्य सुधारण्यासाठी ‘ड्रॅगनफ्लाय बॅकयार्ड वॉच’ नावाचा एक कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे.

🔸सोसायटी फॉर ओडोनेट स्टडीज आणि थंबिपुरनम या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने WWF-इंडिया या संस्थेच्या केरळ शाखेच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

🔸हा कार्यक्रम राष्ट्रीय जैवविविधता मंडळ, संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम, संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम आणि IUCN-CEC या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने WWF इंडिया, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि इंडियन ड्रॅगनफ्लाय सोसायटी या संस्थांच्यावतीने संयुक्तपणे आयोजित केल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय चतुर महोत्सव’चा एक भाग आहे.

चतुर कीटकाविषयी

🔸सधिपाद संघाच्या ओडोनेटा गणातला एक कीटक आहे. याचे शास्त्रीय नाव “क्रोकोथेमिस एरिथ्रा” असे आहे. ‘चटकचांदणी’ नावानेही चतुर हा कीटक ओळखला जातो.

🔸जगभरात त्यांच्या सुमारे 5500 जाती असून त्यांपैकी जवळपास 500 जाती भारतात आढळतात.

🔸कीटकाचे डिंभ जलचर असल्यामुळे ते तलाव, ओढे, डबकी किंवा पाणथळ जागांच्या आसपास तसेच झाडाझुडपांवर वर्षभर आढळतात.

🔸चतुराचे शरीर सुमारे 19 मि.मी. लांब असून त्याचे डोके, वक्ष आणि उदर असे तीन भाग असतात. डोक्यावर दोन लहान शृंगिका व मोठ्या मण्यासारखे दोन संयुक्त डोळे असतात. दोन्ही डोळ्यांत मिळून सुमारे 30 हजार नेत्रिका असतात. प्रत्येक नेत्रिकेत एक भिंग असते. त्यामुळे चतुराला निरनिराळ्या बाजूंचे दिसते.

🔸चिलटे, मिज माश्या व डास यांसारखे लहान कीटक त्यांचे भक्ष्य आहे. मोठे चतुर डास, गोमाशी व घोडामाशी यांना खात असल्यामुळे त्यांना उपयुक्त कीटक मानतात.

🔸मादी एका वेळेस शेकडो ते हजारो अंडी घालते. अंड्यातून बाहेर येणाऱ्या पंखहीन अर्भकांचे भक्ष्य पाण्यातले कीटक, अळ्या, लहान मासे व डिंभ हे आहे. त्यांच्यामुळे डासांची संख्या नियंत्रित होण्यात मदत होते.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...