२६ ऑगस्ट २०२०

हे लक्षात ठेवा :- देशातील 10 अस्वच्छ शहरे

नागरी स्वच्छता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्राने या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशात सर्वाधिक चार, तर अन्य विभागांतील 13 असे एकूण 17 पुरस्कार मिळवून ‘हॅट्ट्रिक’ साधली आहे.

तर दुसरीकडे सर्वाधिक अस्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल दहापैकी सहा शहरे बिहारमधील असल्याची माहिती समोर आली आहे.

🛑 10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या सर्वात अस्वच्छ शहरांची यादी

🔟 अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये दहाव्या स्थानी आहे बिहारमधील साहारसा हे शहर.

9️⃣ बिहारमधीलच बिहार शरीफ शहर नवव्या स्थानी आहे.

8️⃣ आठव्या स्थानी आहे नागालँण्डमधील दिमापूर एमसी हे शहर.

7️⃣ अरुणाचल प्रदेशमधील इटानगर हे या यादीमध्ये सातव्या स्थानी आहे.

6️⃣ मेघालयमधील शिलाँग शहर अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये सहाव्या स्थानी आहे.

5️⃣ अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये पाचव्या स्थानी आहे परसा बाजार. हे शहर बिहारमध्ये आहे.

4️⃣ चौथ्या स्थानी बिहारमधील भागलपूर शहर आहे.

3️⃣ तिसऱ्या स्थानी पंजाबमधील अबोहार शहर आहे.

2️⃣ दुसऱ्या स्थानी बिहारमधील बक्सर शहर आहे.

1️⃣ सर्वात अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये बिहारमधील गया शहर अव्वल स्थानी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...