११ ऑक्टोबर २०२०

असहकार चळवळ


◾️ 1920 सालच्या नागपूर अधिवेशनात राष्ट्रीय सभेने गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीच्या कार्यक्रमास मान्यता दिली.

➡️ तयात पुढील बाबींचा समावेश होता.

1) सरकारी नोकर्‍या व पदव्या यांचा त्याग करणे.

2) सरकारी सभा समारंभावर बहिष्कार टाकणे.

3) सरकारी शाळा- महाविदयांलयातून मुलांना काढून घेऊन त्यांना राष्ट्रीय शिक्षण संस्थांत दाखल करणे

4) सरकारी कोर्ट्सकचेर्‍यांवर बहिष्कार घालणे.

5) प्रांतिक निवडणुकांवर बहिष्कार टाकणे.

6) परदेशी मालावर बहिष्कार टाकणे व स्वदेशी मालाचा वापर करणे.

7) दारूबंदीचा प्रचार व दारूच्या दुकानांसमोर निदर्शने करणे.

◾️ असहकार आंदोलनास भारतीय जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

◾️  शासनाने दडपशाहीचे धोरण स्वीकांरताच गांधीजींनी सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.

◾️ चौरीचौरा येथे चळवळीला हिंसक वळण लागल्याने ऐन जोमात आलेली असहकारची चळवळ मागे घेण्याचा निर्णय गांधीजीनी 5 फेब्रुवारी, 1922 रोजी घेतला.

🟢 विधायक कार्यक्रम :-

◾️ गांधीजीनी असहकाराच्या चळवळीला विधायक कार्यक्रमाची जोड दिली.

◾️ तयामुळे राष्ट्रीय चळवळ ग्रामीण भागात पोचली व तिला जनाधार प्राप्त झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...