Thursday 22 October 2020

रोजर पेनरोज, रीनहार्ड गेंजेल आणि एंड्रिया गेज: भौतिकशास्त्रासाठी 2020 नोबेल पुरस्काराचे विजेते.


♓️भौतिकशास्त्रासाठी ‘2020 नोबेल’ पुरस्काराची घोषणा झाली; यावर्षी रोजर पेनरोज (ब्रिटिश), रीनहार्ड गेंजेल (जर्मनी) आणि एंड्रिया गेज (अमेरिका) यांना नोबेल दिला जाणार आहे.


♓️रोजर पेनरोज यांना अल्बर्ट आइंस्टीन यांच्या ‘सापेक्षतेचा सिद्धांत’ याबाबतची माहिती मिळवण्यासाठी गणिती पद्धत तयार केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जात आहे. तर, रीनहार्ड गेंजेल आणि एंड्रिया गेज यांना एकत्रितपणे कृष्णविवर आणि आकाशगंगा याचे रहस्य उलगडण्यासाठी पुरस्कार दिला जात आहे.


✴️नोबेल पुरस्काराविषयी....


♓️नोबेल पुरस्कार हे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि मानवी प्रगतीला वरदान ठरलेल्या वैज्ञानिक संशोधनामध्ये योगदान दिलेल्या लोकांचा सन्मान करण्यासाठी स्वीडनच्या आणि नॉर्वेच्या संस्थांकडून विविध श्रेणीमध्ये देण्यात येणारा एक वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.


♓️नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशन यांच्यावतीने दिला जातो. डायनामाइटचा शोध लावणारे       स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ 1895 सालापासून हा पुरस्कार दिला जातो. त्यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच 10 डिसेंबरला हे पुरस्कार दिले जातात. वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये नोबेल दिले जाते. स्टॉकहोम (स्वीडन) या शहरातल्या रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेच्या वतीने ‘स्वेरिगेस रिक्सबँक प्राइज इन इकनॉमिक सायन्सेस इन मेमरी ऑफ अल्फ्रेड नोबेल’ हा पुरस्कार दिला जातो.खाली पुरस्काराचा विषय आणि पुरस्कार देणारी संस्था यांच्या जोड्या दिल्या आहेत:


♓️भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र: रॉयल स्वीडीश अकादमी ऑफ सायन्सेस, स्वीडन

शरीरशास्त्र आणि वैद्यकीय शास्त्र: करोलीन्स्का इंस्टीट्यूट येथील नोबेल असेंब्ली, स्वीडन

साहित्य: स्वीडिश अकादमी, स्वीडन

शांती: हे पुरस्कार स्वीडनच्या संस्थेच्यावतीने नॉर्वे या देशातल्या नॉर्वेजियन नोबेल समितीकडून दिले जाते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...