२२ ऑक्टोबर २०२०

चंद्रावर 4G नेटवर्क स्थापित करण्यासाठी ते एक एतिहासिक योजना.



🏞 अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आणि जगातील आघाडीची मोबईल आणि नेटवर्क क्षेत्रातील कंपनी नोकिया यावर काम करीत आहेत.


🏞 चद्रावर 4G नेटवर्क स्थापित करण्यासाठी ते एक एतिहासिक योजना आखत आहेत.


🏞 नोकियाची संशोधन शाखा असलेली ‘बेल लॅब्ज’ या कंपनीला नासाने चंद्रावर अॅडव्हान्स्ड टिपिंग पॉईंट तंत्रज्ञानाद्वारे मोबाईल नेटवर्क निर्माण करण्याच्या कामासाठी प्रमुख पार्टनर म्हणून निवडले आहे.


🏞 या प्रकल्पासाठी 14.1 मिलियन डॉलरचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे.


🏞 याद्वारे चंद्रावर पहिले वायरलेस नेटवर्क प्रस्थापित करण्यात येणार आहे. 4G/LTE तंत्रज्ञानापासून याला सुरुवात होणार असून ते 5G तंत्रज्ञानामध्ये देखील रुपांतरीत करण्यात येणार आहे.


🏞 आपल्या या महत्वाकांक्षी योजनेबाबत बोलताना नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “चंद्रावर 4G/5G नेटवर्क स्थापित करण्यासाठी आम्हाला टेरेस्ट्रियल टेक्नॉलॉजीने प्रेरित केले आहे.


🏞 यासाठी प्रथम नोकियाने LTE/4G संप्रेषण प्रणाली अंतराळात तैनात करण्याचा प्रस्ताव ठेवला.”


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...