साहित्य आणि शांती यासाठी नोबेल पुरस्कार 2020


🔰साहित्य आणि शांती यासाठी नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.


🔰नोबेल शांती पुरस्कार 2020 याचे विजेता - संयुक्त राष्ट्रसंघाचा जागतिक खाद्यान्न कार्यक्रम (World Food Programme)


🔰साहित्यासाठी नोबेल पुरस्कार 2020 याचे विजेता - लुईसे ग्लूक (अमेरिकेची कवयित्री)


🚦जागतिक खाद्यान्न कार्यक्रमाविषयी...


🔰जागतिक उपासमार संपुष्टात आणण्यासाठी आणि खाद्यान्न सुरक्षितेला प्रोत्साहन देणारी ही सर्वात मोठी संघटना आहे.


🔰ती एक आंतरसरकारी संस्था आहे. त्याची स्थापना 01 जानेवारी 1961 रोजी झाली. रोम (इटली) या शहरात त्याचे मुख्यालय आहे.


🔰यद्ध-संघर्षग्रस्त भागातील परिस्थिती सुधारण्यासाठी आणि उपासमारीला रोखण्यासाठी जागतिक खाद्यान्न कार्यक्रमाने मोलाची कामगिरी बजावली आहे. जागतिक खाद्यान्न कार्यक्रमाने 2019 साली 88 देशांतल्या जवळपास 100 दशलक्ष लोकांना मदत केली आहे.


🚦नोबेल पुरस्काराविषयी...


🔰नोबेल पुरस्कार हे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि मानवी प्रगतीला वरदान ठरलेल्या वैज्ञानिक संशोधनामध्ये योगदान दिलेल्या लोकांचा सन्मान करण्यासाठी स्वीडनच्या आणि नॉर्वेच्या संस्थांकडून विविध श्रेणीमध्ये देण्यात येणारा एक वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.


🔰नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशन यांच्यावतीने दिला जातो. डायनामाइटचा शोध लावणारे       स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ 1895 सालापासून हा पुरस्कार दिला जातो. 


🔰तयांच्या पुण्यतिथीला म्हणजेच 10 डिसेंबरला हे पुरस्कार दिले जातात. वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये नोबेल दिले जाते. 


🔰सटॉकहोम (स्वीडन) या शहरातल्या रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेच्या वतीने ‘स्वेरिगेस रिक्सबँक प्राइज इन इकनॉमिक सायन्सेस इन मेमरी ऑफ अल्फ्रेड नोबेल’ हा पुरस्कार दिला जातो.


🔰खाली पुरस्काराचा विषय आणि पुरस्कार देणारी संस्था यांच्या जोड्या दिल्या आहेत:


🔰भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र: रॉयल स्वीडीश अकादमी ऑफ सायन्सेस, स्वीडन


🔰शरीरशास्त्र आणि वैद्यकीय शास्त्र: करोलीन्स्का इंस्टीट्यूट येथील नोबेल असेंब्ली, स्वीडन


🔰साहित्य: स्वीडिश अकादमी, स्वीडन

शांती: हे पुरस्कार स्वीडनच्या संस्थेच्यावतीने नॉर्वे या देशातल्या नॉर्वेजियन नोबेल समितीकडून दिले जाते.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे प्रश्नसंच

241. ————— हा दिवस ‘जागतिक हिवताप दिन’ म्हणून साजरा केला जातो. A. 25 मार्च B. 25 एप्रिल C. 25 जून D. 25 जुलै ANSWER: B. 25 एप्रिल 242...