Sunday 4 October 2020

कोरोना रूग्ण बरे होण्याच्या जागतिक क्रमवारीत भारत अव्वल:-


📚कोविड-19 महामारीविरुद्ध भारत अतिशय सक्षमतेने लढा देत आहे. कोरोना रूग्ण बरे होण्याच्या जागतिक क्रमवारीमध्ये भारत अव्वल स्थानी असून, हे स्थान देशाने कायम राखले आहे. 


📚रग्ण बरे होण्याच्या  आकड्याने आज 54 लाखांचा टप्पा (54,27,706) ओलांडला आहे. बरे झालेल्या रूग्णांचे जागतिक पातळीवरचे प्रमाण 21 टक्के आहे, तर  त्या एकूण रूग्णांमध्ये भारताचे हे प्रमाण 18.6 टक्के आहे.


📚इतर अनेक देशांच्या तुलनेत भारताचा कोविड मृत्यूदर कमी असून भारताने जागतिक क्रमवारीत आपले स्थान कायम राखले आहे.


📚जागतिक स्तरावर कोविड मृत्यूदर 2.97 टक्के आहे तर भारताची तुलनात्मक आकडेवारी 1.56 टक्के आहे.


📚जगामध्ये सर्वात कमी मृत्यूदर असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. भारतामध्ये दर दशलक्ष लोकसंख्येमागे 73 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर जगामध्ये सरासरी दर दशलक्ष लोकसंख्येमागे 130 जणांचा मृत्यू होत असल्याची नोंद आहे.


📚भारतामध्ये मोठया संख्येने कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून गेल्या 24 तासांमध्ये 75,628 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत.

एका दिवसात जास्त संख्येने रूग्ण बरे होत असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावरचे रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. सध्या हा दर 83.84 टक्के आहे.


📚गल्या चोवीस तासांमध्ये बरे झालेल्या कोरोनारूग्णांपैकी 74.36 टक्के रूग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त रूग्ण असून त्या खालोखाल आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमधल्या रूग्णांचा समावेश आहे.


📚10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जवळपास 77 टक्के सक्रिय रूग्ण आहेत. यामध्ये सर्वात जास्त रूग्ण म्हणजे  2.6 लाख रूग्ण महाराष्ट्रात आहेत.

देशामध्ये आज सक्रिय रूग्णांचे प्रमाण 14.60 टक्के आहे.


📚सलग 12 व्या दिवशी भारतामध्ये सक्रिय रूग्णांची संख्या 10 लाखांपेक्षा कमी आहे. देशात आज सक्रिय रूग्णांची संख्या 9,44,996 आहे.


📚गल्या 24 तासांमध्ये देशात 79,476 नव्या रूग्णांची नोंद झाली.

नव्या रूग्णांपैकी 78.2 टक्के रूग्ण 10 राज्ये आणि  केंद्रशासित प्रदेशातले आहेत.


📚महाराष्ट्रामध्ये जवळपास 16,000 नवीन रूग्णांची नोंद झाली. मात्र हे प्रमाण आधीपेक्षा कमी आहे. नवीन रूग्णनोंदीमध्ये केरळ दुस-या स्थानावर असून या राज्यात 9,258 नवीन रूग्ण आढळले. तर तिस-या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकमध्ये नवीन 8000 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे.


📚24 तासांमध्ये 1,069 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

गेल्या 24 तासांत मृत्यू पावलेल्यांमध्ये 84.1 टक्के 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले रूग्ण आहेत.

📚कालचा महाराष्ट्राचा मृत्यूदर 39.66 टक्के आहे. महाराष्ट्रात काल 424 जणांचा मृत्यू झाला, त्याखालोखाल कर्नाटकमध्ये 125 जणांना प्राण गमवावे लागले.

No comments:

Post a Comment

Latest post

सहकार

   11th सहकार  :- Click Here 12th सहकार  :- Click Here