०५ ऑक्टोबर २०२०

काकोरी कट (Kakori conspiracy)



◾️9 ऑगस्ट 1925


◾️लखनौ ते सहारनपूर दरम्यान काकोरी


◾️सहभाग:- चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, मन्मथनाथ गुप्ता, अशफाक उल्लाखान, राजेंद्रनाथ लाहिडी, रोशनलाल इत्यादी क्रांतिकारक अग्रणी होते. (एकून 10 जणांचा समावेश) 


◾️बरिटिशांच्याविरुद्ध सशस्त्र लढा देण्याच्या हेतूने काकोरी (उत्तर प्रदेश) येथे घडवून आणलेला प्रसिद्ध क्रांतिकारी कट.


◾️सरकारी पोस्ट कार्यालयांमध्ये जमा झालेला पैसा रेल्वे मार्गाने जाणार असल्याची माहिती क्रांतिकारकांना मिळाली


◾️लखनौ ते सहारनपूर मार्गावर लखनौपासून आठ मैल अंतरावर असलेल्या काकोरी या गावाजवळ सशस्त्र क्रांतिकारकांनी रेल्वे थांबवून त्यातील खजिना लुटावा अशी योजना आखली.


◾️ 9 ऑगस्ट 1925 रोजी क्रांतिकारक सरकारी खजिना घेऊन जाणाऱ्या रेल्वेच्या डब्यात जाऊन बसले. रेल्वे आडवळणी अशा काकोरी स्थानकाजवळ येताच त्यांनी साखळी ओढून रेल्वे थांबविली


◾️रामप्रसाद बिस्मिल यांनी चैन खेचुन रेल्वे थांबवली


◾️कवळ दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही नियोजित लूट यशस्वी केली. या घटनेलाच ‘काकोरी कट’ असे म्हणतात.


◾️या कटात जवळपास 8000 रुपये लुटले


◾️काकोरी खटल्याचे कामकाज एप्रिल १९२७ पर्यंत चालले.


◾️यामधील रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्लाखान, रोशनलाल व राजेंद्रनाथ लाहिडी यांना फाशी दिली


◾️कारस्थानांमध्ये सहभागी असलेले चंद्रशेखर आझाद ब्रिटिशांना गुंगारा देऊन भूमिगत राहिले.


◾️सशस्त्र क्रांती करण्याच्या उद्देशाने चंद्रशेखर आझाद यांनी ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोशिएशनʼ या जुन्या संस्थेचे ‘हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोशिएशनʼ असे नामकरण करून क्रांतिकार्य चालू ठेवले.

माहीती संकलन:- सचिन गुळीग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...