Saturday 14 November 2020

हयुमिक अँसिड



☘️१५ कारणे का वापरावे पिकांसाठी ह्युमिक अँसिड☘️


☘️सद्रिय शेतीचे महत्त्व आता सर्वांनाच समजले आहे. परंतु हि शेती अधिक कार्यक्षम पद्धतीने कशी करु शकतो हे शेतक-याने जाणुन घेणे खुप महत्वाचे आहे. सेंद्रिय शेती अधिक फायदेशिर करण्यासाठी शेतीसाठी लागणारे आवश्यक घटकांचा म्हणजेच माती, पाणी, हवा यांचा अधिक प्रभावीपणे वापर कसा करता येईल ते पहाणे गरजेचे आहे. यासर्व घटकांचा पुरेपुर वापर करण्यासाठी ह्युमस /ह्युमिक अँसिडचा वापर करणे आवश्यक आहे. ह्युमिक अँसिडचा वापर करणे प्रत्येक शेतक-यासाठी अनिवार्यच झाले आहे.


☘️हयुमस /ह्युमिक अँसिड?☘️


ह्युमस म्हणजे सेंद्रिय घटक म्हणजेच  पालापाचोळा, जनावरांची विष्टा, शेतातील इतर सेंद्रिय पदार्थ यांच्या विघटनातुन तयार होणारा पदार्थ आहे. हा पदार्थ म्हणजे अनेक सेंद्रिय घटकांचे मिश्रण असुन हे पिकांच्य सर्वांगिण वाढीसाठी अतिशय आवश्यक आहे.


☘️हयुमिक अँसिडचे गुणधर्म☘️


☘️हयुमिक अँसिड हे खत नसुन यात अतिशय अल्प प्रमाणात सुक्ष्म व मुख्य अन्नद्रव्ये असुन मातीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारणारे भुसुधारक आहे.हे मानवनिर्मीत नसुन पुर्णपणे नैसर्गिक पदार्थ आहे.ह्युमिक अँसिडमध्ये कार्बनचे प्रमाण अधिक असुन हायट्रोजन अतिशय अल्प प्रमाणात असतो. तसेच त्यात ४% पर्यंत नत्र असते.ह्युमिक अँसिड हे मुख्य करुन पावडर, दाणेदार स्वरुपात तसेच द्रवरुपातही वापरता येते.


☘️हयुमिक अँसिडचे फायदे ☘️


☘️हयुमिक अँसिडमुळे मातीची रचना सुधारते तसेच पिकाची नत्र, स्फुरद, पालाश शोषण्याची क्षमता ही सुधारते.

☘️मातीचा सामु स्थिर ठेवण्यास फायदेशिरनत्र स्थिरिकरण क्षमतेला चालना देऊन मातीतील नत्राची कमतरता भरुन काढते.ह्याचाच परिणाम त्या मातीतील पीक सशक्त व टवटवीत रहाण्यास फायदेशिर ठरते.

☘️हयुमिक अँसिडचा वापर केल्यास पिकांसाठी आवश्यक असणा-या बुरशींची वाढ होऊन ह्या बुरशीमुळे मातीपासुन उद्भवणारे रोगांपासुन संरक्षण मिळण्यास मदत होते.

☘️हयुमसयुक्त मातीमधील जलधारण क्षमता साधारण मातीच्या सातपट अधिक असते म्हणुनच दुष्काळयुक्त भागात ह्युमिक अँसिडचा वापर खुप महत्वाचा आहे.

☘️जमिन हलकी होउन त्यात हवा खेळती राहते व मुळांची वाढ चांगली होते.याच्या वापरामुळे जमिनीतील स्फुरद, कल्शिअम, लोह यांचे उपलब्ध रुप तयार होते व पिकास हि अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरुपात मिळतात.

☘️बीजप्रक्रिया म्हणुन वापर केल्यास बियांची उगवण चांगली होण्यास मदत होते.

☘️हयुमिक अँसिडच्या वापरामुळे जिवाणुंना कार्बन पुरविला जातो व त्यामुळे जिवाणुंची संख्या वाढते.सोडियम व इतर विषारी रसायनांपासुन मातीवर होणारे दुष्परिणाम थांबवण्यास हे अतिशय उपयोगी पडते.

☘️यरिया तसेच इतर रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिन नापिक होण्यापासुन वाचवते.रासायनिक खतांची कार्यक्षमता ३०% पर्यंत वाढवते त्यामुळे खतांचा खर्च कमी येतो.

☘️सर्वात महत्वाचे म्हणजे पिकांच्या पांढ-या मुळींची वाढ जलद होते.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 22 एप्रिल 2024

◆ केकी मिस्ती यांची HDFC लाइफ इन्शुरन्स बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ 6 वर्षांच्या तक्षवी वाघानीने 25 मीटरपेक्षा कमी अ...